Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
>>चला! ३४० धावा करायच्या आहेत
>>चला! ३४० धावा करायच्या आहेत जिंकायला! मी म्हणतो भारत हरणार! माझ्या बाजूने कोण कोण?
मी नाही. मी म्हणतो जिंकणार. आणि जिंकलो तर चिमणला पुण्यातला कुठल्याही हॉटेलात पार्टी
मी म्हणतो भारत हरणार! फार फार
मी म्हणतो भारत हरणार!
फार फार तर वाचचणार!
जिंकणे खुप खुप कठीण आहे.
केदार, माझ्या मते पहिल्या तीन
केदार, माझ्या मते पहिल्या तीन तासात भारत ७ बाद ८३ नि नंतर दोन तास भज्जीच्या जोडीने शर्मा, झहीर खान, व श्रीसंथ, पाउस येईस्तवर निकराने खेळून ९ बाद शंभरावर धावा नेतील नि सामना अनिर्णित राहील. पुनः एकदा आवडत्या खेळाडूंचे कौतुक, नावडत्यांवर टीका, पिच कसे खराब होते, पंचांनी कुणाला तरी कसे खोटे बाद दिले याची चर्चा. भारताचा १ ला नंबर!
कुणिहि कितीहि भिकार खेळले, चुका केल्या, तरी त्यांना पैसे मिळतातच. मग कशाला उगाच कष्ट करायचे?
सेहवाग इज द की खरंय. त्याला
सेहवाग इज द की
खरंय. त्याला टेन्शन माहीत नाही. जयसूर्यासारखा त्याचा धडाका सुरू झाला तर सलामीलाच वेगाने धावा कुटल्या जातील..
>>आपणास जिंकायचे असेल तर
>>आपणास जिंकायचे असेल तर सेहवाग इज की, टिकवून ठेवायचे असेल तर लक्ष्मण, द्रविड, सच्या
केदार... अगदी अगदी हेच लिहायला मी कीबोर्ड सरसावला होता
सकाळच्या सत्रात फारशी पडझड नाही झाली आणि सेहवाग लागला तर मॅच आपली आहे.... नाहीतर आहेच मॅच वाचवायला लक्ष्मण झिंदाबाद!
<< सेहवाग लागला तर मॅच आपली
<< सेहवाग लागला तर मॅच आपली आहे.... >>याचा अर्थ "सेहवाग पहिलीं दहा षटकं टिकला तर मॅच आपली आहे>>असाही होतो, निदान आज तरी !
आज हरणार रे अगदी जबरदस्त
आज हरणार रे अगदी जबरदस्त झुंज वगैरे दिली तर ड्रॉ. जिंकण्याची शक्यता कालच मावळली, रन्सची खिरापत वाटली तेंव्हाच.
सेहवागला आज सकाळी सकाळी
सेहवागला आज सकाळी सकाळी कर्स्टन सरांनी लेक्चर द्यावं जोरदार.
शिवाय स्मिथ कालच म्हणाला. आता त्या पिच मधे फार काही राहिलं नाहीये. त्यामुळे प्रयत्नांती मॅच जिंकणे शक्य आहे.
ऑसीजच्या २ विकेट्स पडल्यात.
ऑसीजच्या २ विकेट्स पडल्यात. क्लार्क आणि खवाजा खेळतायत. आज इंग्लंडने १-२ विकेट्स जर मिळवल्या तर उद्या लवकर गुंडाळता येईल ऑसीजना, नाहीतर हसी-क्लार्क-हॅडीन बसले की इंग्लंडचा विजय लांबेल.
आज गौती नाहीये ओपनिंगला, कदाचित सेहवाह आणि द्रविडअण्णा येतील ओपनिंगला. पण गौती फिट असणे फार महत्वाचे आहे, नाहीतर एक बॅट्समन कमी घेवून खेळल्यास ड्रॉपण करु शकणार नाही.
आज द्रविड आणि साहेब खेळणार.
