Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17
लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूडी, अगदि अगदि. प्रचंड
मंजूडी, अगदि अगदि. प्रचंड अनुखारी!!!!!
मी आणते कधीमधी. आईला तर खुपच आवडतात. मनोहरची खारी, आख्ख्या जगात न्यारी! अशीच त्यांची नानकटाई पण मस्त असते. पण सध्या मिळत नाहीयेत. जो ती बनवायचा त्याचा भाऊ वारल्यापासून मला वाटत खारीनिर्मिती बंद आहे .
आमी बिस्किट पाण्यात घालुन
आमी बिस्किट पाण्यात घालुन खातो !
दुष्ट ... दुष्ट.... दुष्ट
दुष्ट ... दुष्ट.... दुष्ट माणसं आहेत मायबोलीवर.... आता मी माझ्या जीभेवर कसा ताबा ठेऊ बरे

माझ्या लठ्ठपणाचे निम्मे श्रेय या वरच्या सगळ्या अनुभवांना अन उरलेले नॉनव्हेज ला
>.मनोहरची खारी>> अरेच्चा!!!!
>.मनोहरची खारी>> अरेच्चा!!!! माझ्या आईची पसंत एकदम!!
आणि ज्या डब्यात बिस्किटे
आणि ज्या डब्यात बिस्किटे ठेवतो त्यात जमलेला खालचा चुरा??? त्यात काय काय असतं ... पुड्यातून पोटापर्यंतच्या प्रवासातील या स्टेशनावर आतापर्यंत ज्या ज्या प्रकारची बिस्किटे काही काळापुरती का होईना, थांबली होती त्या सगळ्यांच्या आठवणी. काही अर्घे तुकडे, काही त्याहुनही कमी, काही अगदीच भुकटीच्या स्वरूपात, क्रीम बिस्किटांचं क्रीम अगदी छोट्या कणांच्या रूपात, गोड-खारी अशी बिस्किटांची सगळी रुपं गुण्यागोविंदानं नांदत असतात. कधी कधी त्यात पुड्याच्या प्लॅस्टिकचा छोटासा तुकडादेखिल असतो. तर कधी, एखादवेळी अनवधानानं पडलेली स्टेपलरची पीन. हिच्या पासून सावध!
मग एखाददिवशी एका कोणाला हा चुरा संपवायची हुक्की येते. समोर गरम चहाचा कप ठेवायचा. थोडाथोडा चुरा तळहातावर घेऊन स्कॅन करायचा आणि चहात टाकायचा. मधेच एखादेवेळी हात तोंडाकडे जाऊ द्यायचा. डब्याच्या तळाशी उरलेली भुकटी बोटं ओली करून टिपून घ्यायची. डबा बाजूला सारून मनसोक्तपणे चहा-चुरा खायचा.
>>>>बिस्किटे कशी कशी
>>>>बिस्किटे कशी कशी खावीत...?<<<<
बिस्किटे तोंडाने सावकाश , हळू हळू खावीत
पुण्यात खाऊवाल्या पाटणकरांकडे
पुण्यात खाऊवाल्या पाटणकरांकडे आणि डागा ब्रदर्स कडे पूर्वी पूर्णाहार बिस्किटे मिळायची.... कायतरी पथ्याची का अशीच होती.... नक्की नाही आठवत. पण आजोबांना ती खूप आवडायची म्हणून ते घेऊन यायचे. त्या पुड्यातली निम्म्याहून जास्त बिस्किटे मीच फस्त करायचे. उरली सुरली बाकीच्यांना!
मोनॅको बिस्किटांचा लगदाही चहात अप्रतिम लागतो. त्यासाठी टंपरभरून चहा मात्र हवा!
राजगिर्याची बिस्किटंही मिळतात आजकाल. म्हणजे त्यांना 'बिस्किटं' म्हटलं जातं! पण असतात वड्याच! खरपूस असतात, नेहमीच्या राजगिरा वडीसारख्या भुसभुशीत नसतात आणि खमंग लागतात.
बेकरीत भाजून घेतलेली कणकेची/ मैद्याची/ रव्याची बिस्किटे - नानकटाईही अप्रतिम लागतात. त्यांना खास घरगुती चव असते व खमंग स्वाद!
