१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
पनीर भुर्जीत बरचसं संपेल..
पनीर भुर्जीत बरचसं संपेल.. करून पहा, लागते ही बरी..
माझ्याकडे बरणीभर पिनट बटर उरलंय, मला त्याची चव आवडली नाही..

उरलेल्याचं काय करू?
स्वप्ना_तुषार, पिंपरीत जर
स्वप्ना_तुषार, पिंपरीत जर किराणा दुकानात गेलीस तर ताजे गव्हाचे पीठ मिळू शकेल. जी मार्ट मध्ये विचारलंस का ? तिथेही मिळते.
लोणच्याचे तेल चुरमुरे/कच्चे
लोणच्याचे तेल चुरमुरे/कच्चे पोहे यांवर घालून वरून कांदा, कोथीबीर, टोमॅटो घालून यम्मी लागते
पनीर पराठा केलास तर बरेच पनीर
पनीर पराठा केलास तर बरेच पनीर खपून जाईल. किंवा दक्षिणा म्हणते तसं पनीर भुर्जी.
मितान जी मार्ट मध्ये म्हणजे
मितान जी मार्ट मध्ये म्हणजे पिंपळे सौदागर मधले का? नाही पाहिले अजून पण आमचा दुकानदार जे देतो ना पीठ ते अगदीच बंडल असते गं त्यापेक्षा आशीर्वाद बरं पण माझ्या बाईला तयार पीठाच्या पोळ्या नीट जमत नाहीत म्हणते ती आणि मला दळून आणायला वेळ नाही म्हणून म्हटले आहे का कुणी खात्रीशीर?
तीलाच दळून आणायला सान्गायचे,
तीलाच दळून आणायला सान्गायचे,
पनीर पराठा, पनीर पुलाव, पनीर
पनीर पराठा, पनीर पुलाव, पनीर भुर्जी आणि पनीर खीर सगळे एकाच दिवशी करुन टाकायचे !
दक्षिणा, इथे बघ. मंजूडी,
दक्षिणा, इथे बघ.
मंजूडी, बहुतेक तांदळाचे पीठ व उडीद डाळीचे पीठ हे प्रमाण २:१ आहे.
स्वप्ना, एक दिवस पुण्यात फेरी
स्वप्ना,
एक दिवस पुण्यात फेरी मारून सकस चं १० किलो आणून ठेव.. म्हणजे महिनाभर कटकट नाही... अग्रज ही चांगलं आहे. आशिर्वाद मध्ये वगैरे मैदा असतो.
बाय द वे माझ्या पीनट बटर चं लग्न कसं लावू ते सांगितलंच नाहीत तुम्ही..
दिनेशदा!!! अर्धा किलो पनीर
दिनेशदा!!!
अर्धा किलो पनीर हे पनीर भुर्जी व अजून एखादी पनीर डिश (जसे पनीर टिक्का मसाला / बटर मसाला इ.) मध्ये आरामात संपू शकते, सो सावली, फिकर नॉट!
अरू ठेंकू सो मच
अरू
ठेंकू सो मच
दक्षिणा, दाण्याची आमटी आवडते
दक्षिणा, दाण्याची आमटी आवडते का ? त्यात वापरता येईल.
त्यात लाल तिखट घालून चटणीसारखा प्रकार करता येईल.
चपातीच्या पिठात मोहनाच्या जागी ते वापरता येते.
साधारण रसभाजीत (तोंडली, कच्चा टोमॅटॉ, भोपळा, सुरण वगैरे ) भाजीतपण ते ढकलता येते, रस दाट होतो.
मंजूडी, बहुतेक तांदळाचे पीठ व
मंजूडी, बहुतेक तांदळाचे पीठ व उडीद डाळीचे पीठ हे प्रमाण २:१ आहे.>>>>
पण माझ्याकडे उडीद डाळीचं पीठ किती वाट्या डाळीचं आहे हेच मला माहित नाहिये तर मी किती तांदूळ घेऊ ते कळत नाहिये. असो.
(तेम्हणजेझालंयअसं,कीमी३वाट्याउडीदडाळघेऊनभिजवली,वाटलीआणितीसवडेतळले.
