१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मी नॉनस्टीक पॅन मध्ये
मी नॉनस्टीक पॅन मध्ये शॅलोफ्राय करते आणि लगेच बर्फाच्या पाण्यात घालते, मग पिळून भाजीत. छान मऊ राहते आणि तेलकट किंवा कच्चट वाटत नाही.
पनीर जास्त शिजलं की पण वातड
पनीर जास्त शिजलं की पण वातड होतं. तुम्ही ते भाजीत घालून झालं की खुप वेळ उकळता का? अगदी एखादीच उकळी आणायची.
मला मुलाच्या वाढदिवसाला केक
मला मुलाच्या वाढदिवसाला केक ऐवजी खरवस ठेवायचा आहे. केक व खरवस दोन्ही गोड जरा जास्त होईल, म्हणुन केक ऐवजी खरवसच कापायचा विचार आहे. (शेवटी केक तो केक पण ....) त्यालाही हे आवडेल, कारण सध्या खरवसचे नशीब जोरात आहे. रोज दिला तरी तो खातोये. (हो तमाम दुनियेतल्या मातांप्रमाणे मी देखिल त्याच्या मागे असते खा खा म्हणुन).
तर विचारायचे हे की, खरवस ला काही केक सारखे डेकोरेशन करता येईल का? आकाराव्यतिरीक्त काही आयडीया?
केशर घालून खरवस कर. मस्त
केशर घालून खरवस कर. मस्त पिवळा-केशरी रंग येईल. मग वरून टूटीफ्रूटी, बेदाणे, जरदाळू, चेरीने सजव.
अथवा, नेहेमीसारखा पांढरा ख्रवस कर, उकडताना खरवसाच्या दूधात सुकामेवा घाल, म्हणजे स्टफ्ड नट्सचा खरवस होईल. केशर दूधात घालून सिरप सारखं कर. तयार खरवसावर सिरपसारखं ओतून वरून चारोळ्या आणि चेरीने सजव. चॉलकेट सिरपही वापरता येईल.
ती क्रॅकर बिस्किट्स असतात ना, तीही खोचता येतील खरवसात, तो मऊ असल्याने.
रच्याकने, इतकं खरवसाचं दूध मिळालं कुठून? सगळ्या म्हशी गाभण काय गो?

बापरे पौर्णिमा, मी खरवस घरी
बापरे पौर्णिमा, मी खरवस घरी करणार असे वाटले की काय तुला? अगो दुकानदारांच्या पोटावर पाय नको ना.
माझ्या घराच्या जवळच खरवसचा कारखाना आहे. ऑर्डर दिली की हा.का.ना.का. 'कार' ने जायचे आणि 'खाना' आणायचा
पण तुझ्या बाकी कल्पना मस्त. अब हम गहेरी सोच मे है!!!
पौर्णिमा, मस्त आयडिया गो!!!
पौर्णिमा, मस्त आयडिया गो!!!
ओह बर! कारखाना आहे होय! तरी
ओह बर! कारखाना आहे होय!
तरी म्हटलं रोज कसा खरवस मिळतोय! 
त्यांच्याकडून मिळेल का चीक विचार आणि घरी करता येतो का पहा, मग ते स्टफ्ड प्रकार करता येतील. तयार विकत आणला, तरीही वरून सजावट करता येईलच की विविध प्रकारची. जेम्सच्या गोळ्या राहिल्या वर लिहायच्या, त्याही वापरता येतील. लाजोने इथे केक डेकोरेशनच्या बर्याच टिप्स लिहिल्या आहेत, तो बाफ पहा आणि त्यातलं काय वापरता येईल बघ. चीक मिळाला, तर मज्जा येईल. केकच्या मोल्ड्जमध्ये चीक घालून वेगवेगळ्या आकाराचे छोटे खरवस वेगवेगळ्या प्रकारे सजवून सर्व्ह करता येतील. नंतर फोटो टाक नक्की
धन्स अरू
पौर्णिमा, तुझ्या कल्पना छान
पौर्णिमा, तुझ्या कल्पना छान पण मी ईतकी सुगरण नाही ना
मोल्ड्सचा विचार केलेला मी. पण स्वतःच्या आणि वेळेच्या मर्यादा ओळखलेल्या बर्या. १ आयडीया - choco wafer sticks खोचुन चेहेरा करुन त्यात dry अंजिराचे डोळे व, जेम्स किंवा मनुकांचे smiley faces करता येतिल. बघते अजुन ही काही प्रकार सुचतिल हळुहळु. माझ्याकडे वेळ आहे भरपुर. मला हे मे मधे हवे आहे.
