निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए जागू ,मी किंवा बाऊल ने तुझी पोस्ट खाऊन टाकली नाहि.ती तशीच आहे टाय्मिंग बघ.२१.०१.

अमि, उन जास्त हवे. शिवाय माती पण जरा मोकळी करावी लागेल. नवीन लावायचे तर आता पावसाळ्याची वाट बघावी लागेल. पॅशनफ्रुटचे एखादे रोप हवे असेल, तर माझ्या घरुन नेता येईल. (साधनाचा क्लेम आहे.)

दिनेशदा आमच्याकडे जिबुडाची एक लहान जात असते त्याला पण जाम म्हणतात.>>>>>
जागू, जिबूड कि चिबूड.?

वृक्ष निरीक्षण शिबीर (लोकसत्ता मधून)
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संवर्धन शिक्षण केंद्रातर्फे रविवार, २० फेब्रुवारी रोजी बेलापूरच्या आर्टिस्ट व्हिलेजमध्ये वृक्ष निरीक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळात त्या परिसरातील वृक्ष-वनस्पती, फुलोरा जाणून घेता येईल. यावेळी वृक्षांची शास्त्रीय माहिती ज्युलिअस रेगो या तज्ज्ञांतर्फे देण्यात येईल. अधिक माहितीसाठी राहुल कोळेकर- ९५९४९२९१०७, ९५९४९५३४२५, सचिन चोरगे - ९३२३७३८६२२, ९२२३५१३४२५ या दूरध्वनी क्रमांकावर स. १० ते सा. ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा.

मी मांसाहारी वनस्पतीवर एक लेख लिहिलाय. त्याच्या पुढच्या भागासाठी मला उंबराच्या पानाचा फोटो हवाय. उंबराच्या पानांवर गाठी असतात, त्या गाठींचा फोटो हवाय.
साधना, जागू, विजय, योगेश.. कूणाच्याही बघण्यात असे झाड असेल, तर..
साधारण श्री दत्तगुरुंच्या देवळाजवळ हे झाड सापडेलच.

धन्यवाद दिनेशदा.
मी लावलेले बटाट्याचे रोप कसलं जोरात वाढतय! त्याची काही मुळे प्लॅस्टीकमधुन दिसायला लागली होती त्याच्या लांबीची तीन वेळा खुणा करून रिडींग घेतली. तर जवळ पास एक मुळ तासाला १ मिमि किंवा जास्त या वेगाने वाढता आहेत! आणि अशी अनेक मुळे आहेत.

आल्या आल्या मागच्या ३-४ दिवसाच्या सगळ्या पोष्टी अगोदर वाचुन काढल्या !
सर्व निसर्गप्रेमींना धन्यवाद !
Happy

दिनेशदा,
कणेरीची झाडं लहानपणी खुप दिसायची, ती देखील दुर्मिळ होत चाललीत असं वाटतं
त्याची फुले हाताला खुप मऊ लागायची, फुलाच्या पाकळ्यांची चव (आणि वास) देखील थोडीफार गोड लागायची ...
Happy

आणि माझी ही १०६० वी पोस्ट !
Happy

तुम्हा सर्व लोकांच्या चर्चांमधून खूप काही माहिती मिळतेय.आणि खूप मज्जा पण येते त्या वाचतना.दिनेशदा,माझ्या कडे जी फुलझाडे आहेत त्याना फार फुले येत नाहीत. सुफला-युरिया घातले,नैसर्गिक खते पण काही घातली. पण फुलझाडे फुलांनी बहरलेली काही नसतात. आणि इतरांची बाग बघून मला माझ्या बागेत काय कमी पडतय? असा प्रश्न पडतो. कुठले खत घातले की फुले येतील? ऊन व्यवस्थित मिळते. खुरपणी पण ठराविक काळाने होते. पाणी आवश्यकतेनुसार घालते.पण फुले येत नाहीत.काय करता येईल? पान नं ८ वर हाशाळ्यांचा फोटो दिला आहे तो बघून मस्त वाटले.त्याचा उल्लेख डहाणूकरांच्या व्रुक्शगान मधे आहे.त्या फळाचा फोटो पहायला मिळेल असे कधी वाटले नव्हते.तसेच brownia चा पण फोटो साधनाच्या एका लेखात बघितला.दुर्मिळ फुलांचे फोटो इथे बघायला मिळताहेत.असेच फोटो बघायला मिळोत.धन्स.

