निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल तुला शेतीत इंट्रेस्ट असेल आणि आहे ती शेती कसायची इच्छा असेल तर नेटवर धुंडाळत रहा. अ‍ॅग्रोवन वाचत जा. भारतात केवळ आत्महत्या करणारेच शेतकरी आहेत असे नाही तर नवनवीन प्रयोग करुन पाहणारेही शेतकरी आहेत. आपल्या महाराष्ट्रातच ढिगानी पडलेत आणि काही जिद्दी असेही आहेत ज्यांनी निसर्ग साथ देत नसतानाही शेती केलीय. वाचत जा नेटवरचे. तुझ्या शेतीत फायदा होईल तुला.

रच्याकने, शेतीतले इनकम टॅक्सफ्री आहे Happy

शोभा, साधना मी अजुन आमच्याइथे कुठे कदंबाचे झाड नाही पाहीले. माबोच्या फोटोंमध्येच पाहीले आहे.

प्रयोगावरुन आठवल माझे वडीलही आधि दरवर्षी एक एक प्रयोग करायचे. त्यांना आवड होती प्रयोगाची. नोकरी सांभाळून करायचे. आता ७० वर्षाचे आहेत तरी काहीनाकाही स्वतः खोदुन भाजी लावतात पण घरी खाण्यापुरती. माझे काकाही ८० वर्षाचे असुन ते अजुन स्वतः शेतीचे काम, लागवड करतात. माझे वडील सर्विसला होते कुर्ल्याला. केवळ जमिनीकडे व घराकडे लक्ष असाव म्हणून त्यांनी कायमची नाईटशिप केली आहे. रोज सकाळी घरी यायचे व दिवसा शेतात जायचे. गडी असायचा पण त्यांना हौस जास्त. आम्ही एक वर्ष उस लावला होता. पण आमच्याकडे उसाला डिमांडच नव्हत. त्यामुळे बराच उस तुरे येउन फुकट गेला. एक वर्ष वाटाणा लावला. त्याला किडच जास्त पडायची. पण शेंगा यायच्या. एकदा शेंगदाणा लावला. भरपुर आला होता. गोणी भरल्या होत्या. एकदा बटाटे लावले. पण ते जास्त वाढले नव्हते. एक वर्ष हरभर्‍याच शेत लावल होत. हरभराही चांगला झाला होता. कलिंगडाच मी वर लिहीलच आहे. दरवर्षी एक शेत त्यांच्या प्रयोगाला असायच.

साधना अगदी. माझ्या आईलाही खुप हौस आहे. ती रिटायर्ड प्रार्थमिक शिक्षिका आहे ती पण वडीलांना फावल्या वेळेत मदत करायची भाजी वगैरे काढायला, अजुनही करते.

रच्याकने, अनिल, तु जे शेवटी लिहिलेस त्यातला पहिला भाग खरा व्हावा ही माझी मनापासुन इच्छा आहे... पण मी शेत केले तर इथे डायरीच लिहायला लागेन. Happy

सेम विथ माय मॉम.. अर्थात ती गृहिणीच होती पण डालडाच्या डब्यात तुळशीच्या बाजुला आलेही लावायची.

रच्याकने, आपली मेलामेली झालेली आठवतेय?? हिरव्या पाचुला अगदी बारीक हिरवे डोळे फुटलेत. आता तिथुन पाने निघणार बाहेर Happy

आज कुरिअर केलेय. बटरस्क्वाशच्या बीया मी बहुतेक गावी पाठवल्या. दोन दिवस शोधत होते म्हणुन कुरिअर केले नाही. जर सापडल्या तर मीच येते कुरीयर गर्ल बनुन Happy

योग्या, अ‍ॅडेनियमला पाने फुटली काय?? एव्हाना दिसायला पाहिजेत त्याची पाने.

अरे देवा ! जागूच्या भाज्यांचे फोटो पाहून तोंपासु हे सांगायला आले तर मध्ये कित्त्त्त्त्त्ती पोस्ती पडल्यायेत.
लाल माठाची भाजी मला जाम आवडते.

मनु तुझ्याकडेही होईल कदाचित.

साधना मला आनंद झाला हे ऐकुन. आता जगलच समज ते.

माझ्याकडे तुझा अ‍ॅडेनियम सुखरुप आहे. शेंगा अजुन सुकल्या नाहीत.

