उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खूप घाम येतो.. उन्हाळा, दमट हवा माझे एक नंबरचे शत्रू. आंघोळीनंतर हजारवेळा तोंड पुसलं तरी ते पाझरत राहतं. ऑफिसला जाताना मी फक्त टोनर लावून बाहेर पडते, तरीही साधारण अर्ध्या-पाऊण तासाने पाझर तलाव बंद होतो. ह्यावर काय उपाय?

मंजुडी... बिच्चारी गं तु.... Happy हल्ली तर इतके उन आहे बाहेर, गरम वाफा येताहेत अंगावर, कसे होणार तुझे? मागे अलोए वेरा जेलने फरक पडलेला असे लिहिलेलेस ना?

मंजुडी, स्नान झाला नं, की गुलाबपाण्याचे ४ थेंब कापसावर घेउन चेहर्यावर फिरव, मग compact powder लाव! किंवा चेहर्यावर बर्फ फिरवुन, चेहरा किन्चित कोरडा झाला की compact powder लावलास न तरिही फरक पडेल... माझ्या जीवलग मैत्रिणीला फायदा झालाय ह्या उपक्रमाचा.... Happy Try Once!!

मंजु, कितीही काही कर मुंबईत हे होतच रहाणार.
अधून मधून शक्य तितके वेळा नुसत्या गार पाण्याने चेहरा धुवायचा आणि वरून पाहिजेतर गुलाबपाणी टोनर ऐवजी लावायचे. एवढंच कर.
घाम पुसताना खसा खसा पुसू नकोस टिप केवळ. तोंड धुताना मात्र खसखसून धुवायचं.

ओके Happy

मंजू, चेहर्‍यावर बर्फ फिरवण्याचा उपाय वाचलाय बर्‍याच ठिकाणी!!! ट्राय करून बघ!

मला पण हा घामाचा प्रॉब होतो... आणि विचार कर आमचं लग्न तर भर उन्हाळ्यात मिड एप्रिलमध्ये ते पण खुद्द कोंकणात झालेलं!!! तिथे लोड शेडिंगचा प्रॉब!!! Sad
माझ्या मेकअप वालीला सांगितलेलं, जास्त लालेलाल चेहरा करू नको नी नॅचरल मेकअपच ठेव फ्रेश! ती खरंच खूप हुशार होती... एकदम फ्रेश आणि नॅचरल मेकअप केलाय, कुठेही लाऊड वाटला नाही.. असो हे उगाच आपलं अवांतर!! Happy

तर मलाही हा अती घामाचा प्रॉब्लेम आहे... (नुसताच घाम येतो फोपशेपणामुळे, दुर्गंधीवाला नाही अज्जिबात!!)) पण त्यामुळे स्कीन तेलकट वाटत राहते... जवळ डव चा फेसवॉश ठेवते... दिवसातून २-३ फेर्‍या असतात LR मध्ये!!! Happy

आता वाटीकाचा चंदन फेसपॅक आणलाय. रात्री लावते... सुकला की धुवून टाकते... छान वाटतोय! बघ जमलं तर ट्राय करून. त्याने अगदी कोरडापण नाही होत चेहरा!

र॑गप॑चमीला आमच्याकडे खुप भ॑यकर र॑ग वापरतात. होळी खेळुन झाल्यावर तो र॑ग काढताना खुप काही प्रकार करावे लागतात जसे की रॉकेल वैगर लावुन र॑ग काढायचा प्रयत्न. त्यामुळे चेहयावर त्या॑च्या परिणाम होतो. होळीमुळे चेहरा आणि केसाचे हाल बघवत नाही. यावर काही उपाय असेल तर सा॑गा.

रंग खेळायच्या आधी चेहर्‍याला, केसाला भरपूर खोबरेल तेल चोपडणे. नंतर काहीही कष्ट पडत नाहीत. स्किन नीटच राहते. रंग लावणार्‍यांनाही नकोसे वाटते ही जमेची बाजू! Wink

शक्यतो नैसर्गिक रंगांनी रंग खेळायचा प्रयत्न करा. हल्ली फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग मिळतात बर्‍याच ठिकाणी. पण अर्थातच हेच रंग दुसरे तुम्हाला लावतिल याची खात्री देता येत नाही.

