Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
बहुतेक क्रिकेटवरची पुस्तकं
बहुतेक क्रिकेटवरची पुस्तकं प्रकाशनाच्या उंबरठ्यावर असताना सचिसारख्याशी संबधित एखादी घटना उगाळण्याची ही नेहमीचीच जाहिरातबाजी तर नाही ना? चॅपेलसराना गेल्या विश्वचषकापासून काय आताच एकदम उपरती झाली का ?
मॅथ्यु हेडनचं पण पुस्तक आलंय.
मॅथ्यु हेडनचं पण पुस्तक आलंय. भज्जीवर अर्थात लिहिलंय.
>>बहुतेक क्रिकेटवरची पुस्तकं
>>बहुतेक क्रिकेटवरची पुस्तकं प्रकाशनाच्या उंबरठ्यावर असताना सचिसारख्याशी संबधित एखादी घटना उगाळण्याची ही नेहमीचीच जाहिरातबाजी तर नाही ना? चॅपेलसराना गेल्या विश्वचषकापासून काय आताच एकदम उपरती झाली क>>...
भाऊ,
त्यात काय गैर? फटाक्यांची जाहिरात दिवाळी जवळ आल्यावरच होते
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23339
????????
जरुर वाचा
<<त्यात काय गैर? फटाक्यांची
<<त्यात काय गैर? फटाक्यांची जाहिरात दिवाळी जवळ आल्यावरच होते >> योगजी, जाहिरात म्हणून यात गैर कांहीच नाही; पण नेमकी वेळ साधून ती बातमीचं सोंग पांघरवून हळूंच सोडून देणं, ही फसवेगिरी होऊं शकते !
भारतीय संघाचा माजी कर्णधार
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (सोमवार) क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या स्पर्धांमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहे.
ऑफसाईडचा बादशाह असलेला हा
ऑफसाईडचा बादशाह असलेला हा डावरा, शैलीदार व आक्रमक फलंदाज क्रिकेटवर स्वतःचा आगळा छाप उमटवूनच निवृत्त होतोय हे निश्चित ! शिवाय, सचिनबरोबरच्या त्याच्या अगणित, अप्रतिम भागिदार्या व स्वतःचा शर्ट काढून उघड्या अंगाने तो शर्ट हवेत फिरकवणारी त्याची छबी विसरणं कठीणच !! मनःपूर्वक शुभेच्छा, सौरव.
He deserved better send off
He deserved better send off There is God and then there is Ganguly (on off side)
deserved better send off
deserved better send off अरेरे There is God and then there is Ganguly >> हो.
सेन्ड ऑफ मिळालाच की त्याला,
सेन्ड ऑफ मिळालाच की त्याला, २००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे.
उशीरा सुचलेले
उशीरा सुचलेले शहाणपण....
संघनिवडीच्या सगळ्या वाटा बंद झाल्याने नाईलाजाने निवृती स्विकारणार्या खेळाडूच्या वाट्याला यापेक्षा बेटर काय सेंड ऑफ असणार?
>>संघनिवडीच्या सगळ्या वाटा
>>संघनिवडीच्या सगळ्या वाटा बंद झाल्याने नाईलाजाने निवृती स्विकारणार्या खेळाडूच्या वाट्याला यापेक्षा बेटर काय सेंड ऑफ असणार..
मान्य! त्यातही निव्वळ kkr चा ब्रँड असल्याने तो kkr संघात होता. अन्यथा दादा ची दादागीरी केव्हाच संपुष्टात आली होती.
असो. तरिही निर्णय अन निव्रुत्तीबद्दल अभिनंदन! आता क्रिकेट च्या भवितव्यासाठी काही खास काम करावे अशी अपेक्षा..
*****************************************************
पुढील नंबर कुणाचा.. द्रविड, लक्षमण..?
>>संघनिवडीच्या सगळ्या वाटा
>>संघनिवडीच्या सगळ्या वाटा बंद झाल्याने नाईलाजाने निवृती स्विकारणार्या खेळाडूच्या वाट्याला यापेक्षा बेटर काय सेंड ऑफ असणार..
मान्य! त्यातही निव्वळ kkr चा ब्रँड असल्याने तो kkr संघात होता. अन्यथा दादा ची दादागीरी केव्हाच संपुष्टात आली होती.
असो. तरिही निर्णय अन निव्रुत्तीबद्दल अभिनंदन! आता क्रिकेट च्या भवितव्यासाठी काही खास काम करावे अशी अपेक्षा..
