बिस्किटे कशी कशी खावीत...

Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17

लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,
मस्त आणि गोड विषय !
Happy
नाष्टा बनवायचा (अजुन शिकत आहे !) कंटाळा यायचा, मग चहा आणि पारले जी, कधी कधी गुड डे !!
Happy

आमच्या लहानपणी सांगलीत "लोखंडी बिस्किटं " मिळायची. अहाहा काय ती टेस्ट! साईजही चांगला भरदार! बहुतेक लोखंडे यांची बेकरी होती (सांगलीकर्स चू भू दे घे) . तिथे सामान (यात मैदा, डालडा, साखर असं काही असावं...कारण तेव्हा फक्त खाण्याशी मतलब होता त्यामुळे आई तिकडे काय देते याकडे कधी लक्ष गेलं नाही.) नेऊन दिलं की ते ताजी ताजी सुवासिक बिस्किटं बनवून द्यायचे. ते खूपच स्वस्तात पडायचे. मग काय हाणा!

काय राव! किती वर्णनं करता ...जीभ चाळवली ना......खरं म्हणजे मला दुपारी चहा प्यायल्यावर रात्री झोप येते नाही. पण आता ..........नाही शक्य नाही...........आता जाते आणि चहात बुडवून बिस्किट खाते आणि मस्त चहा पिते. थंडीही खूप आहे, झोपेचं काय ...बघू रात्री!

एक भयंकर अ‍ॅडिक्टिव प्रकार - स्मोअर्स
म्हणजे प्लेन पातळ क्रॅकर्स घ्यायचे, त्यातल्या एकावर आवडीचे स्मूथ डार्क चॉकोलेट ची वडी ठेवून मावे मधे गरम करायचे अर्धा एक मिनिट, एकीकडे मार्शमेलो गॅस वर धरून जरा जळवायचा अन मऊ झाला की या मावे वरच्या विरघळून मऊ झालेल्या चोकोलेट वडीवर ठेवाय्चा अन वरून दुसरा क्रॅकर लावून गट्ट करायचा !! यम्म्म्म्म्मी लागते !!
smore.jpg

अरे देवा! आता हा धागा वाचून मला आज सगळं डायट बाजूला ठेऊन बिस्किटे हादडावीशी वाटतायत.

ग्लुकोज बिस्किट नुसतेच. खारी बिस्किटे दुधात बुडवून. क्रिम बिस्किटे आधी क्रिम चाटून खायचे. मोनॅको, रिट्झ, टाऊन हाऊस वगैरे वर चटपटीत टॉपिंग घालून, साल्टिन किंवा ऑइस्टर क्रॅकर्स सूप बरोबर, चॉकलेट चिप कुकीज वर आइसक्रिम घालून. येता जाता तोंडात टाकायला गोल्डफिश, चिझइट, टेडी ग्रॅहम्स ....
जाऊ दे.. इथेच थांबते.

हल्ली बाजारात 'गोरस पाक' या नावाखाली एक फाजील प्रकार खपवताहेत. काय तर म्हणे गाईचं दुध, गाईचं तुप वापरून केलेल्या नानकटाया ..... पण त्यांना काही बेकरीत मिळाणार्‍या (विशेषतः मनोहरकडे मिळणार्‍या) नानकटाईची मजा नाही.

चहा, दुधात बिस्किटे बुडवून कशी काय खाववऊ शकतात. तो गिळगिळीत लगदा झालेला चहा? Uhoh मी बहूतेक एकटीच दिसतेय बिस्कीटे, नानकटाई अज्जिबात न आवडणारी

वा वा.. मै मस्त दिसतोय प्रकार..
ओरियो, बॉरबॉन किंवा तत्सम क्रीमची बिस्कीटे चहात किंवा नेसकॅफेत बुडवून भारी लागतात एकदम !!!!
तसा कपकेप किंवा डोनटपण (क्रिस्पीक्रिमचा.. डंडोचा नाही) नेसकॅफेत बुडवून मस्त लागतो..

मामी, सही धागा. Happy

लहानपणी मारी, पार्ले-जी पाण्यात बुडवुनच खावेत असा अलिखीत नियम. Proud बिस्किटं खाऊन झाली की ते अमृततुल्य पाणीही पिऊन टाकायचं. अहाहा..

मस्त पेलाभर चहा घ्यायचा, कपातुन अज्जिबातच घेऊ नये. त्यात ४-५ मारीची बिस्किटं टाकायची आणि चमच्याने खायची.

खारी मधुनच उघडायची अलगद आणि त्यात जॅम लावुन खायची. असंच बिस्किटांचंही छान लागतं.

हो पण जर केक(अंडं घातलेला) चहात बुडवून खाल्लात तर मात्र पूर्ण चहाला एक भयानक असा स्टिंकिंग असा वास येतो. निदान मी तरी तो चहा पिऊ शकत नाही.

हो पण जर केक(अंडं घातलेला) चहात बुडवून खाल्लात तर मात्र पूर्ण चहाला एक भयानक असा स्टिंकिंग असा वास येतो>>मानु, म्हणून त्या केक मध्ये व्हॅनिला इसेन्स पाहिजे. व्हॅनिला सर्व वासांना न्युट्रलाइज करून एक सुखद फीलिन्ग देते. उत्तम बीबी मामी. तुम्ही लोके रस्क खाता का? चहात रस्क पण मस्त लागते.

