क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६१/२, अजुन १६० धावा काढायच्या आहेत. मागच्या मॅच मधे जशी साउथ अफ्रीकाने रन्गत आणली तसे आपण काही करु नये म्हणजे झाले. Happy

मागच्या मॅच मधे जशी साउथ अफ्रीकाने रन्गत आणली >>>
तशी आपण आणलीच. Sad थोडक्याकरता रैना व पठाणाची जोडी फुटली. आता झहीर व भज्जी काय वाचवतील ते वाचवतील.

India go up 2-1 in the series, another nail-biting finish and India managed to get over the finish line >>>
पुढच्या मॅचपर्यंत नख वाढली तर बरय. Proud

पठाणी हिसका... आफ्रिकेचे गलथान क्षेत्ररक्षण... हरीचे भजन... आणि विजयच्या सिव्हलेस स्वेटरने सरते शेवटी विजय मिळवून दिलाच... Happy

आता तरी मुरली विजयला काढा. ११ सामन्यांत त्याने एकूण २०० धावा सुध्दा केलेल्या नाहीत (सरासरी - १८, धावगती - ६१, सर्वोच्च - ३३).

रॉबिन उथप्पाला का घेत नाहीत? त्याचा सलामीला तसेच बदली यष्टीरक्षक म्हणून सुध्दा उपयोग होईल. मुरली विजयपेक्षा तो अनेक पटीनी उपयुक्त आहे. सचिन, सेहवाग आणि गंभीर असे तीनही सलामीचे फलंदाज जखमी असताना भारतातून बदली सलामीचे फलंदाज का मागविले नाहीत?

पार्थिव भाय निघालेत विमानाने.. चौथ्या सामन्या पर्यंत पोचतीलच.
कसा असेल तो फॉन कॉलः पार्थिव भाया ऊठ. ऊद्या आफ्रिकेवि. सलामीला जायचय.. तू वल्ड कप टीम मध्ये नाहीयेस तेव्हा काही फरक पडत नाही, बिंधास खेळ. फक्त विजय, रोहीत शर्मा, श्री अन ईशांत यांच्यापासून दूर रहा. Happy

आतापर्यंतच्या तीन सामन्यात मुनाफ पटेलचे क्षेत्ररक्षण बघून्(सीमेवर धावून चक्क पायाने सुद्धा चौकार अडवणे) मला अगदी भरून येतेयः)
याचे श्रेय शेन वॉर्नला द्यायला काही हरकत नसावी.

मुनाफ हल्ली क्षेत्ररक्षण तर व्यवस्थित करतोयच वर गोलंदाजी करताना त्याला चौकार मारल्यावर निर्लज्जपणे हसणं पण कमी केलय त्यानं..

आज सामना जिंकू शकू काय आपण?

मग आता पुनः जागा बदला. अजून डुमिनि नि बोथा खेळतच आहेत. आणि सतत बदलतच रहा.
पण आपली बॅटिंग आली की खुर्चीला सुपर ग्लू लावून बसा!

मुख्य खेळाडुंच्या विकेटी काढल्यावर उरलेल्या गाळाला थोडक्यात गुंडाळणे आपल्याला कधीच का जमत नाही? Sad ५ बाद ११८ ते ७ बाद २५७? काही खरे नाही आज.

२५ धावा जास्त झाल्या. त्याची गरज नव्हती. थोडे अ‍ॅग्रेसिव्ह खेळायला हवे होते. बघू आपले वीर काय करतात ते.

आपल्या तिन्ही मेन बॉलर्सला ६ + रनरेट ने धुतले.

१३७/६, सगळे गेले एका मागुन एक (नेहमीसारखे).
आता पाऊस पडतोय. तसेही हारलोच आहोत.
धोनी साहेबानी ह्या सिरीजमधे काहीच नाही केले.
युवराज पण फ्लॉप.

Pages