हा पक्षी कोणता?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.

प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)

चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).

आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):

लालु १:

सावली १ :Smew , Male - नादखुळा

अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा

भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

अवल २. केरळमध्ये काढलेला फोटो.
एक क्लू : भारतातला सर्वात मंजूळ स्वर असलेला पक्षी Happy आम्हाला मात्र त्याने गाऊन नाही दाखवले.
paxi.jpg

साधना हा दिसेल Happy

हा दिसतोय.. पण त्याची जात माहित नाही Sad शेपुट दिसली असती तर कदाचित काहीतरी अर्थबोध झालाही असता. साध्या कोतवालसारखा वाटतोय खरा

अवल त्यातला एक फोटो euphonia किंवा pale billed woodpecker चा वाटत होता.

अवल १. पेलिकन्स आहे तो. ब्राऊन पेलिकन्स असावा बहुतेक.

रच्याकने इतरांनी फोटो इथे टाकले तर चालतील ना अचिंग

अश्चिगला आनंद होईल. त्याने मथळ्यातच म्हटलेय इतरांनीही टाका म्हणुन... पण आता आम्हाला पक्षीच सापडत नाहीत तर काय करणार??????

aschig च्या फोटोचे उत्तरः
हा बुलबूल आहे....... बहुतेक रेड व्हिस्कर्ड बुलबुल. "लालगाल्या बुलबुल" Happy

आणि नाखु "वटवट्या" म्हणजे अ‍ॅशी व्रेन वार्बलर.

अवल १: हा "डार्टर" आहे........ मराठीत याला बहुधा "तिरंदाज" म्हणतात...... मराठी नाव १००% नॉट शुअर..... पण तेच असावे बहुतेक... Happy

aschig 9 चे श्रेय सावली व भुंगा यांना देण्यात येत आहे - रेड व्हिस्कर्ड बुलबुल

cP1010190_0.JPG

अवल, चित्रे जरुर टाका. शक्यतो माहीत असलेले "अवल १" "अवल २" या प्रमाणे टाका व एक चांगला फोटो तयार ठेवा.

माहीत नसलेले टाकत असाल तर "अवल १ अज्ञात" असे टाका (म्हणजे माहीतगार सांगतील, आणि इतर लोक फोका मारायला मोकळे). कुठे काढला आहे फोटो ते ही जरुर लिहा.

"अवल २" रेड विंग्ड ब्लॅकबर्ड असु शकतो. कुठे काढला आहे?

मस्त बीबी आहे. नादखुळ्याला गुगलमध्ये इमेज टाकून सर्च मारता येते का? इतक्या दणादण कसा काय उत्तरे देतोय. Proud

अवल २. हा रेड विंग्ड ब्लॅकबर्ड वाटत नाही. रेड विंग्ड ब्लॅकबर्ड ला खरच एक मोठा लाल ठिपका असतो पंखावर. मी अर्थात गुगल मधे फोटो बघितला. इथे तो नाही दिसत आहे. हा कुठला पक्षी ते मिळालं तर शोधुन सांगते.

अवल २ हा फ्लायकॅचर किंवा थ्रश फॅमिलीतलाच पक्षी वाटतोय.......

अवल ३: हा "ओरिअल" नाही......... ओरिअल साइइज "पीजन" एवढी असते जवळपास.

तो सूर्यपक्षी असावा...... फक्त फोटोत चोच दिसत नसल्याने सूर्यपक्षी वाटत नाहिये.

मी टाकलेला फोटो - मला उत्तर माहीत नाही. Happy फोर्क स्टाईल ड्रोंगो काळाच असतो का? हे काळे नव्हते. आकाराने फार मोठेही नव्हते आणि थव्याने उडत होते. White-bellied Drongo असेल का? इथे फोटो आहे-
http://en.wikipedia.org/wiki/White-bellied_Drongo

लालु १: ड्रोंगो नाही. स्वॅलो किंवा स्विफ्ट असावे.

अवल ३: ओरीओल नाही हे मलाही पटते.

अवल ३ - हा euphonia आहे असं वाटतं. भारतात हा पक्षी आढळणं फार दुर्मिळ आहे.

अवल २ - अवल , बरोबर आहे तो पर्वत कस्तूर आहे. सुमधुर गुनगुन करणारा पक्षी आहे तो. तो सहसा पाण्याजवळच्या जंगलात आढळतो. त्याचं इंग्रजी नाव malabar hill thrush आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतात तो आढळतो.

लालू - फोटोग्राफी अँगलमुळे गल्लत झाली थोडी. फोटो दुरून काढल्यामुळे अस्पष्ट दिसत होता. अन मुळात टेल एंड दिसत असल्यामुळे ड्रोंगो जातीचा आहे एवढंच कळत होतं.

अवल३ चा हा अजून एक स्नॅप . यात चोच दिसतेय. मी त्याला सूर्य पक्षीच समजत होते, मला इंग्रजी नावं अजिबात माहीती नाहीत पक्षांची :

3_2.jpg

नादखुळा सॉरी पण हि दोन्ही नाव सर्च केल्यावर दिसलेले पक्षी वेगळे वाटताहेत.
euphonia खुप गडद पिवळा दिसतोय आणि गळ्याजवळही जरा वेगळा वाटतोय. शिवाय अवलने दिलेला फोटोतला पक्षी मी आधी भारतात असताना पाहिलाय असं वाटतय.
malabar hill thrush > malabar व्हिसलिंग thrush हा पण जरा मोठा दिसतोय आणि शेपुट वेगळी दिसतेय.

हा euphonia असण्याची शक्यता वातत नाही. मी त्याचे नेटवरचे फोटो पाहिले आत्ता. त्याचा रंग डार्क निळा अन त्याच्या डोक्यावर पिवळा पॅच आहे. मी पाहिलेला काळा अन पिवळा होता, डोक्यावर पिवळापॅच नव्हता.

Pages