आपला कपिल ५० वर्षाचा झाला तरी त्याबद्दल फारसे कोठेच काही आले नाही? कदाचित आयसीएल मधल्या त्याच्या सहभागामुळे बीसीसीआय ने काही उत्साह दाखवला नाही. कदाचित मध्यंतरी त्याचे नाव मॅच फिक्सिंग मधे आले होते त्यामुळे ही असेल, पण त्याची शक्यता कमी आहे.
चला निदान आपण तरी काही जबरी आठवणी लिहू
१. पाक मधे (बहुधा जगात) पहिल्यांदाच भारतीय बोलर विरूद्ध हेल्मेट घालायची वेळ आली प्रतिस्पर्धी फलंदाजांना
२. इंग्लंड मधे फॉलोऑन टाळायला २४ रन्स व फक्त एक विकेट शिल्लक असताना सलग ४ सिक्स मारून टाळलेला फॉलोऑन!
३. ऑस्ट्रेलियात त्याला एकदा चुकीचे LBW दिल्यावर "हे आउट असेल तर मी १००० विकेट्स घेतल्या आहेत" म्हणणे
४. तो रिचर्डस चा कॅच !!!
५. गावस्कर बरोबर ची (निदान मीडियाने) लावलेली भांड्णे, पण त्याच्या कप्तानपदाच्या शेवटच्या स्पर्धेत जीव तोडून केलेली बोलिन्ग व बॅटिंग
६. अप्रतिम यॉर्कर वर काढलेली त्याच स्पर्धेतली कासिम उमर ची दांडी, जी नंतर अनेक वर्षी कोणत्यातरी जाहिरातीत दिसली
७. एक सिक्स मारल्यावर लॉन्ग ऑन ला फिल्डर लावला तरी तेथेच पुन्हा कॅच देउन आउट होणे
८. जखमी असताना ऑस्ट्रेलियात शेवटच्या दिवशी बोलिंग ला येउन पाच विकेट्स उडवून भारताला जिंकून देणे
९. रन काढताना दुसरा बॅट्स्मन जेमेतेम तिकडे पोहोचेपर्यंत बॅट टेकवून पुढच्या रन ची ३-४ पावले टाकून केलेली तयारी
१०. "नटराज" पुल शॉट
आणि "आपण जरी फक्त १८३ केलेले असले तरी आपण ते केलेले आहेत, त्यांना अजून करायचे आहेत", कधीही नि विसरणारी कामगिरी म्हणजे १९८३ चा वर्ल्ड कप !
अजून अनेक मजेदार, अवाक करणार्या, डोक्याला ताप देणार्या आठवणी असतील तुमच्या कडे ही. जरूर लिहा
"नटराज" पुल
"नटराज" पुल शॉट >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय ग्रेट नाव ठेवलंय या शॉटला...
मस्त लिहिलंय रे फारेंड....
सही! कपिल
सही! कपिल जैसा कोई नहीं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नटराज शॉट
नटराज शॉट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१३१ कसोटी सामन्यात ३१ च्या सरासरीने ५००० पेक्षा अधिक धावा आणि आठ शतके (एकदिवसीय सामन्यात २३ ची सरासरी).. कपिलची नेहेमीच बोथम, इम्रान आणि हॅडली बरोबर तुलना झाली.. ह्या सगळ्यांच्या तुलनेत कपिलची बॅटिंग नक्कीच चांगली होती (बोथम जास्ती कंसिस्टंट होता हे मान्य).. तसेच सगळ्यात जास्त बळीदेखील कपिलनेच मिळवले..
अरे मी ही
अरे मी ही ऐकलेली उपमा आहे ती, मूळ कोणाची माहीत नाही पण चपखल वाटली.
मी हा लेख लिहावा तसा लिहीलेला नाही, तुमच्या ही आठवणी लिहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमोल... कालच
अमोल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच झी टीव्हीवर बातमी बघताना मनात आलं की कपिलबद्दल काहीतरी लिहायलाच हवं. तुला माहितेय? कपिल माझा ऑलटाईम फेव्हरिट खेळाडू आहे
-----
अजून एक आठवण -- बेन्सन अँड हेजेस कप, ऑसट्रेलिया : कपिल आणि वेंगसरकरने साक्षात रिचर्ड हॅडलीच्या एका ओव्हरमधे १७ रन्स ठोकल्या होत्या !!!
