माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं

Submitted by मामी on 3 December, 2010 - 06:39

गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.

एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्‍याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."

आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......

सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.

दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.

घरातली कामं झटपट आवरून, नवर्‍याला ऑफिसला पाठवून, दुसर्‍या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे किती विकेट्स पडल्या ठीक पण धावा?
---- क्रिकेट या खेळात प्रतिस्पर्ध्याचे केवळ ११ खेळाडु असतात.... मग केवळ दहाच बाद करता येतील. २४ हा आकडा कसा गाठणार? २४ आकडाही गाठता आला नाही तर मग अभिमान कशाचा बाळगायचा? धावांच्या बाबतीत अशा काही मर्यादा नसतांत.

Rofl
मामे आता मोलकरणीचाही किस्सा येऊ दे म्हणजे तुझ्या नवर्‍याचं वाक्य खरं होईल.
काल रात्रीत माझी पण २४ प्रकरणं पुर्ण झाली.
१) कतरिना २) सोनम कपुर ३) झरिन खान ४) सोनाक्षी ५) असिन ६) दिपिका ७) ऐश्वर्या ८) हंसिका मोटवानी ९) जेनेलिया डिसुझा १०) खुशबु ११) प्रियांका चोप्रा १२) राणी मुखर्जी १३) करिना १४) दिया मिर्झा १५) रिया सेन १६) अमिषा पटेल १७) आयेषा टाकिया १८) विद्या बालन १९)नमिता २०) बिपाशा २१) शमिता शेट्टी २२) नेहा धुपिया २३) मल्लिका शेरावत २४ ) टुणटुण Smiley
अर्रर्रर्र ! स्वप्नात होतो बहुतेक. Proud

श्री, धन्य आहे हो तुमची. चक्क नावं दिलीत - तिही सगळीच्या सगळी २४? तुम्हाला माहितेय ना, तज्ञांच्या संकेतानुसार 'नावं देणं या फोरमसाठी योग्य नसतं'. शिवाय तुम्हाला हे सर्व अभिमानास्पद वाटत नाहिये ना याचीही खात्री करून घ्या. ते तसे वाटले नाही पाहिजे - इति (अर्थात) तज्ञ.

वर कोणीतरी 'वर्किंग फ्रॉम होम' वाल्यांनी काय करावं, कोणाच्या तोंडाकडं पहावं अशी शंका उपस्थित केलीये. तज्ञांच्या पोथीत 'फेसलेस एन्काउंटर' चा उल्लेख आहे. त्या सदराखाली तुमची विबासं घालता यायला हरकत नसावी. टेलीमार्केटिंगवाल्यांचे पण तेच.

मामी , श्री
पण हे संबंध एकतर्फी की दोन्हीकडून हे कसे ओळखावे, सिद्ध करावे? आणि विबासं म्हणुन मान्यता मिळण्यासाठी ते दोन्हीकडून असले पाहिजेत का? का एकतर्फी पण चालतील? तज्ञांचे काय मत आहे ? Proud

शिवाय तुम्हाला हे सर्व अभिमानास्पद वाटत नाहिये ना याचीही खात्री करून घ्या.
---- तुम्हाला जरी अभिमान नसला (किती जमिनीवर पाय आहेत.... :स्मित:) तरी २४ धावा फटकवल्यावरही तुमच्या जमिनीवर असण्याचा आम्हाला जरुर अभिमान आहे.

आणि विबासं म्हणुन मान्यता मिळण्यासाठी ते दोन्हीकडून असले पाहिजेत का? का एकतर्फी पण चालतील?
---- आपण विबासंच्या मोजमपां बद्दल खुप कठोर बनत चाललो आहोत असे मला वाटायला लागले आहेत... अशाने होतकरुंना प्रोत्साहन मिळणार कसे? मानवाने स्वत: वर घातलेली कृत्रिम बंधने तज्ञ शिथील करतिलच. शेवटी निसर्ग नावाची काही चिज आहे का नाही?

