Submitted by मी मुक्ता.. on 30 January, 2011 - 07:00
सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..
शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..
काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..
झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..
सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..
रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..
मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...
गुलमोहर:
शेअर करा
झेलली मी वादळे पण, आसवांचे
झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..>>> हा मस्ताय!!
झेलली मी वादळे पण, आसवांचे
झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले.
सुरेख झालेत.
सोयरे सोडून जाता
असे हवे का?
धन्यवाद मुटेजी.. केला
धन्यवाद मुटेजी..
केला बदल...
विजयजी.. आभार..
सोयरे सोडून जाता, झुंजणे
सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले.>>>
हा शेर खूप सुंदर आहे मी मुक्ता!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
धन्यवाद बेफिकीरजी..
धन्यवाद बेफिकीरजी..
मी मुक्ता, गजल सुरेख जमलीय.
मी मुक्ता,
गजल सुरेख जमलीय. सर्वच शेर खूप आवडले. माझी पण याच तरही मिस-यावर केलेली गजल "भार झाले" साईटवर आहे. वेळ मिळेल तेंव्हा वाचणे.
सोयरे सोडून जाता, झुंजणे
सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..
.
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..
मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...
हे शेर उत्तम झाले आहेत. अभिनंदन
शेवटचे दोन आवडले...
शेवटचे दोन आवडले...
डॉक, आनंदयात्री, धन्यवाद..
डॉक, आनंदयात्री,
धन्यवाद..
मस्त शेर....
मस्त शेर....
तू दिलेले गंध गेले, श्वास आता
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..
क्या बात है.... वाह...
@भुंगा, रोहनजी खूप खूप आभार..
@भुंगा, रोहनजी
खूप खूप आभार..
मुक्ता, गझल आवडली. भार आणि
मुक्ता, गझल आवडली. भार आणि गंधार अप्रतिम!
धन्यवाद क्रांतिजी...
धन्यवाद क्रांतिजी...
शेवटचा शेर अप्रतिम.
शेवटचा शेर अप्रतिम.
धन्यवाद अलकाजी..
धन्यवाद अलकाजी..
तू दिलेले गंध गेले, श्वास आता
तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले.
व्वा!!!
खरच की! झाड यांच्याशी सहमत!
खरच की! झाड यांच्याशी सहमत!
श्वास आता भार झाले हा शेर मस्तच!
मी घाईघाईत गझल वाचली असावी बहुधा! (हा शेर मी प्रतिसादात वाचला??)
क्षमस्व!
-'बेफिकीर'!
@झाड, धन्यवाद..
@झाड, धन्यवाद..
@बेफिकीरजी,
तुम्ही परत येवुन प्रतिसाद वाचलात त्याबद्दल आभार..
आपल्यासारख्या जुन्या जाणत्या गझलकारांच्या कौतुकाची आणि त्याहीपेक्षा जास्त, मार्गदर्शनाची वाट बघत असते मी...
खूप आभार...
ह्म्म..
मुक्ता,गझल आवडली.
मुक्ता,गझल आवडली.
मस्तच, भार आणि गंधार आवडले
मस्तच, भार आणि गंधार आवडले
@साती, विशालजी, खूप धन्यवाद..
@साती, विशालजी,
खूप धन्यवाद..
खरंच सुंदर.
खरंच सुंदर.
आभार उमेशजी..
आभार उमेशजी..