१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
अमेरिकेत होल दुधाच्या ऐवजी २
अमेरिकेत होल दुधाच्या ऐवजी २ पर्सेंट किंवा १ पर्सेंट दुधाचे पनीर केल्यास रसमलाइ चे रसगुल्ले जास्त मऊ होतात.
किन्वाचा उपमा पण मस्त होतो - मी त्यात थोडा सांबार मसाला घालते.
बिसि बेळे भात च्या रेसिपीमधे सुद्धा भाता ऐवजी किन्वा मस्त लागतो.
सालाच्या उडिद डाळीचे लाडू छान
सालाच्या उडिद डाळीचे लाडू छान होतात. इथे मनुस्विनीने हरबरा डाळीचा रवा काढून त्याचे गुळाच्या पाकात लाडू करायची कृती दिलीये. त्याच कृतीने माझी एक मैत्रिण उडदाचे लाडू करते. गुळाचा पाक नको असल्यास पिठी साखर घालून करता येतील.
चुकून दोनदा पडली पोस्ट.
चुकून दोनदा पडली पोस्ट.
इडलीसाठी (नेहमीच्या
इडलीसाठी (नेहमीच्या तांदुळ-डाळ प्रमाणातच) हे काळे उडीद वापरता येतील. चांगल्या होतात इडल्या फक्त पांढर्याशुभ्र दिसत नाहीत.
माझ्याकडे भरपूर बदाम मिल्क
माझ्याकडे भरपूर बदाम मिल्क आणलं गेलंय.
त्याचं काय काय करता येईल ?
मिनी, लाडु/वड्या वगैरे करशील
मिनी, लाडु/वड्या वगैरे करशील तेव्हा त्यात घातले तरी चालेल.
cool whip शिल्लक राहिलय. २-३
cool whip शिल्लक राहिलय. २-३ दिवसात संपवायचय. काय करता येईल ?
समुद्र मेथीची भाजी आणलीय. ती
समुद्र मेथीची भाजी आणलीय. ती धुवायची काही युक्ति असेल तर सांगा ना? माझी कितिही धुतली तरी माती रहाते
ती समुद्री मेथी आधी एका
ती समुद्री मेथी आधी एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घालून त्यात पंधरा-वीस मिनीटे बुडवून ठेवायची. माती निघून पातेल्याच्या तळाशी बसते. मग मेथीच्या जुड्या हळूच पाण्यातून काढून पहिले पाणी फेकून द्यायचे आणि दुसरे घ्यायचे, त्यात परत जुड्या बुडवून ठेवायच्या. दहा मिनिटांनी बाहेर काढून एका चाळणीत घेऊन वाहत्या नळाखाली चाळणी धरायची. एका हाताने चाळणी धरून दुसर्या हाताने मेथीच्या जुड्या खळाखळा धुवायच्या. सगळी माती व्यवस्थित निघून जाते.
धन्स
धन्स
कुठे विचारू कळत नाहीए..पण
कुठे विचारू कळत नाहीए..पण युक्तीच हवी असल्याने इथे विचारतेय..
आमच्याकडे मांजरीने २ पिल्लांना जन्म दिला..२-३ महिने झाले आता पिल्ले ब-यापैकी मोठी झालीएत. ज्या खोलीत ही मंडळी राहते ती अर्धी अडगळीची आणि अर्धी वापराची अशी आहे..ही मंडळी अडगळीत राहते आणि बाकीच्या जागेत दिवसभर खेळते..आता त्यांच्या शी-शू चा प्रचंड वास यायला लागला आहे. आणि त्यांचे केसही त्या खोलीत गळतायत/दिसतायत.,
आता काहीच दिवसांत घरात बाळ येणारे त्यामुळे यांना घराबाहेर काढणं गरजेचं आहे...काही करता येईल का? कुणाला असा अनुभव आहे का?
जो, प्लीज मन घट्टं करुन
जो,
प्लीज मन घट्टं करुन त्यांना देऊन टाका मित्रमैत्रिणींना. दुसरा इलाज नाही गं.
लहान बाळाला अजिबात संसर्ग व्हायला नको.
प्लीज मन घट्टं करुन त्यांना
प्लीज मन घट्टं करुन त्यांना देऊन टाका मित्रमैत्रिणींना. >>>> अगदी अगदी...माझ्या आईकडेही मांजरीने अशीच पिल्लं घातली होती...आधी शी-शू...मग तर मांजर पिल्लांसाठी अर्धवट मेलेला उंदीर, कबुतर आणुन देऊ लागली....त्याची तर भयंकर घाण होते घरात.
पाककृतींच्या बाफवर मांजर
पाककृतींच्या बाफवर मांजर
मला वाट्ल मांजराच्या पाककलेबद्दल की काय
पेट्चा हाच प्रॉब्लेम असतो. मी
पेट्चा हाच प्रॉब्लेम असतो. मी व मावशी घरी कायम साफ करायला सज्ज असतो. तरी आमच्याकडे कुत्रे आहेत. त्यांना काढून टाकून सर्व खोली नीट व्हॅक्यूम करून घेणे व डेटॉलने साफ करून घेणे. तू जमीन पुसायला वाकू नकोस पण. सर्व घरच एकदा व्हॅक्यूम करून घे. जास्तीची जागा असल्यस नव्या बाळासाठी मस्त नर्सरी बनविता येइल ना.
