'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून !
'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग २ : ''तोरणा- राजगड' मार्ग ! इथून पुढे..
असो.. शेवटी मनाला त्रास देणारे सगळे विचार मागे सोडून जड पावलांनी खिंड उतरू लागलो.. माझा तर मूड ऑफ झालाच होता.. पण काही मिनीटांतच 'अरे 'उलटे' चालून बघा.. पायावर ताण येत नाही..' असा जावईशोध इंद्राने लावला.. नि मग पुन्हा धमालमस्ती सुरु झाली.. नि अगदी घाटरस्त्याप्रमाणे वळणावळणाचा असणारा तो डांबरी रस्ता आम्ही सग़ळेचजण ''उलटे'' होऊन उतरु लागलो.. फक्त कुत्रा काय तो सरळ मार्गी उतरत होता..
काही अवधीतच आम्ही त्या खिंडीतून बाहेर पडलो.. तोच उजवीकडे दिमाखात उभा असलेला 'राजगड' दिसला.. राजगडावरील 'बालेकिल्ला' तर मस्तच..
पाचेक मिनीटांतच आम्हाला काही अंतरावर रस्त्याच्या डावीकडे एक घर लागले.. हा देखिल धनगरचाच वाडा ! साहाजिकच आम्ही मोर्चा तिकडे वळवला.. आमचे गेल्यागेल्या लगेच "पाणी- पाणी" झाले.. त्याच घरातील एक छोटू आमच्यामधील इंद्रा आणि रोहीतला घेउन जवळच जंगलात असलेल्या पाण्याच्या झर्याकडे गेला.. पाण्याचा प्रश्न सुटला होता नि मग आम्ही लगेच 'एका रात्रीचा मुक्काम' याबद्दल विनंती केली.. 'आम्ही आमचे जेवण वगैरे करु.. तुम्ही फक्त तुमच्या घरातला कुठलाही कोपरा आम्हाला फक्त रात्री झोपण्यासाठी द्या.. बस्स होईल' या विनंतीला नाही-हो करत त्या घराच्या मालकाने परवानगी दिली.. झाले आमचे दोन प्रश्ण सुटले नि आम्ही आमच्या सॅक्स लगेच घराच्या अंगणातच उतरवल्या.. पाली गावात जाताना होणारी मोठी पायपीट टळली होती.. आम्ही फक्त खिंडीतून बाहेर पडताच हे घर लागले होते.. त्यामुळे उद्या राजगड होईल असे वाटू लागले.. !
आमचे दोन प्रश्ण सुटले होते.. आता एक महत्त्वाचा प्रश्ण होता.. तो म्हणजे राजगड गाठण्याचा...!!
राजगड तर अगदी समोर उभा होता.. तेव्हा चुलीची तयारी चालू असतानाच त्या लहानग्याला 'इथून सरळ शॉर्ट्कट आहे का' विचारले.. त्याचे उत्तर होते 'हो' !!! कसला आनंद झाला त्यावेळी.. तरीसुद्धा खात्री करावी म्हणून परत एकदा 'हा शॉर्टकट पाली गावातून वा खिंडीतून तर नाही ना' म्हणून विचारुन घेतले.. तेव्हा कळले की रस्त्याच्या पलीकडे समोर असणार्या जंगलातून वाट आहे !!! झाले.. आम्ही भलतेच खुष झालो.. उद्या राजगड डन ! छोटू म्हणत होता की 'मी जाईन घेऊन..' पण घरातून आवाज आला 'तू नको.. राम घेऊन जाईल त्यांना'.. 'राम' हा त्या छोटूचा मोठा भाऊ.. नि ह्या छोटूचे नाव होते 'लक्ष्मण'... खरच आमच्या मदतीला ही 'राम-लक्ष्मण फॅमिली' साक्षात देवमाणसं धावून आली होती..
