हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
@aschig..तुमची आयडियाची
@aschig..तुमची आयडियाची कल्पना आवडली... अशीच चालूद्या..
हायला, हा ड्रोंगो आहे असं मला
हायला, हा ड्रोंगो आहे असं मला वाटलं होतं पण अस्चिग इतके पटकन ओळखू येईल असे काही टाकणार नाही या लॉजिकने उत्तर लिहिले नाही!!!
aschig 2: हा पहिल्या पेक्षा
aschig 2: हा पहिल्या पेक्षा सोपा ठरावा:
थेक्कडी, केरळ, जानेवारी २०११


हा पहिल्या पेक्षा सोपा ठरावा:
हा पहिल्या पेक्षा सोपा ठरावा: >> पहिला सोप्पा होता.. हा केरळमधील पक्षी कुठला बरे ??
This is bird is Black
This is bird is Black Drongo...
Marathi madhye yaala 'Kotwal' ase mhantat
Shepti forms ulta 'V' which is easy to identify
कोकिळ आहे का?
कोकिळ आहे का?
कोकिळ नाही
कोकिळ नाही
सातभाई आहे का?
सातभाई आहे का?
येस, जंगल बॅबलर (जंगल उपशाखा
येस, जंगल बॅबलर (जंगल उपशाखा डोळ्यांवरुन ओळखता येते जे की त्या चित्रांमध्ये दिसत नव्हते).
मराठी मध्ये सातभाई कारण अनेकदा ते थव्यानेच असतात.
कोतवालाला ते नाव आहे कारण तो स्वतःपेक्षा मोठ्या पक्षांनाही हुसकावुन लावतो. म्हणुन अनेकदा छोटे पक्षी त्याचे घरटे ज्या झाडावर असेल त्यावरच आपलेही घरटे बनवतात व कोतवालाकडुन रक्षण प्राप्त करतात.
aschig 3: हा पक्षी कोणता?
aschig 3: हा पक्षी कोणता?
स्पॉटेड डोव्ह आहे काय? किंवा
स्पॉटेड डोव्ह आहे काय? किंवा मैना.
साळुंखी आहे का?
साळुंखी आहे का?
aschig ३ : टकाचोर शेपटीच्या
aschig ३ : टकाचोर
शेपटीच्या लांबीवरुन आणि पिवळसर आणि पांढ-या पट्ट्यांवरुन मला तरी टकाचोर (tree pie) वाटतोय. पण हा पक्षी दक्षिणेला सापडतो का ते माहित नाही. बहुतेककरुन उत्तरेला दिसतो.
Myna (मैना ) या प्रकारातला एक
Myna (मैना ) या प्रकारातला एक पक्षी वाटतो आहे.
स्पॉटेड डोव्ह असावा......
स्पॉटेड डोव्ह असावा...... पारवा / होला म्हणतात तो.
भुंगा यांचे उत्तर बरोबर
भुंगा यांचे उत्तर बरोबर आहे.
नादखुळाचेही होते पण नंतर त्यांनी बदलले
spotted dove
अभिनंदन भुंगासाहेब.. या
अभिनंदन भुंगासाहेब..
या निमित्ताने मला पारवा, कवड्या, कबुतर यातला फरक सांगा.
भुंगा अभिनंदन. मी उत्तर बदलले
भुंगा अभिनंदन.
मी उत्तर बदलले नव्हते. माझ्या उत्तरावर प्रतिसाद आलाच नाही मग बदलावेच लागले. असोत. थोडी कळ
काढायला हवी होती.
aschig 4: हा पक्षी
aschig 4: हा पक्षी कोणता?
थेक्कडी, केरळ, जनेवारी २०११
नादखुळा, मुख्य पान संपादीत
नादखुळा, मुख्य पान संपादीत करुन तुम्हालाही पुर्ण क्रेडीट दिले आहे

मी सतत हे पान तपासु शकत नाही
तुम्हीही तुमची पक्षी कोडी इथे टाकाल असे वाटत होते - पण बहुदा सगळ्यांनी काधलेले फोटो चांगलेच असावेत
अरे हा कुणी कोकिळा (ककू)
अरे हा कुणी कोकिळा (ककू) फॅमिलीतला वाटतोय...
पक्षी कुठे हे शोधण्यातच माझा
पक्षी कुठे हे शोधण्यातच माझा अर्धा तास गेला
मुळात झाडावर पक्षी आहे हे
मुळात झाडावर पक्षी आहे हे लक्षात येणे, मग कॅमेरा ज्या कोणा मेंबराकडे आहे तिथुन तो हस्तगत करणे, मग व्युफायंडरमध्ये पक्षी कुठे दिसतोय याचा छडा लावणे, मग कॅमे-याची इन्बिल्ट लेन्स अॅडजस्ट करणे.. आणि हे सगळे करुन मग पक्षी व्युफायंडरमध्ये नीट दिसुन त्याला कॅमे-यात कैद करणे, ह्या सगळ्या अॅक्टीविटीज करेपर्यंत तो पक्षी राहणार आहे का जाग्यावर??????????
निम्मे पक्षी मला काळे दिसतायत
निम्मे पक्षी मला काळे दिसतायत त्यामुळे ते सगळे कावळे
अस्चिग
घे रे बाबा. मला काहीच येत नाहिये त्यामुळे नुसता टीपी करतेय इथे 
आकारावरुन हॉर्नबिल वाट्तोय.
आकारावरुन हॉर्नबिल वाट्तोय.
हा हॉर्नबिलच असावा.
हा हॉर्नबिलच असावा.
हो हो हॉर्नबिल. ढापण चोच्या
हो हो हॉर्नबिल. ढापण चोच्या वाट्तोय
आकारावरुन हॉर्नबिल
आकारावरुन हॉर्नबिल वाट्तोय.
हा हॉर्नबिलच असावा.
>>>>
हॉर्नबिलचं पिल्लू सुध्दा कोंबडीपेक्षा मोठे असते लोकहो.... मी ८ दिवस पाळलय ते... आई बाप समोर २ फूटांवर येऊन त्याला भरवून जायचे. पण पिंपळाच्या ढोलीत चढून ठेवणं आम्हाला शक्य नव्हते आणि त्याला उडता येत नव्हते. बर्यापैकी उडेपर्यंत घरात ठेवले होते कुत्री - मांजरांपासून वाचवत..... नंतर मग शेवटी उडाले आईबापांबरोबर...... केवढी ती माया...... आयुष्यात विसरणार नाही ते क्षण..... दुर्दैवाने तेंव्हा माझ्याकडे कॅमेराच नव्हता.... पण सगळे कुटुंब साक्षीदार आहे त्या क्षणांचे
अवांतर बद्दल क्षमस्व..... पण हा हॉर्नबिल नाहीच....... !!!
लोक पटापट ओळखु लागले
लोक पटापट ओळखु लागले की!
जयुला पहिला मान.
Indian Gray Hornbill उर्फ धनेश
यांचा एक थवा फीग फॅमिलीच्या या झाडावर खूप वेळ बसुन होता.
साधना, दुसर्याच्या हाती कॅमेरा द्यायचा??
कोकिळा वाटत होती अंगावरच्या
कोकिळा वाटत होती अंगावरच्या स्पॉट्सवरून पण बूड (व्हेंट) थोडे लालसर दिसतेय...... कोण असेल बर???? ककू फॅमीलीच वाटतेय पुन्हा पुन्हा.
Pages