-----
आणि मित्रा... तू सगळ्यात महत्वाची आठवण लिहिलीच नाहीयेस !!
१९८३ चा विश्वचषक, भारत वि. झिंबाब्वे.... आपण ५ बाद १७ होतो.... तिथून कपिलने रॉजर बिन्नी आणि किरमाणीच्या साथीने नाबाद १७५ ठोकल्या होत्या.... सामना एकाहाती फिरवणं म्हणजे काय त्याचं ह्याहून उत्तम उदाहरण नसावं
-------
'नटराज' शॉट -- गावसकरने ही उपमा त्याच्या 'आयडॉल्स' ह्या अप्रतिम पुस्तकात वापरली आहे
पहिल्या
पहिल्या बॉलला आऊट होणे!
>>महत्वाची आठवण लिहिलीच नाहीयेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो लहान असेल तेव्हा, आठवत नसेल.
तो जेंव्हा
तो जेंव्हा बॅटींगला यायच्या तेंव्हा ते ग्राँउड मध्ये पाय ठेवल्याबरोबर ते वर आकाशात देवाकडे पाहने. नंतर सच्याही तेच करायला लागला.
मी ही
ही स्टाईल रिपीट मारली होती.
आणी एक पाय उंचावर घेउन शॉट मारने मला इतके आवडले होते की आधी गार्ड न घालता तसा बर्याचदा ट्राय केला होता. काही शॉट्स बसल्या, काही मलाच बसल्या.
मी लहान असताना कधी तरी ११ डिसें रोजी कपिल वर लेख छापुन आला होता व त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा असे काही तरी लिहीले होते. अनेक दिवस असे वाटायचे की कपिल आणी माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे.
चित्र्या, ती मॅच काय होती बॉस. अहाहा सुंदर आठवन. मलाही गावसकर पेक्षा कपिल आवडतो. त्यांचा भाडन्याचा काळात गावस्कर कपिलला इग्नोर मारायचा. मग उरलेले १० प्लेअरनी त्यांची जागा घेतली की उरलेल्या जागेवर कपिल जायचा. एक दोन मॅच मध्ये गावस्करचे भक्त असलेल्या माझ्या वडिंलाना चिडलेले पाहीले होते. त्यांनीच हा किस्सा सांगीतला, तेंव्हा पॉलीटिक्स कळत न्हवते.
कपिलनेच गोल्फ काय चिज आहे हे सांगीतले. नांदेडच्या स्टेडीयम वर कपिल ११ विरुध्द अझर ११ मॅच होती. त्या मॅच मध्ये कपिलने ११ सिक्स लावलेले पाहीलेत बॉस. ते ही बॉक्स मध्ये बसुन. (काकांची कृपा).
देव साहेबांवर रॅन्डम आठवनी लिहायला लागनार आता.
काही मलाच
काही मलाच बसल्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लिहीच मग, केदार, शक्यतो येथेच
हो ती मॅच नेमकी रेकॉर्ड झाली नाही (१७५ वाली). केदार ते वरती पाहणे शक्यतो सगळेच जण करायचे, मी सुद्धा
आम्हाला वाटायचे डोळ्यांना उन्हाची सवय व्हावी म्हणून करतो, त्यामुळे आम्ही गल्ली मॅच मधे उन्हात बसलेलो असलो तरी बॅटिंग ला जाताना वर बघायचो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कपिल मस्त
कपिल मस्त कलंदर natural खेळाडू होता. purely gifted. मला वाटते गावसकर्नेच म्हटलय ना कि "कपिल अष्ट्पैलू नसता तर सर्वात great batsman झाला असता."