झर्याचे थंडे पाणी पोटात गेल्याने आधीच तरतरी आली होती.. नि आता खूपच उत्साह जागृत झाला.. काही अवधीतच आकाशात चांदण्यांनी खेळ मांडला तर आम्ही इथे अंगणात चुलीचा थाट मांडला ! त्याच उत्साहाच्या भरात चुल पेटवली गेली.. नि फटाफट कडक चहाचा बंदोबस्त केला. चहाप्राशन होईपर्यंत सूपची बनवण्याची तयारी चालू केली.. आता आम्ही काही थांबणार नव्हतो.. पेटपूजेचा कार्यकम अगदी 'तृप्त ढेकर' येइस्तोवर करणार होतो.. एकीकडे गिरी 'त्या' शॉर्टकटबद्दल साशंक होता.. त्याचेही तसे बरोबर होते.. कारण ह्या गडकरी लोकांचा शॉर्टकट सोप्पा नसतोच मुळी.. पण आम्ही आता 'बस्स राजगड करूच' या विचाराने पेटलो होतो.. .तरीसुद्धा गिरीने 'तुमचा शॉर्टकट आम्हाला जमेल ना' म्हणत पुन्हा चौकशी करुन घेतलीच..!
आम्हा पाहुण्यांना काय हवेय नकोय म्हणत देखरेख ठेवण्यासाठी राम लक्ष्म्ण बाहेरच बसले होते.. त्यांचा आदरणीय पाहुणचार बघून आम्हालाच अवघडल्यासारखे झाले नि शेवटी 'काही नको, बसा इकडेच' म्हणत त्यांना आमच्यासोबतच पेटपुजेच्या कार्यक्रमात सामिल करून घेतले..
<
ह्यांच्या घरात वा त्या डांबरी रस्त्यावर वीज नसल्याने सभोवतालचे जग अंधारमय झाले होते.. फक्त पाली दरवाज्याचा वाटेवर सौरउर्जेवर चालणारे दिवे तारकांप्रमाणे चमकत होते.. आजुबाजूच्या जंगलात हरिण, ससा, कोल्हा इत्यादी प्राणी असल्याचे त्या दोघांकडून कळले.. या दोघांचे बोलणे एकदम मस्त.. होती खरी धनगराची मूले.. पण त्यांची बोलण्याची पद्धत नि पाहुणचार करण्यात दाखवलेले तात्पर्य बघूनच आम्ही भारावून गेलो.. राम शिकतोय 'सातवी' इयत्तेमध्ये तर लक्ष्मण 'चौथी'मध्ये..
सूप तयार झाले नि आम्हीच काय तर राम-लक्ष्मणच्या घरातील इतर मंडळीनीदेखील सूपचा आस्वाद घेतला.. रोहीतने आणलेला तिखट शेव या सूपमध्ये टाकून चवीला अजूनच रंगत आणली.. सूप संपले नि टोपात 'Ready to Eat' ची पाकीटे घातली..Show Must Go on नि वेळ जाईस्तोवर निखार्यावर पापड भाजून खाण्याचा आमचा टिपी सुरु झाला.. थंडीमध्ये जंगलमय प्रदेशात भर चांदण्यांमध्ये चूल पेटवून जेवण बनवण्याचा आनंद काही औरच.. साहाजिकच आम्ही त्या शांततेत मंद स्वरात आमचे गळे आळवू लागलो..
तुम्ही आमचे सूर इथे ऐकू शकता.. काळोख्या रात्रीत काय मजा असते ते कळेल.. ! एक झलक !
https://picasaweb.google.com/yo.rockks/TornaToRajgadClip?authkey=Gv1sRgC...
एकूण या वातावरण निर्मितीमुळे दिवसभरातील त्रागा, थकवा यांना खूप मागे सोडून आलो.. 'पनीर बटर' 'दाल मख्खनी' 'पुरणपोळ्या' 'व्हेज बिर्यानी' इति जबरदस्त जेवण झाले.. आमची पोटं भरताना आमचा सहावा साथिदार म्हणजेच कुत्र्याच्याही खाण्याची काळजी घेतली.. 'ट्रेक मे कब किसी से कैसी दोस्ती बन सकती है ये कोई ना जाने'..
