इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
कोवळ्या पिंपळपानाचा फोटो
कोवळ्या पिंपळपानाचा फोटो सहीच!
<<पिंपळपानावर बाळकृष्ण असतो ! (मग मूंजा कुठून असेल ?)>> पॉईंट नोटेड ! आता पुढच्यावेळी ते मुंजाचं लक्षात आलं की हटकून बाळकृष्णाचं आठवेल.
पण,
वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालंमुकुंदं मनसा स्मरामि । .....वट म्हणजे वड नाही का ?
( पिंपळपानावर तोंडात पायाचा अंगठा धरणार्या कृष्णाला ' चिन्मय ' म्हणतात ना ? )
आईग्ग, किती त्या शंका !
हे प्रश्न बाफच्या विषयाला सोडून आहेत, त्यामुळे उत्तरं दिली नाही तरी चालतील हं.
या झाडांशी आपल्या देवदेवता
या झाडांशी आपल्या देवदेवता निगडीत आहेत ते किती छान.
वड आणि पिंपळ. या दोन्हीवर अनेक पक्षी आणि प्राणी राहतात. निशाचरांपैकी घुबड आणि वटवाघळे असू शकतात. त्यांचा आवाज, या झाडांचा आकार आणि पानांची सळसळ (वडाच्या पारंब्यादेखील ) यांनी काही प्रमाणात भितीदायक वातावरणनिर्मिती होते खरी. पण त्यावेळी त्या झाडाखाली असलेली घुमटी, मारुतीराया अभय देतो, हेही खरे.
बाकी प्रश्नांसाठी, ओव्हर टू चिनूक्स !
दिनेशदा, साधना, जागू,
दिनेशदा, साधना, जागू, तुम्हाला कोपरापासून नमस्कार !!! प्रत्येक झाडाची, पक्षांची,खरतर प्रत्येक विषयाची किती माहिती आहे तुम्हाला? शतश: धन्यवाद. तुमच्यामुळे आमची बुद्धी विकसित होत आहे. तुम्हाला गुरु दक्षिणा द्याविच लागणार.
किति वेगवेगळ्या विषयावर छान
किति वेगवेगळ्या विषयावर छान माहिती मिळतेय. पिंपळाच्या झाडाचा विस्तार केवढा आहे?
रच्याकने, दिनेशदा मायबोलीवर १०० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केल्याबद्द्ल मनापासून अभिनंदन!!!
खरेच की... दिनेशनी सेंचुरी
खरेच की... दिनेशनी सेंचुरी मारलीय... अभिनंदन दिनेशदा.....
अभिनंदन दिनेशदा
अभिनंदन दिनेशदा
दिनेशदा केक कापा अभिनंदन.
दिनेशदा केक कापा अभिनंदन.
जागू,मेल चेक करा
जागू,मेल चेक करा
दिनेशदा, अभिनंदन. केक पायजेल
दिनेशदा, अभिनंदन. केक पायजेल !
वा दिनेशदा, शंभरी गाठलीत!
वा दिनेशदा, शंभरी गाठलीत! हार्दिक अभिनंदन!!!
केक मागणार्यांनो, आधी दिनेशदा, सगळ्यांची चाचणी परीक्षा घेणारेत. झाडा-फुलांचे फोटो ओळखा ... त्यात जे जे पास होतील त्यांनाच केक. मी माझा माझा केक विकत घेऊन खाल्ला पण.
मामी
मामी
दिनेशदा, धन्स ! कावळा आणि
दिनेशदा,
धन्स ! कावळा आणि कोकीळ यांच्या अंड्याबद्दलची माहिती अगदी खास वाटली ....
माबोवरच्या पीचवर केलेल्या सेंचुरीबद्दल अभिनंदन !
डॉक,
कांडिळीचे फोटो आवडले ...
आपल्याला बघताना वाईट वाटते, पण त्या पक्ष्यांसाठी ते नॉर्मल असते. सर्वात बलवान पिल्लूच जगते.
पक्ष्यांबद्दल हे वाचुन वाईट वाटलं, थोडक्यात जो बलवान असेल त्यालाच फक्त जगण्याचा अधिकार आहे ?
कदाचित हा गुण पक्ष्यांनी (अलिकडच्या) माणसांकडुन घेतला असेल, जो आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक देशद्रोह, अन्याय, भ्रष्टाचाराचे प्रकार फक्त पाहत,कधी पचवत "जगण्याची ताकत" ठेवतो.
अनिल, निसर्ग या बाबतीत अगदी
अनिल, निसर्ग या बाबतीत अगदी कठोर असतो. जगण्यास लायक आणि बलवान प्रजाच तो टिकू देतो.