ते फक्त एक शेवटी हाकलून देइतो राहिला नसता तर ...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बाकी त्या
बाकी त्या जमान्यातले लोक सही स्टाईलभाई होते. कपिलचे पाठीमागे वळून वर बघणे, श्रिकांतचे तो stance नि प्रत्येक stroke नंतर fine leg ला जाऊन नाकाच्या त्या चित्रविचित्र हालचाली, गावसकरचे gloves शी खेळणे, शास्त्रीचे ball shine करायला pant वर मागून नि पुढून (??) घासणे (आम्ही पण उगाच रबर बॉल घासत खेळायचो swing व्हावा म्हणून :D) , शिवा बॉल उजव्या हातातून डाव्या हातात उडवायचा रन उप सुरू करायच्या आधी.
कही लिहिलय
कही लिहिलय फारेंड..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
>>>> त्यामुळे आम्ही गल्ली मॅच मधे उन्हात बसलेलो असलो तरी बॅटिंग ला जाताना वर बघायचो >>>>आम्ही पण उगाच रबर बॉल घासत खेळायचो swing व्हावा म्हणून >>>
आधी गार्ड न घालता तसा बर्याचदा ट्राय केला होता. काही शॉट्स बसल्या, काही मलाच बसल्या. >>>>
^^^^^^^^^^^^^^^^^^ अगद
^^^^^^^^^^^^^^^^^^
अगदी बरोबर!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
कपिलने
कपिलने उत्कृष्ट गोलंदाजी केलेली शेवटची मालिका म्हणजे १९९१-९२ साली भारताने ऑस्ट्रेलियात खेळलेली ५ कसोटींची मालिका. ह्या मालिकेत भारताचा ४-० असा दारूण पराभव झाला होता. परंतु कपिलने जबरदस्त गोलंदाजी करून मालिकेत २५ बळी मिळविले होते. त्याने विशेषतः ऍलन बॉर्डरचा मामा केला होता. संबंध मालिकेत त्याने ४-५ वेळा बॉर्डरला त्रिफळाबाद केले होते. त्यावेळी समालोचक "बॉर्डर कपिलाईझ्ड आउट" अशी संज्ञा वापरत होते. या मालिकेनंतर त्याला निवृतीपर्यंत इतकी चांगली गोलंदाजी करता आली नाही.
कपिलच्या आक्रमक नेतृत्वाचे एक उदाहरण म्हणजे १९८३ भारतात वेस्ट इंडिज विरूद्ध अहमदाबाद येथे नाणेफेक जिंकून सुद्धा प्रथम गोलंदाजी घेतली व दुसर्या डावात जबरदस्त गोलंदाजी करून ८६ धावात ९ बळी मिळवून विजयाची संधी निर्माण केली होती. अर्थात वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर भारताचा ४थ्या डावात टिकाव लागला नाही.
कपिलभक्ता
कपिलभक्तांनो.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या ब्लॉगवर एक ताजा लेख लिहिला आहे... कपिलबद्दल्....'योद्धा खेळाडू' नावाचा
जरूर भेट देऊन प्रतिक्रिया सांगा.
लिंक द्या
लिंक द्या की राव
कपिलचे काही मस्त व्हिडीओ आता
कपिलचे काही मस्त व्हिडीओ आता यूट्यूब वर आलेत.
हा एक - जेरेमी कोनीला दोन खतरनाक सिक्स मारल्यावर चक्क त्याने पांढरा रूमाल काढून शरणागती दाखवली
यात दुसर्या सिक्स नंतर त्याचा क्लोज अप दाखवतात तेव्हा त्याला "फावड्या" का म्हणत ते कळेल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.youtube.com/watch?v=TsLLRQjGunc&feature=fvwrel
हा बेन्सन हेजेस १९८५ मधला. यात तो कासिम उमरचा त्रिफळा आहे. हा बहुधा बूस्ट का कसल्यातरी जाहिरातीत नंतर बरीच वर्षे दाखवायचे. साधारण २ मिनीटांनंतर दिसेल.
http://www.youtube.com/watch?v=xmZC6Q7iG1k
शारजा = हारजा हे समीकरण
शारजा = हारजा हे समीकरण होण्यापूर्वीचा शारजातला सामना आठवतोय (१९८५)? इम्रानखानने (१४/६) भारताला १२५/१० असं उखडलं होतं. कपिलने मध्यंतरात आपल्या लोकांना काय सांगितलं कोण जाणे, पण ४०/२ वरून पाकी ८७/१० असे गडगडले!