*****************************************************
पुढील नंबर कुणाचा.. द्रविड, लक्षमण..?
निवृत्तीबाबत गांगुलीचे
निवृत्तीबाबत गांगुलीचे घुमजाव
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7449414.cms
आयपील अथवा तत्सम उरूसात
आयपील अथवा तत्सम उरूसात खेळायला काय हरकत आहे? तो अधिकृत खेळ नसून व्यवसाय आहे. त्यातू कसली आलीय निवृती? आगदी गावसकरने तयारी दाखवली तरी तो ही खेळू शकेल त्याला खरीदले तर
सौरवला कानफाट्या नाव पडलंय,
सौरवला कानफाट्या नाव पडलंय, त्याचाच गैरफायदा माध्यमं तर उठवत नाहीत ना ? निदान त्याच्या वरील [ म.टा.मधील ] स्पष्टीकरणावरून तरी तसंच वाटतं.
गांगुलीने हकालपट्टी होईपर्यंत
गांगुलीने हकालपट्टी होईपर्यंत का ताणले? कुंबळे शहाणा निघाला. काळाची पावले ओळखून स्वतःहूनच तो यावर्षीच्या लिलावात गेला नाही. लारा, जयसूर्या इ. मंडळी गांगुलीच्याच मार्गाने गेली. आयपील ही खेळांची (किंवा खेळातल्या कौशल्याची) स्पर्धा नसून तो बिझनेस आहे व ह्या बिझनेसमध्ये पैसे गुंतविणारे कायम प्रॉफिटचेच डील करणार हे त्यांच्या लक्षात आले नाही का?
>>गांगुलीने हकालपट्टी
>>गांगुलीने हकालपट्टी होईपर्यंत का ताणले?
यावर त्याचे स्पष्टीकरण हे की जर माझ्याच वयाचे गिली, लक्ष्मण आणि द्रवीड चालतात तर मी का नाही?
मला वगळण्याचे कारण क्रिकेटेतर आहे....
आणि काही अंशी ते खरे पण आहे.... गांगुलीला या आयपीएल लिलावात नडले ते "एक्स्ट्रा बॅगेज".... त्याच्या इगोचे आणि त्याच्या बंगाली पाठीराख्यांच्या दडपणाचे!
>>कुंबळे शहाणा निघाला
नक्कीच.... खर म्हणजे लिलावात त्याला बंगलोरने नाही तरी इतर संघांनी नक्कीच घेतले असते.... पण कर्नाटक क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करताना दुसर्या संघाकडून खेळणे बरोबर दिसले नसते.... हे त्याचे स्पष्टीकरण नक्कीच पटण्याजोगे.... आणि त्याच्या "जंटलमन" प्रतिमेला अधिकच उंचावणारे
अहो, पण मिडीयाने छापली ना
अहो, पण मिडीयाने छापली ना कालची तुमची निवृत्तिची घोषणा ! फक्त "फर्स्ट क्लास" ऐवजी "थर्ड क्लास" क्रिकेटमधून निवृत्त, इतकाच तर फरक केलाय ना !!
भाऊ ... एकदम जबरी ....
भाऊ ... एकदम जबरी ....
संघनिवडीच्या सगळ्या वाटा बंद
संघनिवडीच्या सगळ्या वाटा बंद झाल्याने नाईलाजाने निवृती स्विकारणार्या खेळाडूच्या वाट्याला यापेक्षा बेटर काय सेंड ऑफ असणार?>>एक मिनीट गोंधळ होतोय, IPL मधे सुरूवातीला गंगूची value २००K होती, auction च्या १ दिवस आधी दुप्पट झाली. त्यामधे interest नसेल असे वाटते ?. समजा तोही मुद्दा बाजूला ठेवू. कोची interested असताना बाकीच्या franchises नी NOC का देऊ नये ?
BCCI could have handled this in more dignified way. One could have dropped hint to Gangu to pull out before auction.
द्वारकानाथ संझगिरी यांचा
द्वारकानाथ संझगिरी यांचा गांगुली आणि त्याच्या निवृत्ती विषयक लेख.
पहिले म्हणजे त्याने कसोटीतून
पहिले म्हणजे त्याने कसोटीतून स्वतःच्या टर्म्स वर निवृत्ती घेतली होती, ते ही शेवटच्या सिरीज मधे ऑसीज वि. शतक मारून. त्या सुमारे वर्षभरात पाक, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका विरूद्ध जोरात होता तो.
