Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
हरभजन खेळत असताना स्टेनचा
हरभजन खेळत असताना स्टेनचा वेगवान चेंडू स्टंपला लागूनही बेल्स पडल्या नाहीत त्याबद्दल आकाशातल्या बापाचे आभार! नाहीतर ७०-८० धावांचं लीड डोक्यावर बसलं असतं आणि त्या खेळपट्टीवर ते भीषण ठरलं असतं.
स्टेन आज काय टाकत होता दुसरा
स्टेन आज काय टाकत होता दुसरा नवीन चेंडू मिळाल्यावर... अफाट.. त्याने हर्भजन ला टाकलेला चेंडू... पुजारा ची विकेट.. अफाट!!
जीएस क्षणभर मला वाटलं मी
जीएस
क्षणभर मला वाटलं मी इतुका म्हातारा झालो कि काय ?
असो.
सचिन १०० धावांवर बाद झाला. नाबाद फलंदाज होता इशांत शर्मा. (दोन नाबाद फलंदाज असू शकत नाहीत) . पॉल हॅरीस ने त्याला त्रिफळाचीत केले होते..
हे घ्या स्कोरकार्ड
http://thatscricket.oneindia.in/test/2010/south-africa-in-india-2009-10/...
उपाखफा, ते स्कोरकार्ड त्या ५०
उपाखफा, ते स्कोरकार्ड त्या ५० व्या शतक वाल्या मॅचचे नाही.
हे आहे
http://www.espncricinfo.com/south-africa-v-india-2010/engine/current/mat...
सचिन १०० धावांवर बाद झाला.
सचिन १०० धावांवर बाद झाला. नाबाद फलंदाज होता इशांत शर्मा. (दोन नाबाद फलंदाज असू शकत नाहीत) . पॉल हॅरीस ने त्याला त्रिफळाचीत केले होते..
----सचिन दोन वेळा ५० वे शतक मारु शकत नाही :स्मित:.
फारेण्ड चे बरोबर आहे.
भारत जिंकणार...
आता ५१ वे शतक केले तरी ५०
आता ५१ वे शतक केले तरी ५० व्या शतकातच अडकलेत का लोक? एका डावाने पराभव आणि १ गडी राखून पराभव यात स्टॅट्स मध्ये आणि रेटींग पॉइंट्स मध्ये काही फरक पडतो का?
पाठदुखी असताना कॅलिस लक्ष्मणप्रमाणे जास्त चांगला खेळतो असा काही ट्रॅक रेकॉर्ड नाही ना त्याचा?:)
कालच्या साहेबांच्या शतकाला
कालच्या साहेबांच्या शतकाला नावे ठेवणे म्हणजे " काय ते थांबत थांबत, पडत पडत एवरेस्ट चढण, आमचा बाळ्या पर्वती कशी पळत पळत चढतो ते बघा, म्हणे उच्चांक करतो" अस एखाद्या पोटॅटो काउचने म्हणण्या सारख आहे."
मला सुनिल गावस्करची पाकिस्तान विरूद्ध आखाडा खेळपट्टीवर केलेली ९६ रन्स ची इनिंग आठवली. दोन्हीत गटस, टेक्निक, संयम आणि जबरदस्त एकाग्रता याचा उत्कृष्ट मिलाफ.
असो.
आपण मॅच जिंकणार. :).
विकेट फक्त नविन बॉल वरच फास्ट बॉलर ना साथ देतेय. हरभजन ला अनूकूल होइल अस वाटतय. सा. आ. ला अॅटॅक करता येणार नाही, व लवकर दिक्लेअर करता येणार नाही.
नंतर त्यांच्या स्पिनरची येवढी कूवत दिसत नाही की आपल्याला गुंडाळावे. वीरू, द्रविड ड्यू आहेत. चौथ्या इनिंगचा बादशहा फॉर्मात आहेच.
पण काल पुन्हा एकदा द बेस्ट विरूद्धा द बेस्ट असा सामना पाह्यला मिळाला. स्टेन विरूद्ध सचिन.
ही सिरीजही अप्रतिम चालली आहे.
फारएण्ड माय मिस्टेक... ते
फारएण्ड
माय मिस्टेक...
ते स्कोरकार्ड आफ्रिका भारतात आली तेव्हाचं आहे..
५० वं नसलं तरी ५० कडे वाटचाल
५० वं नसलं तरी ५० कडे वाटचाल करणारं होतं ना ते शतक ?
ते नसतं केलं तर ५० झाली असती का?
कालच्या साहेबांच्या शतकाला
कालच्या साहेबांच्या शतकाला नावे ठेवणे म्हणजे " काय ते थांबत थांबत, पडत पडत एवरेस्ट चढण, आमचा बाळ्या पर्वती कशी पळत पळत चढतो ते बघा, म्हणे उच्चांक करतो" अस एखाद्या पोटॅटो काउचने म्हणण्या सारख आहे."
