क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विराट कोहली ने याही सामन्यात उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. त्याने हाणलेल्या चौकार षटकाराचे टायमिंग मस्तच होते. त्याच्या खेळात घिसडघाई जास्त दिसत नाही, त्यात दुसर्‍या डावात खेळताना, दबावाखाली त्याच्या खेळ बहरतोय असं त्याच्या खेळावरुन जाणवतय. उगाच आक्रमक नाही किंवा एकदम नांगर टाकून बसत नाही, व्यवस्थित स्ट्राइक रोटेट करत खेळतोय. आगाऊ (मायबोलीवरचा आयडी नव्हे Happy ) दिसत असला तरी खेळताना त्याची जाणीव होत नाही. तो भारताचा भावी कर्णधार ठरेल अस मला वाटतं.

बाकी धोण्याने पटेल व शर्मा यांना संधी देऊन काय सिध्द केलं काय माहिती. हे दोघे विश्वचषक संघात नाहीत. कदाचित आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ही उपाधी मिळवण्याची धोनीला घाई झाली असावी.

बाकी काल युवराजचा स्मिथने पकडलेला झेल भारीच होता..स्मिथचे ते अवजड धूड ज्या पद्धतीने गतीने हालले व झेप घेतली ते जबरदस्त होते.

ओपनिंगला दुसरे कुणी नाही म्हणून पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा.
आधीच्या मॅचमध्ये पण सगळे कॅचेस अफलातून होते म्हणे. झहीरने पण आधी धावत येऊन उडी मारून झेल घेतला होता?

>>ओपनिंगला दुसरे कुणी नाही म्हणून पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा.
युसुफ आहे ना, २०-२० च्या मॅच मधे (पाक वि.) तो आला होता. त्याला खेळवला पाहिजे होता.
नाहीतरी रोहित शर्मा फ्लॉप झालाय ओपनिंगला.

रोहीत शर्माला कायमस्वरूपी श्रीफळ मिळण्यासाठी त्याने अजून किती डाव फ्लॉप होणे आवश्यक आहे? धोनीचे नीलाक्ष सुपुत्र (ब्ल्यू आईड बॉईज) म्हणजे मुरली विजय, रोहीत शर्मा (आणि यापूर्वी रविंद्र जडेजा) असंख्य वेळा फेल झालेले आहेत. पण त्यांच्यापैकी कोण ना कोण तरी कायम संघात असतोच.

ते जाऊदे.
गेल्या दीड वर्षात खुद्द धोणी ची फलंदाजीतील कामगिरी अत्यंत सुमार म्हणता येईल.. चांगला संघ आहे म्हणून जिंकतयात, अन्यथा धोणी हा खरोखरीच "खोटा सिक्का" ठरेल.. विश्वचषकातून भारत लवकर बाद झाला आणि धोणी पुन्हा फलंदाजीत अपयशी ठरला तर या खोट्या सिक्क्यालाही लवकरच नारळ मिळ्ले बहुदा... Happy

केदार. वर्ल्ड कप साठी खूप प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. मी रजा घ्यावी म्हणतो. Happy

काल कारण नसताना बॉलिंग मधे नको ते बदल करून धोनीने १२०/५ नंतर पकड घालवली. त्याची पण प्रॅक्टिस झाली. हरभजन ने बेकार बॉलिंग टाकली. काय करू नये याचेच धडे बहूतेक गॅरीने कालच्या मॅच मधे गिरवून घेतले असणार.

पुन्हा एकदा आपण सपाटून मार खातोय. रोहीत शर्मा, धोनी, युवराज एकसारख्या चेंडूवर बाद झाले (ऑफ स्टंपच्या खूप बाहेर असलेल्या चेंडूला अजिबात पाय न हलविता जागेवरून बॅट लांब करून कट मारायचा प्रयत्न करून स्लिपमध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल जातो किंवा बॅटला लागून चेंडू स्टंपावर आदळतो). रोहीत शर्मा तर जवळपास प्रत्येक सामन्यात असाच बाद होतो. धोनी जर कर्णधार नसता तर एव्हाना सुमार कामगिरीमुळे त्याची केव्हाच हकालपट्टी झाली असती.

