Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17
लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे>>>>>>> नुस्तं वाचूनच
दक्षे>>>>>>> नुस्तं वाचूनच वजन वाढलं दोन चार किलो

जेवणानंतर?????? जेवणाच्या बदली तरी म्हण गं
मस्त धागा...मामी देव तुम्हाला
मस्त धागा...मामी देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
माझ्या लहानपणीची आठवण:
गोल जीरा बटर मिळायचे... एक बटर घेऊन तो बशीत ठेवायचा..मध्यभागी चमचाने छोटं छिद्र पाडायचं...मग त्यात चमचाने थोडा थोडा चहा ओतायचा...मग तो मऊ झालेला बटर चमचाने केक प्रमाणे खायचा...
टोस्ट मधली चेरी वेचून खाणे...
खारीच्या पुड्यातील शिल्लक राहिलेल्या चुरा खायला तर आम्ही भांडायचो...
अहाहा... लहानपण देगा देवा....

आजकालच्या डाएट आणि nutritious बिस्कीट मध्ये ती मजा नाही....
दक्षिणा >>>> शुअरशॉट डायबिटीस
दक्षिणा >>>> शुअरशॉट डायबिटीस शॉर्टकट की गं..... पण एकदा तरी खाऊन बघणारच.
मानुषी, व्हय व्हय सर्व्याण्च्या सहभागामुळे आणि ल्हाणपणी सर्व्याणीच बिस्कीटे खाताना 'out of (biscuit) box' ही विचारपध्दती अवलंबल्यामुळे धागा लै इंटरेश्टिंग झालाय....
रच्याकने : कोणा विंग्रजानी हा धागा वाचला तर तो वाचणार नाही.
मामी, धमाल धागा आहे.
मामी, धमाल धागा आहे.
ते क्रीम रोल्स आवड्तात का
ते क्रीम रोल्स आवड्तात का कोणाला? त्यातली क्रीम व चेरी खाउन तोंड अगदी गोड होते मग च्या घ्यायचा.
मस्त धागा मामी
अश्विनी क्रिमरोल ज्या उंचिचा
अश्विनी क्रिमरोल ज्या उंचिचा त्याच उंचिच्या ग्लासात भरून चहा घ्यायचा.
शेपटाकडून चहात बुडवून तो खायचा, क्रिमरोल संपला की उरला सुरला साखरमिश्रीत चहा संपवायचा..
Good day biscuits आनि दुध !!!
Good day biscuits आनि दुध !!! लई भारी
बरं, मारी बिस्किटं खायची अजून
बरं, मारी बिस्किटं खायची अजून एक पध्दत आहे. त्यांना थोडंसं लोणी लावून ती तव्यावर / मावेमध्ये गरम करायची. मस्त खरपूस होतात. आणि अशी बिस्किटे च्या बरोबर खायची.
हा बाफ सुरु झाल्यावर मला रात्री स्वप्नात पण बिस्किटेच दिसायला लागली आहेत
आजच सकाळी साखरझोपेत सुचलेली ही बिस्किट रेसिपी करुन बघणार आहे : मारी/ गुड डे बिस्किटे, त्यांवर केकवर जे आयसिंग करतो ते आयसिंग, त्यावर चॉकलेट सिरपचा एक थर.... वरून झाकायला तसेच दुसरे बिस्किट.... यह हुआ अपना बिस्किट-आईसिंग-चॉकलेट सँडविच!
हॉस्टेलात असताना आम्ही रात्री बेरात्री भूक लागली की इतर मैत्रिणींच्या रूम्सवर धाड घालून जे जे काय मिळेल त्याचे कॉम्बिनेशन करुन खायचो. त्यात लावलेले शोध : मारी बिस्किटांवर गोड्या/ तिखट लिंबाच्या लोणच्याचा खार पसरून खायला चांगला लागतो. (रस्कवरही हा खार चांगला लागतो.) जर लिंबाचे क्रश लोणचे असेल तर ते रस्क/ बिस्किटावर पसरण्यासाठी अजूनच छान! माझ्या काही मैत्रिणी घरून आणलेले मुरांबे, साखरांबेही पसरायच्या बिस्किटांवर. एकीने तर माझ्यासमोर च्यवनप्राश बिस्किटाला फासून ते खाल्ले होते. असो. हॉस्टेलात भुकेल्या पोटी त्या गोष्टी बर्या लागायच्या. पण घरी काही तसे प्रकार करुन बघितले नाहीत नंतर!
मारी बिस्कीट विथ पीनट बटर ही
मारी बिस्कीट विथ पीनट बटर ही मस्त लागतय हं......
च्यवनप्राश बिस्किटांवर??
च्यवनप्राश बिस्किटांवर??
होस्टेल लाईफ मधे असे प्रयोग करायला खूप वाव असतो नै????
