इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
मला तुमच्याकडची मिरीची वेल
मला तुमच्याकडची मिरीची वेल हवि आहे. कुठल्या नर्सरीत मिळेल
मिरी विजयनी अजुन लावली नाही बहुतेक. मी तरी पाहिली नाही. वरची राजुदादांच्या शेतातली आहे.
जागु सगळ्याच नर्सरीत मिळेल असे नाही. तुझ्या एरियातल्या नर्सरीत विचार. मला मिळाली तर मी देईन तुला. मी कर्नाळ्याच्या गो-ग्रीन नर्सरीत जाणार आहे या किंवा पुढच्या महिन्यात. तिथे नक्कीच मिळेल.
अरे किती मिसलं मी. विजयच्या
अरे किती मिसलं मी. विजयच्या शेतीवर मलाही जायचय. उरणला पण.
जागू ते केशरी फूलांचे झाड, पचोडीया किंवा स्पॅथोडीया. त्याचे मूळस्थान युगांडा. त्याच्या कळ्या, दाबल्या तर पिचकारी उडते.
रुणूझुणू, मी फार मालदीव नाही बघितले, पण मुख्य बेटांवर काही छान झाडे आहेत. अर्थात श्रीलंकेत त्यापेक्षा जास्त वनसंपदा आहे.
तसा मीहि मस्त निसर्ग अनूभवून आलोय. ऑकलंडच्या बोटॅनिकल गार्डनमधे पायाचे तूकडे पडेपर्यंत भटकलो (आणि ओळखू न येण्याइतका टॅन झालोय !! ) अनोखी फूले, झाडे बघितली. इथे ओळख करुन देईनच !!!
साधना आमच्याइथल्या नर्सरीत
साधना आमच्याइथल्या नर्सरीत नाही ग पाहीली अजुन मिरीची वेल. कारण इथे तस डिमांडही नाही.
दिनेशदा नक्कीच या उरणला. कोणत्या केशरी फुला बद्दल म्हणताय राणिच्या बागेतल्या की अबोलीच्या ?
दिनेशदा, चला,बरं वाटल ! तुमची
दिनेशदा,
चला,बरं वाटल !
तुमची एका आठवडयाची सुट्टी संपली म्हणायची !
साधना,
घरी २-४ कुंड्या तरी आता लावल्याच पाहिजेत असं माझ मत झालं आहे
अनिल एकदा २-३ कुंड्या आणल्यात
अनिल एकदा २-३ कुंड्या आणल्यात ना की त्याच्या ५-६ व्हायला वेळ नाही लागत. कारण झाडांचा छंद वाढत जातो.
जागु, अगदी तुमच्या मनासारखच
जागु,
अगदी तुमच्या मनासारखच होऊ दे
(.. खरं तर माझ्या एका असच मनाला वाटतयं, पण दुसरं म्हणतयं तुला हे जमणार नाही. )
जमणार नाही ह्या मनाला पुढे
जमणार नाही ह्या मनाला पुढे करु देउ नका जमणार्या मनाची जिद्द वाढवा. सहज होईल.
अगं तु टाकलेस ना लोणावळ्याचे
अगं तु टाकलेस ना लोणावळ्याचे फोटो त्यात ती केशरी फुले आहेत त्याबद्दल बोलताहेत दिनेश...
दिनेश, ऑ. चे फोटोही टाका लवकर...
अच्छा म्हणजे ते मोठ्या
अच्छा म्हणजे ते मोठ्या फुलाचे. साधना मला वाटत तो मेमरी प्रोब्लेम तुझा गायब झाला आणि मला चढलाय.
(No subject)
फोटो मी टाकतोच. पण मला त्या
फोटो मी टाकतोच. पण मला त्या वनस्पति उद्यानातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, स्थानिक झाडांना दिलेले महत्व. त्या प्रत्येक झाडाखाली, त्या झाडांच्या फूलांचा फोटो आणि माहिती. लोकजीवनातले त्याचे स्थान. ते कुठे दिसू शकते त्याची माहिती.
तिथे वनस्पतिंचा अभ्यास करणार्याला, फार उपयोगी पडेल अशी माहिती होती.
पूर्ण दिवस तिथे घालवूनही, मला तिथले काही विभागच बघता आले !!
अरे वा. दिनेशदा आले का परत ?
अरे वा. दिनेशदा आले का परत ? लवकर फोटो टाका आता.
च्यामारी, गप राहून वाचत गेलो
च्यामारी, गप राहून वाचत गेलो तर तुमच्या गप्पा वाढतच चालल्यात
आता ऐका, मला तुमची मदत लागणार आहे. पोयनाडला मला सिरियसली झाडं लावणं, शेती करणं (थोड्या प्रमाणात) करायचीये. तूम्ही कोण कोण कसली कसली मदत करु शकता ते कळवा.