मी जे कांडोळीचे फूल म्हणत होतो ते हे. याचा वेल असतो. फूलाची उंची ८ सेमी आणि व्यास ६ सेमी असतो. (रानपडवळाच्या फूलाला पण अशीच लेस असते, पण ते फूल खुप छोटे असते )
मामी, ऑकलंडच्या फूलांनी माझा माज (मला काहितरी कळते हा ) उतरवून टाकला. आता टाकतोच हे फोटो, इथे.
इथे फूलांचे प्रदर्शन भरवलेय,
इथे फूलांचे प्रदर्शन भरवलेय, अवश्य भेट द्या.
(आपल्या माणसांत फिरवली, तर त्याला रिक्षा म्हणू नये.)
http://www.maayboli.com/node/23039
http://www.maayboli.com/node/23131
http://www.maayboli.com/node/23133
जागु तुझा मिरी चा वेल आणला
जागु तुझा मिरी चा वेल आणला आहे. मिरीच्या झाडाचे दोन प्रकार असतात. मिरी वेल आणि मिरी बुश.
मिरी वेल नारळाच्या झाडावर चढवतात. माझ्या शेतात अध्याप मिरी वेलाला खान्द्यावर घेण्यासारखे नारळाचे झाड नाही त्या मुळे मी मिरी बुश लावला आहे.
२६ तारखेला शेतावर जाताना वाटेत देव कान्चनाचे झाड दिसले. ( कान्चन फुलु लागला आहे).झाड मस्त फुलले होते म्हणुन जवळ जावून बाल बच्चे दिसतात का म्हणून पाहीले.खुप बच्चे मन्डळी होती. आज जाताना कूदळ घेऊन गेलो आणि चार बाळाना शेतावर घेऊन गेलो.
सोबत जागुचे मिरी वेलाचे आणि कमन्डलु च्या झाडाचे फोटो जोडत आहे.
(No subject)
विजय, कमंडलू म्हणजे कलाबाश तर
विजय, कमंडलू म्हणजे कलाबाश तर नव्हे, असेच असते ते.
तूम्ही आणि जागू, पिंपळी का लावत नाही, मिरीला चांगला आणि औषधी पर्याय आहे तो. शिवाय त्याचे झाडच असते.
हो ते कलाबाश च. मराठी पर्याय.
हो ते कलाबाश च. मराठी पर्याय.
साधने, मला पायज्येत फॅशन
साधने, मला पायज्येत फॅशन फ्रूट चे वेल.
सगळ्यानाच... काय काय झाडं झुडपं आहेत ती द्या पाहू.
दिनेशदा, अब्बीनंदन.
बाकी निसर्गाचे नियम कोणीच टाळू शकत नाही. उत्तमोत्तम प्रजा उपजावी म्हणूनच निसर्ग कमजोराचा नाश करत असतो. हा ही उत्क्रांतीचा भागच.
तू आधी जाऊन कलींगडाच्या बीया
तू आधी जाऊन कलींगडाच्या बीया पेर. आता लावल्यास तरच मिळतील कलिंगडे सिजनमध्ये.
मला कलिंगड नकोयत साधनाज्जी
मला कलिंगड नकोयत साधनाज्जी झाडं आणि वेली हव्यात. त्याचाच जोगवा मागत फिरतोय
स्वगत : वयोमानानुसार आज्जींना कमी ऐकू येउ लागलं कॉय ?
विजय धन्स. आता तो
विजय धन्स. आता तो माझ्यापर्यंत कसा येईल वेल ?
त्या कमन्डलुच्या फळाच काय करतात ?
दिनेशदा पिंपळीचा काय उपयोग होतो ?
जागू, कमंडलू म्हणजे कलाबाश
जागू,
कमंडलू म्हणजे कलाबाश असेल तर त्याचा काहिच उपयोग नसतो. प्राणी पण त्या फळाचा गर खात नाहित. इथे आफ्रिकेत ते फळ सूकवून त्याचा पाणी भरण्यासाठी उपयोग करतात.
पिंपळीची चव मिरिसारखीच असते. अनेक औषधात ती वापरतात. पोर्तूगीजांनी आपल्याकडे मिरची आणण्यापूर्वी, तिखटपणासाठी आपल्याकडे जेवणात मिरी, पिंपळी, लसूण व आले एवढेच पदार्थ वापरत असत.
वा.. हा बाफ खूपच बहरला. सगळी
वा.. हा बाफ खूपच बहरला. सगळी करामत साधना, दिनेश सारख्या निसर्गप्रेमींची आहे. नवीन माहिती मिळाली. किती पाहू नि किती वाचू असे होऊन गेले. माझ्याकडे पण नवीन फोटो आहेत. वेळ मिळाला की इथे डकवेन.
बी,आपल्याशी
बी,आपल्याशी सहमत...
साधना,जागू,दिनेशदा यांना या धाग्याबद्दल अन माहीती बद्दल प्रचंड धन्यवाद.
धन्स डॉ. कैलास आणि बी. डॉ.