फक्त पार्थिव पटेल आणि पठाण पॉझिटिव्हली खेळले. पार्थिवच्या दुर्दैवाने त्याचा घेतलेला झेल जमिनीला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते, तरीसुध्दा त्याला बाद दिले. शक्य असले तर विश्वचषकासाठी धोनीला काढून त्याला घ्यावे व साहेबांना किंवा सेहवागला कर्णधार करावे.

पठान पेटलाय.................................. Happy

>>स्टेनगन समोर नवीन चेंडूवर युसुफ पठाण चालणार?
युसुफ पठाण !! त्यानेच आज १०० केले :)आपण तरीही हारणार.

पठाण ने मॉर्नेला ती शॉट खेळायला नको होती. कारण त्या आधीच स्मिथ आणि मॉर्ने आखणी करत होते शॉर्ट टाकायची. शिवाय बॉल जास्त आणि रन कमी झाले होते. थोडासा जोर हवा होता.

पण पठाण ने लाज राखली! जय पठाण !! वेलडन !!

पहिले ५ लोकं काय करत आहेत हे कळत नाही. धोनीला प्रश्न विचारायला हवा की तो नक्की काय करतो. त्याने विकेट फेकली.

ह्या सिरीज मध्ये पटेल हा सर्वात चांगला ओपनर ठरला. Happy

शमला पण पठाण. Sad अवघड आहेस आज पण. थोडक्याकरता गेला.. लै भारी खेळला पण हॅट्स ऑफ. निदान त्याचा खेळाकरता तरी जिंकायला हवे आज. Happy भारी.

सिरीज वैशिष्ट्ये :
- त्सोसोबे सारख्या सुमार बॉलरने ( स्टेन आणि मॉर्नेच्या दर्जात्मक तुलनेने) आपल्याला त्रास दिला.
- भारताची बॉलींग अफ्रिकेपेक्षा तुलनेने चांगली होती कारण दरवेळी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने आउट केले, (तर आपण आउट नेहमीच बेफिकीर शॉटस घेऊन किंवा घाईघाईत शॉट घेऊन ऑट झालो)
- पहिले पाच लोक (विराट कोहलीचा अपवाद) ह्या मॅच मध्ये खेळलेच नाहीत.
- झहीर ने रोहित पेक्षा आणि इतर मान्यवर (!) बॅटसमनपेक्षा जास्त धावा काढल्या!

Happy

केदार Happy
अजुन एकः मुनाफ पटेल आता बॉलर वाटतो.
त्सोसोबे तेवढा वाइट नाही, त्याने पाकिस्तान विरुद्ध चान्गली कामगिरी केली होती.

- त्सोसोबे सारख्या सुमार बॉलरने ( स्टेन आणि मॉर्नेच्या दर्जात्मक तुलनेने) आपल्याला त्रास दिला.>> साधी गोष्ट आहे, लोक स्टेन आणि मॉर्नेला सांभाळून खेळतात नि त्सोसोबे च्या पाठी लागून विकेट गमावतात, हे त्याचे क्रेडीट कि तो अगदीच प्लॉट हरत नाही.

काळजीचे कारण नसावे, WC ला bounce नसल्यामूळे सगळॅच form मधे येतील. Its bounce and swing/seam/cut combo that we always struggle.

साधी गोष्ट आहे >> अरे हो ना, म्हणूनच कंसात त्यांची नावे दिली आहेत.

cut combo that we always struggle. >>> Lol ह्या क्रिकेटवीरांना क्रिकेट मधील आरक्षण देण्यात यावे. आम्हाला बाऊन्सी विकेट, शॉर्ट पिच बॉलींग, पुल मारण्यासाठी उसळत येणारे बॉल, ह्या विरुद्ध खेळता येत नाही!

पण ऑन सिरियस नोट : ह्या वेळी बहुतेक खेळपट्या (एखाद अपवाद वगळता) चांगल्या होते असे मला वाटते, उलट ह्या पिच मुळे भारतीय बोलींग प्रभावी ठरली. आणि अगदी आपले तळातील फलंदाज देखील सहज रन काढू शकले आपल्या सर्व मॅच धावा काढन्यात बॉटम्स अपच आहेत. मागची धावपट्टी तर इतकी सुंदर होती की बॉल सहज बॅट वर येत होता, आजची पण फार अपवाद नाही. ज्या पद्धतीने युसुफ खेळला त्या ते बघता त्याने खूप अवघड बॉल्स खेळले असे नाही तर त्याने बॅट वर विड्थ घेऊन येणार्‍या प्रत्येक बॉलला सिक्स, फोर मारला आहे.

