Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीला कि जवानी हे गाणं लागलं
शीला कि जवानी हे गाणं लागलं कि माझी मुलगी कानावर हात ठेवते. बदल ते असं ओरडते..
तिला शी ला हे नाव आहे हेच मान्य नाही..
माय नेम इज शीला, शीला की
माय नेम इज शीला, शीला की जवानी
मला या नंतरची ओळ 'हॅपी बर्थ डे टु यु, मै तेरे हाथ ना आयी' अशी ऐकू यायची
नुकतेच कळले की ती तशी नाहीये. काय आहे नक्की?
अनिल सोनवणे,
अनिल सोनवणे,
शीला बारोबरचं 'मुन्नि बदनाम'
शीला बारोबरचं 'मुन्नि बदनाम' गाणं पण तेवढंच अवघड आहे. Suprisingly, त्या गाण्याबाद्दल अजून कोणीच काही बोललं........ आपलं लिहिलं नाही. मला ती एक ओळ ना भलतीच confusing वाटते आणि ती मला ऐकु पण अशी येते - 'शिल्पा सदीगर की बोसी अदा, नखरोंमें मेरि है फिल्मि अदा' असं कही तरी. आता सांगा ना. अर्थ आणि बरोबर शब्द काय आहेत? सांगा सांगा ना.
मुन्नी बदनाम मधील ओळ अशी आहे
मुन्नी बदनाम मधील ओळ अशी आहे - "शिल्पा सा फीगर, बेबो सी अदा/ है मेरे झटके में फिल्मी मझा"
(यातील शिल्पा व बेबो कोण हे सूज्ञांस सांगणे नलगे!)
माझा नवरा माय नेम इज खान
माझा नवरा माय नेम इज खान मधल्याशाहरुखचे डोळे पाहून तेरे नैना तेरे नैना हे गाणं मेरे नैना टेढे हैना असं असायला हवं होतं म्हणतो ...
मामी, गाण्याचे पूर्ण लिरिक्स
मामी, गाण्याचे पूर्ण लिरिक्स इथे वाचा: http://www.lyricsmasti.com/song/7456/get_lyrics_of_Sheila-Ki-Jawani.html
गाण्यात ते "just" च्या ऐवजी "too" आहे असं माझं मत आहे
मुन्नी गाण्याच्या शेवटी
मुन्नी गाण्याच्या शेवटी सलमानच्या तोंडी एक वाक्य आहे
सिने माहौल हुई डार्लिंग तेरे लिये...
मी लईच विचारात पडलेले ही सिने माहौल काय भानगड आहे?
मग एक दिवस स्वत:हून ट्यूब पेटली
सिनेमा हॉल हुई....
दक्षिणा, त्यात मै झंडु बाम
दक्षिणा, त्यात मै झंडु बाम हुई असं पण आहे ना?
दक्षे
दक्षे
शीला बारोबरचं 'मुन्नि बदनाम'
शीला बारोबरचं 'मुन्नि बदनाम' गाणं पण तेवढंच अवघड आहे. Suprisingly, त्या गाण्याबाद्दल अजून कोणीच काही बोललं........ >>>
मनिमाऊ, तुझा ह्या बीबीचा अभ्यास कच्चा आहे गं. झंडु शब्दावरून चर्चा झालीये आधीच!
सिने माहौल हुई डार्लिंग तेरे
सिने माहौल हुई डार्लिंग तेरे लिये...
मी लईच विचारात पडलेले ही सिने माहौल काय भानगड आहे? >>> दक्षे .. अगदी अगदी. मीही तसेच ऐकायचो.
दक्षिणा, त्यात मै झंडु बाम
दक्षिणा, त्यात मै झंडु बाम हुई असं पण आहे ना? >> स्वप्ना इतकंच नै बरंच काही आहे,
असं पण आहे बरं...
अमिया से आम हुई
बे-हिंदुस्थान हुई... बे हिंदुस्थान म्हणजे काय?
ले झंडु बाम हुई...
ले सरेआम हुई...
आ ले बदनाम हुई...
सिन में होल हुई....
ले सरेआम हुई... >> या शब्दाचा
ले सरेआम हुई...
