हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
अवल ३ पिवळा सुर्यपक्षीच
अवल ३ पिवळा सुर्यपक्षीच वाटतो आहे.
सनबर्डच आहे हा.
सनबर्डच आहे हा.
तो सूर्यपक्षीच आहे
तो सूर्यपक्षीच आहे मित्रांनो......... हा पर्पल रम्पड सनबर्ड आहे.... ज्याला आपण "शिंजीर" असही म्हणतो.....
चला, थ्रश आणि सूर्यपक्षी म्या
चला, थ्रश आणि सूर्यपक्षी म्या बरूबर वळिकला हाय.....
आता नवं पाखरू येऊ देत......
लालू १: हा मात्र स्वॅलोव /
लालू १: हा मात्र स्वॅलोव / स्विफ्ट च वाटतोय....... तो ड्रोंगो असण्याची शक्यता नाही.......
हा पक्षी ओळखा. हे कोडं नाही
हा पक्षी ओळखा. हे कोडं नाही आहे, कारण याचे नाव मलाच माहित नाही
हा दिसला कि लेन्स आणि कॅमेरा घेऊन तयार असतो, पण याचे फोटो काढणे जबरदस्त आव्हान आहे (मला)
एका जागी निवांत सापडतच नाही. हे काही फोटो (कसेतरी
) काढले.
सध्या रोज सकाळी समोरच्या शेवग्याच्या झाडावर येऊन फुले खात असतो. चिमणीपेक्षाही हा छोटा पण (सुमधुर :-)) कलकलाट इतका असतो कि, न राहवून याला पाहण्याकरीता गॅलरीत येतो.
आता ओळखा पाहू
थोडा क्लियर फोटो

जिप्सी, तो सूर्यपक्षीच
जिप्सी, तो सूर्यपक्षीच आहे.....
क्रिमसन बॅक्ड किंवा पर्पलरम्प्ड सनबर्ड असावा....
पहिल्या दोन फोटोत "मेल (नर)" आहे आणि इतर फोटोत बहुधा "फिमेल (मादी)" आहे.
सूर्यपक्ष्यांमधे नर खूप आकर्षक, रंगीबेरंगी असतो.. तितकीच मादी फिकट रंगाची असते.
येस्स्स. जिप्स्या हा सनबर्ड
येस्स्स. जिप्स्या हा सनबर्ड आहे. मला रोज सकाळी उठवण्याचे काम याच्याकडे असल्याने माझी याची ओळख आहे. अगदी मधुर आवाजात मला उठवतो हा रोज., आणि वर माझ्या गच्चीतही येतो.
भुंगा, साधना धन्स खरंच याचा
भुंगा, साधना धन्स

खरंच याचा आवाज मधुर आहे (इतका कि कधी आवडीची गाणी पीसीवर वाजत असेल तर मी ती बंद करून याचा आवाज ऐकतो. :-)). पण याचा फोटो मिळणे तेव्हढेच अवघड आहे.
अवल ४ : केरळ, अलेप्पी बॅक
अवल ४ : केरळ, अलेप्पी बॅक वॉटर
अवल ४ डार्टर वाटतोय
अवल ४ डार्टर वाटतोय
अवल ४ डार्टरच आहे.....
अवल ४ डार्टरच आहे.....
अवल बहुतेक एकच पक्षी
अवल बहुतेक एकच पक्षी वेगवेगळ्या पोझमधे दाखवून आपली परिक्षा घेतेय
अवलः४ हा हेरॉन वर्गातला
अवलः४ हा हेरॉन वर्गातला पक्षी आहे.

