इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
नेरुळहून पुण्यास जात
नेरुळहून पुण्यास जात असताना,एल.पी.बस थांब्याला हे झाड आढळले. याला आलेली लाल फुले लाल कापसाच्या पुंजक्यागत भासली व कुतूहलाने मी कॅमेर्यात टिपले.... या विषयी कुणाला जास्त माहीती असल्यास जाणून घेणे आवडेल.
फूल आणि फळाचा घोस.
क्लोज-अप.
फळं..
ही फुलं लाल कापसागत दिसत होती.
जागु,अरुंधती, साधना,
जागु,अरुंधती, साधना, दिनेशदा

धन्स ! खुप छान माहितीबद्दल ..
डॉक,
मस्त फोटो !
आमच्याकडे 'पांगिराला' (पारिंगा) पांगरा म्हणतात
गावी पानाचे मळे खुप आहेत, अजुनही प्रत्येक पानाच्या मळ्यात पांगराची झाडे (बिया लावुन) असतातच,पण इतरांपेक्षा प्रमाण कमी.
या पांगराबरोबर खुप प्रमाणात शिवरी,शेवगा ही इतर मुख्य झाडे लावतात पानाच्या वेलीला आधार म्हणुन , पण ही सगळी झाडे अगदी सरळ (१०-१२ फूटावर) वाढवली जातात (फांद्या वेळच्या वेळी काढुन)
या सगळ्या झाडांचा उपयोग पानाच्या वेलींना (नागवेलीला) आधाराबरोबर जनावरांना चारा म्हणुन केला जातो
एका एकरात पानमळा असेल तर ४-५ जनावरांना वर्षभर चारा मिळतो
पानवेलींचे फोटो देऊ शकलो
पानवेलींचे फोटो देऊ शकलो नाही , माफी असावी

पुढच्या वेळी फोटो सहित माहिती असेल , अरुसारखा, नविन कैमेरा घेतल्यावर
डॉ, त्याला पावडर पफ म्हणतात.
डॉ, त्याला पावडर पफ म्हणतात. Calliandra Haematocephala मध्य अमेरिकेतून आलेय आपल्याकडे. पर्जन्यवृक्षाची फूले पण अशीच पण गुलाबी असतात, आणि ते झाड मोठे असते. हि दोन्ही झाडे परदेशी.
अशीच पण हिरव्या रंगाची फूले असलेला शिरिष मात्र आपला. खाली कोकणात फारसा नाही. गोव्यात आहे आणि नगर भागात आहे तो. त्याला सुगंध असतो. संस्कृत काव्यात त्याचे शृंगारीक वर्णन आहे. त्यांच्या शेंगा सोनेरी रंगाच्या असतात आणि त्या वार्यावर झुलताना, जो आवाज येतो त्याची तूलना, तरुणींच्या पायातील पैंजणांच्या आवाजाशी केलेली आहे.
अनिल पानमळ्यांचा फोटो नक्कीच टाक. पान भारतीय लोकांना अतिप्रिय पण मस्कत आणि अमराती मधे आता त्यावर (विकणे, खाणे आणि थुंकणे ) बंदी आली आहे. खरे तर तंबाखू शिवाय पान अवश्य खावे आणि तसे खाल्ले तर थुंकायची गरजच नसते.
माझ्या या पाल्हाळीक पोष्ट्स
माझ्या या पाल्हाळीक पोष्ट्स वाचून जागू मनात म्हणत असेल, या माणसाला नूसती पिन मारायची खोटी, कि सुटलाच...
खरे तर तंबाखू शिवाय पान अवश्य
खरे तर तंबाखू शिवाय पान अवश्य खावे आणि तसे खाल्ले तर थुंकायची गरजच नसते.

दिनेशदा,
अगदी रास्त आहे, पान खाणं चांगल असुनही या तंम्बाखुच्या संगतीमुळे लोकांकडुन बदनाम झाली आहे
कशाचाही अतिरेक चांगला नाही पण, आमच्या काही लोक रोज २-३ पासुन ५-६ पान (सुपारी,कात्,चुना सहित) खाणारे खुप आहेत पण आज ही वयाच्या सत्तरीमध्ये त्यांची तब्येत ,उत्साह अजब दिसतो .
माझ्या या पाल्हाळीक पोष्ट्स वाचून जागू मनात म्हणत असेल, या माणसाला नूसती पिन मारायची खोटी, कि सुटलाच...
तुमचं हे अस सुटता आणि ....
आमच्या सारख्यांच्या अनेक शंका आपोआप दुर होतात्,नविन आणि सुंदर माहिती रेडीमेड (न शोधता) मिळते, हे काय कमी आहे ?