सगळे आटपले नि आता वेध लागले झोपेचे.. आमच्या सॅक्स घेउन त्या "भल्या मोठ्या" घरात पहिल्यांदाच शिरलो.. ! नि बघूनच हडबडलो.. ! आमची घराच्या मध्यभागी झोपण्यासाठी सोय केली होती.. राम-लक्ष्मणची फॅमिली बरीच मोठी होती.. त्यांचे आईवडील नि दोन- तीन नातेवाईक रहायला होते..त्यात अगदी जेमतेम एक वर्षाचे छोटे मूल होते.. शिवाय गाय, वासरु, बैल, बकर्या, कोंबड्या, एक कुत्रा नि एक मांजर.. !!! सगळे एकाच छताखाली.. चार भिंतींमध्येच..! त्यामुळे अंतर्गत खोल्या जरी नसल्या तरी हे छोटे घर इतका मोठा परिवार सामावून घेत असल्याने भले मोठेच समजायचे ! एका कोपर्यात देवारा, एका कोपर्यात चूल.. गोठादेखील घरातच ! आणि आता तर त्यात आमच्या पाचजणांची भर... नशिब आमच्याबरोबर असणार्या त्या कुत्र्याने घराबाहेरच झोपण्यासाठी जागा निवडली होती.. इथे घरात मी ज्या कडेला झोपणार तिथून तीन-चार वित अंतराने वासरु नि बकर्या बांधल्या होत्या.. तर आमच्या पायाच्या खालच्या बाजूस गाय- बैल..! तर दुसर्या कडेला जिथे नविन झोपला होता तिथेच बाजूला त्या घराचा राखणदार 'कुत्रा' झोपला होता.. झोपला कुठे.. सारखा इथून तिथे उड्या मारत होत्या.. त्यामुळे 'नविन' भलताच टेंशनमध्ये आला होता.. म्हटले हाच एक अनुभव घ्यायचा राहीला होता..! ही रात्र तरी माझ्या आयुष्यातील एक अस्विमरणीय अनुभव देणारी होती..!!
लवकरच आम्ही झोपी गेलो.. मग जाग आली ती थेट घरातला कोंबडा आरवल्यावर.. वाटले पाच वाजले.. पण बघतो तर चारच वाजले होते.. ! घरात असल्याने रात्री तेवढी थंडी जाणवली नव्हती.. पण आता पहाटे थंडीने जोर धरला होता नि तीने घरातदेखील शिरकाव केला.. ! माझ्यासोबत इंद्राचीदेखील झोप पुर्ण झाली होती.. सो बाहेर जाउन चहा टाकू म्हणत आम्ही उठलो.. कुडकुडतच बाहेर आलो.. या घराच्या एकमेव दरवाज्यातून बाहेर पडले की समोरच राजगड दर्शन !! यापेक्षा आणखी काय हवे.. पहाटेचे चांदणे बघण्यातही एक आगळीच मजा असते.. सभोवताली चांगलेच दव पडले होते.. थंडीचा जोर पहाटेला जास्त असतो.. नि तो आम्ही अनुभवत होतो.. राम-लक्ष्मण फॅमिलीने आम्हाला त्यांच्या घरात राहण्यास जागा करून दिल्याने आम्ही बचावलो होतो.. लगेच चूल पेटवण्याच्या कामाला लागलो.. तिथेच बाजूला दोन व्यक्ती झोपलेल्या दिसल्या.. नंतर कळले की कोणी दूरच्या नात्यातले वारले होते तसा संदेश घेउन ते दुसर्या गावातून रात्री आले होते..
लवकरच राजगडाच्या मागच्या बाजूस उजाडू लागले.. साहाजिकच पुन्हा कॅमचे शटर उघडले गेले
(राजगडची एक पूर्ण बाजू..)