मला खालील प्रश्नांची उत्तरं मिळाल्यास आवडेल.
१. आत्ता कसली लागवड करायची ?
२. होलसेलमध्ये चांगली रोपं, बियाणी कुठे मिळतील ? परवा पेरु आणि चिकूची रोपं आणि एक लालेलाल जास्वंद आणली. पण त्या भावात ५० १०० झाडं आणणं परवडणारं नाही.
सध्या तिथे भोपळा (नीट काळजी न घेतल्याने खुरटलाय) भेंडी, टोमॅटो, वांगी आहेत. पण ही झाडं एकदाच लावली होती तीही कुणाच्यातरी गाईडन्सखाली. आता स्वतः खपायचय.
प्लीजच हेल्प बघू.
जागू मला तुमच्याकडची मिरीची
जागू
मला तुमच्याकडची मिरीची वेल हवि आहे. कुठल्या नर्सरीत मिळेल
मिरीची वेल आमच्य्या येथे मिलते.१५ रु. मी तुझ्यासाठी एक वेल घेउन ठेवतो.तुला नेता आली तर ठीक नाहीतर राहील माझ्याघरी.
ही घ्या प्रूफं आणि हो,
ही घ्या प्रूफं
आणि हो, एक केळ पण पसवलीये. पुढच्यावेळी जाईन तेव्हा टाकेन फोटो.
आम्ही दर शनिवारी / रविवारी चक्कर मारतो तिथे. कुणाला यायच असेल तर स्वागत आहे.
असुदे, आता थोड्याच दिवसात
असुदे, आता थोड्याच दिवसात उन्हाळा सुरु होईल. आता नव्याने झाडे लावायची, तर पाणी द्यायची व्यवस्था करावी लागेल. तसे जमत असेल, तर अनेक झाडे लावता येतील.
सध्या जर तिथे कुणी रहात असेल आणि बाथरुमचे पाणी जिथे सोडले असेल, तिथे अळू, केळी, कर्दळी, आले, हळद, सोनटक्का अशी झाडे सहज तग धरतील.
सबजा, तूळस यांच्या बिया बाजारात मिळतात. त्या सगळीकडे उधळल्यास, काही नक्कीच उगवतील.
पण सध्याच्या काळात, बिया गोळा करणे हा उद्योग करता येईल. नव्याने रोप लावण्यापेक्षा बी रुजली तर ती तग धरायची शक्यता जास्त असते.
बहावा, काजू, झकरांदा, सीताअशोक, करंजा, पळस अशा अनेक मोठ्या झाडांच्या बीया जमवता येतील, पण हि झाडे सावलीसाठी चांगली, याच्या खाली बाकी झाडे जगणार नाहीत. म्हणून हि सीमेवर (आणि लोकांच्या / सार्वजनिक जागेवर ) लावता येतील.
उन्हाळी काकडी, कलिंगड वगैरे आता लावता येईल, पण पाणी देणे आवश्यक आहे. पावसाची चाहूल लागल्यावर आणखी बोलूच.
आणि हो, एक केळ पण पसवलीये.
आणि हो, एक केळ पण पसवलीये. पुढच्यावेळी जाईन तेव्हा टाकेन फोटो.
आयला, मला वाटले केळीच देतोय्स खायला.. इथे नुस्ते फोटू बघायचे काय??????
मी तुझ्या जायच्या वाटेवरच राहते रे.. रविवारी कधी जात असलास तर आवाज दे जाताना...
अलिबागला बघ ना रोपे मिळतात का? मुंबईतल्या नर्सरीमध्ये दोन-चार रोपे असतात आणि किंमतीही तशाच असतात. तुला होलसेलमध्ये पाहिजे तर जिथे एकरी बागांना देण्यासाठी रोपे बनवतात तिथे विचारायला पाहिजे. अलिबागच्या नगरपालिकेत किंवा तिथेच आजुबाजुला बघ.
शोभेची झाडवाल्या नर्सरीत तु लुटलाच जाणार...
माझ्याकडे कुठले बी कधी पेरायचे आणि त्याला सहाय्यक भाज्या कुठल्या आणि विरोधक भाज्या कुठल्या ह्याची माहिती आहे. उद्या टाकते इथे. बीयांसाठी भायखळ्याला राणिबागेसमोरची दुकाने.... सानपाड्यालाही बॉम्बे सिड्स आहेत, पण तिथे लिमिटेड स्टोक असतो. तरी विचारते तिथेही. लहान पाकिटे आता रु १२ ला मिळतात. मोठे पाव किलोचे पालकचे पाकिट मला रु १५ ला मिळाले तिथे.
