केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hey Dreamgirl....
थँक्स गं... मी थेट शँपू नाही लावत, पण dry scalp आहे खरा.... कित्तिही तेल लावा... सगळं गट्ट्म.. Wink

ही सगळी माहिती साधनाने पण कुठेतरी लिहिली आहे.

अगं ते त्वचेसाठी होते. उर्जिताचे पुस्तक काढुन पाहते केसांसाठी काय आहे ते Happy

रच्याकने, भराभरा वाढणा-या केसांना थांबवण्याचा उपाय आहे का कोणाकडॅ? मी जवळजवळ महिनाभर मेंदी घातली नाहीय केसांत आणि आता १ इंच पांढरा पट्टा पडलाय डोक्यात Sad
टकलावरचे केस पांढरे आणि मागे लहान मेंदुवरचे केस काळे.. काय उपेग??? दर आठवड्याला मेंदी घालणे हा किती मोठा ताप आहे हे ज्याचे त्यालाच माहित. (कोणाचे काय तर कोणाचे काय....)

आवळा पावडर आणलीय पण अजुन वापरली नाहीय. अर्थात केस काळे होतील ही आशा नाहीच आहे. फक्त आहेत ते नीट टिकावेत अजुन १० वर्षे ह्याच अपेक्षेने करतेय सगळे... Happy

दर आठवड्याला मेंदी घालणे हा किती मोठा ताप आहे हे ज्याचे त्यालाच माहित. (कोणाचे काय तर कोणाचे काय....)>> अगदी अगदी! दर आठवड्याला लावून केसांचे भरभरीत हाल तर सोडाच ते डाग, घरभरातील पसारा... देवा...

नाही केलं तर काकी म्हणणारे आजी म्हणायलाही कमी नाही करणार Sad

नवर्‍याला अजूनही दादा वगैरे म्हटलं की जास्त कॉन्शस होते Sad Sad

अमि आयुर्वेदिक शाम्पू बनवता येत असेल... रिठा, आवळाकाठी, नागरमोथा, शिकेकाई वगैरे वापरून... रिठा शाम्पूचे क्लिनिंग चे काम करतो...

साधना, पण हे भराभरा केस कसे वाढतात ते आधी सांग.....इथे केस वाढण्याची मारामार.... Happy

तु उर्जीता जैनचे Greynil किंवा Indego वापरुन बघितले नाहिस का? त्याने येणारे केस काळे येतात अस एकले आहे.

ग्रेनिल बद्दल इथेच वाचलेल सखी, पण म्हटलं भारंभार उपाय करायचे नी आहेत ते पण उडून जायचे Proud म्हणून आता फक्त वाचतेय इथे येऊन... येऊंद्या नवनवीन उपाय.. वाचतेय... Happy

मी मेंदीत इन्दिगो पावडर टाकते. पण आनुवंशिक दोषामुळे पांढरे झालेले केस परत काळे होत नाहीत असा माझा अनुभव आहे. माझ्या घरात सगळ्यांना हा त्रास आहे. त्यात इथे मुंबईचे क्लोरिनयुक्त पाणी... Sad

साधना, पण हे भराभरा केस कसे वाढतात ते आधी सांग

माझे केसही खुप हळूहळू वाढायचे. आता पांढरे झाल्यावर त्यांना भरपुर वाढ सुटली.
http://www.hennaforhair.com/gray/index.html
इथे वाचले की पांढरे केस लवकर वाढतात.

डिलिव्हरीनंतर माझे केस खुप गलत आहेत. equate brand che after sun aloe vera cooling gel आहे माझ्याकडे पण ते कसे लावायचे? केस धुण्याच्या आदल्या रात्री तेलात मिक्स करुन कि केस धुन्याच्या आधी अर्धा तास नुसतेच जेल लावायचे कि शाम्पुत जेल मिक्स करुन केस धुवायचे??
अरेरे किति हे कन्फ्युजन Sad

