कवितेचे देणे
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
12
कसा सांग सुटतो ग हातातला हात
स्वच्छ निळ्या आभाळाचा का ग तुला राग?
झाकोळता नभ पुन्हा येतेस धावून
दिसे बापुडेसे मग कोवळे हे ऊन्ह
नवी ओळ, नवे खूळ घेऊन येतेस
डोळ्यास जागाई तू ग देऊन जातेस
नित्य नव्या खुळापायी येई दाटून पापणी
प्राक्तनांची खूण अवघ्या जन्माच्या गोंदणी
ओळ धरून उशाला मन निजले थकून
तिथे भेटली कविता रडे तिला बिलगून
का ग वेळ लावियेला किती केले जपजाप
अंतरीचा तूच दीप; तूच ईश, मायबाप
(कधीकधी ओळखिची सापडते खूण
भेट होते आता अशी अधुनमधुन
काही रुसवे-फुगवे, काही शपथा वचने
कैक जन्म फिटू नये ऐसे कवितेचे देणे)
~श्यामली
ही कविता दिवाळी अंकात दिली होती...कविता विभागच रद्द झाल्यामुळे छापून आली नाही (ऑडियो स्वरुपात तिथे आहे)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर आहे. श्यामली ताई पुर्वी
सुंदर आहे. श्यामली ताई पुर्वी सुद्धा वाचली होती हि कविता अन आज सुद्धा वाचतो आहे.
सुरेख.
सुरेख.
नित्य नव्या खुळापायी येई
नित्य नव्या खुळापायी येई दाटून पापणी
प्राक्तनांची खूण अवघ्या जन्माच्या गोंदणी .... सुंदर!!
का ग वेळ लावियेला किती केले जपजाप
अंतरीचा तूच दीप; तूच ईश, मायबाप
. अगदी.. अगदी!! अनुभवलेल्या ओळी आहेत ह्या...
वाह वाह श्यामली!
वाह वाह श्यामली!
सुंदर.
सुंदर.
श्यामली, निव्वळ
श्यामली, निव्वळ अप्रतीम..!
नकळत गुणगुणलो. मस्तच!
काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला मी ही सादर करणार.. चालेल?
सगळ्यांना धन्यवाद किरू,
सगळ्यांना धन्यवाद
किरू, विचारतो काय अरे, बिनधास्त वाच, फिडबॅक सांगायला विसरू नकोस
सही श्यामली !!! अंकाच्या
सही श्यामली !!!
अंकाच्या कामांच्या वेळी लूप मधे टाकून १५-१५ वेळा ऐकली होती... आत्ता परत ऐकली..
फार मस्त आहे..
व्वा श्यामली कधीकधी ओळखिची
व्वा श्यामली
कधीकधी ओळखिची सापडते खूण
भेट होते आता अशी अधुनमधुन ..........मस्तच
मस्त कविता.
सुधीर
ओळ धरून उशाला मन निजले
ओळ धरून उशाला मन निजले थकून
तिथे भेटली कविता रडे तिला बिलगून>>>> मला खूप आवडलेली ओळ. दिवाळी अंकात ऐकली होती. कविता आवडलीच.
आ हा हा हा...... काय जीव
आ हा हा हा......
काय जीव सुखावला म्हणून सांगू ........
व्वा! सुंदरच!
व्वा! सुंदरच!