Submitted by रामकुमार on 4 February, 2011 - 15:13
कालच पहिल्यांदा मायबोली संकेतस्थळाला भेट दिली तेंव्हा-
'दु:ख आता फार झाले-तरही' बद्द्ल वाचण्यात आले.
आज सकाळी तरही गझल लिहिली,
आणि आत्ता पोस्ट करीत आहे,
उशीर तर झालाच आहे.
क्षमस्व!
------------------------------------------------------------------------------------
श्वासही दुश्वार झाले
दु:ख आता फार झाले!----१
वादळे बंदिस्त चित्ती
सांगणे अनिवार झाले!----२
वाहिल्या इच्छा विषारी
डोह उरिचे गार झाले!----३
दग्ध चिंतांनी गुलाबी
रक्त काळेशार झाले!----४
सूर्य ग्रहणाने बुडाला
प्राक्तनाचे वार झाले!----५
उमजलो अस्तित्वदंशा
हृदय हे हळुवार झाले!----६
आवरी तृष्णा जराशा
अपूर्णांचे भार झाले!----७
मित्र पण पूर्वाश्रमीचे
का बहीरे ठार झाले?----८
-रामकुमार.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
राजकुमारजी, स्वागत तुमचं या
राजकुमारजी,
स्वागत तुमचं या संकेत स्थळावर. गजल फार छान जमलिय. सर्वच शेर मस्त. अभिनंदन. असाच प्रवाह वाहो.
स्वागत रामकुमारजी आपले. छान
स्वागत रामकुमारजी आपले.
छान जमलीय गझल..
तिसर्या शेरात थोडा बदल केल्यास वाचणे सुलभ होईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या शेरात नवीन संकल्पना आहेत.
पुलेशु.
सूर्य ग्रहणाने
सूर्य ग्रहणाने बुडाला
प्राक्तनाचे वार झाले!
वा!!!
श्वासही दुश्वार झाले दु:ख आता
श्वासही दुश्वार झाले
दु:ख आता फार झाले!-
आवडली !!
श्वासही दुश्वार झाले दु:ख आता
श्वासही दुश्वार झाले
दु:ख आता फार झाले!-
दुश्वार म्हणजे काय?
दुश्वास हवं होत का?
स्वागत! अपूर्णाने यात वृत्त
स्वागत! अपूर्णाने यात वृत्त काहीसे बदलते.
शुभेच्छा!
क्या बात है.......
क्या बात है.......
सर्वांचे आभार! मुकु,दुश्वारच
सर्वांचे आभार!
मुकु,दुश्वारच म्हणायचे होते.
हिन्दी-जिंदगी दुश्वार हो गई/कठीण,मुश्कील.
निशिकांतजी, धन्यवाद! संकेतस्थळ सुचवल्याबद्दल.
रामपुत्र म्हणून रामकुमार.(राजकुमार नाही.)
कैलासजी, बेफिकिर(जी लिहिणे मुद्दाम टाळतोय),
सहमत.मात्रावृत्तात होऊन चाललीय त्यामुळे.
धन्यवाद!
रामकुमार.
छानच!!
छानच!!
क्या बात है......
क्या बात है......
छान जमलिये.. पुलेशु..
छान जमलिये.. पुलेशु..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख, खुप आवडली मायबोलीवर
सुरेख, खुप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवर स्वागत, रामकुमारजी !
श्वास व वादळे आवडले.
श्वास व वादळे आवडले.
मायबोलीवरची तुमची पहिलीच गझल
मायबोलीवरची तुमची पहिलीच गझल पण खूप छान .पुलेशु .