आ.न.,
-गा.पै.
या मालिकेनंतर त्याला
या मालिकेनंतर त्याला निवृतीपर्यंत इतकी चांगली गोलंदाजी करता आली नाही.
कपिल शेवटपर्यंत घातक गोलंदाज राहीला. पण दुस-या एण्डकडून दबाव नसल्याने त्याचा स्पेल डोळ्यात तेल घालून खेळला जाई आणि नंतर रान मोकळं मिळाल्यावर स्कोर केला जात असे... त्याचा रन अप कमी झाल्यावर तर त्याच्या स्विंगमधे अचूकता आणि भेदकता जास्त होती.
नटराज' शॉट >>> ह्यावर नंतर
नटराज' शॉट
>>> ह्यावर नंतर नटराज पेन्सिट्ची जहिरात आली होती ना? त्यात तसाच पुल दाखवला होता...
की जाहीरातीवरुन नटराज शॉट असे नाव पड्ले होते?
फारेन्डा भारी! हा नव्हता
फारेन्डा भारी!
हा नव्हता पाहिला.
काय योगायोग आज सकाळी मी B&H फायनल पाहात होतो. गावस्कर १२१ नंतर ति लिंक दिसली अन १९९३ चे हायलाईट परत पाहिले अन हे पण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रिकेटच्या अनेक खेळाडूंबद्दल
क्रिकेटच्या अनेक खेळाडूंबद्दल मला नितांत आदर व प्रेम आहे. पण माझा सर्वांत आवडता खेळाडू मात्र कपिलच आहे. त्याचे 'लेट स्विंग', 'यॉर्कर्स', दिलखुलास फलंदाजी इ.इ. अनेक कारणं असली तरी मुख्य कारण आहे- मैदानावरची प्रत्येक गोष्ट तो मनस्वीपणे करत असेच पण त्यातला आनंद तो प्रत्येक क्षणीं घेतो आहे, हें स्पष्ट कळायचं; व तें इतकं सांसर्गिक असायचं कीं बघणार्यालाही आनंद देऊन जायचं ! सचिनला फलंदाजी करताना पाहून विस्मयकारक, आगळाच आनंद निश्चित मिळतो पण गोलंदाजी करताना तो स्वतःही आनंद लुटतो आहे हें स्पष्टपणे जाणवतं - निदान मला तरी जाणवतं - तसंच कपिलच्या खेळाचं होतं, हें आपलं माझं व्यक्तीगत मत.
अरे हे आजच वाचले.. मस्त
अरे हे आजच वाचले.. मस्त आठवणी.
माझ्या मते कपिल हा एक संपुर्ण व नैसर्गीक देणगी असलेला खेळाडु होता.. अनेक आठवणी आहेत त्याच्या.. पण सगळ्यात जास्त आठवतो तो त्याचा फिटनेस.. मला वाटत दुखापती शिवाय सलग खेळण्यात कपिलचा बहुतेक विक्रम असावा.. तेही जलदगती गोलंदाज असुनसुद्धा! अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ती त्याची.
वरच्या तुमच्या स्वतःच्या आठवणी सुद्धा मस्तच खासकरुन..
"आधी गार्ड न घालता तसा बर्याचदा ट्राय केला होता. काही शॉट्स बसल्या, काही मलाच बसल्या. "
" त्यामुळे आम्ही गल्ली मॅच मधे उन्हात बसलेलो असलो तरी बॅटिंग ला जाताना वर बघायचो " व
"आम्ही पण उगाच रबर बॉल घासत खेळायचो swing व्हावा म्हणून " हे जबरीच..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मी सुद्धा लहानपणी शिवाजी पार्कवर टेनिस बॉल ने मॅचेस खेळताना बॅटींग करताना पिचवर थोडे पुढे जाउन बॅटीने एक्-दोनदा ठोकायचो..( कारण बहुतेक ग्रेट बॅट्समनना तसे करताना बघीतले होते.. बहुतेक खर्या पिचवर एखादा खडा किंवा पिचचा पापुद्रा वर आलेला काढुन टाकायला ते करत असावेत बहुतेक... अजुनही मला नक्की ते का करतात याचे गौडबंगालच आहे) कारण तसे करताना एकदम कूल वाटायचे... क्षणभर तसे करण्याने आपणही टेस्ट मॅच प्लेयर आहोत असा एक आत्मविश्वास यायचा.
