पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर
काजू सोलून घ्यावेत.
कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.
काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.
सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.
ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्या दिवशी सोलावेत.
हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.
शैलजा, कोकणात बालपण गेलं, पण
शैलजा, कोकणात बालपण गेलं, पण ही ऊसळ खायचीच राहीली.
प्रज्ञा१२३, .. ह्या वेळी जर मला तुझ्याकडून ऊसळ मिळाली नाही तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. दरवर्षी तुम्ही भरपूर खाता. त्यामुळे यावेळी घरात कुणलाही न देता सगळी ऊसळ मलाच पाठवून दे. तुझ्या घरच्यांना माझं नाव सांग. आतुरतेने वाट पहातेय. (ऊसळीची)नक्की पाठव.
वाट्णात गर्रम म् साल्यात ३-४
वाट्णात गर्रम म् साल्यात ३-४ चीर्र् फ्ळ घ्यावीत, छान वास येतो
वाट्णात गर्रम म् साल्यात ३-४
वाट्णात गर्रम म् साल्यात ३-४ चीर्र् फ्ळ घ्यावीत, छान वास येतो
तुम्हाला तिरफळे म्हणायची आहेत
तुम्हाला तिरफळे म्हणायची आहेत का?
बित्त्या, फोटो लई झकास!
बित्त्या, फोटो लई झकास!
धन्यवाद, भ्रमर!
धन्यवाद, भ्रमर!
मस्त आहे ... एकदा प्रयत्न
मस्त आहे ... एकदा प्रयत्न करायला हवा...
ओल्या काजूच्या पाककृती साठी
ओल्या काजूच्या पाककृती साठी आवाहन
आमची मावशी काजूची आमटी
आमची मावशी काजूची आमटी बनवायची.त्या पूढे मटण फीके लागायचे. गेल्या कित्येक वर्शात काजूची आमटि खाल्ली नाही. अशा जुन्या खपल्या ऊगाचच काढू नये.
हाणायलाच हवे हिला.
ओल्या काजूच्या पाककृती साठी
ओल्या काजूच्या पाककृती साठी आवाहन >> सह्हीच आहे की.
मी काजूची उसळ आयुष्यात कधीही
मी काजूची उसळ आयुष्यात कधीही खाल्लेली नाही, खायचं सोडा पण
कधी नुसती पाहिलेली सुद्धा नाही, इथे एक फोटो आहे वाटतं, पण तो दिसत नाहिये.
पाकृ तर सुरेख आहे, पण मला काजुची उसळ खायला कधी मिळणार?
पुण्यात कधी आणी कुठे मिळतात
पुण्यात कधी आणी कुठे मिळतात ओले काजु?
दक्षिणा म्हापश्याला
दक्षिणा म्हापश्याला मार्केटमध्ये कॅफे कॉर्नर म्हणुन एक हॉटेल आहे तिथे बियांची भाजी मिळते. पण सकाळीच जावे लागते.
Pages