मामी तुस्सी ग्रेट हो ज्जी.. हा धागा काढताच अबव सेन्चुरी मार्ली कि याने
वर्षू पण टॉप्स तुझे ते दातानी
वर्षू पण टॉप्स तुझे ते दातानी खरवडून खायचे पोस्ट. अशक्य हसले. बिस्किट गट्ग घालाच एकदा. ( लग्नाची पंगत घालतात तसे हो.)
अश्विनीमामी इज बॅक. थँक गॉड!
अश्विनीमामी इज बॅक. थँक गॉड! किती दिवस मी एकटीच एवढी भाचरं सांभाळत होते.
होस्टेल लाईफमधील रेसिपीजचा एक
होस्टेल लाईफमधील रेसिपीजचा एक वेगळाच बाफ काढावा लागेल वर्षू!
दुनियाभरातील अजब कॉम्बिनेशन्स व इम्प्रोव्हायझेशन्सने युक्त रेसिपीज!! 
आजच सुपर मधे गेले होते..
आजच सुपर मधे गेले होते.. तिकडे बिस्किटांच्या सेक्शनमधे जाताच मामी आणी सर्व बिस्किट प्रेमींची कडकडून आठवण आली आणी इतकं फसकन हसू फुटलं, मग हसू दाबत उगीचच सर्व क्रीम ,चॉकोलेट इ.इ. बिस्किटाच्या पुड्यांना हात लावून घेतला.. (हां ना.. आज्काल मेलं तो डाएट चा दुष्ट विचार भुतासार्खा डोक्यावर सवार असतो
.. बाकीचे लोकं माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतायेत असे लक्षात आले .. मग पाहिजे ती स्प्रिन्ग ओनिअन ची सॉल्टी बिस्किटं उचलली आणी पाय काढला तिथून..
आयला.. आताशी नुस्ती बिस्किटं दिसली दुकानात तरी हसू येतंय..
वर्षू सेम हियर.
वर्षू सेम हियर.
प्रचंड रणरणतं ऊन आहे, भिवंडी,
प्रचंड रणरणतं ऊन आहे, भिवंडी, रसायनी वा तत्सम एम.आय.डी.सी. एरिया आहे. सगळीकडे मोठाल्या गाड्या नी धुळवटले रस्ते. पोटात भुकेने काहूर माजवलाय. सकाळीच नेहमीसारखा हेवी नाष्टा न घेतल्याची अन् नेहमीसारखेच बॅगेत गुड डे/पार्ले नसण्याची खंत ती भुक अजून चेकळवतायत.
दुरवर हॉटेल सोडाच एखादी वडापावाची टपरी देखील नाही. शोधाशोध करून एक टपरी भेटते. फक्त चहाच.
धुळीनं भरलेला भैय्या, चहा, भांडी, टपरी. अशावेळी पोट माघार घेतं. बॅगेत पाण्याची बाटली आहे, म्हणजे नशीब तेवढं खराब नाहीतर.
"भैय्या, दोन-तीन बिस्कीटाचे पुडे दे" त्याच्याकडे कुठले ब्रॅन्ड? जे दोन-चार असतील ते. शक्यतो पार्ले असतो नाहीतर टायगर. ते टायगर नकोसं वाटतं एरवी. पण त्यावेळी..
मग हावर्या-हावर्या ते पुडे फोडायचे सोबत पाण्याचे घोट.
असल्या वैराण वाळवंटात एक असामान्य लंच केल्याबद्दल स्वता:ची पाठ थोपटायची अन् कामाला लागायचं.
आम्हा सेल्स्/सर्वीस वाल्यांच्या हे परिचयाचं. इथं बिस्किटं देवदूत म्हणून हजर असतात.
(रच्याकने, मला आठवतंय/कळतंय तेव्हापासून पार्लेची किंमत ४ रुपयेच.. हल्ली हल्ली पाच झालीये)
पुण्यच्या कयानी बेकरीची बटर
पुण्यच्या कयानी बेकरीची बटर कुकीज. आम्ही लहान असताना पुण्याला गेलो की आवर्जुन आणायचो. बाकी ग्लुकोज ची खिर, खारी इ. सगळ्या पोस्टना अनुमोदन
आम्हा सेल्स्/सर्वीस
आम्हा सेल्स्/सर्वीस वाल्यांच्या हे परिचयाचं. इथं बिस्किटं देवदूत म्हणून हजर असतात.>> अगदी अगदी रे.
सोबत डोक्यात पेमेंट्च्या सप्लायच्या काळज्या. बिस्किट खाताना तेव्ढेच विसरायला होते.
दादरला रानडे रोडवर मनोहर
दादरला रानडे रोडवर मनोहर बिस्किट मार्ट आहे, तिथे मिळतात तशी खारी बिस्किटं अख्ख्या दुनियेत मिळत नाहित>>>> अगदी अगदी... आचरेकरांच्या खारीला तोड नाही. लय मिसते इथे :(.
