केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_सखी उदवण्यासाठी ऊद वापरतात त्याने केस निर्जंतुक होतात आणि वासही छान येतो. कोंडा, उवा यावर खात्रीशीर उपाय आहे.
माझ्या कोंड्यासाठी मी खूप उप्चार करून दमले होते पण बालाजी तांबेंचं तेल आणि रामदेव बाबांचा शाम्पु असं कॉम्बिनेशन वापरून माझा कोंडा पूर्ण गायबला आहे हुर्रे

हम्म्म्....अस आहे होय. मला वाटत होत कि ह्याने केस वाढायला वैगरे मदत होते कि काय्....पण तसेहि केस निर्जंतुक झाल्यावर वाढ जास्त प्रमाणात होत असावी.

हा "ऊद" कुठे मिळतो? लेकीसाठी वापरायचा विचार आहे.

संत्र्याच्या सालीच पाणी केसांवर ओप्तुन झालं की परत साधं पाणी घ्यायच का वरुन. म्हणजे कंडिशनर जस मग साध्या पाण्यानी धुतो तसं? की शेब्वटच पाणीच संत्र्याच घायच?

उदवण्यासाठी ऊद वापरतात

म्हणजे आपण देवपुजेला वापरतो तो धुप ना? अर्थात त्याच्यातही ब-याच क्वालीटी आहेत, पण केस उदवायला तोच वापरायचा ना?

इतक्या दिवसांनंतर आता या रविवारी दादरला जायचा योग येईल अशी आशा वाटतेय. आवळा पावडर घेऊन येईन आणि करेन सुरवात रोज लेप लावायची Happy

माझे केस खुप कुरळे होते मेंदी लावलावुन ते आता सरळ झाले..

पण खुशी हा उपाय नाहीय हं. मी सरळ होण्यासाठी मुद्दाम हे केले नाही. हे आपोआप झाले.

रफ केस मऊ होण्यासाठी वरची सगळी पाने वाचा आणि त्यातले तुम्हाला जमेल ते करा. भरपुर जणांनी भरपुर सुचवले आहेत उपाय. आणि ते सगळे टेस्टेड आहेत. केस मऊ झाल्यावर तुम्हाला आवडायला लागतील आणि मग सरळच हवेत असे वाटणार नाही. तसेही माझे आधी कुरळे होते तेव्हा मला सरळ जाम आवडायचे. माझे असे असते तर........ हा विचार कॉलेजात असताना नेहमी डोक्यात वळवळायचा. आता सरळ झाल्यावर काही विशेष वाटत नाही त्यांचे.

स्काल्प सोरॅसिस बद्दल माहित आहे का कुणाला,
माझ्या डोक्यात दोन्ही कानाच्या वर व मागच्य बाजुला एक दोन ठिकाणी लालसर लहान (साधारण चिंचोक्या एव्हढे) चट्टे आलेत, खाज सुटुन कोंडा होतोय, केस पण काही प्रमाणात गळतात.
डॉक्टरांनी झींक, टरटर,ई द्रव्य अस्लेली शांपु/लोशन वापरण्यास सांगितले.
वापरल्यावर ३-४ दिवस बरे वाटते, पण चट्टे पुर्ण बरे होत नाहित. हे असे साधारण १ वर्षा पासुन होत आहे.

कुणास या बद्दल काहि घरगुती उपाय/माहिती असल्यास सांगावे.

टिल्लू, तुम्ही म्हणताय तसे सगळे माझ्या नवर्‍याला झाले होते. पुण्यात डॉ. नरेंद्र पटवर्धनांची ट्रीटमेंट घेतली होती. तेव्हापासून त्यांनी एल्युशन नावाचा एक शॅम्पू जन्मभर वापरायला सांगितला आहे. ते चट्टे, फोड वगैरे गेले त्यांची औषधे घेतल्यावर. पण त्याला जास्त गोड, मसालेदार खायचे नाही असे सांगितले आहे. हा शॅम्पू बंद केला तर परत हे सगळे प्रकार सुरू होतात.