कालचा दिवस खरेच नं.१ चा बोलर विरुद्ध नं.१ चा बॅट्समन असा होता, टेस्ट क्रिकेट किती थरारक होउ शकते त्याचा उत्तम नमुना.
एका डावाने पराभव आणि १ गडी
एका डावाने पराभव आणि १ गडी राखून पराभव यात स्टॅट्स मध्ये आणि रेटींग पॉइंट्स मध्ये काही फरक पडतो का?
भरतजी
प्रश्नानेच उत्तर देतो.
शंभर धावा केल्या काय आणि ९९ धावा केल्या काय ..काय फरक पडतो ?
शतकाला जसा मान आहे तसाच डावाच्या विजयाला.
आणि डावाच्या पराभवाला मानहानीकारक समजले जात नसते तर दोन्ही संघांनी त्यासाठी आटापिटा केलाच नसता .
या खेळपट्टीवर आपल्याला ४ थ्या
या खेळपट्टीवर आपल्याला ४ थ्या डावात फलंदाजी खूप अवघड जाणार आहे. सामना जिंकणे अवघड वाटत आहे. आपल्याला दुसर्या डावाच्या राजावर, म्हणजेच लक्ष्मणवरच, भिस्त ठेवावी लागणार. सचिनने दुसर्या डावातही शतक करावे म्हणजे त्याचे जे २-३ विक्रम करायचे शिल्लक आहेत (दोन्ही डावात शतक, त्रिशतक, चौशतक इ.) त्यातला एक होऊन जाईल.
हरभजनच्या बरोबरीने धोनी सेहवाग किंवा सचिनच्या फिरकीचा का वापर करत नाही ते कळत नाही.
भज्जी ची चौथी विकेट. डेंजर
भज्जी ची चौथी विकेट. डेंजर मॅन आमला आउट. आजच मॅच संपतीय की काय?
<<या वि़केटमुळे सामन्यात
<<या वि़केटमुळे सामन्यात कांहीतरी "सेंन्सेशनल" घडणार आहे, व तेही भारताच्या बाजूने, असं माझी मनोदेवता मला वारंवार कां बजावते आहे !!>>कां तें आतां कळलं ! द.आफ्रिका ७२-४.
<<हरभजनच्या बरोबरीने धोनी सेहवाग किंवा सचिनच्या फिरकीचा का वापर करत नाही ते कळत नाही.>> मास्तुरेजी, १००% सहमत.
सेहवागचा खांदा दुखतोय म्हणे.
सेहवागचा खांदा दुखतोय म्हणे.
कालच्या साहेबांच्या शतकाला
कालच्या साहेबांच्या शतकाला नावे ठेवणे म्हणजे " काय ते थांबत थांबत, पडत पडत एवरेस्ट चढण, आमचा बाळ्या पर्वती कशी पळत पळत चढतो ते बघा, म्हणे उच्चांक करतो" अस एखाद्या पोटॅटो काउचने म्हणण्या सारख आहे.">>>>>>
अरे हा कॅलिस किती वर्षे
अरे हा कॅलिस किती वर्षे पिडणार आहे आपल्याला?
कॅलीस खरच आजच्या काळातील
कॅलीस खरच आजच्या काळातील सर्वष्रेष्ठ क्रिकेटपटू आहे. बॅटींग, बॉलींग मध्ये धूमाकूळ घातलाय नुसता.
पण ही टेस्ट आपण ड्रॉ पन करू शकतो, पण गंभ्या खेळत नाहीये ना, मग ओपनिंगची समस्या येणार आहे.
आपण मोमेंटम घालवला. २००-२२५
आपण मोमेंटम घालवला. २००-२२५ च्या लिडवर त्यांचा भेदक बॉलींग समोर सामना जिंकने अवघड नव्हते पण आता चौथ्या इनिंग मध्ये ३००+ धावा करणे जड जाईल.
सेहवाग लागला तर मात्र काहिच अशक्य नाही. तो फक्त २० ओव्हर टिकला तरी आपले १०० होतील.
३००+ अवघडच आहे... मला वाटले
३००+ अवघडच आहे... मला वाटले होते २५०-२६० पर्यंत रोखतील.. ३००+ सोपी गोष्ट नाही..
अवघड आहे आता.. गंभीरला काय
अवघड आहे आता.. गंभीरला काय झाले?
कॅलिसची दोन्ही डावात
कॅलिसची दोन्ही डावात शतके.हल्ली आणखी कुणी असं कुणी केल्याचं आठवत नाही- कदाचित पाकिस्तानी युनुस, युसुफ पैकी कुणी केले असेल.
आता द आफ्रिकेचा एक मुख्य गोलंदाज जायबंदी झाला तरच काही तरणोपाय.
