पालवी

Submitted by रामकुमार on 9 February, 2011 - 15:26

ओसाड वाळवंटी हिरवी फुटेल जेंव्हा
माझ्यातल्या तुलाही येईल पूर तेंव्हा !...१

संतापल्या उन्हाला वाटे विषाद, हेवा
अमुच्यात दंग आम्ही छाया असे नसे वा !...२

दिस आज आठवांचे येतील का फिरोनी ?
खोपे, लपाछपी अन गोड शिवारी मेवा !..३

गर्दीत भोगियांच्या नादावला कुबेर
त्याला पुरे न अवघा नगरीमधील ठेवा !...४

ही कोणत्या मनाची स्वप्नील आस आहे ?
अंधार पेरिताही उगवेल सूर्य केंव्हा ?...५

दिधलीस तूच तृष्णा, सलही उरात देवा
का फक्त अंकुशांनी केली तुझीच सेवा ?...६
--रामकुमार.

गुलमोहर: 

संतापल्या उन्हाला वाटे विषाद, हेवा
अमुच्यात दंग आम्ही छाया असे नसे वा !
वा!!

ही कोणत्या मनाची स्वप्नील आस आहे ?
अंधार पेरिताही उगवेल सूर्य केंव्हा ?...
हाही छान!

खोपे, लपाछपी अन गोड शिवारी मेवा !.
>> इथे वृत्त गडबडतंय...

एक शंका,

मतल्यात 'व्हा' असे शेवटचे अक्षर स्पष्ट झाले असल्याने नंतरच्या शेरांत 'वा' घेणे कितपत योग्य आहे?

गजल गैरमुर्रदफ्फ असल्यासारखी आहे परंतु गैर मुर्रदफ्फ गझलेत स्वर काफिया नसावा असेही म्हणतात!!

चु. भू. द्या घ्या Happy

निव्वळ अप्रतिम रचना!!!

व्याकरणविषयक शंकाचा विचार करालच.

ही कोणत्या मनाची स्वप्नील आस आहे ?
अंधार पेरिताही उगवेल सूर्य केंव्हा >>> छान!

माझ्यातल्या तुलाही येईल पूर तेंव्हा !...>>> व्व्वा!

धन्यवाद!
मला वाटते वा आणि व्हा चालायला पाहिजे
तज्ज्ञ लोक यावर काय म्हणतात?
खोपे लपाछपी अन् + गोड शिवारी मेवा=१२+१२ मात्रा
रामकुमार

ओसाड वाळवंटी हिरवी फुटेल जेंव्हा
माझ्यातल्या तुलाही येईल पूर तेंव्हा !...१

हा शेर जरा बरा जमला आहे.

संतापल्या उन्हाला वाटे विषाद, हेवा
अमुच्यात दंग आम्ही छाया असे नसे वा !...२

शेवटचं वा हे अक्षर उगाच आहे. तसच शेरात दम नाही.

गर्दीत भोगियांच्या नादावला कुबेर
त्याला पुरे न अवघा नगरीमधील ठेवा !...४

वा !! हा शेर आवडला.. आशयघन आहे.

दिधलीस तूच तृष्णा, सलही उरात देवा
का फक्त अंकुशांनी केली तुझीच सेवा ?...६

अर्थबोध होत नाही.

@भिब्ररा,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
अजून चांगले देण्याचा प्रयत्न करीन.
आता अर्थबोध होत नसलेल्या शेराबद्दल-
हे देवा,
मला काही तरी पाहिजे अशी इच्छा तूच दिलीस.
ती पूर्ण झाली नाही म्हणून जी जखम झाली तिला काळरूपी अंकुशाने का सल देतोस?
फक्त तो अंकुशच तुझा सेवक आहे का? मी नाही का?

छायाताई, धन्यवाद!
अगदी मला पण ते जास्त आवडले होते