त्याच्यासाठी संघनिवडीच्या वाटा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सुद्धा २००५ मध्ये बंद झाल्या होत्या. त्यानंतर तो पुन्हा आला आणि यशस्वी होउनच मग स्वतःहून गेला.
आमच्या दृष्टीने 'दादा' तेव्हाच रिटायर झाला होता. सन्मानाने. पुढचा सगळा टाईमपास.
आयपीएल मधे तो काय करतोय याचा त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर काहीच परिणाम होणार नाही. इंग्लंड मधे सुद्धा पूर्वी कसोटीतून निवृत्त झाल्यावर काउंटी खेळत राहण्याची पद्धत होती, अजूनही आहे बहुधा.
या सगळ्या लोकांच्या दृष्टीने आयपील म्हणजे गाजराची पुंगी असावी. सचिनला जमली, इतरांना नाही. २०-२० मधे सुद्धा इतर अनेकांपेक्षा तो बराच चांगला अजूनही आहे. पण तो कॅप्टन म्हणूनच पाहिजे असा लोकांचा समज झाला असावा. आणि दुसरे म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट्स तीन वर्षासाठी आहेत. गांगुली, जयसूर्या, लारा बद्दल तीन वर्षे फिटनेस ची खात्री नसल्याने त्यांची निवड झाली नाही.
संझगिरींचा लेख पटला नाही.
संझगिरींचा लेख पटला नाही. उद्या एक एक ओव्हर्सचे सामने कोणी चालू केले तर रिचर्डस पासून सगळे खेळतील, मग कधीतरी बाहेर जातील. ती त्यांची आंतरराष्ट्रीय निवृत्ती समजायची काय?
मला प्रामाणिकपणे वाटतं कीं
मला प्रामाणिकपणे वाटतं कीं कुणी कोणत्या पातळीवरच्या क्रिकेटमधून [ किंबहुना, कोणत्याही क्रिडाप्रकारातून] केंव्हा निवृत्त व्हावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय असावा व केवळ तो प्रसिद्ध खेळाडू आहे/होता हे त्याच्या या विशिष्ठ निर्णयस्वातंत्र्यावर बंधनकारक होऊं नये; तो निर्णय बरोबर किंवा चुकीचा ठरला तर त्याचे बरे-वाईट परिणाम तो स्वतःच अनुभवणार आहे व त्याला त्याची तयारी असली कीं झालं. अशा निर्णयामुळे त्याची आधीची कारकिर्द जोखण्यात फरक पडण्याचीही गरज नाही.
उलटपक्षीं, उतप्पासारखे उदयोन्मुख खेळाडू अवेळी खेळाबाहेर गेले तर त्यावर झालेली चर्चा खरोखरीच त्या खेळांडूसाठी फलदायक ठरेल !
>>समजा तोही मुद्दा बाजूला
>>समजा तोही मुद्दा बाजूला ठेवू. कोची interested असताना बाकीच्या franchises नी NOC का देऊ नये
मला अस वाटतय की ही कुणीतरी मुद्दाम पसरवलेली अफवा आहे कारण कोचीच्या संघमालकांनी जाहीर केलय की त्यांनी गांगुलीला अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही!
>>गांगुली, जयसूर्या, लारा बद्दल तीन वर्षे फिटनेस ची खात्री नसल्याने त्यांची निवड झाली नाही
हो... तेही एक कारण असू शकते गांगुलीला नाकारण्यामागे.... कारण 3 yrs is a long time!
भाउसाहेब , कार्टून मस्त. आणि
भाउसाहेब , कार्टून मस्त. आणि उत्तम पोस्ट.
अगदी अचूक लेख आहे
अगदी अचूक लेख आहे संझगिरींचा..