आज द्रविड आणि साहेब खेळणार. धोनी पण चमक दाखवेल. .. भारत जिंकणार !
धोनीच्या बायकोला निर्जळी उपास
धोनीच्या बायकोला निर्जळी उपास करायला सांगा.
आज भारतीय टीम ची अवस्था मला
आज भारतीय टीम ची अवस्था मला सेन्सेक्स सारखी वाटतीय. त्याचे टेक्निकल अॅनॅलिसिस
सुरुवातीच्या एका दोन तासात जर विकेट पडली नाही तर ३४० क्रॉस करायला हरकत नाही. पहिल्या सत्रात कन्सॉलिडेशन आवश्यक. सेहवाग नावाच्या बिग बुल च्या शेअरने ने जर मार्केट मधे बोली लावल्या तर ३४० फार लवकर क्रॉस होइल. शिवाय सचिन व धोनी हे बुलप्रिय शेअर्स आहेतच.
पण जर का मात्र पहिल्या सत्रात तेजी टिकून राहिली नाही तर स्टेन गन च्या माराने मार्केट मध्ये ब्लड बाथ होउ शकतो. अशा वेळेस सावधानी म्हणून द्रविड व लक्ष्मण या शेअरना चांगली मागणी. अशा वेळेस स्टॉप लॉस ठेवून बोली लावणे केंव्हाही चांगले. शिर सलामत तो पगडी पचास.
आर्बिट्रेटर्स चे निर्णय मार्केट वर परिणाम करू शकतात.
पुजारा नावाचा नविन लिस्ट झालेला अजून त्याच्या कुवती प्रमाणे कामगिरी करत नाहीये. त्याच्या वरही लक्ष ठेवणे आवश्यक.
एकंदर परिस्थिती व्होलाटाईल राहील असे वाटते. आज काहिही झाले तरी फंडामेंटल्स चांगले असल्याने सेंन्सेक्स मध्ये इन्वेस्ट करून राहणे लाँग टर्म साठी फायद्याचे.
बघा पटतय का.
डिसक्लोजर : आम्ही फक्त सेंन्सेक्स मध्ये गुंतवणूक करतो. आणि आम्ही ३४१ या आकड्यावर कॉल्/फ्युचर लावला आहे.
वि.सू. : खरे अॅनॅलिस्ट सध्या झोपलेले असल्याने आम्ही त्यान्ची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
विक्रमा... अशक्य अनॅलिसिस....
विक्रमा... अशक्य अनॅलिसिस....
तिकडे इंग्लंडनी ऑसीजला चारीमुंड्या चीत केल्यासारखेच आहे... फक्त शेपटी बाकी आहे.. पण शेपटी जोरात वळवळली तरच पराभव लांबणीवर पडेल... विशेष गोष्ट म्हणून अर्धा तास वाढीव मिळाला आहे...
आज वीरु आणि साहेब ओपनिंगला आले पाहिजेत आणि वनडे इश्टाईल धुतला पाहिजे जेणेकरुन स्टेन आणि मॉर्कलला दिशाच सापडू नये... वॉल सध्या फारच ढेपाळली आहे.. ती जितकी उशिरा येईल तितके चांगले.. अर्थात कॅलिस कडून प्रेरणा घेऊन गंभीर खेळायला उतरलाच तर मग नेहमीचाच क्रम चालू शकेल... आज वीरुच्या आईला देव पाण्यात घालून ठेवायला सांगितले पाहिजेत..
खरे अॅनॅलिस्ट सध्या झोपलेले
खरे अॅनॅलिस्ट सध्या झोपलेले असल्याने आम्ही त्यान्ची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. >>> :d
या सिरीज मधे आफ्रिकेला प्रत्येकवेळी भारताच्या फक्त ९ विकेट काढाव्या लागल्या... त्यामुळे सेहवाग कडून फारशी आशा बाळगू नका... ड्रॉ मे जीत है आणि सध्या तेव्हढच शक्य आहे.