मोनाली, विपू बघून ताबडतोब
मोनाली, विपू बघून ताबडतोब उत्तर देणे. मला हे सगळं मार्चमधेच हवे आहे.
मोना, खरवसाला जनरली पाणी
मोना, खरवसाला जनरली पाणी सुटते, तेव्हा तो विचार करून वरून काय डेकोरेशन करायचे ते ठरव. मे मध्ये म्हणजे अगदी थंडगार खरवस खादडायला बच्चेकंपनीला जाम मजा येईल. चिल्ड बर्थडे केक!!
मंजूडी, दिले - उत्तर.
मंजूडी, दिले - उत्तर.
अरुंधती कुलकर्णी, धन्स, पण
अरुंधती कुलकर्णी, धन्स, पण माझे म्हणजे - सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ideas भरपुर, गप्पाही भरपुर, अन करायचा उल्हास. पण यावेळी नक्की करायचे आहे मला हे. त्यातच २ दिवस आधी भावाचे लग्न त्यामुळे वाढदिवस कुठे यावरुन आईचे व माझे १मत होत नाहीये ते वेगळेच. पाहु काय्काय होते ते. पण केले तर फोटो नक्की टाकेन.
केकच्या मोल्ड्जमध्ये चीक
केकच्या मोल्ड्जमध्ये चीक घालून वेगवेगळ्या आकाराचे छोटे खरवस वेगवेगळ्या प्रकारे सजवून सर्व्ह करता येतील. >> हे प्रकरण उकडायचे कसे? मी भांड्यात ठेउन त्यावर झाकण ठेवते आणी सरळ कुकरला तिन शिट्या काढते.... मस्त होतो खरवस.. पण मोल्ड कुकरमधे बसणार नाही
दुकानदाराला सांगितले तर तो
दुकानदाराला सांगितले तर तो "पानी कम" खरवस बनवून देऊ शकेल. पनवेलला मिळतो असा खरवस.
त्यावर थंड क्रीमने (नॉझल) वापरुन डेकोरेशन करता येईल.
वर्षा त्यापेक्षा मोल्ड्ने
वर्षा त्यापेक्षा मोल्ड्ने कापायचा खरवस ते सोपे. हो पण मधला मधला उरलेला मोठ्याना गट्ट्म करावा लागणार.
ढोकळ्यासारखा वाफवता येईल.
ढोकळ्यासारखा वाफवता येईल. भांड्याच्या बाहेर वाफ यायला लागली की २० मिनिटे वाफवायचा.
हे जमेल
हे जमेल
दुकानदाराला सांगितले तर तो
दुकानदाराला सांगितले तर तो "पानी कम" खरवस बनवून देऊ शकेल. >>> असे पण असते? विचारुन पाहते.
मेदुवड्यांसाठी केलेलं
मेदुवड्यांसाठी केलेलं उडदाच्या डाळीचं वाटण उरलंय, कसं संपवू?
thanks mandalee, Mi paneer
thanks mandalee,
Mi paneer kachche vaaparate. kadachit jast shijavale jat asel. pudhchya veles donhi yuktya vaaproon baghate.