- - - - -
<
- - - - -
इंद्रा चूल पेटवताना.. नि धनगरचा वाडा..
लवकरच एकेक करून आमचे इतर सहकारी बाहेर आले.. चहा बनलाच होता.. आता मॅगीचा नाश्ता तयार होईपर्यंत सगळे फ्रेश झाले.. पेटपूजा आटपली नि पुन्हा नव्या दमाने पुढील वाटचालीसाठी सज्ज झालो.. आता इथून पुन्हा तोरणा जरी करायचा म्हटला तरी केला असता इतकी शक्ती आली होती.. आमच्याबरोबर राम येणार होता.. ही मुले गडावर जाउन ताक विकतात.. ! आतादेखील रामने आमच्याबरोबर येताना ताकाची किटली डोक्यावर चढवली.. त्याला म्हटले लक्ष्मणला का नाही संगतीला घेत तर म्हणे 'नको.. तो स्वतःच ताक संपवून टाकतो' या दोघांचा निरागसपणा मला जास्त भावला..
कूच करण्याची वेळ झाली.. पुन्हा एकदा प्लॅनमध्ये बदल केला.. आमच्या सॅक्स इथेच ठेवून खाण्यापिण्याचे सामान 'नविन'च्या सॅकमध्ये घेतले.. म्हटले पाठीवर ओझे नसेल तर शक्य तितका राजगड बघता येइल.. नि गुंजवणेला उतरुन तिकडूनच गाडी घेऊन इकडे येऊ नि मुंबईला निघू असा बदल केला..
घरातील बकर्या, गुरे चरण्यासाठी बाहेर काढली गेली.. त्यांच्याबरोबरच आम्ही सुद्धा बाहेर पडलो..
(काउबॉय म्हणा वा बकरीबॉय म्हणा.. जल्ला तो यो रॉक्स हाय.. हा फोटू गिरीच्या कॅममधून..)
रामची बोनी आम्हीच करणार होतो त्यामुळे १०० रुपयाचे ताक आमच्या नावावरच बुक करुन ठेवले.. लवकरच वाट जंगलात घुसली.. ह्या काट्याकुट्याची असलेल्या आडवाटेने जाताना मस्तच वाटत होते.. अगदी नॅचरल ट्रेलसारखे.. त्यात भर म्हणून राम आम्हाला आवर्जून शक्य तिथे झाडांची माहिती देत होता.. आम्हाला इथे दिनेशदांची आठवणा नाही झाली तर नवलच.. या रामचे कौतुक करायचे तर त्याची बोलण्याची पद्धत अगदी गाईडला शोभणारी.. हे कुठून शिकला असेल ?? गडावरती ताक विकताना येणार्या ग्रुपशी बातचीत करताना.. !! खरच काही गोष्टी परिस्थितीच माणसाला शिकवतात याचे एक उदाहरण आमच्या समोर होते..
(ही वाट जंगलातून जाते...)
-------
(आमचा सहावा पार्टनर..)
-------
(ताकाची किटली घेवून उभा असलेला राम नि मायबोलीवीर)
-------
(ही पाने म्हणे खाल्ली की दात पडतात !! )
-------
वाटेत लागणारे कडीपत्त्याचे झाड, शिकेकाईचे झाड नि बर्याच काही झाडांची माहिती राम आम्हाला देत होता..
लवकरच चढ पार करत, जंगल पार करत आम्ही डोंगरावर आलो.. डोंगरावर पोहोचलो म्हणजेच तोरणा-राजगडच्या वाटेला येवून मिळालो ! वूssहूsss हीच ती वाट जिचा नाद काल आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने सोडला होता.. पण आता पुन्हा त्याच वाटेवरी ! अगदी 'आनंद पोटात माज्या माईना ग माईना' असे झाले.. कालचा निर्णय किती योग्य होता ते पटले.. नि त्या निर्णयामुळे आम्हाला आतापर्यंत अनेक अनुभवांचा आस्वाद घेता आला होता.. जे अन्यथा आम्ही मुकले असतो..