उरलेलंपीठडब्यातकाढूनठेवलं.मगआतासांगापाहूकीमीत्यातकितीवाट्यातांदूळभिजवूनवाटूनघालू?)
मंजूडी झाला तर नेहमीसारखा,
मंजूडी
झाला तर नेहमीसारखा, नाहीतर उडीद डाळीचा डोसा म्हणायचं!
मंगलोर/ दक्षिणेकडे करतात तसा उडीद डाळ पोळो!
दक्षिणा, पुण्यात नक्की कुठे
दक्षिणा, पुण्यात नक्की कुठे मिळेल ते सांगशील प्लीज?आणि हो पीनट बटर दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे भाजीत घाल यम्मी लागतं आमच्याकडे सगळ्याच भाज्यांत दाण्याचा कूट घालतात मग फॉर अ चेंज म्ह्णून मी हे करून बघितले आहे मस्त लागतं..
स्वप्ना, मी चिंचवड मध्ये
स्वप्ना, मी चिंचवड मध्ये रहाते. माझ्या नेहमीच्या किराणादुकानातून मी गहू निवडते नि त्या दुकानदाराला त्याची कणिक पाठवायला सांगते. तो आपण सांगितलेले गहू दळून पाठवतो. खात्रीशीर ताजे आणि हवे तसे ( बारीक, जाड) पीठ घरपोच मिळते. तू पण असे एखाद्या दुकानात विचारून बघ. नेहमीचा दुकानदार असेल तर तो नक्की मदत करतो.
आणि हो जीमार्ट पिं सौदागर मधलेच म्हणतेय मी. माझी जाऊ तिथे रहाते ती तिथूनच घेते.
रच्याकने, तुला बाकी ब्रँडची तयार पिठं पिंपरी मार्केटमध्येही मिळतील. ते ही होलसेल रेट ने. पुण्यात जाण्यापेक्षा खूप जवळ पडेल तुला ते. तिथे किराणा भुसारची लेन आहे तिथे जा.
मितान जी मार्ट मध्ये म्हणजे
मितान जी मार्ट मध्ये म्हणजे पिंपळे सौदागर मधले का? नाही पाहिले अजून पण आमचा दुकानदार जे देतो ना पीठ ते अगदीच बंडल असते गं त्यापेक्षा आशीर्वाद बरं पण माझ्या बाईला तयार पीठाच्या पोळ्या नीट जमत नाहीत म्हणते ती आणि मला दळून आणायला वेळ नाही म्हणून म्हटले आहे का कुणी खात्रीशीर?>>> स्वप्ना पॅकेटमधले पिठ डब्यात काढुन ठेव आणि सांग तिला दळून आणलंय म्हणून
बरेचदा ह्या कामवाल्या उगाच काहिना काही नखरे सांगतात.
मग करेल चांगल्या पोळ्या.
डॅफो
डॅफो
<<बरेचदा ह्या कामवाल्या उगाच
<<बरेचदा ह्या कामवाल्या उगाच काहिना काही नखरे सांगतात्>>..अगदी अगदी.
एखाद्या कामाच्या ठिकाणी ह्यानी काही नवीन पाहिले, की, "वहिनी, तो अमुक साबण आहे ना त्याने भांडी छान निघतात, पुढच्या वेळी तोच आणा"...थोड्या दिवसांनी परत काहीतरी दुसरेच...!
राहवत नाही म्हणुन विषयांतरात
राहवत नाही म्हणुन विषयांतरात माझी पण भर.

<<बरेचदा ह्या कामवाल्या उगाच काहिना काही नखरे सांगतात्>>..अगदी अगदी.
एखाद्या कामाच्या ठिकाणी ह्यानी काही नवीन पाहिले, की, "वहिनी, तो अमुक साबण आहे ना त्याने भांडी छान निघतात, पुढच्या वेळी तोच आणा"...थोड्या दिवसांनी परत काहीतरी दुसरेच...!>>> माझी बाईने जेव्हा विम चा लिक्वीड सोप पाहीला तर म्हणे दिदी हे घेउन या, जास्त लागत नाही, खुप दिवस जाईल..म्हटलं आणुन बघु. तर नंतर म्हणते हे खूप वापरलं जातं, महाग पण आहे.. तुम्ही तो साबणच आणा.