ही गणेशवेल नदीकाठी ऊसामध्ये
ही गणेशवेल नदीकाठी ऊसामध्ये इतकी उगवायची की आम्हाला शाळेत असताना ऊस मोडुन खाताना अगोदर या वेलीला बाजुला करायला लागायचा आणि या वेलीचा खुप रागही यायचा !

अनिल याला तूम्ही गणेशवेल
अनिल याला तूम्ही गणेशवेल म्हणता का ? याला आम्ही चित्तरंजन म्हणतो, गणेशवेलीला लाल फूले येतात, पण अशा पाच सूट्या पाकळ्या नसतात.
उसावरचा घेवडा असतो कि नाही तूमचाकडे ?
झाडांचे प्रकार आणि एकाद्या
झाडांचे प्रकार आणि एकाद्या गावातले त्यांचे पत्ते (address) अस काम कोणी केलेलं माहीत आहे का ?
नवीन झाडाची माहिती वाचली की कधी एकदा प्रत्यक्ष त्याला भेटेन असं होऊन जातं !
जागू हा धागा चालू केल्याबद्दल
जागू हा धागा चालू केल्याबद्दल धन्यवाद. मलासुद्धा निसर्गाचे देखणेपण न्याहाळायला आवडते. माझा तो छंदच आहे.सूर्य उगवताना आणी मावळताना आकाशात रंगांची जी उधळण होते,ढगांच्या आडुन सूर्यकिरणांचा जो लपंडाव चालू असतो,तो पाहून त्या विधात्याला साष्टांग नमस्कार घालावासा वाटतो.झाडांकडे पहा,हिरव्या रंगाच्या किती छटा दिसतात्.तेच अमेरिकेमध्ये हिवाळ्यात मेपल ट्रीच्या
किती हिरव्या लाल शेड पाहायला मिळतात.
आमच्या कडे वरचे पावडर पफचे झाड आहे.खूप फुले आली की खुप छान दिसते.
मेळघाटात पळस फुलला की जंगलाला आग लागल्यासारखे दिसते.
मध्यप्रदेश आणी उत्तर प्रदेशातही डोक्यात फुले घालणे वाईट समजतात्.आम्ही माळतो तर आम्हाला नावं ठेवतात.
अवनी, मी तो उपद्व्याप केलेला
अवनी, मी तो उपद्व्याप केलेला आहे. मुंबईतील बहुतेक पत्ते सांगू शकेन.
आणि एक भेट नाही पुरेशी होत. प्रत्येक ऋतूमधे भेटावेसे वाटते.
सगळ्यांनी खुप सुंदर सुंदर
सगळ्यांनी खुप सुंदर सुंदर लिहीले आहे. धन्स.
माझ्या या पाल्हाळीक पोष्ट्स वाचून जागू मनात म्हणत असेल, या माणसाला नूसती पिन मारायची खोटी, कि सुटलाच...
तुमचं हे अस सुटता आणि ....
आमच्या सारख्यांच्या अनेक शंका आपोआप दुर होतात्,नविन आणि सुंदर माहिती रेडीमेड (न शोधता) मिळते, हे काय कमी आहे ?
अनिल यांना अनुमोदन.
मेपलच्या रंगाचे कौतूक होते,
मेपलच्या रंगाचे कौतूक होते, आणि ते तसे योग्यही आहे. एखादा परिसर पूर्णपणे त्या रंगात रंगलेला असतो. पण आपल्याकडे तसे नसते. पण तेच तर आपले वैभव आहे. आपल्याकडे निसर्गात विविधता आहे आणि ती जपणे अत्यंत गरजेचे आहे.
जंगलात एखादाच बहावा, एखादाच पळस, एखादाच पांगारा असावा.
याला जे गालबोट लागलेय ते निलगिरी आणि वेडी बाभूळ यांच्या बेसुमार लागवडीमूळे. ही झाडे बाकिच्या झाडांना जगू देत नाहीत.
मायबोलीकर ललिता प्रिती च्या
मायबोलीकर ललिता प्रिती च्या प्रोफाईल मधे या फुलांचा फोटो बघितला होता. केरळमधली प्रकाशचित्रे मधे पण या फुलांचा फोटो होता. दोन्ही ठिकाणी पांढरट गुलाबी रंग होते. या फूलाचा प्रोफाईलमधे आकार खूपच वेगळा आणि सुंदर होता. त्याचवेळी त्या फूलाचा मुखडा पण बघायला मिळेल का, असे वाटले. ती इच्छा अचानक पूर्ण झाली.
हा रंग खूपच वेगळा. आपल्याकडे पूर्वी सोवळ्यातले कद असत, त्यात हे रंग दिसत असत.