वर बूमरँग ने म्हटले तसे क्रिकेट्खेरीज ईतर गोष्टी- प्रचंड ईगो, त्याचे अंधभक्त बंगाल अन काळाची पावले ओळखूनही स्वताचा हट्ट अन ईगो जपण्याची धडपड यामूळे सौरव या सर्व प्रकरणात भरकटला. पहिल्या बिडींग मध्ये खुद्द kkr ने त्याला घेतले नाही तेव्हाच तयचे डोळे ऊघडायला हवे होते. खेरीज त्याच्या आधीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा, आइपीएल मधील कामगीरीचा मान ठेवण्याईतपत क्रिकेट मधले शाहरुख ला कळत असते तर शाहरूख ने बॉलिवूड मध्ये नाही तर bcci मध्ये करीअर केले असते
भाऊ,
मस्त आहे व्यंगचित्र
असामी,
आयपील आणि bcci चा तसा काही सुतराम व्यावसायिक संबंध नाही, विशेषतः खेळाडू खरेदी आणि निवडीमध्ये. तेव्हा सौरव ने स्वताच्या पायावर कुर्हाड मारून घेतल्यावर त्याचे खापर bcci च्या माथी फोडणे अगदीच चूकीचे आहे.
>>> यावर त्याचे स्पष्टीकरण हे
>>> यावर त्याचे स्पष्टीकरण हे की जर माझ्याच वयाचे गिली, लक्ष्मण आणि द्रवीड चालतात तर मी का नाही? मला वगळण्याचे कारण क्रिकेटेतर आहे....
लक्ष्मणबद्दल पूर्ण आदर बाळगून असे म्हणावेसे वाटते की आयपीएल मध्ये लक्ष्मणपेक्षा गांगुली कधीही अनेकपटीने जास्त उपयुक्त आहे. त्याचा स्ट्राईक रेट लक्ष्मणपेक्षा खूप जास्त आहे, तो गोलंदाजीही करू शकतो व त्याचे क्षेत्ररक्षण लक्ष्मणपेक्षा चांगले आहे. २०१० च्या आयपीएल मध्ये गांगुलीने ३-४ मोठ्या खेळी केल्या होत्या. याउलट लक्ष्मणची फलंदाजी. त्याला डेक्कनने ३-४ सामने खेळविले. तो सलामीला आला होता. साहेबांसारखे खराब चेंडूची वाट न बघता तो प्रत्येक चेंडू मारायचा प्रयत्न करत होता. सर्व सामन्यात तो ८-१० धावा करून बाद झाला. शेवटी त्याला उरलेले सामने बाहेर ठेवले.
गांगुलीची कर्णधारकी सुध्दा बरी आहे. २०१० च्या मौसमात कलकत्त्याने आपल्या पहिल्या २ सामन्यात, २००९ च्या विजेत्या (डेक्कन) व उपविजेत्या (बंगलोर) संघांना पराभूत करून, चांगली सुरवात केली होती. पण पुढे ढेपाळले.
खरं तर आयपीएलमध्ये गांगुली द्रविडपेक्षा सुध्दा उपयुक्त आहे. पण यावर्षी द्रविड व लक्ष्मण या दोघांनाही वेगवेगळ्या संघांनी घेतले तर गांगुलीकडे कोणी ढुंकुनसुध्दा का बघितले नाही हे एक गूढच आहे.
>>पण यावर्षी द्रविड व लक्ष्मण
>>पण यावर्षी द्रविड व लक्ष्मण या दोघांनाही वेगवेगळ्या संघांनी घेतले तर गांगुलीकडे कोणी ढुंकुनसुध्दा का बघितले नाही हे एक गूढच आहे
कारण गांगुलीला हाताळणे फार अवघड आहे.... तुलनेने द्रवीड आणि लक्ष्मण संघाच्या स्र्टॅटेजीप्रमाणे मोल्ड होउ शकतात!
लक्ष्मणला गेल्या मोसमात ४-५ मॅचेस नंतर बसवलं.... द्रवीडला तर बंगलोरने ६-७ व्या नंबर वर बॅटींगला पाठ्वले.... पण संघाची गरज म्हणून त्या दोघांनी ते विनातक्रार स्वीकारले!
हेच गांगुलीच्या बाबतीत इमॅजिन करुन बघा.... दादाने किती चिडचिड केली असती.... आख्खा बंगाल पेटला असता.... सगळ्या बाँग ब्लॉगर्सनी त्या फ्रेंचाइजीची हुर्यो उडवली असती.... त्यांच्या पिक्चरवर बंदी घातली असती, त्यांची विमाने रोखली असती आणि त्यांचे शेअर पाडले असते..... कम्युनिस्ट नेत्यांनी गांगुली वर अन्याय झाल्याचा संसदेत आरडाओरडा केला असता!
हे सगळ माहीत असताना कोण विकत घेइल असलं विकतच दुखणं?
Pages