(आम्ही याच जंगलातून वर आलो !!!)
------
इथेच एका टेकडीवरती कारवीचे जंगल नि आकाशातील चंदामामा छानच दिसत होते..
आता आमचे पुन्हा अपडाउन सुरु झाले. हो अजून तीन चार डोंगर पुढ्यात होतेच.. सकाळची वेळ असल्याने उनाचा त्रास नव्हता.. वाराही भन्नाट सुटला होता.. लवकरच आम्ही अंतिम टप्प्यात आलो जिथे एक छोटी घळ लागते.. इथूनसुद्धा दोन विरुद्ध दिशेस जाणार्या पाउलवाटा आहेत.. एक जाते भुतोंडे गावात तर दुसरी पालीगावाकडे..! आम्ही तिथेच क्षणभर थांबून ताकाचा आस्वाद घेतला नि अंतिम डोंगर चढू लागलो..
(आमचा इमानदार पार्टनर रोहीतकडून लाड करुन घेताना..)
- - - -- -
(अंतिम लक्ष्य दृष्टीपथात..)
- - - -- --
- - - - -
- - - - -
चढ पार केला नि एकदाचे संजीवनी माचीच्या टोकाशी येउन पोहोचलो !! हुर्रे ! काल खिंडीत असताना वाटलेही नव्हते की राजगड गाठू ! त्यातच एक आगळीवेगळी वाट चोखंदळल्यामुळे अभिमान वाटू लागला.. याच टोकावर असणार्या बलाढ्य बुरुजाची कल्पना इथूनच करण्याजोगी !!
इथेच मग उड्या मारून जल्लोष करण्यात आला..
लवकरच आटपते घेतले.. कारण आमचा राजगड प्रवेश अजून बाकी होता.. आता ह्या संजीवनी माचीला वळसा घालून चालायचे होते.. ही वाट संजीवनी माचीच्या भक्कम अश्या चिलखती तटबंदीचे दर्शन घडवत जाते.. सोपीशी वाट.. डावीकडे संजीवनी माचीची अभेद्य भिंत..
- - - -- - -- -
तर समोर दिसणारा बालेकिल्लाचा डोंगर नि उजवीकडे पसरलेली सुवेळा माची..!
<
मागे मी पावसात राजगडावर आलो होतो तेव्हा दाट धुक्यामुळे संजीवनी माची फारशी बघता आली नव्हती.. नि पावासात राजगड म्हणजे हिरवाईने नटलेला असतो.. पण आता राजगडचा खरा रांगडेपणा दिसत होता..!
इंद्रा आणि गिरी यांनी हा राजगड अप्पांसोबत केला असल्याने त्यांना मिळालेली माहिती जशी आठवेल तशी सांगत होते.. लवकरच आम्ही अळू दरवाज्यापाशी पोहोचलो.. ! 'तोरणा-राजगड' मार्गाने राजगड गाठण्याचे लक्ष्य आम्ही साधले होते !
शिवगर्जना देत अळू दरवाज्यापाशी पाया पडत आम्ही गडांचा राजा,राजियांचा गड अश्या 'राजगडा'वर प्रवेश केला..!!
जय शिवाजी जय भवानी !
क्रमश :
पुढील भाग : अंतिम भाग
यो, अश्या रितीने आपला
यो, अश्या रितीने आपला तोरणा-राजगड पार पडला....
सुंदर वर्णन अन प्रचि....
राजगडाची संजिवनी माची एका वेगळ्या कोनातुन बघायला मिळाली...
झकास .... मि असा trek फक्त
झकास .... मि असा trek फक्त स्वप्ना मधेच करु शकतो.
सुंदर... मला ते पहाटेचे वर्णन
सुंदर...
मला ते पहाटेचे वर्णन फार आवडले आणि ट्रेक मिस केला असं पहिल्यांदाच वाटून गेलं...