धन्स सगळ्यांना.. मग तर मांजर
धन्स सगळ्यांना..
मग तर मांजर पिल्लांसाठी अर्धवट मेलेला उंदीर, कबुतर आणुन देऊ लागली....त्याची तर भयंकर घाण होते घरात.>> अगदी..
हो गं रैना...असंच काहीतरी करावं लागणारे..
मी तर वाकूच शकत नाहीये..:) पण आता लवकरात लवकर त्यांना हलवायला हवं..पिल्लांना हलवल्यामुळे मांजर ओरडेल ना पण? त्याचं काय?
जो तू प्लीज अजिबात मन गुंतवू
जो तू प्लीज अजिबात मन गुंतवू नको बरं. दिवस भरत आलेत आणि. मग ती पिल्लं सोडवत नाहीत बघ अजिबात.
नवर्याला सांग मांजरांची व्यवस्था लावायला. खरंच.
तोच त्या वासाने हैराण
तोच त्या वासाने हैराण आहे....त्यामुळे येत्या विकांताला लागेलच त्यांची व्यवस्था...
अमा पाळीव नाहीये ती मांजर..तिने अशीच सुरक्षित जागा (ती अडगळीची खोली) शोधली आणि दिली पिल्लं..
भाजणीच्या पिठाचा सोपा पदार्थ
भाजणीच्या पिठाचा सोपा पदार्थ आहे का? थालीपीठ सोडून...
रात्री जेवणाला एकटीसाठी बनवायचाय...
मोकळ भाजणी करा.
मोकळ भाजणी करा.
मोकळ भाजणी करा. >> कशी करतात?
मोकळ भाजणी करा.
>>
कशी करतात? मि कधी केली नाही...
१ वाटी भाजणी + १ कांदा बारीक
१ वाटी भाजणी + १ कांदा बारीक चिरुन + मीठ + तिखट + चिमुटभर ओवा + १ चमचा तेल हे एकत्र करुन थालिपिठाला लागतं तसंच भिजवायचं. १५ मिनिटांनी कढईत/पातेल्यात फोडणी (तेल, हिंग, हळद, मोहरी) करुन त्यात तो भिजवलेला गोळा टाकायचा आणि कालथ्याने फोडणी मिक्स होईल इतका परतायचा. मग कढईवर झाकण टाकायचे. थोड्यावेळाने परत कालथ्याने परतायचं. परत झाकण ठेवायचं. जेव्हा ती भाजणी शिर्यासारखी मोकळी होईल आणि जरा काळपट होईल तेव्हा वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करायचा. ताटलीत वाढून घेऊन वर तूप घालून खावे किंवा जोडीला ताक, दही घ्यावे.
अश्विनी के, इथे कृपया पाककृती
अश्विनी के, इथे कृपया पाककृती लिहू नका, वर्गीकरण करता येत नाही.
मनीमाऊ, ह्या पानाच्या खाली तुम्हाला एक सर्च पर्याय दिसतोय त्यात 'मोकळ भाजणी' असे लिहून कृपया सर्च करायचे कष्ट घ्या. मायबोलीवर लिहिलेली पाककृती तुम्हाला सापडेल. धन्यवाद.
धन्यवाद अश्विनी... सॉरी
धन्यवाद अश्विनी...
सॉरी मंजूडी...पुढच्या वेळी काळजी घेईन...
पनीर चा अर्धा किलोचा फ्रोजन
पनीर चा अर्धा किलोचा फ्रोजन पॅक डिफ्रॉस्ट कसा करायचा? मी पहिल्यांदा आणलाय त्यामुळे माहित नाही. शिवाय अर्धा किलो एका वेळी वापरायचा नाहीये.
मोकळ भाजणीची रेसिपी स्वातीने
मोकळ भाजणीची रेसिपी स्वातीने लिहिली आहे इथे.
सावली, डिफ्रॉस्ट /थॉ करायला
सावली, डिफ्रॉस्ट /थॉ करायला रुम टेंप. ला येऊ देत. मग तुला हव्या त्या शेपमध्ये पनीरचे तुकडे काप. आणि जशी गरज नेहमी लागत असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या झिपलॉकमध्ये भरुन ठेव म्हणजे वापरायच्या वेळी तेवढी एकच बॅग थॉ करुन चालेल.
majhe paneer vatad hote
majhe paneer vatad hote kontyahi bhajit ghatale tari majhe kaay chukat asel? paneer ghetana taaj baghoon ghete, te kachche mau asate pan shijavale ki vatad hote, madat karaa.
माझे पनीर वातड होते कोणत्याही
माझे पनीर वातड होते कोणत्याही भाजीत घातले तरी, पनीर घेताना ताज आणि soft बघून घेते, शिजले कि ते वातड झालेले असते. please, मदत करा, काय चुकत असेल?
मुकुला, पनीर तळून घेता का ?
मुकुला, पनीर तळून घेता का ? तळताना ते फार कोरडे होते का ? बाजारचे पनीर तसेही फार कोरडे असते. न तळता वापरले तर चांगले. तसेच भाजीत घालायचे.
समजा तळायचेच असेल, तर थोडे दूध घातलेल्या पाण्यात (तळल्याबरोबर) लगेच टाकायचे. त्या पाण्यातच थोडा वेळ (१५/२० मिनिटे ) ठेवायचे आणि मग भाजीत घालायचे.
Pages