झाडे लावण्याआधी राजुदादांना भेट. मी त्यांच्या शेतात २*२ मिटरच्या चौरसात चार पेरु आणि चार केळी पाहिली. ह्या चौरसाबाहेर आंबा. त्यांचे लॉजिक - केळ लगेच वाढणार, उत्पन्न सहा महिन्यात सुरू. शिवाय केळ्याच्या कॅनॉपीमुळे उन अडेल, हुयमिडीटि वाढेल आणि त्यामुळे उन खेचण्यासाठी पेरु जास्त जोरात वर येणार. पेरू दोन वर्षात उत्पन्न सुरू करेल. तोपर्यंत केळीचे उत्पन्न घ्यायचे. मग पेरूचे सुरू करायचे. ६-७ वर्षात आंबा उत्पन्न द्यायला लागेल. तोपर्यंत केळ आणि काही पेरू गेलेले असतील, आंब्यासाठी जागा तयार झालेली असेल.
झाडे आणि भाज्या लावताना कोण कोणाला पुरक आणि मारक ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. उत्पन्नात फरक पडतो.
मिरीची वेल आमच्य्या येथे
मिरीची वेल आमच्य्या येथे मिलते.१५ रु. मी तुझ्यासाठी एक वेल घेउन ठेवतो.तुला नेता आली तर ठीक नाहीतर राहील माझ्याघरी.
नाही मला आणलेला वेल मी नेणार. मी कधी बदलापुरला आले तर मी घेउन जाईन. तुम्ही कधी नमुत किंवा उरणला आलात की तो तुम्हाला घेउन यायचा आहे. किंवा मला आमच्या जवळपासची एखादी नर्सरी सांगा ज्यात हे मिळू शकेल.
असुदे सध्या पिक काढण्याची सुरुवात आहे. तरी पण तु भेंडी, वांगी, गवार, टोमॅटो आत्ता लावु शकतोस. पण त्याला दोन दिवसा आड पाणी देणे गरजेचे आहे. आता नवअलकोल, फ्लॉवर, बिट लावुन उपयोग नाही. कारण जस हवामान गरम होत जात तसे ह्याला फळ धरत नाही. कोथिंबिरीसाठी लवकर धणे टाक थोड्या दिवसांनी ति पण नाही उगवणार. थंडीच्या सुरुवातीला खुप छान कोथिंबीर येते.
मेथी, पात मुळा, पालक, माठ (लाल माठ, हिरवा माठ), चवळी माठ ह्या पालेभाज्या कधीही उगवतात. त्यांचे छोटे छोटे पॅकेटच घे सुरुवातीला. बि थोड विरळच पेरायच पालेभाजीच म्हणजे त्यांना वाढायला चांगली जागा मिळते. फक्त बारीक मेथी करायची असेल तर दाट लावुन चालते.
अजुन थोड्या वेळाने लिहिते.
साधना, ते केळी, पेरू आणि
साधना, ते केळी, पेरू आणि आंब्याचे नियोजन ग्रेट.
पेरुच्या झाडावरून हाताने तोडून खाल्लेला कच्चा पेरु !!!
आमच्या घरी पॅशनफ्रूटच्या बिया, मागच्या वेळी टाकल्या होत्या, त्याची रोपे उगवली आहेत. आमच्या घरी तो वेल वाढणे जरा कठीण आहे. कुणाला रोप हवे असेल तर सांगा, स्वतःच्या हाताने हळूवारपणे उचलून न्यावे लागेल. मी आईला सांगून ठेवेन.
माझ्या आंबोलीच्या घरी
माझ्या आंबोलीच्या घरी बागेतल्या एका कोप-यात एक दोन फुट रुंद आणि दोन्-तिन फुट लांब अशी पुष्करणी करायचा विचार मनात आलाय. आधी कमळे लावायची आणि मग काही महिन्यांनी लहान मासे आत सोडायचे असा विचार आहे. इलेक्ट्रिसिटी वगैरे काही वापरायची नाहीय.
नेटवर बरेच शोधले. कमळे लावली तर माशांसाठी वेगळी ऑक्स्जिजनची व्यवस्था करावी लागणार नाही, उन्हात उडुन गेलेले पाणी परत भरत राहावे लागेल आणि कमळाची पाने वेळोवेळी काढावी लागतील एवढे काम पडेल असे वाचुन वाटतेय.
अजुन काही खास काळजी घ्यावी लागेल का? कोणाला माहित असल्यास सांगा. कमळ, मासे, एखादे कासव याव्यतिरिक्त अजुन काही सुचना असतील तर सांगा...
मी आहे ना... गावी जाताना
मी आहे ना... गावी जाताना घेऊन जाईन. तसेही तुम्ही दिलेल्या बीया टाकल्यात कुंडीत. त्या रुजल्या तर बरे. नाहीतर तुमच्याकडचा वेल नेईन.