पण गोम अशी होती की आम्ही आमच्या मॅचेस बहुतेक वेळेला रविवारी मुलांनी गच्च भरलेल्या शिवाजी पार्क मैदानावर... जिथे खेळायला जागा मिळेल तिथे व्हायच्या. मग मिळालेल्या जागेवरचे पिच(?).. पिच कसले.. चालुन चालुन उकरला गेलेला व खड्यांनी भरलेला मैदानाचा एक भाग तो.. त्यामुळे सगळीकडेच अन इव्हन सरफेस व सगळीकडे खडेच खडे.. कुठे कुठे ठोकणार? पण आपले कूल वाटते म्हणुन आपले ठोकायचो बॅटीने..:)
कपिल पाजी आज ६० चे झाले! त्या
कपिल पाजी आज ६० चे झाले! त्या निमित्त आणखी एक दोन क्लिप्स
इंग्लंड मधले शतक
https://www.youtube.com/watch?v=AQW_iGjJE94
रिचर्ड्सचा तो १९८३ मधला प्रसिद्ध कॅच
https://www.youtube.com/watch?v=TuHhB7eQGJk
ऑस्ट्रेलियातील खतरनाक स्पेल
https://www.youtube.com/watch?v=KQU4ySSXaNU
तीन वर्षांपूर्वी मुलांच्या
तीन वर्षांपूर्वी मुलांच्या शाळेत कपिल आणि एक दक्षिण विभागाचे जीओसीएनसी ( लेफ्ट जनरल रँकचे) आले होते. लष्करी अधिका-यांनी अत्यंत रटाळ भाषण केले. नंतर कपिलच्या भाषणाने सुरूवातीलाच मुलांच्या भावनेला हात घातला. "आज सन्डे होकर भी आपको स्कूल आना पडा. मै आपकी जगह होता तो कपिलदेव को बहोत गाली देता"
नंतरचे संपूर्ण भाषण पूर्ण धमाल होते. आणि अशा गंमतीजंमतीत त्याने संदेश पण चांगले दिले. अगदी सहज साधलेला संवाद.
तो जेव्हां पाठीमागून फिक्क्ट निळ्या रंगाच्या सूट मधे आला तेव्हां पांढ-या झालेल्या बटा सोडल्या तर त्याच्या ऐन तारूण्यात जसा होता तसाच कपिल वाटला. केस काळे केले तर कळणारही नाही.
डीएसकेंनी पुण्यात स्पोर्ट्स अॅकेडमी सुरू केली आहे. तिचे काम कपिलदेव पाहणार होता. चांगली कल्पना होती.
नटराज शॉट हे नाव बहुतेक सुनील
नटराज शॉट हे नाव बहुतेक सुनील गावस्करने दिले आहे असे मला वाटतेय. त्याने त्याच्या मिस्कील शैलीत दूरदर्शनवर एकदा हे सांगितले असे आठवतेय. बहुधा त्याने इतर खेळाडूंवर एक पुस्तक लिहीले होते त्यासंबंधी मुलाखत असावी. मुलाखतकार संझगिरी की लेले असावेत. पण नक्की नाही सांगता येत. युट्यूबवर असेल तर लि़क द्या कुणीतरी.