ऑसिजची दयनीय अवस्था... डावाचा पराभव टाळण्यासाठी १५१ धावा आणि ३ गडी शिल्लक.
सामना वाचविणे अवघड आहे.
सामना वाचविणे अवघड आहे. सेहवाग, सचिन व लक्ष्मण असे तिघेही खेळले तरच सामना वाचविता किंवा जिंकता सुध्दा येईल.
या निमित्ताने एका जुन्या सामन्याची आठवण झाली. बरोबर १८ वर्षांपूर्वी जानेवारी १९९३ च्या पहिल्या आठवड्यात आफ्रिकेमध्ये भारताविरूध्द मालिकेतला शेवटचा म्हणजे ४ था सामना होता. आफ्रिका १-० ने पुढे होते. या सामन्यातल्या ४ थ्या दिवशी आफ्रिकेचा दुसरा डाव संपून भारताला विजयासाठी ३१८ धावा करायच्या होत्या. त्यासाठी ४ थ्या दिवशीचा अर्धा तास व संपूर्ण ५ वा दिवस शिल्लक होता. आदल्या दिवशी सिधू व रवी शास्त्रीने नाबाद १५ धावा केल्या. ५व्या दिवशीच्या ९० षटकांत उरलेल्या ३०३ धावा करायच्या होत्या. हे अवघड असले तरी अशक्य नव्हते. ५ व्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत २ बाद १४० होता. म्हणजे संपूर्ण दिवस खेळून ९० षटकात भारताने फक्त १२५ धावा केल्या. जिंकण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. यामध्ये सिंहाचा वाटा होता तो रवी शास्त्री (२०० मिनिटे खेळून २३ धावा), मांजरेकर, सिधू आणि अझरूद्दीनचा. सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यापेक्षा भारताने शेपूट घालून वेळ काढला. वाईटातूनही काहीतरी चांगले निघते. हा सामना शास्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर त्याची भारतीय संघातून कायमस्वरूपी हकालपट्टी झाली.
आज याची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा. जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. हरला तरी लढून हरा. शेपूट घालून वेळ काढू नका.
धोनीला लीडिंग फ्रॉम द फ्रंट
धोनीला लीडिंग फ्रॉम द फ्रंट करु दे की...
जांम हसलो अॅनॅलिसिस
जांम हसलो अॅनॅलिसिस वाचून...
जबरी रे
<<आज भारतीय टीम ची अवस्था मला
<<आज भारतीय टीम ची अवस्था मला सेन्सेक्स सारखी वाटतीय>> जोरदार पावसात खेळपट्टी
डी-मॅट करून ठेवली तरच मार्केट क्लोज होऊन मालिकेची सध्याची इक्वीटी मजबूत राहील ! नपेक्षा, मार्केट उघडताच जर सेहवागचा शेअर पडला, तर द्रविड, सचिन व लक्ष्मण ह्या ब्ल्यू चिप कंपन्याच सेन्सेक्सची घसरगुंडी कदाचित थांबवू शकतील !! मात्र स्टेन अँड मॉर्केल कं.ने जर सकाळीच मोठ्या प्रमाणात बल्क सेलींग केलं तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊं शकते. !!!
आणि भारताची बॅटींग सुरु झाली
आणि भारताची बॅटींग सुरु झाली आहे.. सध्या तरी सेहवागला वरुन सज्जड दम दिल्यासारखे भासते आहे.. बाहेरच्या बॉलला हात लावलास तर तुलाच बाहेर बसवू वगैरे..
हुश्श !!! पहिल्या १० ओव्हर
हुश्श !!! पहिल्या १० ओव्हर विदाऊट विकेट . !!! त्सोत्सोबे आला !!!
सेहवाग गेला. ९ राहीले आता.
सेहवाग गेला. ९ राहीले आता.
केदार असं म्हणे पर्यंत ११व्या
केदार असं म्हणे पर्यंत ११व्या ओव्हर मध्ये गेलीच बघ पहिली विकेट..