दिनेशदा, हे खालील झाड कसले
दिनेशदा, हे खालील झाड कसले आहे ? ह्याच्या खोडाला उंबरासारखी फळे येतात. पान लांबट, मोठ सागाच्या पानासारख खरखरीत असत. माझ्या वडीलांकडे विहीरीला थाळा आहे. थाळ्यात पंप आहे. आम्ही लहान असताना त्या पंपाचे पाणी थाळ्यात साठवायचो. ते साठवण्यासाठी थाळ्याच्या होलाला आम्ही ह्याची पाने चिकटवुन दगड लावायचो त्यामुळे पाणी थाळ्यात साठायचे. साठलेल्या पाण्यात आम्ही पोहायचो. तसेच ह्याचा उपयोग शेतातल्या काढलेल्या भाज्या जुडी करुन धुवण्यासाठीही व्हायचा. लहानपणापासुन हे झाड बघते पण ह्याचे नाव माहीत नाही. ह्याच उत्तर तुमच्याकडे मिळेलच.
आमच्या कॉलनीत पण याची खूप
आमच्या कॉलनीत पण याची खूप झाडे आहेत. हे अंजीराच्या कूळातील झड आहे एवढे नक्की पण याची फळे मात्र खाद्य नसावीत.
साधारण असेच एक झाड क्रीक सँडपेपर फिग नावाने ओळखले जाते, पण हे जरा वेगळे आहे.
दिनेशदा ती वरची निळी फुले
दिनेशदा ती वरची निळी फुले अगदी कापडाने बनवल्यासारखी वाटत आहेत. कारण त्यांचे रंग अगदी हटकेच आहेत.
दिनेश, कसलं सही फूल आहे ते?
दिनेश, कसलं सही फूल आहे ते? काय नाव?
नवीन झाडाची माहिती वाचली की
नवीन झाडाची माहिती वाचली की कधी एकदा प्रत्यक्ष त्याला भेटेन असं होऊन जातं !
अवनी, दिनेशदा
मी एकदा संगमनेरला कामानिमित्त गेलो असताना पेपरला वाचलं की भारतातलं सगळ्यात जुना वृक्ष (वडाचं झाड) हा संगमनेर, जि. नगर या तालुक्यात आहे, तो आता ,त्याच्या पारंब्यामुळे इतर झाडे असा काही एकरामध्ये पसरला आहे.
पण त्या गावात जाऊन बघणं राहुनच गेलंय ...
डॉ. अनिल यांना अनुमोदन.
जागु,
मी आणि डॉ ??????
अहो कंपावडर देखील नाही हो मी.
दिनेशदा,
ऊसावरचा (कडेला) घेवडा तर नेहमी असतोच, पण ऊस खायला मोडताना घेवड्याची वेल ऊसाला लवकर सोडत नाही
अनिल पोस्ट मध्ये बदल केला
अनिल पोस्ट मध्ये बदल केला आहे.
दिनेशदा, ती वरची निळी फुले
दिनेशदा, ती वरची निळी फुले अगदी कापडाने बनवल्यासारखी वाटत आहेत. कारण त्यांचे रंग अगदी हटकेच आहेत.
जागु,
अनुमोदन, (पण ,मला ती प्लास्टीकची वाटली !)
(पण ,मला ती प्लास्टीकची वाटली
(पण ,मला ती प्लास्टीकची वाटली !)
म्हणजे दोघांनाही खरी वाटलीच नाहीत.
नीळी फुले खरेच मस्त
नीळी फुले खरेच मस्त आहेत..
अनिल, तु लिहिलेल्या वडावर इथे कोणीतरी आधीच लिहिले आहे, फोटुही आहेत. शोधा म्हणजे सापडेल
जाता आले नाही तरी निदान बघता तरी येईल.
जागु, दिनेश.. हे झाड मीही पाहिलंय. दिसायला अगदी उंबरासारखी फळे आहेत पण वास अजिबात नाही. जवळ गेल्यावर ओळखता येतात की ही उंबरे नाहीत म्हणुन. मी आधी शिवडी ऑफिसात होते तिथे आवारातच हे झाड होते. मी हिरवी फळे पाहिली, म्हटले वा.. आता पिकली की उंबराचा मस्त वास येईल. फळे पिकली पण वास मात्र गायब :(.. मग जवळ जाऊन जरा झाडाची चौकशी केली, तेव्हा कळले हे वाघाचे कातडे घालुन गाढव बसलेय
माझ्याबरोबरचा युपीवाला भैया म्हणाला की त्यांच्याकडे याची भाजी करतात म्हणुन. ह्यांना जरासे वाफवुन वरचे थोडेसे केसाळ असलेले आवरण काढतात अणि मग भाजी करतात. आता हे खरे की तो यांना भोकरे समजुन त्यांची भाजी करतात म्हणाला देव जाणे. तसेही भय्या काहीही खातात. मागे माझ्या कॉलनीतल्या काटेसावरीला एक भय्या झोडपत होता. कोणी झाडांना त्रास देताना दिसले की मी त्याची लगेच हजेरी घेते. मग त्याने एक कळा निट उघडुन त्यातला खाण्यायोग्य घटक मला दाखवला आणि म्हणाला आम्ही याची भाजी करतो.....