सुं द र !!!
सुं द र !!!
हो ते राम-लक्ष्मण आपल्या
हो ते राम-लक्ष्मण आपल्या मदतीला धावुन आले म्हनुन नाय तर हा अनुभव मुकलो असतो.
यो भारी वर्णन केलेस....
राजगडाची संजिवनी माची एका
राजगडाची संजिवनी माची एका वेगळ्या कोनातुन बघायला मिळाली... >>> पण आता राजगडचा खरा रांगडेपणा दिसत होता..! >>> अगदी अगदी
सुंदर वर्णन, प्र.ची. एकदम
सुंदर वर्णन, प्र.ची. एकदम बोलकी.... मस्तचं रे यो......!!!!संजीवनी माचीची अभेद्य भिंत>>>> या बाजुन पाहिली नव्ह्ती अजुन.
मस्त प्रचि आणी वर्णन पण...
मस्त प्रचि आणी वर्णन पण... अंतिम भागाची वाट पहात आहे...
एक जाते भुर्तंडे गावात तर दुसरी पालीगावाकडे >>> अरे भुर्तंडे नाही रे.. भुतोंडे गाव ते
मस्तच (आमचा इमानदार पार्टनर
मस्तच
(आमचा इमानदार पार्टनर रोहीतकडून लाड करुन घेताना..) >> ईथे असलेला फोटो आणि (आमचा सहावा पार्टनर पण तयारच होता..) >> हा फोटो याची असलाबदल करशील का?
मस्तच रे. खरे तर त्या
मस्तच रे. खरे तर त्या लोकांच्या सोप्या वाटा आपल्यासाठी अवघडच असतात. आपण बूट, काठी वगैरे जामानिमा करुन निघतो. त्यांच्या पायात धड चप्पल पण नसते. शिवाय डोक्यावर ओझे असते ते वेगळेच.
पण त्यांची चालण्याची पद्धत खास असते. ते एकाजागी फार वेळ पाय टेकतच नाहीत, त्यामुळे तोल जायच्या आत त्यांनी पुढची पायरी गाठलेली असते. ते तंत्र आपल्याला जमत नाही.
आणि त्यांच्या झाडपाल्याच्या ज्ञानाला तर माझा कायमच मानाचा मुजरा असतो.
मनोज, जुई.. चुक सुधारलीय
मनोज, जुई.. चुक सुधारलीय
धन्यवाद
सह्ही!
सह्ही!
मित्रा, तुझा वृतांताची एक
मित्रा, तुझा वृतांताची एक वेगळीच शैली असते आणि त्याला सुंदर प्रचिची साथ!!
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत वृतांत.
:पुढिल भागाची वाट पाहणारा बाहुला:
सह्हीये!!जिप्सीला अनुमोदन
सह्हीये!!जिप्सीला अनुमोदन
फार सुंदर तो ताकवाला राम रोज
फार सुंदर
तो ताकवाला राम रोज एवढं चालून जातो डोक्यावर ताकाची कासंडी घेऊन? त्या खोबणीसारख्या पायर्या तो कसा चढतो?
सह्ही~! बकरीबॉय यो रॉक्स
सह्ही~!
बकरीबॉय यो रॉक्स
अभिनंदन यो , राजगडाचे दर्शन
अभिनंदन यो , राजगडाचे दर्शन झाल्याबद्दल
झकास!! सही वर्णन एकदम.
झकास!! सही वर्णन एकदम.
सगळ्यांचे धन्यवाद रोज एवढं
सगळ्यांचे धन्यवाद
रोज एवढं चालून जातो डोक्यावर ताकाची कासंडी घेऊन? त्या खोबणीसारख्या पायर्या तो कसा चढतो? >> त्यांना ती कला चांगलीच अवगत असते.. त्यांच्यासाठी हे सगळे सोप्पेच असते..
खुपच मस्त, लगे रहो, बकरीबॉय.
खुपच मस्त,
लगे रहो, बकरीबॉय.