शांकली, उन व्यवस्थित मिळते ना ? कुठली झाडे आहेत. मोगर्‍यासारख्या काही झाडांची पाने काढून टाकली तर बहर येतो. डाळींबासारखी झाडे असतील तर पाणी तोडावे लागते. गुलाब असतील तर छाटणी करावी लागते. आणि फूले आली नसली तरी झाडे तर टवटवीत आहेत ना ? झालं कि.

जास्वंदी आहेत.त्यांनाच फार फुले येत नाहीत.आणि माव्यासारखी कीड पण पडते. कीडनाशक मी मारत नाही.कारण ती आपोआप जाते. कुन्दाचे पण २ वेल आहेत.त्यांनापण फार फुले येत नाहीत.सर्व रोपे टवटवीत आहेत पण मला आपले वाटते की खूप फुले यावीत.

शांकली, जास्वंदीची छाटणी करत रहा. नंतर ज्या फांद्या जोमदार वाढतील त्याच ठेवायच्या. झाडाची पूर्ण वाढ झाल्याशिवाय फूले येणार नाहीत.

>> अमि, उन जास्त हवे. शिवाय माती पण जरा मोकळी करावी लागेल. नवीन लावायचे तर आता पावसाळ्याची वाट बघावी लागेल. पॅशनफ्रुटचे एखादे रोप हवे असेल, तर माझ्या घरुन नेता येईल. (साधनाचा क्लेम आहे.)>>>

धन्यवाद. मुंबईतल्या घरीसुद्दा खुप झाडे लावली आहेत तर..... बघायला गेलेच पाहिजे Happy

नाही अमि, ३० वर्षांपूर्वी लावली ती मोठी झालीत, पण आता लावण्यासाठी जमिनच उरली नाही, सगळीकडे कॉक्रिट टाकलेय. आहेत ती, मोठ्या झाडांच्या सावलीमूळे नीट वाढणार नाहीत, म्हणून तर मी घेऊन जा म्हणून सांगतोय. (तसे तूमच्या दोघींबद्दल आई आणि वहिनीशी बोललो आज.)
पण आमच्या शिवसृष्टीत तशी बरीच झाडे आहे. तामण, सीताअशोक, करमळ, सप्तपर्णी, जंगली बदाम, जाम, आवळा, नारळ, वड, पिंपळ, जांभूळ, बकुळ अशी बरीच आहेत.

इथे नैरोबीमधे मात्र आता काही झाडे मस्त बहरली आहेत. मी आधी पण देल्ही सावरचा फोटो टाकला होता, तरीही..

हे पूर्ण बहरलेले झाड ..

हि एक फांदी, नुसती

आणि माझ्या नेहमीच्या खोडीप्रमाणे अंतरंग, पु़केसराच्या टोकावरची कलाकुसर बघा तरी..

शांकली मातीही थोडी भुसभुशीत हवी. मातिचा भुसभुषीतपणा कायम ठेवण्यासाठी त्यात गांडूळ खत टाक.

ती बटाट्याची निळी फुल वांग्याच्या फुलासारखीच दिसतायत.

दिनेशदा, खुजलीच्या शेंगांचा खुजली सोडून काही उपयोग आहे का हो? घराच्या बाजुला खुप झालेत (आजुबाजुला दुष्मनपण नाहीत)

दिनेशदा आज आल्या आल्याच मी शेअर करणार होते ते राहून गेल. परवा आम्ही इनरव्हिल तर्फे वेशवी गावातील कातकरी वाडीत कपडे व खाऊ वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथेच डोंगरावर एकविरेचे मंदीर आहे. त्या डोंगरावर मला फुललेला पळस दिसला. इतका आनंद झाला ना. माझ्यामुळे सगळ्यांना तो पळस आहे हे कळल आणि माबोवर टाकलेल्या फोटोमुळे मला पळस ओळखता आला.

हे पळसाचे फुलांनी बहरलेल झाड पण फोटो निट नाही आला.
palas.JPG

ही गोळा केलेली फुल.
palas1.JPG

एक पाकळी Lol
वेशवीच्या डोंगरावर ह्या कुयलीने सावरीला घेरलय. ती सावर पण तुम्ही करताय त्याच विचारात पडलेय.
kuyali1.JPG

दिनेशदा उंबराच झाड आहे माझ्याकडे गाठीच्या पानांचा फोटो देते मी तुम्हाला.