धन्स डॉ. कैलास आणि बी.
डॉ. तुम्हाला संध्याकाळी तुमची माहीती देते.
स्वगत : वयोमानानुसार आज्जींना
स्वगत : वयोमानानुसार आज्जींना कमी ऐकू येउ लागलं कॉय ?
वयोमानानुसार ब-याच गोष्टींचा -हास होऊ लागतो. जसे वयोमानामुळे काँप्युटरवरचे वाचन कानांनी होत नसुन डोळ्यांनी होते हे माणूस विसरतो... मेंदूचा -हास दुसरे काय??
अरे झाडे तर लावच पण तिन महिन्यानंतर एखादे फळ पाहिजे तर आज लागवड करणे आवश्यक आहे.
मला पिटुनियाची रंगीबेरंगी फुले खुप आवडतात. कुंडीत किंवा टांगत्या कुंडीत खुप छान दिसतात. त्यांच्या बिया खसखशीपेक्षाही बारीक असतात. ह्या बिया सप्टेंबरात पेरणे आवश्यक आहे, तर कुठे डिसेंबरापासुन फुले फुलायला लागतात. मला नेहमी फुले दिसली की आठवते, बी पेरायला पाहिजे होते म्हणुन... गेले तीन वर्ष मी प्लॅनींग करतेय ही फुले घरी लावायचे आणि दरवेळी विसरते. अर्थात विकतचे रोप आणता येते पण मला बीया पेरुन रोपे आलेली पाहायला जास्त आवडते. या सप्टँबरात मात्र नक्कीच लावणार.
म्हणुन तुला मुद्दाम आठवण केली की मे महिन्यात कलिङ्गडे पाहिजे असतील तर आताच पेर्ते व्हा.
डॉ. तुमची मेल वाचली. सध्या तरी आलबेल आहे.
बी, सिंगापूरला यायचे आहे आता
बी, सिंगापूरला यायचे आहे आता एकदा निवांत. बरेच बदललेय. आणि हो तिथेही छान जपलाय निसर्ग.
असूदे, कलिंगडाच्या काहि नवीन जाती (भारतातच) बघितल्या. वरून पिवळी साल आणि गरही पिवळाच. साल हिरवी गर पिवळा.
आपल्याकडे अजून बिनबियांची दिसली नाहीत. पण या सगळ्यांना भरपूर पाणी लागते.
साधना, या बियांची निसर्गात किती काळजी घेतली जाते ना ? तूमच्या भागात श्रावणात भरपूर तेरडा उगवतो, त्याच्या बिया तिथेच पडलेल्या असतात वर्षभर. आणि पावसाची चाहूल लागली कि बरोबर रुजतात. त्यांचे वेळापत्रक ठरलेले असते. कास सारख्या ठिकाणी, एकाच जागी वेगवेगळ्या काळात वेगवेगळी फूले दिसतात. त्या सर्व बिया एकत्रच असतात, पण कुणी कधी उगवायचे, ते ठरलेले असते.
दिनेशदा माझ्याकडे अजुन तेरडा
दिनेशदा माझ्याकडे अजुन तेरडा फुलतोय कुंडीत.
हो.. कुणी कधी उगवायचे आणि फळे
हो.. कुणी कधी उगवायचे आणि फळे द्यायची ते ठरलेले आहे.
माझे मिरचीचे रोपटे बिचारे फुलुन जातेय पण फळ धरत नाही. आता काढुन टाकावे लागणार.
मी हाती लागेल ते कुंडीत पेरते. मोसम असेल तर फळ मिळते, नसेल तर रोप वाढते पण पुढे काहीही होत नाही. मग वाटते, बिनमोसमी भाज्या पिकवण्यासाठी शेतकरी जमिनीवर आणि पिकावर किती अत्याचार करत असेल. जबरदस्तीने खताचा डोस द्यायचा, पिकांवर लवकर लागवडीसाठी औषधे फवारायची. मुकी बिचारी जमीन आणि पिके निमुटपणे अत्याचार सहन करतात आणि वर फळेही देतात. माणसाची हाव काही कमी होत नाही.
गेल्या आठवड्यात वाशीबाजारात आंब्याचे आगमन झाल्याची बातमी वाचली. इतक्या लवकर आंबा येणे आवश्यक आहेच का? आयुर्वेदात कोणत्या मोसमात काय खावे म्हणजे आरोग्यास लाभ होतो हे लिहिलेय. अशी बिनमोसमी फळे खाऊन आपण फक्त जीभेचेच चोचले पुरवतोय. एकदा अन्ननलिकेतुन ते फळ खाली उतरले की त्याचे पुढे काय होते त्याच्याकडे सोयीस्कर डोळेझाक (नरेंद्र गोळ्यांचा 'आहारातुन रोग हरा' लेख आठवला.)
Pages