दु:ख आता फार झाले..

Submitted by मी मुक्ता.. on 30 January, 2011 - 07:00

सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...

गुलमोहर: 

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले.

सुरेख झालेत.

सोयरे सोडून जाता

असे हवे का?

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले.>>>

हा शेर खूप सुंदर आहे मी मुक्ता!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मी मुक्ता,
गजल सुरेख जमलीय. सर्वच शेर खूप आवडले. माझी पण याच तरही मिस-यावर केलेली गजल "भार झाले" साईटवर आहे. वेळ मिळेल तेंव्हा वाचणे.

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..
.
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...

हे शेर उत्तम झाले आहेत. अभिनंदन Happy

खरच की! झाड यांच्याशी सहमत!

श्वास आता भार झाले हा शेर मस्तच!

मी घाईघाईत गझल वाचली असावी बहुधा! (हा शेर मी प्रतिसादात वाचला??)

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

@झाड, धन्यवाद.. Happy

@बेफिकीरजी,
ह्म्म.. Happy तुम्ही परत येवुन प्रतिसाद वाचलात त्याबद्दल आभार.. Happy आपल्यासारख्या जुन्या जाणत्या गझलकारांच्या कौतुकाची आणि त्याहीपेक्षा जास्त, मार्गदर्शनाची वाट बघत असते मी... Happy खूप आभार...