कपिल-५०

Submitted by फारएण्ड on 6 January, 2009 - 23:49

आपला कपिल ५० वर्षाचा झाला तरी त्याबद्दल फारसे कोठेच काही आले नाही? कदाचित आयसीएल मधल्या त्याच्या सहभागामुळे बीसीसीआय ने काही उत्साह दाखवला नाही. कदाचित मध्यंतरी त्याचे नाव मॅच फिक्सिंग मधे आले होते त्यामुळे ही असेल, पण त्याची शक्यता कमी आहे.

चला निदान आपण तरी काही जबरी आठवणी लिहू Happy

१. पाक मधे (बहुधा जगात) पहिल्यांदाच भारतीय बोलर विरूद्ध हेल्मेट घालायची वेळ आली प्रतिस्पर्धी फलंदाजांना Happy
२. इंग्लंड मधे फॉलोऑन टाळायला २४ रन्स व फक्त एक विकेट शिल्लक असताना सलग ४ सिक्स मारून टाळलेला फॉलोऑन!
३. ऑस्ट्रेलियात त्याला एकदा चुकीचे LBW दिल्यावर "हे आउट असेल तर मी १००० विकेट्स घेतल्या आहेत" म्हणणे Happy
४. तो रिचर्डस चा कॅच !!!
५. गावस्कर बरोबर ची (निदान मीडियाने) लावलेली भांड्णे, पण त्याच्या कप्तानपदाच्या शेवटच्या स्पर्धेत जीव तोडून केलेली बोलिन्ग व बॅटिंग
६. अप्रतिम यॉर्कर वर काढलेली त्याच स्पर्धेतली कासिम उमर ची दांडी, जी नंतर अनेक वर्षी कोणत्यातरी जाहिरातीत दिसली
७. एक सिक्स मारल्यावर लॉन्ग ऑन ला फिल्डर लावला तरी तेथेच पुन्हा कॅच देउन आउट होणे
८. जखमी असताना ऑस्ट्रेलियात शेवटच्या दिवशी बोलिंग ला येउन पाच विकेट्स उडवून भारताला जिंकून देणे
९. रन काढताना दुसरा बॅट्स्मन जेमेतेम तिकडे पोहोचेपर्यंत बॅट टेकवून पुढच्या रन ची ३-४ पावले टाकून केलेली तयारी
१०. "नटराज" पुल शॉट Happy

आणि "आपण जरी फक्त १८३ केलेले असले तरी आपण ते केलेले आहेत, त्यांना अजून करायचे आहेत", कधीही नि विसरणारी कामगिरी म्हणजे १९८३ चा वर्ल्ड कप !

अजून अनेक मजेदार, अवाक करणार्‍या, डोक्याला ताप देणार्‍या आठवणी असतील तुमच्या कडे ही. जरूर लिहा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपिलला जेव्हां विकेट मिळत नसत तेव्हांही त्याच्या गोलंदाजीला धार होतीच. व्हायचं काय की कपिल, प्रभाकर यांच्या ओव्हर्स डोळ्यात तेल घालून खेळल्या जायच्या. त्यांच्या गोलंदाजीच्या व्हिडीओ क्लिप्स पाहिल्या जायच्या. त्यांच्या सुरूवातीच्या स्पेलमधे जपून खेळल्याने धावा निघायच्या नाहीत पण विकेट्सही मिळायच्या नाहीत. नंतर एखादा नवा गोलंदाज किंवा कमकुवत गोलंदाज सापडला की त्याला झोडले जायचे. बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस मधे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कपिलने सलग तीन मेडन ओव्हर्स टाकल्या. दुसरीकडून प्रभाकरनेही दोन मेडन टाकल्या आणि तिस-या ओव्हर मधे एक की दोन धावा दिल्या. या दोघांच्या चार चार ओव्हर्स संपल्यावर श्रीनाथचा स्पेल सुरू झाला. त्याचा स्विंग आणि कटर दोन्ही हात हात भर वळत होते आणि वेगही दोघांपेक्षा जास्त होता.

त्या वेळी कमेंटेटर म्हणाला होता दक्षिण आफ्रिकेसाठी आता चौथा गोलंदाज नवखा असू दे.. आणि सुब्रतो बॅनर्जीच्या रूपात त्यांना तो सापडला. तिघाही गोलंदाजांनी रोखून धरलेल्या धावा बॅनर्जीच्या स्पेल मधे मिळाल्या.

विकेट मिळणे न मिळणे हे शतक होण्यासारखेच असते. कपिल रडतखडत बाहेर हाकलला गेला या इथल्या एका मताशी पूर्णपणे असहमत.

अलिकडेच सुनील गावसकर आणि कपिलदेव एका मंचावर एकत्र आले होते. कपिल एकदम दिलखुलास अंदाज मधे होता. दोघेही बोलले. आपल्या मैत्रीबद्दलही आणि त्यांच्या बहुचर्चित दुश्मनीबद्दलही..

https://www.youtube.com/watch?v=HyMbDvR4FjM

कपिल आणि गावस्करांची तुलना म्हणजे रफी साहेब आणि किशोर कुमार यांची तुलना करण्यासारखे आहे.

रफींचे ओ दुनिया के रखवाले ऐका किंवा किशोर कुमारांचे मेरे मेहबूब कयामत होगी ऐका ... आपण फक्त आनंद घ्यायचा ...

दोघांचे भारतीय क्रिकेटप्रती दिलेले योगदान फारच मोठे आहे

१९८६ साली भारत विरुद्ध न्यूझीलंड एक दिवसीय सामन्यात आपण ११३ मध्ये गारद झालो. त्या सामन्याची कपिलची आठवण कायम स्मरणात राहिली. कपिलने एवढी कमी धावसंख्या असतानाही पाच-पाच (किंवा बहुदा जास्तच) स्लीप लावून गोलंदाजी केली होती. प्रत्येक चेंडू फलंदाजाच्या समोर पडून स्लीप कडे जायचा. बॅट घातली तर गेलाच समजा.

आपण तो सामना हरलो, पण कपिलची जबरदस्त गोलंदाजी कायम लक्षात राहिली

कपिल देव १०-४-२६-३

https://www.espncricinfo.com/series/8531/scorecard/65396/india-vs-new-ze...

सर्वांशी 100% सहमत !
मैदानावर. एका बाबतीत तरी कपिल सुनिलपेक्षां वेगळा व अधिक लोभस निश्चितच होता - कपिल मैदानातला प्रत्येक क्षण, अगदीं फलंदाजांचा साधा बचावात्मक फटका अडवून चेंडू गोलंदाजाला परत देणं असो, मनापासून एन्जॉय करायचा व त्याचा तो आनंद सर्व खेळाडू, प्रेक्षकांपर्यंत पोचायचा.

Pages