अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरिल लोकांचे स्नेहसंमेलन

Submitted by क्ष... on 22 December, 2010 - 16:27
ठिकाण/पत्ता: 
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.

महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्‍याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.

पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण Happy

माहितीचा स्रोत: 
मायबोली
तारीख/वेळ: 
रविवार, January 16, 2011 - 14:30 to 21:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेचा हा बीबी एवढा का थंड पडलाय, कुठून शोधून काढावा लागला Happy
मला सध्यातरी यायला जमेल असं वाटतय.
पण नक्की तारीख कधी ठरणार?

मी शनिवारी रात्री पोचून रविवारी परतीचे तिकीट बघतो आहे.
लोकांना रविवारी भेटले तर चालेल का ?

अरे वा! सहीच.
मागच्या वेळी २०० च्या वर पोस्टी पडल्या होत्या. ह्या वेळी १३ दिवसात ११ पोस्टी? शोनाहो.
मेनु आणि व्हेन्यु वगैरे ठरवा लवकर.

समीर, Sad तरी बघ जमलं तर.
रार पण येणार आहे.
फारएण्ड, रमा, प्रविणपा, सशल, पेशवा, फुलपाखरू आणि कोणाचं नाव विसरलं असेल तो/ती, नाव नोंदणी करा.

१६ तारीख म्हणजे १० दिवसांवर आलं गटग; वेळ, ठिकाण, मेनु कधी ठरायच Uhoh
आणि बाकी बेकर्स कुठे गेले, अजून ईथे कसे नाही आले नावनोंदणी करायला ?

चुकीचा किनारा गारठलाय वाटतं.
बाराकरांना द्या मेन्यु ठरवायचे कॉन्ट्रॅक्ट धपाधप पोस्टी टाकतील १००-२०० Happy
गटगला शुभेच्छा.

मिनोतीकडे आहे म्हणजे कुणी काही करुन आणायला नको. उरलेलं भरुन न्यायला रिकामे डबे न्या फक्त. Happy

हे नक्कि कस लिहु कळत नाहि. पण मला यायला खुप ऑक्वर्ड वाटतय. मागच्या गटग ला प्रचेतस मुळे काहिसा बेरंग झाला :(. त्यामुळे त्याला घेउन येण बरोबर होणार नाहि. पण एवढे ५/६ तास तो माझ्याशिवाय रहाणार नाहि त्यामुळे मी एकटीने येण पण जमणार नाहि. म्हणुन मी यायच नाहि अस ठरवलय. मज्जा करा लोक्स.

नक्की काय? संम्मेलन का गटग आहे?
मी बहुतेक येइन.
रमा, अगं लहान मुलांना काहीतरी होतचं असतं. असं काही वाटुन घेवु नकोस. घेवुन ये त्याला.

बॉम्बे गारडन वगैरे तत्सम ठिकाणी जेवण करून मग मिनोतीकडे जाऊन गप्पा-दंगा करणे पण चालेल.
काय वाटतंय ते कळवा.

रमा, मला माहीत नाही काय झालं मागच्या वेळी ते. पण चल्ता है, सगळे आपलेच आहेत, ये तू नक्की.

दोन दोन ठिकाणी जाण्यापेक्षा कुठेतरी एकाच ठिकाणी भेटु, लहान मुलांना घेवुन यायला सोपं पडतं यामुळे.
पण सर्वांना जर ते मान्य असेल तर मला चालेल.

Pages