मानुषी,
गावकडे अजुनही अनेक बेकरीत हे पदार्थ नेऊन दिले की अस्सल बिस्किटे बनवुन देतात,ते ही अगदी स्वस्तात कारण फक्त बनवण्याचा खर्च तेवढाच बाकी सगळं घरातलं !

Happy चहा किंवा दूध न घेता कोरडी बिस्कीटे खावीत त्यामुळे तोंडात एक लगदा तयार होतो व तो टाळ्याला चिकटतो. मग तो जिभेने वेगळा करायचा प्रयत्न करावा पण वेगळा होत नाही मग सरळ बोट घालून बिस्कीट मोकळे करावे. बोटाला चिकटलेले बिस्कीट बाहेर न काढता तसे च आत घ्यावे. टाळूपर्यंत बोट गेल्याने उलटी येण्याची शक्यता असते ती करायची की परतवायची हे बिस्कीटपुड्याच्या किमतीवर ठरवावे. Happy

बशित थोडा चहा ओतायचा, मग ३ ग्लुकोज बिस्किटं पाण्यात होडी सोडतात तशी १-१ करून सोडायची.
ती जर बुडली नाहीत तर चमच्या-चमच्याने त्यांना अभिषेक करयचा, जेणेकरून जास्तं चहा संपू नये.
आणि शेवटी ती थोडीशी फुगतात, मग चमच्याने खायची. ही गम्मत बघायला लहानपणी मजा यायची.

नीलूशी अनूमोदन, माझ्या आईला हे बघवत नसायचं.

bourborn biscuits- ही बिस्कीटं खाण्याची आवडती वेळ रात्री पावणे अकरा वाजता office वरून येताना, ती पण चव घेत घेत ४ तुकडे करून खायची.

<<पार्लेकर्स या बाबतीत लई नशिबवान. दिवसातून दोनदा त्यांच्या गावी ग्लुकोज बिस्किटांचा घमघमाट सुटतो.>>
पण तो आम्हाला जाणवतच नाही.
माझ्या माहेरची बिल्डीन्ग पार्ले बिस्कीट फैक्टरीला खेटुन.त्यान्च आणि आमच्या बिल्डीन्गच कम्पौन्ड एकच.
पण आम्हाला कधीच बिस्किटांचा वास जाणवलाच नाही.
पाहुणे आले की तेच म्हणायचे किती मस्त गोड वास येतो ना.
नाही म्हटल तरी लहान पणी त्यान्च्या कम्पौन्ड मधे आमचा चेन्डु जायचा. आणि तो आणायला गेलो की एक बिस्किट चा पुडा मिळायचा

इतक्या मस्त धाग्यासाठी तुमच्या तोंडात तुमची आवड्ती बिस्किट पडोत मामी.. Proud
नजर हटी दुर्घटना घटी >>> भुंग्या.. Lol
पूर्वी `टॉप' ची बिस्किटं मिळायची (लोण्यातली). आता बन्द झाली का ती ? >>> हल्ली पार्लेची टॉप नावाची बिस्कीटं मिळ्तात प्रचंड प्रमाणात बटर अस्लेली.. पण मस्तय चव त्यांची.. तशीच असायची का ती पूर्वीची लोण्यातली `टॉप' बिस्किटं?? वर्ती लिहिलेल्यापैकी जवळजवळ सगळ्याच पध्दतीने खाल्ली आहेत बिस्कीटं.. वॉव.. तोंपासु.. Happy

२ गूड्डे + २ पार्ले जी बिस्किटं घ्यावीत, कपात घालावित, त्यावर चिल्ड दुधावरची जाड साय एक (दोन चमचा हवी तितकी) घालावी, एक चमचा जॅम आणि एक चमचा गुलकंद घालावे, सर्वात शेवटी अर्धा चमचा साखर घालून हे मिश्रण त्या चमच्यासकट फ्रिजात ठेवावे. हे सर्व जेवणा आधी मिक्सून ठेवावे, जेवण झाल्यावर, हा कप फ्रिजातून काढावा.. आणि या अफलातून डेझर्टचा आस्वाद घ्यावा...
गुड्डे व पार्ले सोडून कोणतीही बिस्किटे वापरून पदार्थाची चव बदलल्यास्(बिघडल्यास) मला जबाबदार धरू नये... Proud

हबा (तीच ती हसून गडाबडा लोळणारी बाहुली.)
हं..............अनिल.........सांगलीतही असतील अश्या बिस्किटे करून देणार्‍या बेकर्‍या पण प्रेझेंट स्टेटस माहिती नाही रे!
बाकी मामी तुम्हाला तरी वाटलं होतं का हा धागा इतका एंटरटेनिंग होईल म्हणून! भारीच आहात!

हं दक्षिणा ....................पण हे डेझर्ट सुटीच्या दिवशी खावे ही टिप का नाही दिलीस?
या तुझ्या डेझर्टमधले इन्ग्रेडियण्टस पहाता ..या डोसनंतर कुणी शुद्धीवर रहातील का?

Pages