भुंग्या नाही रे तिन्ही पक्षी
भुंग्या नाही रे तिन्ही पक्षी वेगवेगळे आहेत रे

हंम्म आता असं असू शकेल की ते वेगळे आहेत असा माझा गैरसमज असू शकेल,:फिदी:
पण वर सगळ्यांनी तीन पक्षांची वेगवेगळी नावं सांगितली की रे
माझ्या किचनच्या खिडकीत रोज
माझ्या किचनच्या खिडकीत रोज मोठ्या चिमणीएवढे काळे, डोळ्यांच्या बाजूला पिवळा रंग असलेले पक्षी येतात. अचानक येऊन जातात त्यामुळे कॅमेरा आणून फोटो काढणं शक्य होत नाही. कुठला पक्षी असेल तो?
डार्टर म्हणतात काय याला? मला
डार्टर म्हणतात काय याला? मला हा उदयपुरला भेटलेला. पाय बदकासारखे दिसताहेत.
हो साधना मलाही तो हेरॉन
हो साधना मलाही तो हेरॉन वर्गातला वाटला.
मस्त पाण्यात सूर मारून मासा पकडतात हे पक्षी अन जवळच्या झाडावर बसून गट्टम्म करतात.
त्यांची ही शिकार बघायला खूप मजा येते. एका क्षणी उडणारे, मग पाण्यात सूर मारणारे, मग बदकांसारखे काही क्षण पोहणारे, मग काही काळ झाडावर बसून पंख वाळवणारे अन मग पुन्हा झपकन आकाशात भरारी घेणारे
अश्विनी तू जो पक्षी म्हणतेस
अश्विनी तू जो पक्षी म्हणतेस ती "साळुंकी"
अवल, नाही ग..... अग डार्टर तू दोनदा टाकलास म्हणून..... बाकी तू टाकलेले पक्षी ओळखून झालेतच..... अजुन येऊदेत......
साधना, काय म्हणतोय डार्टर??????? बरा आहे ना...!!!
येस्स्स. मला आधी बदकेच
येस्स्स. मला आधी बदकेच वाटलेली. पोहताना अगदी बदकांसारखे दिसतात लांबुन.
साधना, काय म्हणतोय
साधना, काय म्हणतोय डार्टर??????? बरा आहे ना...!!!
माहित नाही... हाती सापडला असता तर सांगितलं असतं 'बरा' लागतो/आहे का ते??? तेवढे भाग्य कुठले?????
हेरॉन, इतके पाण्यात बुडून
हेरॉन, इतके पाण्यात बुडून मासे नाही पकडत........... डार्टर, कॉर्मॉरंट, डॅबचीक, बदकं हे इतक्या पाण्यात सूर मारून मासे पकडतात........ आणि म्हणूनच हेरॉनची चोच लांब असते.... पाण्यात उभे राहून मासे टिपायला......
साधना... त्या फोटोत तो पक्षी
साधना... त्या फोटोत तो पक्षी हेरॉन नाही..... कुठून घेतलास हा फोटो?????
बदके उंच उडु शकतात काय??? मी
बदके उंच उडु शकतात काय??? मी कधी पाहिली नाहीत उडताना पण उडणा-या बदकांना टिपण्याबद्दलचे प्रसंग खुपदा वाचलेत.. बदके नेहमी डुगुडुगु चालताना पाहिलीत. पण ती सगळी माणसाळलेली होती. म्हणुन कदाचित उडायचे कष्ट घेत नसावित.
आणि म्हणूनच हेरॉनची चोच लांब असते.... पाण्यात उभे राहून मासे टिपायला......
आपले बगळे पण हेरॉनच्याच जातीतले ना?
लिहिलेय ना वर उदयपुर
लिहिलेय ना वर उदयपुर म्हणुन... ज्या तलावात लेक पॅलेस आहे.. पिचला की पिछोला असे कायतरी नाव आहे त्या तळ्याचे. तिथे मोठ्ठा थवा होता यांचा.
बदके उंच उडु शकतात काय??? मी
बदके उंच उडु शकतात काय??? मी कधी पाहिली नाहीत उडताना पण उडणा-या बदकांना टिपण्याबद्दलचे प्रसंग खुपदा वाचलेत.. बदके नेहमी डुगुडुगु चालताना पाहिलीत. पण ती सगळी माणसाळलेली होती. म्हणुन कदाचित उडायचे कष्ट घेत नसावित.
>>>>
हो. बदके स्थलांतर पण करतात...... तेंव्हा ऊंच उडणे स्वाभाविकच आहे.
हॅत्तेरी भुंग्या, साधी
हॅत्तेरी भुंग्या, साधी साळुंकीच का ती? दोनतीनदा एक गिर्रेबाज तुरा डोक्यावर असलेला रंगिबेरंगी भला मोठा पक्षी पण आलेला. मी त्याला डिस्टर्ब न करता मनसोक्त बघून घेतला. बुलबुल असेल तो.
अवल ४ : फोटोमधला कॉरमोरंट
अवल ४ :
फोटोमधला कॉरमोरंट आहे.डार्टरची चोच टोकदार लांब असते. कॉरमॉरंटची किंचीत वक्र असते आणि डोळ्याजवळ पिवळी रेघ असते. शिवाय शेपुट छोटी असते.
आयला...... बघा कॉर्मोरंट
आयला...... बघा कॉर्मोरंट लिहायला आलो आणि सावलीचं स्पष्टीकरण हजर......
धन्स सावली.... मी कनफर्म करूनच घेत होतो डाऊट आलेला चोचीवरून म्हणून......
डार्टरची मानही लांब असते......
पण पिवळी रेघ कुठे आहे इथे?
पण पिवळी रेघ कुठे आहे इथे?
Pages