डिलिव्हरीनंतर केस गळने नॉर्मल आहे. मुळात गरोदरपणात केस गळणं पूर्ण थांबत असल्याने डिलिव्हरीनंतर केस गळायला लागले की ते जास्त गळतात असं वाटायला लागतं.
काही महिन्यांमध्ये केसांचं जास्त गळणं कमी होईल. Happy

गंगावन Light 1

सोन, हा बाफ सुरुवातीपासून पारायणाला घेतलात तर हज्जार उपाय मिळतील Happy

Happy Happy

इन्दिगो पावडर काय आहे,कुटे मिलते,कशि वपरायचि

उर्जिता जैनचे एक उत्पादन आहे. जिथे तिची उत्पादने मिळतात तिथे मिळायला हवी. मी मेंदीत दोन चमचे टाकते.

व्हिनेगर , चहाचं पाणी वैगरे न्हाताना शेवटचं पाणी डोक्यावर घ्यायच्या आधी लावायचं. कंडिशनर सारखा उपयोग होतो असं खूप पुर्वी ऐकलं / वाचलं आहे पण कधी करून बघितलं नाही.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगार केसांसाठी वापरतात. काही वर्षांपूर्वी केस बदाबदा गळत होते (सगळी हॉर्मोन्सच्या पळापळीची किमया हे नंतर कळलं) तेव्हा डेस्परेट होउन बराच सर्च मारला होता उपायासाठी. त्यात मिळालेला हा उपाय होता. अर्थात मला फार उपयोग नाही झाला. पण एकूण जाणवलं हे की व्हिनेगर मुळे केसावरचा बिल्डअप निघून जायला मदत होते.

बोराची पान वाटुन डोक्याला लावली की केस खुप छान वाढतात.
(खायची गावठी छोटी बोर)
अस ओळखीत एकीच बघितल आहे.
कश्यामुळे, त्यात काय असत असल काही मला माहित नाही.

Pantene Shampoo ने केस गलती थाम्बते अशी जाहिरात आहे, कोणाला काही अनुभव आहे का?

अंड्याचा (फक्त) पांढरा भाग केसांच्या मूळाशी लाउन, २०-२५ मिनिटे ठेउन पाण्याने केस धूवायचे, केस- गळती थांबवण्याचा मस्त उपाय आहे हा!

सोन, वेगवेगळे प्रॉड़क्ट्स नी तेलं ट्राय करू नका... बाजारात नवनवीन येतच राहतं.. खोबरेल तेल सगळ्यात उत्तम! सपोर्ट साठी बदाम्/ऑलिव तेल मिक्स करून वापरले तरी चालते. केस धुण्याच्या आदल्या दिवशी तेल थोडे कोमट करून संपूर्ण डोके (स्काल्प, केस, केसांची मुले व शेवटची टोके) मालिश करावे. आठवड्यातून तीन वेळा केस धुवावेत सौम्य शांपू व कोमट पाण्याने. कंडीशनर लावून धुवावे. (जास्वंद जेल उत्तम!!) धुतल्यावर झटकू, विंचरू नका. हेअर ड्रायर नको. नैसर्गिकपणे वाळू देत. कडक उन्हात मोकळे सोडू नका.

आठवड्याने/पंधरवड्याने नीधपने सांगितलेला नारळाच्या दुधाचा उपाय करावा. महीन्यातून एकदा मेहंदी लावावी.

अवांतरः हे सगळे बाह्य उपाय. खाणं व्यवस्थित असेल तर त्वचा नी केस सुंदर होण्यासाठी जास्त बाहेरचे उपाय करावे लागत नाहीत. फक्त प्रदुषणापासून वाचण्यासाठी टच अप म्हणून! म्हणून मोड आलेल्या उसळी, कडधान्ये, मासे, दूध, भाज्या, फळे, सॅलड खा, भरपूर पाणी प्या...

तळटिपः केसगळतीसंबधी, नवीन प्रश्न विचारायच्या आधी सुरवातीची पाने चाळा रे थोडे कष्ट घेऊन... बरेचसे उपाय त्यांच्यातच सापडतील!

तेलांनी केस वाढत नाहीत. तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन बळकट बनवतं. सकस आहारामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Pages