त्रिविक्रम - . मी
त्रिविक्रम - :D. मी नेहमीप्रमाणे मॅचसाठी २:३० ला उठलो.
डरने का नै. आज खर्या वॉलची गरज आहे. त्यांचे शेवटचे लोकं ८०+ स्ट्राईकने रनरेट ठेवत होते, तेंव्हाच आपल्या बोलर्सचा व त्यांच्या लिड बोलर्समधील फरक जाणवतो.
aaj wall cha 150 vaa saamnaa
aaj wall cha 150 vaa saamnaa aahe...
SA madhla bahudha shevatcha...
1lya SA series cha shevatcha saamnyaat tyaani 148 kele hote...
aaj tashaach kheleechi garaj...
अंक्या ते १४८ किती तासांत
अंक्या ते १४८ किती तासांत केले होते तेही महत्त्वाचे आहे... तेव्हढा वेळ नसावा बहुतेक आज..
आत्ताची परीस्थिती बघता स्ट्राईक रोटेट पण करत नाहीयेत..
मला वाटतं आपण खूप बचावात्मक
मला वाटतं आपण खूप बचावात्मक खेळत आहोत, थोडे आक्रमक झालो तर फिल्डर्स सगळे घेरून उभे राहणार नाहीत. तीन चार फोर मारावेत.
आणि ह्या रेटने जिंकने अशक्य आहे. मॅच वाचवायची असेल तरी निदान ३ + चा रेट ठेवायला हवा. नाहीतर कठीण आहे. धावा पण नाही आणि विकेट पण गेल्या अशी अवस्था.
केदार ह्यात नवीन काय ते...
केदार ह्यात नवीन काय ते... कातडी बचाव धोरण सगळीकडेच आहे तसे इकडे पण... सेहवाग गेला म्हणल्यावर धक्का लागलेलाच आहे.... द्रवीड आधीच फेल जातोय तो रिस्क घेणारच नाही... गंभीर कदाचित खेळेल.. पण अजून एक विकेट गेल्यावर सचिन ही असाच नांगर टाकून खेळेल आणि शेल मधे जाईल.. ते झाले की मॅच वाचवणेच बाकी..
हो मी ही जिंकण्याबद्दल लिहितच
हो मी ही जिंकण्याबद्दल लिहितच नाही, पण वाचवता येऊ शकते. आणि चुकून विकेट गेल्या तर पुढच्या खेळणार्यावर दबाव येऊ नये म्हणून थोडा रेट हवा. नाहीतरी तू म्हणतोस तसेच नेहमी होते हे खरेच.
गोलाची लढाई करायला हवी. प्राण वाचतील. भाऊसाहेबांनी सांगीतलं होतं.
मला १ गोष्ट कळत नाही आहे की
मला १ गोष्ट कळत नाही आहे की सगळॅजण आपण जिंकायचा प्रयत्न करावा असे का म्हणतायत ?
एक तर काल स्मिथ ने अतिशय भित्रेपणाने सगळा दिवस खेळून ३४० चे टारगेट दिलेय . त्याने जर १० ओवर राहिल्या असताना ३०० काढण्यासाठी दिल्या असत्या तर गोष्ट वेगळी (Frankly speaking , Getting 340 on this track ie almost 4 RPO on this pitch against this attack is unrealistic ; Even we would have started well they could have bowled negative lines very easily)
दुसरे म्हणजे भारत कधीही तिथे सिरिज ड्रॉ सुद्धा करू शकला नाहीये ,त्यामुळे १-१ हा आपल्यासाठी चांगलाच रिझल्ट आहे
आणी तिसरे हे अफ्रिकेचे होम ग्राऊंड आहे ,त्यामुळे त्यांच्या गोलंदाजाना अनुकूल पिचेस करूनही जर ते जिंकत नसतील तर ते त्याना नामुष्कीजनक आहे .
द्रविडचा स्टच्यू झाला आहे. तो
द्रविडचा स्टच्यू झाला आहे. तो काहीच करीत नाही आहे....
Pages