पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर
काजू सोलून घ्यावेत.
कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.
काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.
सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.
ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्या दिवशी सोलावेत.
हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.
कशाला जीभेला त्रास देते आहेस
कशाला जीभेला त्रास देते आहेस ? तोंडाला सुटलेले पाणी साठवायला ड्रम मागवलाय
यम्मी वाटतीये.. शैलजा..
यम्मी वाटतीये.. शैलजा.. नॉर्मल काजूंना भिजवून बरी लागेल का उसळ???
चेतन वर्षू,नाही गं नेहमीचे
चेतन
वर्षू,नाही गं नेहमीचे काजू नाही वापरत याला. ते मऊ नाही होत. ओले काजू ताजे असतात अगदी
ओले काजू मुंबईत मिळतात का ?
ओले काजू मुंबईत मिळतात का ? कुठे?याबद्दल कुणास माहिती असल्यास कृपया सांगावे.
शैलजा,फार छान वाटतेय ही डिश...
ह्म्म्म्म!! वाटलंच मला आता
ह्म्म्म्म!! वाटलंच मला
आता ओले काजू कुठून आणू
बघूया कुणी गोव्याहून येत असेल तर ..
मुंबैत पार्ले इस्टला क्वचित
मुंबैत पार्ले इस्टला क्वचित अन शिवाजीमंदिरच्या दाराशी हमखास मिळायचे काजू,
वडाळ्याला लग्नाचा हॉल आहे कोकणी लोकांचा, तिथल्या प्रत्येक लग्ना/मुंजीत सीझन मधे ही 'उपकरी' अगदी मस्ट ( अन मस्त सुद्धा) असायची.
तोंपासु रेसिपी. पण फोटो का
तोंपासु रेसिपी. पण फोटो का नाही टाकला ?
अगो, ओले काजू असले तर फोटो
अगो, ओले काजू असले तर फोटो नं?
हाsssss ईली उसळ... खराच शैलू
हाsssss ईली उसळ... खराच शैलू जीभेचे हाल गो
पण ओल्या काजूची चव सुक्याक नाय .
आता कुठून हाडू ओले काजू.
>> सुकवलेले ओले काजूही मिळतात>> हे खय गावतत?
अगो नीलू बघ मगो मुंबैत
अगो नीलू बघ मगो मुंबैत वडाळ्याक, लालबागेत, मुलुंडाक.
हो आता शोधूचेच लागतीत
हो आता शोधूचेच लागतीत
हाsssssय! मला काजुची फळे
हाsssssय!
मला काजुची फळे (कळलं ना काय म्हणायचंय ते?) लाल-पिवळ्या रंगाचे.. प्रचंड आवडतात.. नुसतं मीठ लावुन खायचं.. घसा थोडा खवखवतो पण तरीही.. दर सुट्टीत त्यानादात एकतरी ड्रेस खराब व्हायचाच.. काजुच्या रसाचे डाग अजिबात निघत नाहीत!
तोपासु
ह्या उसळीला मालवणी मसाला पण
ह्या उसळीला मालवणी मसाला पण घालतात ना? मैत्रिणी कडून आलेत सुकवलेले ओले काजू. जमलं तर टाकते आज उद्या मधे फोटो. निलू ठाण्याला ते मार्केट मधे महादेवाचं मंदीर आहे त्यापाशी कातकरणी आणतात ओले काजू विकायला. पण लवकर जावं लागतं. पटापट संपतात.
मस्त लागते ओल्या काजूंची उसळ
मस्त लागते ओल्या काजूंची उसळ किंवा आमटी. फोटो येऊ देत ना.
फेडेक्स करतेस का?
फेडेक्स करतेस का?
आयटे कधी बोलावतेस
आयटे कधी बोलावतेस
प्रॅडी,आपण करु तितक्या
प्रॅडी,आपण करु तितक्या पद्धती. कुठे असते तुमची मैत्रिण? मीही मागवीन तिच्याकडून ओले काजू. टाका फोटो.
सायो, प्रॅडी टाकेल.
केदार्, करते की. पत्ता पाठव, मिळाले की करते.
अम्मि, तुला कधी यायचय? ये.
चिंगी, ती काजूची बोंड गं. त्याला तिखट मीठ लावून खायला किती यम्मी लागतात.
शैलु मस्त रेसिपी गो.. पण
शैलु मस्त रेसिपी गो.. पण झणझणीतच बरी लागात मगो ति साखर कित्याक? नि हिरव्या मिरचेपेक्षा मालवणी मसालो घालुन बनवली तर आजुन मस्त
मस्त लागते हे उसळ . आई नेहमी
मस्त लागते हे उसळ . आई नेहमी करते कोकणातून काजुबिया मागवून
आमटी पण मस्त, लागते
अगो काय बचकभर नाय टाकूची
अगो काय बचकभर नाय टाकूची साखर, चिमूट्भर.
काय गो शैलु, खावंक कधी
काय गो शैलु, खावंक कधी बोलवतसं???
माझी आजी करी गावाक गेलय की. "फका" हाडुन स्वता: काजु काढी , हात कुसत पण नातवंडांसाठी करी, तिची आठवण ईली.
धन्यवाद हो!!! आमच्या विनंतीचा
धन्यवाद हो!!!
आमच्या विनंतीचा मान ठेवल्याबद्दल!!!!!!!!!!!!
आता ओले काजु मिळाले कि करेन!!तुझी आठवण काढून काढून खाईन बरं का!!
भ्रमा, आमच्या पणजोळी पण
भ्रमा, आमच्या पणजोळी पण काजूची झाडां होती.. हे सगळे लाड लहानपणी करुन घेतलय रे..
>>माझी आजी करी गावाक गेलय की.
>>माझी आजी करी गावाक गेलय की. "फका" हाडुन स्वता: काजु काढी , हात कुसत पण नातवंडांसाठी करी, तिची आठवण ईली. >> माका पण
प्रज्ञा तिथे मिळतात का!! मग बघायला पाहिजे एकदा.
शैलजा मस्तच ग रेसिपी. आता
शैलजा मस्तच ग रेसिपी.
आता यायला लागतील ना ओले काजु. मी मागे दिनेशदांनी रेसिपी दिलेली तशी उसळ केली होती. छान झालेली. आता तुझ्या पद्धतीने करेन.
रेसिपी मस्त आहे.
रेसिपी मस्त आहे.
मस्त! ओल्या काजूची उसळ
मस्त! ओल्या काजूची उसळ खाल्याला जवळ जवळ २० वर्षे उलटली.:(
अजून किती रेसिपीज लिहीणार
अजून किती रेसिपीज लिहीणार आहेस ?
शैलजा, एक अडाणी प्रश्न
शैलजा, एक अडाणी प्रश्न विचारते आहे घाबरत घाबरत. ओले काजू कसे दिसतात?
डॅफो रैना, घाबरते कायको?
डॅफो
रैना, घाबरते कायको? खालच्या चित्रात ही काजूची पिवळी फळं आहेत ना बोंड म्हणतात त्याला. त्याच्या तोंडावर राखाडी रंगाचं काजू बी दिसत आहे ना, ते कवच आहे, ते फोडून काजू काढतात. हे कोवळे असताना काढतात आणि मग त्या काजूंची उसळ करतात. मी पाहून आणि खाऊनही खूप वर्षं झाली..
आणि हे अगदी कोवळे काजू. झाडावर असे दिसतात.
प्रॅडी फोटो टाक गं.
Pages