साधना, नैसर्गिक उताराचा फायदा
साधना, नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन, त्या पुषकरणीतून एखादा पाट काढता येईल, सर्व झाडांना आपोआप पाणी मिळेल. पाणी घालायच्या वेळेस, वरच्या भागात पाणी सोडायचे, ते आपोआप वळत वळत सर्व झाडांना मिळेल. झुळझुळ वाहणारे पाणी, नूसते बघायलाही मस्त वाटते. (हा प्रयोग मी लहानपणी केला होता. )
त्या पाण्याच्या आधाराने, ब्रम्ही, माका वाढतील.
तो ओहोळ केळीच्या बुंध्याकडे संपवायचा.
मी बी सुकवण्याच सजेशन देते
मी बी सुकवण्याच सजेशन देते कारण सुकवलेल बी वर्षभर चांगल राहत आणि कधीही वापरु शकतो.
असुदे पपई बाजारातुन घेउन तु त्याचे बी घरी सुकव आणि पेर झाडे उगवतात.
सुक्या मिरच्यांचे बी टाकुन मिरचीची रोपे तयार कर
अगदी लालबुंद टोमॅटोचे बी काढुन ते वाळवुन ते पेरु शकतोस.
भाजीवाल्याकडून पिकलेले कारले आण आणि त्यातले बी सुकवुन रुजव.
मक्याचे दाणे टाकुन मक्याची रोपे उगवतात.
झेंडूचे चांगले मोठे फुल बाजारातुन आण आणि त्याच्या पाकळ्या सुकवुन त्याचे बी कर.
अलिबागेत रोपे मिळतील तुला बाजारात विकत. आमच्याकडे अलिबागवरुन येतात विकायला. त्यात वांगी, अलकोल, फ्लॉवर, कोबी, मोठी शेवंतीसारखी फुले, जर्मन ची फुले, मिरची, टोमॅटो ची रोपे येतात. येत्या रविवारी मी त्यांना अलिबागमध्ये कुठे मिळतील ते विचारेन आणि तुला फोन करेन.
तोंडलीचा वेल पण लाव. आणि मिळाला तर मला पण दे.
जिथे सांडपाणी वगैरे असेल तिथे दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे, अळू, आल, हळदीबरोबर चहापातीपण लाव.
कढीपत्त्याचे रोप, अळू, मायाळू माझ्याकडे मिळेल.
सर्वांना धन्स. तुम्ही मला
सर्वांना धन्स. तुम्ही मला देताय तेव्हढ प्रेम आणि आपुलकी मी झाडांना देउ शकलो तर नक्कीच वाढतील झाडं.
साधने, पुष्करणीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे. डोन्टच वरी.
साधने, पुष्करणीचं कॉन्ट्रॅक्ट
साधने, पुष्करणीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे. डोन्टच वरी.
काय सांगतोस.... डिटेलमध्ये सांग काय कसे करु ते.. फेब्रुवारीत जाणार आहे गावी, तेव्हा सुरू करायचीय...
असुदे, सध्या कलिंगड लावता
असुदे,
सध्या कलिंगड लावता येईल,तसे द्राक्षेच्या चार (काड्या) वेली पण लावु शकता,पण त्याला औषध फवारणी हवी !
शेवटी तुम्ही काहीही लावा पण ते आहे तसं तिथे आलं की खाता आलं पाहिजे! (आम्हा निसर्गाच्या गप्पा मारणार्यांना !)
पोयनाडला मला सिरियसली झाडं लावणं, शेती करणं (थोड्या प्रमाणात) करायचीये
"पोयनाडा" हे भारतात आहे कि परदेशात ?
<< शेवटी तुम्ही काहीही लावा
<< शेवटी तुम्ही काहीही लावा पण ते आहे तसं तिथे आलं की खाता आलं पाहिजे! (आम्हा निसर्गाच्या गप्पा मारणार्यांना !) >>
म्हणजे कलिंगड सालासकट खायचं ? नाय जमणार.
असुदे, कलिंगडाच्या साली,
असुदे, कलिंगडाच्या साली, दोडक्याच्या साली, लाल भोपळ्याच्या साली, पडवळाच्या बिया, वाटाण्याच्या शेंगाच्या साली, मूळ्याचा पाला, केळ्याच्या साली, केळीचा गाभा ईत्यादी ईत्यादी पासून, रुचकर खाद्यपदार्थ करण्यास, मी / जागू समर्थ आहोत. काळजी नसावी !!!!
आज पोलिओ रविवार... आपल्या ०
आज पोलिओ रविवार...
आपल्या ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे २ थेंब द्यायला विसरु नका.
दिनेशदा, मी पण.....नुसती
दिनेशदा, मी पण.....नुसती खायला हं. बनवता नाही येत हे सगळं.
Pages