>> या शब्दाचा उच्चार मी "सडेआम" (म्हणजे "सडलेले आंबे"..!) असा करत होतो.
संशयकल्लोळ नको -
संशयकल्लोळ नको - http://www.mastikorner.com/2010/09/03/munni-badnaam-hui-song-lyrics-from-dabangg/
चिका चिका चिका लेट्स पचिका
चिका चिका चिका
लेट्स पचिका गर्ल
एक तो बॉडी ये तो
कोवन मेटका
लेट्स पचिका गर्ल
निंबुडा, केवळ अशक्य...
अजून हसतेय....
मलाही आजपर्यंत काहीही ऐकु येतं ते गाणं...... Bring it on च्या ऐवजी मला नेहेमी 'pikidon, pikidon' असे काहीतरी ऐकु यायचं आणि 'एक तो बॉडी.....' ते ' everybody/every boy would be going better' असे काहीतरी .... हा हा..... नक्की काय आहे माहित नाही.
अजब प्रेम की .... मधले 'तेरा होने लगा हूं' मधल्या सुरूवातीच्या ओळी ' shining in the setting sun' असे ऐकु यायचे. वाटायचे सेटींग सन कसला? मग कळले की ते 'shade in the sun' असे आहे.
त्या शीलाच्या गाण्याचे
त्या शीलाच्या गाण्याचे लिरिक्स मी आत्ता वाचले. त्यातही चुका आहेत:
१. Silly silly silly silly boys
O o o you're so silly
Mujhe bolo bolo karte hain
माझ्या मते ते "मुझे फॉलो फॉलो करते है" असं आहे
२.Haye re aise tarse humko
Ho gaye sober se re
Sookhey dil pe megapan ke teri nazariya barse re
हे "हो गये सौ अरसे रे" असं असावं. तसंच "सूखे दिलपे मेघा बनके"
३. Paisa gaadi mehnga ghar
?ani na mainu ki gimme your that
Jaibein khaali bhadti chal
No no I don't lie like that
पैसा गाडी महंगा घर
आय नीड अ मॅन हू कॅन गिव्ह मी ऑल दॅट
जेबे खाली फटीचर
नो,नो, आय डोन्ट लाईक देम लाईक दॅट
"कोई गाता मै सो जाता" हे गाणं
"कोई गाता मै सो जाता" हे गाणं आमच्या बंधुराजांनी असं ऐकलं "कोई खाता, मै सो जाता"
'संदेसे आते है' हे गाणं मला
'संदेसे आते है' हे गाणं मला चुकीचं ऐकू येत नाही, पण ऐकू आलं /आठवलं की मनात मात्र असे शब्द उमटतात :

समोसे आते हैं कचोरी आती है
ये पूछे जाती है
हमे कब खाओगे हमें कब खाओगे....
भरत मयेकर ...... शाळेत
भरत मयेकर ......
शाळेत असताना जेवायच्या सुटीत आम्ही हा खालील श्लोक म्हणायचो:
बासुंदी पुरी, लागते बरी
खीर त्यापरी नाही दूसरी
आवड बहु मला लाडूची असे
भूक लागली वाढा हो कसे
त्याचे मी आणि बहिणीने केलेले सोईस्कर कस्टमायझेशन :
शेव, बटाटा-पुरी लागते बरी
भेळ त्यापरी नाही दूसरी
आवड बहु मला पाणीपुरीची असे (हे चालीत म्हणताना 'पाण्पुरीची' असं बोलावं लागे)
भूक लागता पावभाजी दिसे
http://loksatta.com/index.php
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...
वेबजगत : ओठांवर असू द्या अचूक ओळी!