खात्रीशीर घरगुती उपाय मलाही माहित नाही. पुण्यात असते तर काहीतरी शोध घेता आला असता आयुर्वेदिक वगैरे. तुम्हाला कळले तर मलाही सांगा.

सुनिधी, ही घे नावं डॉ. बालाजी तांबे यांचं संतुलन व्हिलेज हेर ऑईल , त्यांचीच सुकेशा नावाची शिकेकाई मिळते खूप छान आहे पण त्याने तेल जात नाही डोक्यातले पण रामदेव बाबांचा "केश कान्ती" शाम्पू त्यापेक्षा छान आहे. तेल ही जाते आणि कोंडाही Happy

उदवण्यासाठी ऊद वापरतात

म्हणजे आपण देवपुजेला वापरतो तो धुप ना? अर्थात त्याच्यातही ब-याच क्वालीटी आहेत, पण केस उदवायला तोच वापरायचा ना?>>>>>>>>>>>>>>>>>
ऊद म्हणजे काय? आणि तो वापरतात कसा? आमच्या घरात सगळ्या॑ना भरपुर प्रमाणात को॑डा झाला आहे. या अगोदर कधीही नव्हता. एक-एकदा वेड लागायची पाळी येते काही सुजत नाही. प्लीज काही उपाय सा॑गा.

निमीशा सर्वांचे कंगवे दर आठवड्याला धुत जा.
नेहमीच्या शाम्पुने कोंडा जात नाही. आणि बाजारात मिळणारे जाहिरातीत दाखवलेले
सुप्रसिद्ध शाम्पु केसाचे भरपुर नुकसान करतात. तुम्ही स्कीन स्पेशालीस्ट ना विचारुन योग्य तो शाम्पु वापरा.
मी स्काल्प नावाचा १ शाम्पु वापरत होते.त्यावर दिलेल्या सुचना वाचुन त्याप्रमाणे करा.आणि हा शाम्पु डॉक्टर सांगतील तेवढेच दिवस वापरावा.
डोक्याला खाज सुटली तर खाजवु नका त्यामुळे मागाहुन खुप जळजळते.
नखानी कोंड्याच्या खपल्या उचकटुन काढु नका.
कोमट तेल कापसाच्या बोळ्याने लावुन मग २ तासांनी केस धुवा.[हे माझ्या पार्लरवालीनं सांगितलं]
मग लगेच पंचानी केस पुसुन वाळु द्या.

केसात कोंडा -भीमसेनी कापुर--या नावाने मिळतो औषधासाठी वापरतात्,कापुर आरती चा वेगळा असतो--तो [१० रुपायाचा ]आणुन खोबरेल तेलात बारीक करुन टाकायचा..ते तेल डोक्याला लावायचे..कोंडा समूळ जातो..खात्रीलायक उपाय आहे..

mala please straghtening baddal sangaa na mee aikeley ki parlour madhye karne khup mahagade aaste aani te jasta divas tikat suddha nahi. aapan ghari karu shakto ka ? asel tar kase. kes aadhi ole vagaire karave lagtat ka? pls mahiti dyavi.... aani mala ithe marathi shabdat lihita yet nahi. pan shiken halu halu

सुलेखा, भीमसेनी कापूर इंग्रो मधे मिळेल का?
त्याला वास कितपत येतो? आणि किती वेळा करायचा हा उपाय? की एकदा केल्यावर पुन्हा कोंडा होतच नाही?
मी लिंबू वगैरे लावते, पण ८ दिवसांत कोंडा होतोच.