त्याला कुंडीतुन काढ जपुन. जमिनी खाली थोडा जाड गठ्ठा झाला असेल तयार. तो वरची येईल असे पाहुन परत लाव. मस्त दिसते. अ‍ॅडेनियमला खोटे बोन्साय म्हणतात.

डियर, मेथी लावायला आधी मेथ्या तर पाहिजेत ना माझ्याकडे Proud
सध्या स्व.घरात साबांचं राज्य चालू आहे, त्यामुळे मला माहीत नाही मेथ्या शिल्लक आहेत की नाहीत ते.

मनु चांगल आहे तुला आरामतर मिळेल. मेथ्या आण बाजारातुन.

साधना माझ्याघरी येणारे लोक त्याला बोन्सायच म्हणतात.

"महानंदा" चित्रपटातील "माजो लवताय डावा दोला...." या गाण्यातील "रतन अबोली केसातं मालता...." पैकी "रतन" हे फुल कुठले? त्याला दुसरे अजुन नाव आहे का?
कुणाकडे फोटु असले तर प्लीज डकवा Happy

जागू, कुंडीतील भाज्यांवर एक लेख टाकच. पण तुला कोणी माहित आहे का जो/जी घरी येऊन माझ्या झाडांची निगा राखेल?

रतन अबोली -

रतन अबोली ही अबोलीची एक जात आहे. आपण नेहमी पाहतो ती मोठ्या पाकळ्यांची अबोली. रतन अबोलीच्या पाकळ्या लहान असतात आणि रंग गडद असतो. खुप सुंदर दिसते ही अबोली. गोव्याची स्पेशॅलिटी... Happy वाडीलाही मिळते.

अबोलीच्या ४ जाती मला माहित आहेत. १) फिक्कट शेंदरी कलरची अबोली ही जास्त दिवस टिकते. एक पिवळी अबोली, २)हिरवी अबोली. ही जंगली असते. साधना आपण त्यादिवशी राणीच्या बागेत पाहीली. ३) डार्क अबोली कलरची अबोली हिचे फुल मोठे असते जरा. दिसायला गडद रंगामुळे खुपच छान दिसते पण एक दोन दिवसांत मलुल पडते. ४) गडद अबोलीतीलच छोटी जात कदाचीत हीच रतन अबोली असेल.
अजुन निळी कलरची फुल अबोलीच्याच जातितली येतात. पण अजुन तिला कोणी अबोलि म्हटलेले ऐकले नाही. पण लहानपणी मी तिला निळी अबोली बोलुन तिचा गजरा करायचे. तिच्यात मधही असायची. मागे योगेशनी की कोणीतरी फोटो टाकला होता.

मी जी पहील्या रंगाची अबोली म्हटली आहे. ती माझ्याकडे आहे. उद्या फोटो टाकेन. तिचे बी होते. पुर्वी हिची व्यवसायासाठि लागवड व्हायची. १ रुपयाला १०० फुल मिळायची. हिचे सुकलेले बी काढुन ते पाणी बरल्या बालदीत टाकायचे आणि वरुन झाकण द्यायचे. ते बी बालदीत तडतडते. मग ते बी पेरायचे. पण असेही पावसाळ्यात अबोलीच्या झाडाखाली तिचे बि पडून बरीच रोपे उगवतात.

तिन नंबरची अबोलीही व्यवसायासाठी वापरतात. हिला बोंडे येतात पण त्याच्यात बी नसते. हिच्या फांद्या लावुन लागवड करतात. माझ्याक्डुन गेली आता. शोधते आता कुठेतरी.

हसू नका, पण मला फार्फार इच्छा आहे की आपल्या घरी एक भलामोठा गरगरीत पिवळाजर्द भोपळा यावा. किती वेळा बिया लावल्या, किती वेळा झाडे आली. पण फुलं येऊन गळून गेली ..... भोपळ्याचे झाड जमिनीत लावावे लागते का?

मामी भोपळ्याची वेल जमिनीतच लावावी लागते. कारण ती भरपुर पसरते. पसरुन भरपुर जागा व्यापते आणि भोपळ्याचा लोड वेल घेउ शकत नाही म्हणून गावी भोपळ्याची वेल घरावर, झोपडीवर सोडतात. म्हणजे पत्र्यावर किंवा कौलावर हे भोपळे व्यवस्थित वाढतात. जर जमिनीवर जागा भरपुर असेल तर जमिनीवर सोडतात.