जागू शेवटी पळस दिसला तर ! (या होळीला त्याचा रंग करायचा ) उंबराची पाने श्रावणीला अवश्य दाखव. त्यातली गाठ अलगद फोडून, आतमधे काय आहे, ते पण बघा !

खाजखुजलीची कुसे औषधी असतात, पण ती काढायची एक रित आहे. (मधात वगैरे काढावी लागतात)
तसेच तिच्या बिया अत्यंत पौष्टिक असतात. त्याला कवचबीज किंवा कौचा म्हणतात. थंडीच्या दिवसात गुजराथी लोक, कौचापाक नावाची मिठाई करतात ती यापासून. खाजखुजलीची फूले पण सुंदर दिसतात. गुलबट जांभळ्या रंगाची असतत.

जागू,
बटाटे, वांगी, टोमॅटो, मिरची हे सगळे एकाच कूळातले. म्हणून त्यांची फूलेही सारखी. इतकेच नव्हे तर. अशीच फूले येणार्‍या एका मोठ्या झाडाला वांगीवृक्ष असे नाव आहे. त्याला वांगी वगैरे लागत नाहीत. आणि झाड व फूल दोन्ही मोठे असते.

कुयलीच्या मुळांचा रस जंत नाशासाठी उपयोगी असतो. मला लहानपणी आजी कुयलीच्या उगवलेल्या वेली काढून त्याची मुळे धुवुन मला चावायला द्यायची. मला आवडायची ती. अजुनही चव तोंडावर आहे.
दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे कुयलीची फुले सुंदरच असतात.

जास्वंदी आहेत.त्यांनाच फार फुले येत नाहीत.
शांकली,दिनेशदा,
आमच्या शेजार्‍यांच्या घराजवळ एक पांढर्‍या जास्वंदीचे झाड आहे, गेल्या काही महिन्यांपासुन मी बघतोय ,झाडाला पाने अगदीच कमी आणि लहान आहेत, पण फुले मात्र रोज भरपुर लागतात, त्यामुळे लांबुन झाड पाहिलं कि फक्त फुले आणि लहान-लहान (काड्यावजा) फांद्या (आणि मागे पुर्ण रात्रीचा चंद्रही !).

दिनेशदा,
काल मी ते पाहुन माझ्या मनात असा विचार आला कि इतकी सुंदर फुले, रोज नविन कुठुन ,कशी आणि का बरं उमलत असतील ?
झाडाला कधी कंटाळा, राग, वैताग येऊन फुल उमलवणं कधीही थांबवत कस नाही ?
Happy

आपल्यापेक्षा त्यांच्या जीवननिष्ठा वेगळ्या असतात. आणि त्यांचे फूलणे हे केवळ त्यांचा वंश वाढावा म्हणून असते. ती असते जाहिरात. आणि जाहिरात केली नाही तर माल खपेल कसा ?

तुमच्या पैकी कोणाला उप्परसाळ म्हणुन एक वनस्पती माहीत आहे का? छोटी वेल असते. पाने गडद हिरवी आणि अगदी छोटी निमुळती बदामी आकाराची असतात. कोकणात आणि लाल मातीत सर्वत्र दिसते. याची मुळं उगाळुन लावली कि चेहेर्‍यावरचे मुरुम नाहीसे होऊन एकदम गुळगुळीत चेहेरा होतो Happy याची मुळे खोलवर साधारण एका फुटापेक्षा जास्त खोल असतात. तो खणुन काढावी लागतात. त्याचा वासही सुरेख असतो. याला दुसरं काही नाव असण्याची दाट शक्यता आहे. असेल कुणाकडे तर फोटो टाका प्लिज.

जागू,दिनेशदा आणि अनिल ७६ खूप खूप धन्स. जागू मी गांडूळ खत नक्की टाकीन.आणि अनिल तुम्ही जे वर्णन केले आहे - तुमच्या शेजारच्यांच्या जास्वंदीला खूप फुले येतात - त्यामुळे माझ्या पोटात दुखायला लागले त्याचे काय?

Pages