चीझलिंग प्रकार आवडतो का कोणाला इथे? ही बिस्किटे (?) देखील चहात बुचकळून खाण्यात लै मजा!
प्रसन्न अ, बरं झालं सांगितलंत
प्रसन्न अ, बरं झालं सांगितलंत ......
पूर्वी `टॉप' ची बिस्किटं
पूर्वी `टॉप' ची बिस्किटं मिळायची (लोण्यातली). आता बन्द झाली का ती ?
चीजलिंग्ज बेस्टच .... बोकाणे
चीजलिंग्ज बेस्टच .... बोकाणे भरायला.
माझ्या मुलीला थ्रेपटीन ची बिस्कीटे खुप म्हणजे खुपच आवडतात. रोज स्कुलबस स्नॅक म्हणून २ नेते. आम्ही लहानपणी त्यांना कुत्र्याची बिस्किटे म्हणायचो. अगदी कार्डबोर्ड खात असल्यासारखी चव.
ग्लुकोज बिस्किटं वेनिला
ग्लुकोज बिस्किटं वेनिला आइस्क्रिम मधे..........चुरा करुन टाकावीत........मग खावीत.......वेनिला आइसक्रिम ला वेगळीच चव येते...................
मारी बिस्कीट बशीत चहा ओतून
मारी बिस्कीट बशीत चहा ओतून त्यात बुडवून खायला आवडतं
हि माझी लहानपणी आवडिची
हि माझी लहानपणी आवडिची बिस्किटे त्याच क्रमाने, मला नुसते सफेद दूध व दूधात काहिहि घातलेले आवडायचे नाही मग थोडे तरी दूध पोटात जाईन म्हणून बिस्किटे द्यायची आई. कारण बुडवून खाल्ली की उरलेले दूध टाकायची. वय वर्षे काळः १-१२ वर्षे दूधात बुडवून खायची.
१)आईची घरी बनवलेली नी भट्टीत भाजून आणलेली नानकटाई डायरेक्ट दूधात बुडवून चवीने चवीने खायची. एका वेळेला चार खावूनच उरलेले दूध टाकून द्यायचे.
२)लहानपणी चँम्पियन हा ब्रँड फेमस होता. मध्ये मस्त क्रीम वा जेली असे. तर प्रथम हि जेली खायची, मग नुसती दोन बाजू दूधात बुडवून खायची, उरलेले दूध टाकायचे.
३) बॉर्न्बॉन चॉकलेट फ्लेवरः ह्यातील क्रीम खावून परत उरलेल्या दोन बाजू दूधात.
४) कोकोनाका क्रंची: खोबर्याची हि बिस्किटे खूप आवडायची. हि पण खायची तीच पद्धत.
५) गूडडे काजू फ्लेवरचः हा एक आवडायचा. दूधात बुडवून चार ते पाच.
६) मोनॅको: वरच्यासारखीच खायची.
ह्या व्यतिरिक्त मला कोणतीच बिस्किटे जराही आवडायची नाहित व सहसा आवडिने खाल्ली नाहित. हि बिस्किटे मला फक्त दूधातच बुडवून आवडायची. चहा सुरु केला प्यायला तेव्हा चहाबरोबर इतकी आवडली नाहित. तेव्हा कमीच झाले खाणे.
बिस्किटांखेरिज जीर बटर व मस्का खारी कधीतरी चहाबरोबर. पण ती खावून वर्षे काय तर काळ लोटला. अक्कल आल्यावर कायच्याकाय फॅट असते असे शिकायला लागल्यावर सोडले.
प्रसन्न अ, मारी बिस्कीट बशीत
प्रसन्न अ, मारी बिस्कीट बशीत चहा ओतून त्यात बुडवून खायला आवडतं >>>
अनुमारी!!! पण त्यात पण एक खासम खास गोष्ट आहे. बशीत मारी ठेऊन वर चहा ओतला तर ही गंमत दिसत नाही. त्याकरता गरम चहा बशीत ओतायचा आणि मग त्यात हळूच काठावरून मारी बिस्किट सोडायचे. वर तरंगले पाहिजे. जसा चहा खालून बिस्किटात शिरतो, तसे ते मोठे होते, त्याला भेगा पडतात पण गोलच रहाते. थोडक्यात मारी बिस्किट उमलते. बघायला खुप मजा येते. मग चहा प्यायचा आणि शेवटी मारी खायचे.

