गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.
एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.
संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."
आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......
सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.
दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.
घरातली कामं झटपट आवरून, नवर्याला ऑफिसला पाठवून, दुसर्या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........
आत्ताच हाती आलेल्या
आत्ताच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार काल चुकून शिवाजी पार्क परिसरात फिरायला गेल्यामुळे मामींचे उर्वरीत २० विबासं अर्ध्या तासात उरकले. त्यामुळे त्यांचा २४ विबासंचा संकल्प यशस्वीरित्या पार पडला आहे. यानिमित्ताने लवकरच मामींच्या घरी सत्यनारायणाची पूजा घालण्यात येईल असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
विबासं पुर्तीचा सत्यनारायण??
विबासं पुर्तीचा सत्यनारायण?? अशक्य आहात मामी
विबासंपूर्ती? मग त्याला
विबासंपूर्ती? मग त्याला विबासंनारायण नाही का?
मस्तच ग मामी
मस्तच ग मामी
भयानक हसलो!!! परवा गटगमधेही
भयानक हसलो!!! परवा गटगमधेही विबासं ची चर्चा होती. पण मी वाचला नव्हता त्यामुळं मला त्या लोकांसोबत हसता आले नव्हते. मामी तुसी ग्रेट हो. प्रतिसाद तर अफलातुन आहेत.... निखळ आणि जबरदस्त मनोरंजन!!!!
मामी, खरंच क्रमशः टाकयला
मामी,
खरंच क्रमशः टाकयला हवंय. बाकीचे २३ विबासं कोण आहे याची उत्सुकता वाटतेय.
अशक्य ..............
अशक्य ..............
ती.स्व. मामिसाहेबांस साष्टांग
ती.स्व. मामिसाहेबांस साष्टांग प्रणिपात,
बालके विनंती अशी की हुजूरांचे मुकामाचे ठिकाण कळवावे, त्यादिशेस हात जोडून आरती करणेचे मनसुबा असे.
कळावे.
>>हात जोडून आरती करणेचे
>>हात जोडून आरती करणेचे मनसुबा असे
असुदे असुदे !!!
सुरु झालेला विबासं 'क्यान्सल'
सुरु झालेला विबासं 'क्यान्सल' झाला तर तो टॅलीत ठेवायचा का नाही?
विबासं सुरू होऊन क्यान्सल कसा
विबासं सुरू होऊन क्यान्सल कसा होईल? विबासं सुरू होऊन सफळ सुफळ नाहीतरी संपन्नच होणार ना...
यात अजुन एक फरक करायला हवा
यात अजुन एक फरक करायला हवा असे नाही वाटत कुणाला?
विवाहितान्चे विबासं अन विवाहाआधिचे विबासं
काये ना की इथे काय, कोणीही उठतय अन खरडतयं!
तर विबासं बद्दल बोलाणारी व्यक्ती जरा तरी "अधिकृत" असायला हवी की नको?
नैतर आहेच की, ज्यान्च्या मान्डवाचाच काय, जन्मपत्रिकेचा अजुन पत्ता नाही, अन ते लिवताहेत विबासं वर.
नै, लिहूदे की, बट फ्रॉम दि अदर साईड, नै का?
हा आगाऊ इथे बराच रमलेला
हा आगाऊ इथे बराच रमलेला दिस्तोय
चालुद्यात
हा आगाऊ इथे बराच रमलेला
हा आगाऊ इथे बराच रमलेला दिस्तोय >>>
नीधप, आगावाला एकतर्फी विबासं
नीधप, आगावाला एकतर्फी विबासं बद्दल विचारायचे आहे वाटतं.
म्हणजे सुगरण पक्षाच्या घरट्यासारखंच की.
आपण कष्टाने काहितरी करुन दाखवायला जावे आणि कुणीतरी काड्या (काढून ) टाकाव्यात.