बेलापुरच्या पारसिक हिलवर काटेसावर उर्फ शाल्मलीचे अमाप पिक आहे. नव्या मुंबईत इतरत्रही काटेसावर खुप येते. त्यामानाने मुंबईत काटेसावर जास्त दिसली नाही.
दिनेश, ते सँडपेपर चे झाड
दिनेश, ते सँडपेपर चे झाड राणीबागेत आहे. नंदन कलबागांनी दाखवलेले. पानाचा पृष्ठभाग खरेच सँडपेपरसारखा खरखरीत असतो.
साधना आमच्याकडे आजुबाजुलाही
साधना आमच्याकडे आजुबाजुलाही खुप झाडे आहेत ही पण ह्याची भाजी किंवा फळे खाल्याचे आजिबात निदर्शनास नाही. हे जंगलीच झाड आहे.
साधना, माहितीबद्दल धन्स,
साधना,
माहितीबद्दल धन्स, शोधुन सापडतं का ते बघतो!!
दिनेश, ओळखा पाहु लिस्टमधले
दिनेश, ओळखा पाहु लिस्टमधले पुढचे पाऊल -
जयपुरला कुठेतरी हिंडत कॅमेरा तलवारीसारखा चालवत होते तेव्हा हे नजरेस पडले. आता आमची मती काही तुमच्याइतकी चालत नाही, त्यामुळे ओळखा पाहु कोडे तुम्हालाच सोडवायचेय -
फोटो तुम्हाला कोडे घालण्यासाठिच काढलेला, पण इथे टाकायचे राहुन गेले आणि मग विस्मरणात गेले.
http://mbtest.maayboli.com/no
http://mbtest.maayboli.com/node/4818
हा एक लेख आहे. अजुन एका ठिकाणी वाचलेले आठवतेय. मला वाटते कोणी मायबोलीकर तिथे गेला होता आणि तिथे लावलेल्या फलकाचा त्याने फोटो टाकला होता.
साधना ती निळी फूले खरीच
साधना ती निळी फूले खरीच आहेत.
आणि त्या कोड्याचे उत्तर, वाघूळ फूले. त्यालाच ब्रम्हदंड म्हणतात.
मुंबईला पारसी कॉलनीत याचे झाड आहे. या फूलांचा असा रंग आणि सडणार्या मांसासारखा येणारा वास हे वटवाघळांना आमंत्रण असते. त्यांचे तोंड आत जाईल असा त्या फूलांचा आकार असतो. शिवाय देठही मजबूत आणि लोंबता. वटवाघळांना त्या फूलापर्यंत पोहोचायला कुठलाच अढथळा होऊ नये म्हणून.
याची फळे दूधीभोपळ्याएवढी होतात आणि ती लांबलचक देठांना लोंबकळत असतात ( जणू दोरीला बांधलेले वरवंटे. हि जीएंची उपमा आहे ) फळांचा तसा खाण्यासाठी उपयोग नसतो, म्हणून कुणी काढत नाहीत (अशीच असणारी गोरखचिंचेची फळे मात्र खाण्याजोगी असतात )
ती कधी कधी खालून जाणार्या माणसांच्या डोक्यावर देखील पडतात. तर असे अपघात होऊ नये म्हणून पारसी कॉलनीतील ते झाड पाडून टाकावे अशी मागणी झाली होती. ती मागणी अमान्य व्हावी, हि सदिच्छा.
कच्च्या उंबराची वाटून भाजी
कच्च्या उंबराची वाटून भाजी करतात. खिम्यासारखी लागते म्हणतात (आता मी ही भाजी आणि खिमा, दोन्ही खाल्लेले नाही.)
भोकरांचे सरबत करतात तसेच लोणचे व बेसन भरुन भाजीही करतात. पण "त्या" झाडांच्या फळाचे काहीच करत नाहीत बहुतेक,
काटेसावरीच्या पूप्ष्पदलांची भाजी आपल्याकडेही करतात. खरेच मुंबईत नाहीत हि झाडे पण कात्रजच्या घाटात पिवळी आणि पांढरी अशी दोन दुर्मिळ जातींची झाडे आहेत. दिल्ली सावर म्हणून एक वेगळी जात असते. तिला मस्त मोठी गुलाबी नक्षीची फूले येतात.
प्रपंच सिनेमात (सीमा, श्रीकांत मोघे) आशाचे, बैल तूझे हरणावाणी, गाडिवान दादा, असे एक मस्त गाणे आहे, त्या गाण्यात सावरीची बोंडे फूटून उडणारा कापूस मस्त टिपलाय.
Pages