फिलाडेल्फिया क्रीम चीज वापरून
फिलाडेल्फिया क्रीम चीज वापरून घरी केलेल्या चीजकेक चा बेस .. चुरा केलेली मारी बिस्किटे.. स्लर्प!!!!!!!!
मारी बिस्किट उमलते..........
मारी बिस्किट उमलते..........
किती गोड शब्दप्रयोग
अनुमारी!!!!!!!! अनु'मोदन/क'
अनुमारी!!!!!!!! अनु'मोदन/क' असतं तसं तू अनु'मारी' म्हणत्येस मामी???????????? गॉश!
धन्य ती बिस्किट निष्ठा!
मामी द बिस्किट क्वीन !!!!
मामी द बिस्किट क्वीन !!!!
पौर्णिमा, अनुमारी, अनुखारी,
पौर्णिमा,
अनुमारी, अनुखारी, अनुनानकटाई ... इ.इ.
वर्षुतै, तुम्हीही तुमची
वर्षुतै, तुम्हीही तुमची बिस्किटनिष्ठा वरती दाखवलेय की. बिस्किट-खवणी क्वीन कोणै सांगा बरं?

मामी, खारीचा उरलेला चुरा
मामी, खारीचा उरलेला चुरा बेस्टच.....
अख्हाच्या अख्खा पुडा नाही...

लहानपणी आईची शिकवण एकवेळी दोनच बिस्किटे खायची
त्यावेळी ही चुर्याची आयडिया कामी यायची... चुर्यात किती बिस्किटे आहेत ते कळतच नाही.....
वर आई डबा स्वच्छ केला म्हणून खुष.... एक तीर मे ढेर सारा बिस्कुट....
मारी बिस्किटे बशीत एकावर एक ठेवायची आणि एकेकावर चहा हळूहळू ओतायचा...... बशीतला चहा पिऊन टाकायचा. मग हा बिस्किटांचा थर चमचा घेऊन (मामीच्या भाषेत उमललेल्या बिस्किटांचा
)
इतकं मस्त वाटतं अजुनही हुकी आली की खातो तसंच....... जुने दिवस विसरू नयेत म्हणतात ना..... 
एकेका कडेने केक खावा तसा खायचा....... कारण तेंव्हा केक असा खायला मिळणे म्हणजे दिवाळी असायची..... मग काय केकची भूक मारीवर.....
क्या बात हे मारी अर्र मामी
क्या बात हे मारी अर्र मामी ...
मारी बिस्कीट बशीत ठेवून वर चहा ओतून खायच्या स्थितीचे एवढे अचूक, भावस्पर्शी वर्णन
तंग पलटी, घोडे पसार
मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच चहात
मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच चहात विरघळणरी..... ते म्हणजे "नजर हटी दुर्घटना घटी" असा प्रकार

मग मोनॅकोवर वेगवेगळे टॉपिंग्स ठेवून खायची....... खायचे बिस्किटच पण अश्या आविर्भावात की इतरांना वाटलं पाहिजे हा शेवपुरी खातोय.....
>>>>मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच
>>>>मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच चहात विरघळणरी..... ते म्हणजे "नजर हटी दुर्घटना घटी" असा प्रकार<<<<
बिस्किटांचा एक किस्सा आठवला.
बिस्किटांचा एक किस्सा आठवला. कॉलेजात असताना रात्र फार झाली होती. हॉस्टेल मधे रात्री एक वाजता चहा मिळणं कठीण कठीण समय. मग घेतलं पाणी फोडला बिस्किट पुडा अन पाण्यात बुडवत बुडवत खाल्ली. रच्याकने पोटही भरलं अन गोड पाण्याचा बिस्किटी मिश्रित चहा पावडर अन दुधाविना चहा प्यायला मिळाला.
दिल भी खुश, पेट भी खुश .. अन बिस्कीट एकदम खुशखुशीत.
मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच चहात
मोनॅको आणि क्रॅकजॅक लगेच चहात विरघळणरी..... ते म्हणजे "नजर हटी दुर्घटना घटी" असा प्रकार>>>
नजर हटी दुर्घटना घटी >>>> हे
नजर हटी दुर्घटना घटी >>>> हे लै ब्येशच हं भुंग्या!!!!!

नजर हटी दुर्घटना घटी >>>>> लई
नजर हटी दुर्घटना घटी >>>>>:D
लई भारी धागा.
आता बहुतेक मायबोलीकर एक
आता बहुतेक मायबोलीकर एक बिस्किट गटग करतील
'नजर हटी दुर्घटना घटी >>>>>
'नजर हटी दुर्घटना घटी >>>>>

बिस्किट गटग- व्वा मस्त आयडिया आहे
Pages