आशूनी दिलेल्या युक्तीचा खूप उपयोग होतो. Happy

आमच्या भागात बहुतांशी कोरड्या रंगांनी, गुलालाने रंग खेळतात आणि अंगावर रंगित पाण्याच्या बादल्या टाकतात. पण आपल्याकडे जसं रंग पाण्यात कालवून /ओला करुन चेहर्‍याला फासतात तसं करत नाहीत. त्यामूळे अंगावरचा आणि कपड्यांवरचा रंग /गुलाल अगदी आरामात निघतो. Happy

तुरटी लावल्यावर त्वचा कोरडी पडते, पण धुवून टाकल्यावर क्रीम लावायच.

कोणाला फ्रेकल्स घालवण्यासाठी / फिकट करण्यासाठी काय करायचं माहित आहे का. माझ्या चेहर्‍यावर फ्रेकल्स आहेत, १० वर्षापूर्वीपासून थोडे थोडे होते, आता जरा वाढलेत. मला आजिबात आवडत नाहीत, इथे डॉक्टरांकडं गेले होते तर ते म्हणाले काही उपाय नाही.

प्रिय मैत्रिणिंनो.....
रंग अज्जिब्बात न खेळ्ण्याचं ठरवलं होतं, त्यामुळे कसलीच तयारी नव्हती, पण अचानक, ह्यांचे मित्र आणि त्यांच्या श्रीमती येउन हल्लाबोल केला... कोरड्याच रंगांचा वर्षाव केला, पण चेहर्यावर Rash आलेत (मी छान cleansing करुन बसले होते) .... :-(( .... काही झटपट relief सुचवा प्लीज..... लाल्-लाल गाल झालेत Sad

होळी खेळुन झाल्यावर तो र॑ग काढताना खुप काही प्रकार करावे लागतात
>>
वर सगळ्यांनी सांगितल्यानुसार तेल, वॅसलिन जेलीने खुप फरक पडतोच. तरीही कलर जात नसेल तर क्लिन्सींग मिल्क चोळावं चेहर्‍याला आणि साध्या कॉटनच्या कपड्याने चेहरा पुसावा. लगेच निघुन जातो रंग. (ट्राईड & टेस्टेड फॉर्मुला )

बागेश्री, योडी ने सुचवल्याप्रमाणे क्लिंजींग मिल्कने हळूवारपणे पुसून काढ. घासू-चोळू नको... २ दिवस जमलं तर सौम्य साबण लाव चेहर्‍याला. आणि उर्जीता जैनचं कोरफड जेल (फ्रीज मध्ये थोडा वेळ ठेऊन थंड केलेलं असेल तर अधिकच चांगलं) हळू हळू चोळ. रॅश कमी येइल.

Thanks योडी आणि Dreams.....
अगं, कोरफड जेल आहे घरी पण नाही suit होत मला... आणि रंग गेलाय गं, पन रॅश खूप आहे...

कुंकुमादी तेल खरच छान आहे. आईला एका छोट्या अपघातामुळे चेहर्‍यावर डाग आला होता.पण एकाच दिवसात खूप फरक पडलाय आणी चेहरा पण उजळलाय असं आई सांगत होती. बोरीवलीला श्रीजी आयुर्वेदीक दुकान आहे,तिथे मिळाले तेल आईला. १० मिलीची बाटली १५० रुपये. पण वर्थ ईट असं चक्क माझी आई सांगत होती Happy
उद्या मला पण भेटेल वापरायला,मग माझा रीव्यु सांगेन.

माझी ही चेहरयावरची त्वचा काळी पडली आहे. त्यावर काही उपाय. कुंकुमादी तेलाचा वापर केला तर चालेल का? त्याने त्वचा उजळेल का?

अगदी अगदी, मी पण आणलय कुकूंमादितैलम, सुरुवात केलीय लावायला... खरोखरच फरक पडतोय.... Happy

कुकूंमादितैलम त्वचेत पुर्णपणे जिरते.... आणि ते झोपण्याआधी स्वच्छ धुतलेल्या चेहर्यावर लावावे...

क्रुती:
१) तेलाचे थेंब हातावर घेउन, चेहर्यावर लावत तेल त्वचेत जिरवयचं
२) कोरडी त्वचा असलेल्यांनी ५/६ थेंब घ्यावेत
३) तेलकट त्वचा असलेल्यांनी २/३ थेंब घ्यावेत
४) तेल रात्रभर ठेवायचं चेहर्यावर
५) सकाळी (ब्रश च्या वेळी :-)) चेहरा गार पाण्याने धुवावा...

immediate effect सुरु होतो..... महिन्यभरात तर ट्यनिंग, काळे डाग, पिम्पल्स असं सगळं "गायब" होतं

Pages