तस नाय नी, ज्या कारणाने
तस नाय नी, ज्या कारणाने विबासं सुरु झाला होता ते मीच मोडीत काढले, आता बोल!
लिंब्याभाव,जलनेका नै!!! या बाबतीत माझे 'ग्रह' उच्चीचे आहेत
रच्याकने, माझा स्कोर ७ झाला बरे!
<<<अजून पाहिजे तर बायका ठेव."
<<<अजून पाहिजे तर बायका ठेव." आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही.
<<<< विवाह झालेला......
हे आणी असे सगळे विनोद समजले पण झाल पण हे "विबास" काय असत????????????? ते समजल कि मला पण पोट धरुन हसता येईल सगळ्यां सारख.
समु, विबासं=विवाह बाह्य
समु, विबासं=विवाह बाह्य संबंध.
पण आगावा... तो सुरू झाला ना
पण आगावा... तो सुरू झाला ना म्हणजे झालाच रे. स्कोर झाला.
--सुरु झालेला विबासं
--सुरु झालेला विबासं 'क्यान्सल' झाला तर तो टॅलीत ठेवायचा का नाही?---
आगावा , पोथीचा अभ्यास कमी पडतोय रे तुझा. तज्ञांनी असे नमुद केले आहे की 'एकमेकांकडे बघणे' हे सुद्धा विबासं मधे मोडते. तेव्हा एकदा 'बघितले' म्हणजे आलाच तो लिस्ट मधे. पुढे काही प्रोग्रेस होतेय का नाही याने काही फरक पडत नाहीये.
किती सोप्प आहे ना विबासं
किती सोप्प आहे ना विबासं (करणं ):इश्श:
प्यार करते नही हो जाता है
प्यार करते नही
हो जाता है च्या चालीवर
विबासं करते नही
हो जाता(ते) है ..
असं म्हणायला पाहीजे आता..
कधीतरी गंभीर व्हायला
कधीतरी गंभीर व्हायला शिका
आणि
http://www.maayboli.com/node/21809
इथं लक्ष द्या.
मामी, अग तुला अश्याने
मामी, अग तुला अश्याने "सामुहिक सत्यनारायण" घालावा लागेल.......
म्हणजे सगळे सोंडके बसलेत आपले एक एका सत्यनारायणासमोर, भटजी मंत्र म्हणतायत आणि मामी आपली या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रत्येकाच्या उजव्या हाताला हात लावत "मम" म्हणत फिरतेय......
आणि भटजी सांगतोय "मामी" आता "मम" म्हणा...
काय पण स्टॅमिना आहे........ पण यातून "सामुहिक सत्यनारायण" ही एक अभिनव कल्पना सुचली..... चला कामाला लागुया...... पुण्या-मुंबईत एकदम हिट होईल आयडिया...... काय मामी????
मी आता कादंबरी लिहिण्याऐवजी
मी आता कादंबरी लिहिण्याऐवजी माझे खरेखुरे विवाहबाह्य संबंधच क्रमशः लिहावेत या विचारात आहे.
कारण ते वास्तव आहेच, वर मनोरंजकही आहे.
वाचकांनी सहमती, असहमती दर्शवल्यास कल कळेल.
-'बेफिकीर'!
मामी, विबासंनारायणाला आमंत्रण
मामी, विबासंनारायणाला आमंत्रण देणार ना ? की त्याला काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत...म्हणजे किमान इतके विबासं झालेले पाहिजेत वगैरे...
भुंग्या , अशक्य
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7097168.cms
(No subject)
हल्ली वास्तवाला धरून
हल्ली वास्तवाला धरून असावं..
इथून पुढे लेख वगैरे लिहीताना
त्यांच्या सोन्यासारख्या संसाराला कुणाचीतरी दृष्ट लागली
या ऐवजी
"योग्य" ती खबरदारी घेईन म्हणतो.
अय्या!! इतकं सोप आहे विबासं??
अय्या!! इतकं सोप आहे विबासं??
Pages