हो..इंग्रो मधे मिळतो...दवाई के लिये/खाने के लिए असे विचारा ..नाहीच मिळाला तर कापुर आरतीला जाळायचा कापुर ही चालतो..२०० ग्राम/मिलि.लि तेलात एक डबी कापुर वड्या बारीक करुन घाला..१० रुपयांचा कापुर ही २०० ग्राम/मिलि लि तेलात घाला..हे तेल रात्री लावायचे./ जिरवायचे आहे...सकाळी केस धुतले तर चालते.. शाम्पु थोड्या पाण्यात विरघळवुन केसांना लावावा..कापराचा वास पुर्ण जात नाही थोडा येतो..पण कोंडा मात्र हमखास जातो..हे तेल रोज लावायचे आहे..कोंडा जाई पर्यंत..
कोरड्या त्वचे मुळे अंगाला खाज/कंड सुटते त्यावर हे तेल आंघोळी आधी लावावे..साबण न लावता मसुरडाळी चे/बेसन पीठ लावावे..खाज नाहीशी होते..लहान मुलांना ही वापरता येते..[चेहर्‍यावर डोळ्याचा भाग सोडुन लावावे..]

नीधप मी नवीन आहे इथे,
पण आधीची सगळी पाने वाचली मी काल, आणि आज सकाळी नारळाच्या दुधाचा प्रगोग केला, काल जास्वंद तेल लावल होता आणि आज नारळ दुध...
लिंबू चोळले नाही कारण मला कोंडा अज्जिबात नाही... Happy
त्यानंतर उर्जिता जैन चा शाम्पू वापरला.... पण केस हलके तेलकटच आहेत... मला पुन्हा लगेच उद्या केस धुवावे लागणार.....:-(
आणि मला एक सांग तू बर्याचदा "जास्वंद जेल" चा उल्लेख केला आहेस, ते "उर्जिता जैनच च" आहे का?

(नोट: माझे केस कुरुळे आणि कोरडे आहेत....)

बागेश्री ,
जास्वंद जेल उर्जीता जैन यांचेच आहे.
नारळाचे दुध लावल्यावर मी नेहमीचा शँम्पुच वापरते. २दा लावावा लागतो मला.
मग जास्वंद जेल लावते.
नीधप सांगतिलच पण मला जेवढ माहिती आहे ते शेअर केलं.

धन्यवाद ऑर्किड,
पण एक सांगा, तुम्ही जास्वंद जेल केस धुतल्यावर लावता? ओल्या कि कोरड्या केसात? चिकट नाही होत का केस त्याने?

बागेश्री
केस धुतल्यावर ओल्या केसातच जास्वंद जेल लाव आणि साध्या पाण्यानी केस धुवुन टाक, शँम्पु लावु नको.
केस चिकट नाही होत.

भीमसेनी कापूर मी सुद्धा नेहमी केस धुवताना लावते, मला वासासाठी म्हणून आवडतो, परदेशात्(सिंगापूरला/अमेरीकेत तरी मला कधीच मिळाला नाही). किलो किलोने घेवून येते पुण्यातील आयुर्वेदिक दुकानात मिळतो. मस्त असतो. अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ छान वाटते कधी तरी.

जास्वंद जेल मस्त आहे कंडिशनर म्हणून... आणि हे इतर कंडिशनर सारखं नाही, उलट हे स्काल्पला चोळून चोळून लावायचं! ट्राय करून बघ बागेश्री...!
ह्म्म ध्वनी, आता उन्हाळ्याच्या दिवसात भीमसेनी अंघोळ करावी लागाणार असं दिसतेय... आत्तापासूनच भयंकर उकडायला लागलंय!!! Happy

Thanks Dreamgirl..... Happy
अगं मी काल घरी गेल्यावर ते जेल समप्रमाणात पाण्यात कालवलं आणि केसात जीरवलं, अर्ध्या तासाने पाण्याने धुतले.... मस्त मऊ मऊ झालेत..... छान वाटलं... आता एकदा कंडीशनर म्हणून वापरेन आणि तुला feedback देईन Wink

Pages