भारताचा क्रमांक पहिला आहे
भारताचा क्रमांक पहिला आहे म्हणतात क्रिकेट जगात. आता उद्या हे सगळे नावाजलेले फलंदाज मिळून जर सामना जिंकला नाही, नि उगीचच पिच नि हवामान नि पंचांचे निर्णय असली करणे सांगून हरले तर फार वाईट वाटेल. अनिर्णित राहिला तरी फारसे कौतुक नाही.
खरे पहिल्या क्रमांकावर कोण हे आज व उद्या या दोन दिवसात कळेल. आजहि चेंडू वेडावाकडा उसळतो नि वळतो आहे म्हणे. बाउचर बाद झाला तो चेंडू मुद्दाम तसा टाकला होता असे वाटत नाही. तेव्हढी चांगली गोलंदाजी असती तर या आधीच का नाही तसे केले?
थोडक्यात, ज्या परिस्थितीत द. अफ्रिकेचे फलंदाज खेळले त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थितीत जर आपले फलंदाज खेळू शकले नाहीत तर उगीच कुणाला पहिला नि कुणाला दुसरा म्हणायचे?
त्यापेक्षा, भारतातली पिचेस, हवामान, इतर देशातील पिचेस नि हवामान यांचे क्रमांक लावा पहिला, दुसरा असे!!
भज्जीचे चेंडू वळत होते पण फार
भज्जीचे चेंडू वळत होते पण फार संथपणे, उडत होते पण उसळत नव्हते व अनपेक्षित असं कांहीच होत नव्हतं, तरीपण एका बाजूने त्याला अविरत कां गोलंदाजी दिली जात होती, मला हें कांही कळलं नाही. कालीसची प्रिंन्स व बाउचर बरोबरची जोडी फोडायला वेगळं असं कांहीच केलं गेलं नाही, हे मला खटकत होतं. कांही समर्थन असेल का याचं ?
पहिलीं २० षटकं आपण धावांकडे लक्ष न देतां खेळून काढली तरच या खेळपट्टीवर चौथ्या/पांचव्या दिवशी ३००च्यावर धावा करणं शक्य होईल; नपेक्षां, प्रचंड दबावाखाली खेळणं आलंच. स्टेन,मॉर्केलच्या
सुरवातीच्या मार्यापुढे "सेहवाग लागला तर" हे कठीणच दिसतंय; थोडं डेअरींग दाखवून सेहवागला थोडं खाली खेळवलं तर ?
चला! ३४० धावा करायच्या आहेत
चला! ३४० धावा करायच्या आहेत जिंकायला! मी म्हणतो भारत हरणार! माझ्या बाजूने कोण कोण?
एके काळी भारताने एका दिवसात
एके काळी भारताने एका दिवसात ३८५ का ३८६ धावा केल्या होत्या म्हणे! परत तसे करणार का?
अवघड आहे मॅज जिंकणे. पण होप
अवघड आहे मॅज जिंकणे. पण होप फॉर द बेस्ट. गंभीर, सेहवाग जोरात खेळणे व नंतर साहेब व लक्षण धावले पाहीजेत.
मोर्केल, स्टेन असताना ३४०
मोर्केल, स्टेन असताना ३४० काढून जिंकणं अवघड वाटतंय .. उद्या आपले खेळाडू कुठल्या इराद्याने उतरतात हे पण पाहायचे आहे..
जिंकणं अगदीच अशक्य नाही. पण
जिंकणं अगदीच अशक्य नाही. पण शेवटच्या दिवशी वेगाने धावा काढणं कठीण आहे. सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता सर्वात जास्त आहे.
हवामान बिघडलं, पिच बिघडलं तर सामना हातातून जाऊही शकतो..
पण चांगली गोष्ट अशी की
पण चांगली गोष्ट अशी की मॉर्केल, स्टेन सारखे तळातले फलंदाज देखील ३० + धावा काढतात तेंव्हा पिच बॅटसमनला साथ देते असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. दुपार नंतर भज्जीला अजिबात टर्न मिळत नव्हता. फास्ट बोलर्सला पण काहिही मदत होत नव्हती. त्यामुळे पिच खराब होईल असे वाटत नाही.
गंभीर खेळेल असे वाटत नाही, त्यामुळे द्रविड, सेहवाग ह्यांनी १००+ पार्टनरशिप ते पण २५ ओव्हर्स मध्ये दिली, तर सामना जिंकायला मदत होऊ शकते अन्यथा अनिर्णीत राहायला देखील मदत होऊ शकते. पहिले सेशन दिशा ठरवेल.
सेहवाग ने ऑफच्या बाहेर दोन स्टंप असलेला बॉल सोडून द्यायचा सराव आज रात्री करावा. आपणास जिंकायचे असेल तर सेहवाग इज की, टिकवून ठेवायचे असेल तर लक्ष्मण, द्रविड, सच्या.
Pages