आमच्याकडे पहिला फुल येउन फळ धरत नसेल तर दृष्ट काढण्यासाठी अश्या झाडा-वेलिंना चामड्याची चप्पल बांधायचे.

मामी बरीचशी फुले तसेच फुलावरचे कोवळे भोपळे गळून पडतात. किड लागल्यानेही ते गळतात तसेच त्यांना नमिळालेली पोषक द्रव्यांमुळे किंवा हवामानामुळे. पण काही दिवस ठेवली वेल की लागतो एखादा भोपळा तरि. पण कधी कधी सुरवातीलाच ७-८ भोपळे लागतात. मग संपवायचे कसे हा प्रश्न पडतो.

हो टरबुज लागु शकतात कुंडीत.
चवळी, कारल पण लावु शकता.

माझ्या आईला भारी हौस असल्याने मलाही थोडीफार बागकामाची आवड आणि माहिती आहे. मी भेंडी, अळू, टोमॅटो, मिरच्या, कढिपत्ता, पपया, पुदिना, मेथी, तुर, चवळी, कारली, कोथिंबीर लहानपणापासून आतापर्यंत कधी ना कधी उगवून बघितलेले आहेत. आता टरबूज बघेन. बाजारच्या टरबूजातून निघालेल्या बिया (जर जून असतील तर) चालतील का?

अग जुनच पाहिजेत. म्हणजे त्या चांगल्या तयार झालेल्या असतात रुजण्यासाठी.

कधीकधी आपल्याकडील टोमॅटोही खुप पिकुन खराब होतात मग त्या टोमॅटोच्या बिया टाकायच्या कुंडीत.
सुक्या मिरचीचे बी काढुन मिरचीची रोपे तयार करता येतात.

भाजीवाल्याकडून एखादे पिकत आलेले कारले आणायचे आणि त्याच्या बिया लावायच्या. रुजतात त्याही.

कधीकधी आपल्याकडील टोमॅटोही खुप पिकुन खराब होतात मग त्या टोमॅटोच्या बिया टाकायच्या कुंडीत.
सुक्या मिरचीचे बी काढुन मिरचीची रोपे तयार करता येतात. भाजीवाल्याकडून एखादे पिकत आलेले कारले आणायचे आणि त्याच्या बिया लावायच्या. रुजतात त्याही. >>> अगदि हेच करते मी.

टोमॅटो टाकलय सध्या. मागच्या वर्षी माझ्याकडे काम करणार्‍या मावशींनी इतक्या मिरच्या लावल्या होत्या की टोपलीत घालून बाजारात विकायला न्यायची वेळ आली होती. आता तुझ्या पोस्टी वाचून पुन्हा सगळ्या भाज्या लावायला हात शिवशिवताहेत. धन्स. पावसाळ्यात अती वार्‍यापायी सगळी झाडं खराब होऊन जातात.

मामी
ओह, अग जागू मग माझ्याकडे कसे येणार भोपळे? मी तर कुंडीतच झाडे लावू शकते.

भोपल्याचे वेल जमिनीवर सोड्तात्.भोपळ्याच्या वेलीला नर आणि मादि अशी फुले आलटुन पालटउन लागतात. फळ धारणेसाठि किटक वा फुलपाखरे असावी लागतात. नाहितर फुले गळुन पड्तात. किवा फळ धारणा झलिच तर फळ मुरड्ते. या साठि ज्या ठिकाणी हे शक्य नसते तेथे सकाळि सुर्योदया पुर्वी नर फुल काढुन मादि फुलात फिरवावे.असे ४ ते ५ दिवस करावे. एकच फुल २,३ फुलात फिरविले तरि चालते.
फळ धारणा नक्कि होते.
तुम्हि सारे एवढे सारे पटापट कसे लिहिता.

विजय

विजय मस्त माहीती. मला तुमच्याकडची मिरीची वेल हवि आहे. कुठल्या नर्सरीत मिळेल ?

http://www.bnhs.org/

इथे Brunch with Birds at Navi Mumbai ह्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. असाच ठाण्यालाही कार्यक्रम आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा... Happy

Pages