रेल्वेच्या डब्यात कोणी भिकारी ‘केशवा.. माडवा तुझ्या गावात रे गाढवा’ असं रेकत मूळ गाण्याचा खून पाडत असतो. अनेकजण बाथरूममध्ये सहज गुणगुणतात.. पण फक्त गीताचा मुखडाच त्यांना ठाऊक असतो. सहलीत, भेंडय़ा खेळताना एखाद्या स्पर्ध काला गीताचे संपूर्ण कडवे पाठ नसते, अशावेळी हिंदी लोकप्रिय गीतांचे अचूक बोल आपल्याला कोण सांगू शकेल असा प्रश्न पडतो. www.giitaayan.com या वेबसाईटच्या सर्चबॉक्समध्ये तुम्हाला हव्या असलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द टाइप करून सर्च घ्या. त्या शब्दाच्या अनेक गीतांची यादी समोर येईल. त्या प्रत्येक शीर्षकावर क्लीक करताच ते संपूर्ण गीत पडद्यावर वाचता येईल व जर तुम्ही ‘नागरी’ या शब्दावर क्लिक केले तर ते चक्क देवनागरी लिपीतही दिसेल. त्यासोबतच ते कोणत्या चित्रपटातील आहे? संगीतकार, गीतकार, गायक कोण? ही माहितीही समजेल. अशीच सुविधा (इंग्रजी अक्षरात फक्त) www.hindlyrics.org व www.glslyrics.com येथेही आहे. तसेच www.bollwoodlyrics.com वर तर प्रत्येक हिंदी ओळीसोबत चक्क इंग्रजी भाषांतरही वाचता येते. मात्र ती हिंदी गीतांची रुपांतरं वाचताना हसू येते तर मग.. आता तुमच्या ओठांवर अचूक ओळीच गुणगुणू द्या!
विवेक मेहेत्रे
माझा भाऊ गदर्-एक प्रेमकथाचं
माझा भाऊ गदर्-एक प्रेमकथाचं गाणं असं म्हणायचा:
"उड जा काले कावा तेरे मुंह मे श्रीखंड जावा"
भरत, मामी ""उड जा काले कावा
भरत, मामी
""उड जा काले कावा तेरे मुंहविच खंड पावा" म्हणजे बहुतेक "तुझ्या तोंडात साखर पडो" चा पंजाबी अवतार असावा. पण मला ही ओळ ऐकली की नेहमी तोंडात पावाचा तुकडा घेऊन उडणारा कावळा दिसतो.
ही ओळ ऐकली की नेहमी तोंडात
ही ओळ ऐकली की नेहमी तोंडात पावाचा तुकडा घेऊन उडणारा कावळा दिसतो. >> आणि मला वेखंड घेऊन उडणारा
अर्रे, काय योगायोग आहे! मी पण
अर्रे,
काय योगायोग आहे! मी पण गदरच्या याच गाण्याविषयीचे माझे अज्ञान पाजळण्यासाठी इथे आले तर हे गाणे ऑलरेडीच इकडे हजर.
मला ते गाणं नेहेमी असे ऐकू येते:
"उड जा काले कावा तेरे मुंहविच अंड-पावा"
त्यामुळे मलाही या ओळी आठवल्या किंवा ते गाणे पाहिले की चोचीत अंड-पाव घेऊन उडत जाणारा कावळाच आठवतो.
ऋणानुबंधाच्या हे पूर्ण गाणं
ऋणानुबंधाच्या
हे पूर्ण गाणं कुणाकडे आहे का ?
मी खूप वर्षांपूर्वी ऐकलंय ते असं..
ऋणानुबंधाच्या, सुटून पडल्या गाठी
भेटीत उष्णता मोठी..
बेफाम, या गाण्यावर या बीबी वर
बेफाम,
या गाण्यावर या बीबी वर झालीये आधीच चर्चा.
जरा मागची पाने चाळा.
अरारारारा ...... काय वाटेल
अरारारारा ...... काय वाटेल त्या कावळ्याला, काय काय कोंबताय तुम्ही त्या बिचार्याच्या चोचीत!
उड जा काले कावा तेरे मुंहविच खंड पावा >>> मला हे गाणं असं आहे हे आताच कळलं, पण त्यामुळे कावळ्याच्या तोंडात एक अखंड बासरी दिसायला लागलीय ..... आता काय करू बरं????
मला तर हे उड जा काले कावा
मला तर हे उड जा काले कावा तेरे मुंहमे चिकन .... अस ऐकू यायचे.
मामी..
मामी..

Pages