मलाही गावस्कर पेक्षा कपिलच
मलाही गावस्कर पेक्षा कपिलच आवडायचा. गावस्कर आणि त्यावेळचे बरेचसे खेळाडू 'रड्या' कॅटॅगरीतले होते. बहुतेक 'हे आपल्याला जमणारच नाही' म्हणून सोडून द्यायचे. गावस्करने एका वर्ल्ड कप मधे ६० ओव्हरी खेळून काढल्या. रना काढायचा साधा प्रयत्न पण नाही केला. बीबीसी वरच्या एका कॉमेंट्रीत गावस्कर म्हणाला की त्या सामन्यात मी पहिल्या बॉलला आउट झालो होतो. पण कुणीच अपील केलं नाही मग मी खेळत राहीलो. त्या विरुद्ध कपिल! १८३ चं टार्गेट आहे म्हणून खचला नाही. बिनधास्त खेळला आणि जिंकला. नंतर एका कॉमेंट्रीत गावस्कर असंही म्हणाला की 'आय वुड टेक हाफ फिट कपिल एनी टाईम दॅन एनी अदर फुलफिट बोलर'. अजून एका कॉमेंट्रीत तो म्हणाला होता की कधी कधी एखाद्या खेळाडूच्या डोक्यात यश चढतं आणि मग त्याची आपल्याला संघातून कोण काढणार अशी भावना होते. कपिलचं तसं झालं होतं. तो बॅटिंग सिरियसली करत नव्हता. म्हणून मी त्याला एका मॅच मधे मुद्दाम काढला.
गावस्कर आणि त्यावेळचे बरेचसे
गावस्कर आणि त्यावेळचे बरेचसे खेळाडू 'रड्या' कॅटॅगरीतले होते.>>
गावस्कर रड्या कॅटेगरीत ह्याबद्दल पुर्णतः असहमत!
गावस्करची ओळख संथ खेळाडू अशी
गावस्करची ओळख संथ खेळाडू अशी होती. यात त्याची चूक नव्हती. त्याने कित्येकदा डाव कोसळताना एका बाजूने सावरण्याचा प्रयत्न केला. तो बाद झाला की भारताचा संघ पत्त्यासारखा कोसळायचा. त्यामुळे गावस्करचे महत्त्व किकेट न खेळणा-याला सुद्धा चांगलेच ठाऊक होते. तो राजकारण करतो असे बोलले जायचे. माझे बंगाली मित्र म्हणत की तो फक्त मुंबईचे खेळाडू घेतो. पण गावस्करने ती पोझिशन निर्माण केली होती. चुकीचा बाद दिला म्हणून आख्खी टीम पॅव्हेलिअन मधे घेऊन जाणे, ऑस्ट्रेलियाच्या शिवीगाळीला खरमरीत मात्र सभ्य उत्तर देणे अशा कित्येक गोष्टी त्याच्याकडून घडत. शिवसेनेचे बीज त्याच्यात होते असे म्हटले तरी चालेल. विश्चचषक जिंकला तेव्हां सर्फराज नवाज म्हणाला होता, " हम नही जीते तो क्या हुआ, वर्ल्डकप एशिया मे तो आया " , त्याला सुनीलने " हा वर्ल्डकल आम्ही जिंकलेला आहे. तुमचा तुम्ही जिंका" असे उत्तर दिले होते.
कपिलमधे आणि त्याच्यात नेमके काय झाले हे ठाऊक नाही, पण त्याने कपिलचा अखंडीत मॅचेस खेळण्याचा विक्रम होऊ नये यासाठी पुण्याच्या मॅचमधे त्याला विश्रांती दिली असा आरोप त्याच्यावर झाला. कपिलसारख्या लोकप्रिय खेळाडूच्या बाबतीत अशी भूमिका घेण्याची ताकद सुनील गावस्करमधे होती हे मान्य केले पाहीजे. कारण तो कर्णधार म्हणूनही उत्कृष्ट होता.
एक दिवसीय सामने त्याच्या आयुष्यात उशिरा आले. पण त्याने जेव्हां त्याच्याशी जुळवून घेतले तेव्हां सर्वात जलद शतक असा अल्पकाळासाठी का होईना विक्रम त्याने केलाच होता. तो क्विक लर्नर होता.
कपिलने भारतीय क्रिकेटचा फॉर्मॅटच बदलून टाकला. अष्टपैलू खेळाडूचं महत्व अधोरेखित केलं. आक्रमकता आली. जिंकण्याची सवय लगली. यामुळे तो गावस्करपेक्षा अनेकांचा आवडता खेळाडू बनला यात नवल नाही. मात्र या प्रेमामु़ळेच गावस्करबाबत अज्ञानातून अनेक आरोप झाले.