दक्षिणा , प्राची , दिनेशदा,
दक्षिणा , प्राची , दिनेशदा, अकु आभार


एका दिवशी नाही पण दोन चार दिवसाच्या अंतराने करेन.
मंजूडी एकदम गणिती प्रश्न
डॅफोडील्स
मिनोती धन्स गं तू कुठल्या
मिनोती धन्स गं तू कुठल्या दुकानात जातेस पिंपरीत? मी तिरथदास आणि कं तून आणलेले गहू उत्तमच होते.
:
पण ते पिम.सौ. पर्यंत घरपोच पीठ आणून देतील की नाहि यात शंका वाटतेय.
मला तुझ्या दुकानदाराचा पत्ता दिलास तर बरे होईल मी नवीन आहे गं पुण्यात केवळ ६ च महिने झालेत उसगावातून येऊन ...मी तिकडे आशीर्वादच वापरत होते पण खात्रीने सांगेन की इथल्या णि तिथल्या पीठात खूप फरक आहे. शिवाय तयार पीठात चिंचुक्याचे पीठ मिसळतात पीठाला चिकटपणा येण्यासाठी इति माझे मोठे काका ...त्यामुळे धास्तीच बसलीय आता ...........
@डेफो...मी पाकिटातून काढूनच ठेवलय डब्यात पण ती म्हणाली कुठल्या गिरणीतून आणलय्म हे किती भगरं भगरं पीठ आहे...अजून तिला हे माहितच नाहिये की हे तयार आहे...मी म्हटले दुसर्या गिरणीतून आणलेय....;)
माझं आजकाल तूप नीट होतच
माझं आजकाल तूप नीट होतच नाहिये बेरीच जास्त होते म्हणजे गाळ खूप राहतोय काय करावे?
बेरीत साखर कालवून खाऊन
बेरीत साखर कालवून खाऊन टाकायची
स्वप्ना, माझ्या सा.बा तुपाची
स्वप्ना, माझ्या सा.बा तुपाची बेरी लाडवात घालतात म्हणजे पोळीचा लाडू किंवा कणीक भाजून करतात तसले लाडू. चांगले लागते.
आशिर्वाद मध्ये वगैरे मैदा
आशिर्वाद मध्ये वगैरे मैदा असतो>>> नसतो ग आशिर्वाद मध्ये मैदा. मागच्या पानांवर त्यावर चर्चाही झाली की.
सावली, पनीर थॉ करुन तुकडे करुन लगेचच छोट्या छोट्या individual पेक्समध्ये भरुन ठेवून फ्रिज कर. अंबिकाकडच्या पनीरला वगैरे उशीरापर्यंतची एक्सपायरी असते त्यामुळे लगेच वापरायची घाई न करुनही चालेल.
कालचा वरी भात खुप राहिलाय
कालचा वरी भात खुप राहिलाय ..काय करता येइल?
पीहू, त्यात उकडलेला बटाटा
पीहू, त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घालून, मीठ, तिखट/ मिरची, जिरे व आवश्यकता वाटल्यास बाईंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर/ साबु पीठ/ तांदळाचे पीठ/ ब्रेड क्रंब्ज घालून टिक्क्या किंवा वडे थापायचे. नॉनस्टिक तव्यावर शॅलो फ्राय. सोबत खजूर/ चिंचेची चटणी किंवा सॉस.
आमच्या नात्यातल्या एक बाई वरईच्या उरलेल्या भाताची थालिपीठे लावतात, पण मला कृती माहित नाही.
वरीच्या भातात बटाटे किसून,
वरीच्या भातात बटाटे किसून, जिरे, हिरवी मिरची वाटून, थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालून थालिपीठ लाव आणि मस्त दह्याबरोबर/ गोड ताकाबरोबर मिटक्या मारत खा ...हा.का.ना.का
क्रीमचीज, आंबा प्युरी, अंडं,
क्रीमचीज, आंबा प्युरी, अंडं, साखर हे मिश्रण खूप राहिलंय. काय करता येईल का ? चीजकेक बनवताना घेतलं होतं.
Pages