आम्हा सेल्स्/सर्वीस वाल्यांच्या हे परिचयाचं. इथं बिस्किटं देवदूत म्हणून हजर असतात.>> हो गेल्या महिन्यात भारत वारीत, एका फळ विकणार्या भैयाला पार्ले-जी खाताना बघीतले लंच म्हणून!! आत्ता बोला!
मी सर्वच बिस्कीटे चहात बुडवून खाते, पण लगदा (पार्लेजीचा सोडुन) नाही आवडत. ती अशी चहा प्यायलेली बिस्कीटे, लगदा व्हावयाच्या आधी पटकन खायची. खारी, बटर यांची गम्मतच न्यारी.
लहानपणी पार्ले-जी पाण्यात हलके भिजवून, लगदा करून खायचे.
आणखी एक प्रकार लहानपणी खुप केला. पार्लेजीचा चुरा करायचा आणी त्यात साखर टाकून, पुडींग करुन खायचे.
सध्या सुपुत्र, क्रिम बिस्किट्स आतल क्रिम चाटून मग मला अगदी प्रेमाने खाउ घालतात
काही वर्षापूर्वी भारतात
काही वर्षापूर्वी भारतात डिलाइट नावाची बिस्कीट मिळायची, ती आता दुसर्या कोणत्या नावाने मिळतात का? ती बिस्कीट माझी प्रचंड आवडती आहेत. गव्हाळ-थोडासा ऑरेंज रंग असतो. चहाबरोबर भारी लागतात.
मामी | 14 January, 2011 -
मामी | 14 January, 2011 - 07:25 नवीन
खारी बिस्कीटे खाण्याची माझी पध्दत.
कपात खारी घालायची. वरून साखर घालायची. खारी जवळ जवळ सगळा चहा शोषून घेतील. उरलेला चहा भुर्रभुर्र करून प्यायचा. त्याला छानपैकी साखरमिश्रित खारीची चव आलेली असते. मग चमच्याने खारी खायची ...
>>>
आयला मामी सेम सेम.
हे खमंग चकलीला पण तुम्ही करु शकतात!
निलिमा तोंपासु एकदम. मी खारी
निलिमा
तोंपासु एकदम.
मी खारी अशीच खाते, फक्त साखर नाही घालत
ज्युनियर हबाच्या मते,
ज्युनियर हबाच्या मते, बिस्कीटाचा छोटासा तुकडा तोंडात ठेऊन आधी पुर्ण भिजवून घ्यावा. नंतर तो कार्पेटवर टाकावा काही काळ त्याच्याकडे बघत बसावे व नंतर जोराने किंचाळून पालथे पडून जिभेने पटकन चाटून खावा. आईने बघितल्यास रट्टा मिळतो. बाबानी बघितल्यास घाबरू नये.
हबा..
हबा..

हबा ...... पोरगं बापसे
हबा ......
पोरगं बापसे सवाई दिसतय!
'बाबानी बघितल्यास घाबरू
'बाबानी बघितल्यास घाबरू नय''... कारण बाबानेच शिकवलेली दिस्तीये ही ट्रिक

बिस्किटांचा लगदा करून खाताना
बिस्किटांचा लगदा करून खाताना चहा लवकर संपतो.... तेव्हा अशा वेळेला नेहमीपेक्षा जास्त चहा बनवावा! लगदा संपल्यावर भुरकत भुरकत प्यायला छान!
मी ८ वीत असतांना नागपूरच्या
मी ८ वीत असतांना नागपूरच्या सेमीनेरी हील्सवर सागाच्या जंगलात एन सी सी कॅम्पला गेलो होतो, तीथे कडक, राकट मिलिटरीमेन आम्हाला ट्रेनिंग द्यायचे. तिथे 'ग्लुकोज बिस्किटांची लापशी' असा एक पदार्थ शिकवला होता. म्हण्जे, समजा तूम्ही जंगलात हरवलात, भूक लागली असेल, तर जवळची बिस्किटे एखाद्या भांड्यात पाण्यात कालवायची आणि काट्या-कुट्या गोळा करून त्यावर शिजवली की लापशी तयार! (मात्र तुम्ही जंगलात जाता हरवायला तेव्हा तुमच्याकडे बिस्किटे, एखादे भांडे कम्पल्सरीली असायला हवे हां !!)
लिटल हार्टस नावाची बिस्किटे पूर्वी मिळत, ती मला फार आवडत ! आता मिळत नाहीत बहुदा !
आई hexagon shape चि आणि
आई hexagon shape चि आणि काजुच्या आकाराचि खारि बिस्किट आणायचि. ति बिस्किट मुठ्भर चहाच्या कपात टाकुन चमच्याने खायला मजा यायचि.
हबा ज्यु. हबाची पद्धत भारी
हबा
ज्यु. हबाची पद्धत भारी आहे!
Pages