मंजुताई, तांदळाचे पीठ मिक्स
मंजुताई, तांदळाचे पीठ मिक्स करून त्यात हिरवी मिकांदा-कापून, कोथिंबीर - बारीक कापून त्याचे छोटे छोटे उत्तप्पे घालणे.
गोड आवडत असेल तर खजूर+ड्रायफ्रुट्स सारण तयार करून, त्याचे गोळे उडदाच्या पीठात बुडवून तळणे.
कुठेतरी मनःस्वीनीने दिलेली पाकृ आहे पेपर दोश्याची. १ वाटी डाळीला ३ वाट्या रवा असे काहीसे प्रमाण होते. शोधून पहा.
मैसूर बोंडा करता येइल, पण माझ्याकडे खात्रीदायक रेसीपी नाही त्याची.
मी परवा धिरडी घालण्यासाठी जो
मी परवा धिरडी घालण्यासाठी जो तवा वापरला तो आता स्वच्छच होत नाहिये
थोडा जाड आहे तवा, निर्लेप चा नॉनस्टिक आहे. साबण घालून आणि थोडं पाणी घालून गॅसवर गरम केलं. तळणीची कढई स्वच्छ करण्यासाठी ज्या प्रकारे थोडा साबण आणि पाणी घालून उकळतो त्याप्रमाणे. पण तव्याला जिथे कडा आहे तिथे चिकटलेल्या तेलाचा ओशटपणा जात नाहिये. असं पहिल्यांदाच होतंय. जास्त घासलं तर कोटिंग जाईल. नुसत्या गरम पाण्यात १ तास भिजवून चिकट थर सुटतोय का तेही बघितलं.
काय करू तवा स्वच्छ करायला?
प्रज्ञा , तवा गरम करायला
प्रज्ञा , तवा गरम करायला ठेवा. आणि पेपर टॉवेल ओला करुन भरभर पुसुन घ्या. स्वच्छ होतो नॉन स्टिक तवा .
उडीद डाळीच्या पीठाचे
उडीद डाळीच्या पीठाचे तांदळाच्या पीठाबरोबर आंबवून डोसे घालता येतील.
भटुर्यातही उडद डाळीचे पीठ वापरतात ना?
इतर पीठे त्यात मिसळून (गहू, बेसन इ.) त्याचे पराठ्याच्या कणकेत रूपांतर करून पराठेही बनवता येतील असा माझा धाडसी अदमास!!
लोणच्याचं तेल शिल्लक राहिले
लोणच्याचं तेल शिल्लक राहिले आहे काय करता येइल त्याच?
सायो धन्यवाद. पण एकदा रुम
सायो धन्यवाद.
पण एकदा रुम टें. ला आलेला पनीर पुन्हा फ्रिझरला ठेवून खराब होणार नाही ना?
चिन्नू, अकु, उत्तप्पे/डोसे
चिन्नू, अकु, उत्तप्पे/डोसे वगैरे घालायचे असतील तर किती तांदूळ घेऊन भिजवू तेच कळत नाहीये, बघते काहीतरी करून.
हसरी, उरलेल्या लोणच्याच्या
हसरी, उरलेल्या लोणच्याच्या तेलामचे, फ्लॉवर, मूळा, गाजर वगैरे घालून ताजे लोणचे करता येईल. पण ते झटपट संपवावे लागेल. ठेपल्याचे पिठ भिजवताना, हांडवो करताना ते वापरता येईल.
सावली, तसेही पनीर जास्त दिवस ठेवू नये. तीन चार दिवसात वापरुन टाकावे.
धन्यवाद दिनेशदा अर्धा किलो
धन्यवाद दिनेशदा
एक जाल्फ्रेझी वाली मस्त आहे. बाकी बघतेच
अर्धा किलो पनीर चार दिवसात म्हणजे आता रेसिप्या शोधायला हव्यात
पुण्यात खात्रीशीर गव्हाचे पीठ
पुण्यात खात्रीशीर गव्हाचे पीठ कुठे मिळेल? मी पिंपळे सौदागर मध्ये राहते
Pages