Submitted by मी मुक्ता.. on 19 January, 2011 - 23:17
हा पहा हा चाललेला थोर मेळा
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..
आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्यातून डोळा..
राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...
गे, बटा का परत आणे चेहर्यावर
का हवा वार्यास वेडा हाच चाळा..
बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..
रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शेवटचा मस्त!
शेवटचा मस्त!
"आज संधी लाभली अन बोलला
"आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्यातून डोळा.."
.... छान
छान जमली
छान जमली
छान.
छान.
बोलती रागावल्या गोपी
बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..
किती गोड!
@UlhasBhide, मुकु, गंगाधर
@UlhasBhide, मुकु, गंगाधर मुटे ,
धन्यवाद...
@क्रांति,
आभार...
छान! पहार्यातली द्विपदी
छान!
पहार्यातली द्विपदी आवडली.
@साती... धन्यवाद... तुझ्या
@साती...
धन्यवाद... तुझ्या गझल ची वाट पहातेय..
सुंदर!
सुंदर!
@उमेश.. धन्यवाद..
@उमेश..
धन्यवाद..
सुंदर
सुंदर
क्लास!!
क्लास!!
@डॉ.कैलास गायकवाड, किरु.. खूप
@डॉ.कैलास गायकवाड, किरु..
खूप खूप धन्यवाद..
क्या बात है ... मस्त !!! आपका
क्या बात है ... मस्त !!!
आपका लिखनेका स्टाईल अच्छा है मॅडम ... जियो !!!! खुप शुभेच्छा !!!
आभार गिरीशजी... एकदम
आभार गिरीशजी...
एकदम दिलसे...
मस्त कविता.....! खुप आवडली
मस्त कविता.....!
खुप आवडली
शेवटचा मस्तच !
शेवटचा मस्तच !
@विशाल, नंद्या , खूप आभार..
@विशाल, नंद्या ,
खूप आभार..
शेवटच्या दोन द्विपदी विशेष
शेवटच्या दोन द्विपदी विशेष आवडल्या.
@रुणुझुणू, धन्यवाद...
@रुणुझुणू,
धन्यवाद...
>>>>आज संधी लाभली अन बोलला तो
>>>>आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्यातून डोळा..
अफाट!!!