नटराज शॉट हे नाव बहुतेक सुनील
नटराज शॉट हे नाव बहुतेक सुनील गावस्करने दिले आहे असे मला वाटतेय. >>> हो मलाही तसेच आठवते.
वरच्या अनेक प्रतिक्रियांमधे कपिल बद्दल लिहीलेले आहे त्याच्याशी सहमत, मात्र गावसकर बद्दल नाही. त्याने १९७५ साली जेव्हा तो डाव खेळला तेव्हा भारतात वन डेज ना कोणीही विचारत नव्हते. भारतात वन डे गेम्स ना महत्त्व आले ते १९८३ साली आपण कप जिंकल्यावर. तोपर्यंत कसोटी क्रिकेट हेच फक्त फॉलो केले जायचे. वन डेज ची वेगळी रेकॉर्ड्स वगैरे धरली जातील अशी त्याला तेव्हा कल्पनाही नसेल.
कपिल धमाल करायचा. पण अनेकदा वाहवत जायचा. १९८४ च्या त्या दिल्लीच्या मॅच मधे पाचव्या दिवशी भारत फक्त ८-१० रन्स ने पुढे होता दुसर्या डावात. त्या दिवसभराचा बराचसा भाग खेळण्याची गरज होती. पण संदीप पाटील आणि कपिल दोघेही मारायच्या नादात आउट झाले. कपिल चे तर अगदी ढळढळीत होते. आल्या आल्या एक सिक्स मारला. तेथे फिल्डर लावला. तेथेच पुन्हा मारायला जाउन कॅच देउन आउट झाला. त्या मॅच नंतर दोघांनाही (पाटील सुद्धा) ड्रॉप केले होते. कपिल लगेच परतला पण संदीप पाटील कसोटीत परत आला नाही. कारण कलकत्त्याला पुढच्याच मॅच मधे अझर आला आणि त्याने सलग तीन शतके मारली. इतकेच नव्हे तर इडन गार्डन्स हे त्याचे फेवरिट ग्राउण्ड बनले. तेथे अझरला पाहायला मजा येत असे. ते क्लूसनर ला मारलेले पाच फोर्स वगैरे तिथलेच.
कपिल च्या सलग खेळण्याबद्दल ऐकले होते पण त्यात फारसे तथ्य नसावे. मात्र त्याला बसवण्यात काहीतरी राजकारण नक्कीच असेल. कारण दोघांमधे त्या वर्षभरात बरेच शीतयुद्ध सुरू होते. कप्तानपदही दोघांमधे कधी याला तर कधी त्याला असे सुरू होते. पण हे मार्च १९८५ मधे भारताने गावसकरच्या नेतृत्वाखाली बेन्सन अॅण्ड हेजेस स्पर्धा जिंकली तेव्हा संपले. नंतर गावसकर ने वन डे चे कप्तानपद सोडले. या स्पर्धेत कपिलही जबरी खेळला होता. मी गावसकरच्या पुस्तकात वाचले आहे त्यावरून आठवते की यानंतर पुन्हा दोघांचे नीट जमले असावे. नंतर गावसकर ने कायम त्याचे समर्थन केले आहे.
कपिल चे सर्वात जास्त नुकसान झाले ते १९९२ च्या नंतरच्या सिरीज च्या आयोजनाने. १९९१-९२ सीझन मधे कपिल ने द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात पोत्याने विकेट्स काढल्या होत्या. पण त्यानंतर २-३ वर्षे भारतातच बरेचसे क्रिकेट खेळले गेले आणि सगळा भर स्पिन वर होता. कपिल व प्रभाकर ५-५ ओव्हर्स टाकून बाजूला होत व राजू-चौहान-कुंबळे फक्त बोलिंग करत. पिचेसही पाटा असल्याने कपिललाही फारशा विकेट्स मिळाल्या नाहीत. मग १९९४ पर्यंत तो निवृत्तीला आलाच होता.
Pages