आपल्याला ह्यावेळी धावपट्टी हे कारण देता येणार नाही. तर टॉप ऑर्डर फेल्युअर हे एकच कारण आहे.

तर टॉप ऑर्डर फेल्युअर हे एकच कारण आहे >> आपली वरिजिनल टॉप ऑर्डर घरी टी व्ही वर मॅच बघत असेल... Proud ... वर्ल्ड कपात हे लोक इन्जुरी तून परतणार आहेत .. काय Light 1 लावतात पाहूया..

मॅन ऑफ द मॅच ज्याने झहीर नोबॉलवर बाद झाल्याचे पाहून त्याला परत बोलावले. पॉवर प्ले मध्ये षटकार मारायला गेला नसता तर युसुफ पठाण चषक घेऊन येता. पण हे फक्त इफ्स अँड बट्स.
या मालिकेत झहीरचे एकदिवसीय सामन्यांतले २५० बळी झाले.

>>शक्य असले तर विश्वचषकासाठी धोनीला काढून त्याला घ्यावे व साहेबांना किंवा सेहवागला कर्णधार करावे

धोणीला हाकलायला हरकत नाही.. पाक प्रमाणे बिना कॅप्टन चा संघ खेळवा Happy
त्याच्या जागी कार्तिक्/पटेल घेता येतील. कप्तान प्रत्त्येक सामन्यात बदलावा- वीरू, गंभीर, साहेब.

(भारतीय संघाचा कप्तान झाल्यावर एक सौरव गांगुलीचे ऊ.दा. सोडता सर्वच जण फलंदाजीत फ्लॉप झाले आहेत, अगदी साहेबांसकट. याचे मुख्ख्य कारण कप्तानाचा वेळ, आणि शक्ती सर्वांना एकत्र बांधण्यात, निवड समितीशी जुळवून घेण्यात वगैरे खर्च होते... अधिक मानसिक त्रास. अर्थात हे सर्वांनाच करावे लागते. याच कारणाने रिकी पाँटींग हा मला सर्वात आवडणारा कप्तान आहे. अलिकडील त्याची सुमार कामगिरी वगळता तो कांगारूंचा सर्वात यशस्वी कप्तान आहे, सर्व आघाड्यांवर.)

ऑसीज पुन्हा जबरदस्त फॉर्मात आलेत. आज इंग्लंडच्या ३३३ धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला. पाँटिंग्,मायकेल हसी इ. संघात नसताना ते जिंकले हे विशेष. ७ सामन्यांच्या मालिकेत आता ते ५-१ असे आघाडीवर आहेत. शेन वॉटसन, हॅडिन हे फॉर्मात आहेतच. मायकेल क्लार्क व ब्रेट ली पुन्हा फॉर्मात आलेत. स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड हसी, मिशेल जॉन्सन इ. अधूनमधून खेळतातच. एकंदरीत त्यांचा संघ अ‍ॅशेस हरल्यानंतर थोड्याच काळात सावरलेला दिसतोय. पाँटिंग, मायकेल हसी व इतर काही जण संघात परतल्यावर त्यांचा संघ २०११ च्या विश्वचषकाच्या विजेतेपदाचा पुन्हा एकदा प्रबळ दावेदार होईल..

अलिकडील त्याची सुमार कामगिरी वगळता तो कांगारूंचा सर्वात यशस्वी कप्तान आहे, सर्व आघाड्यांवर. >> माझ्या मते तो मान Border चा.

बरोबर आहे. पण अ‍ॅशेसमध्ये ऑसीजचा दारूण पराभव केल्यावर वनडे मध्ये पण इंग्लंड ऑसीजचा कचरा करतील असे वाटले होते. पण झाले उलटेच.

आता चॅपेलवर खटला भरा - विश्वचषक घालवल्याबद्दल, सचिनचे करिअर बिघडवल्याबद्दल, आणि एकंदरीतच तो ऑस्ट्रेलियन आहे म्हणून, (पाँटिंगचा मित्र म्हणून.)

Pages