मी (स्वत: च्या) बायकोशी लग्न केलेच नाही अशी स्वत:ची समजुत घालतो. मग प्रत्येक स्पर्श नविन हवाहवासा भासतो... म्हणुन अशी प्रकरणे पण विबासं मधे मोडायला हरकत नसावी.

उदय ना अनु ... आपलं अनुमोदन!
निसर्ग हा घटक आपल्या थॉट प्रोसेस मध्ये आणला तर विबासं सुलभ होतात म्हणे! तेव्हा तो आणा.

डेलिया, तज्ञांची मते जाणून घ्यायला पोथी मुळातुनच वाचली पाहिजे.

तज्ञांच्या संकेतानुसार 'नावं देणं या फोरमसाठी योग्य नसतं'. शिवाय तुम्हाला हे सर्व अभिमानास्पद वाटत नाहिये ना याचीही खात्री करून घ्या. ते तसे वाटले नाही पाहिजे - इति (अर्थात) तज्ञ.>>>> आणि हो 'हे सगळे आपल्याला झेपेल का' असा विचारही विबासं सुरु करायच्या आधी करायचा असतो (संदर्भ- तज्ञपोथी, ओवी १४) Proud

मामी,

माझा छळ झालाय. एका दिवसात या विनोदी लेखनाला प्रतिसादाची शंभरी झाली तरी मला "विबासं" हा शब्द समजला नाही. आगाऊ सह सर्व मला हसणार. पण मला सांगा हे काय आहे ? विपु,हाकानाका,रचाकने सारखा मायबोली शब्द आहे की मुळतला शब्द आहे ?

नितीनचंद्र, याचा अर्थ तुम्ही पोथी वाचलेली नाही असा होतो. ती वाचल्याशिवाय हा बाफ वाचण्यात मजा नाही. विबासं = विवाह बाह्य संबंध.

तज्ञांच्या संकेतानुसार 'नावं देणं या फोरमसाठी योग्य नसतं'. >>
हे सर्व अभिमानास्पद वाटत नाहिये ना >>
ते तसे वाटले नाही पाहिजे - इति (अर्थात) तज्ञ. >>
तज्ञांच्या पोथीत >>
निसर्ग हा घटक आपल्या थॉट प्रोसेस मध्ये आणला तर विबासं सुलभ होतात म्हणे!
>> omg!!! rofl Rofl Rofl

काही शब्द नव्याने दिसू लागतील असं वाटू लागलंय..

उदा.
मानलेला/ली नवरा/बायको Proud
चुलत बायको, चुलत नवरा इ. इ. Proud

पाच वर्षांनी हे शब्द कॉमन झालेले असतील.

नाय हो नितिनजी मी नाय हसणार, तुम्ही पोथीवाचन करा, अज्ञानरुपी अंधःकार दूर होईल.

>>>>> अगदि. अगदि. आणि नंतर हे विबासं च व्रत पण जरूर करा बरं का.

आणखी काही नविन शब्दसंपत्ती :
१. क्लोज एनकाउंटर ऑफ द फर्स्ट काईंड - विबासं टाईप १
२. क्लोज एनकाउंटर ऑफ द सेकंड काईंड - विबासं टाईप २
३. क्लोज एनकाउंटर ऑफ द थर्ड काईंड - विबासं टाईप ३

त.टि. : क्लोज एन्काउंटरची व्याख्या आपापल्या मगदुराप्रमाणे ठेवावी. तेवढी फ्लेक्सिबिलिटी अलाउड आहे.

मामी, क्लो़ज येनकांटर की फेसलेस? कारण तज्ञपोथी, ओवी २१, प्रमाणे 'फेसलेस' असा शब्दप्रयोग आहे.
अर्थात प्रक्षिप्त भाग घुसडला जाणे हेही कोणत्याही महान ग्रंथाचेच लक्षण आहे.

आगाऊ, फे. ए. हा होमवर्कींग वाल्यांचा आणि टेलीमार्केटिंग वाल्यांचा.

विबासं लवकरच कल्ट स्वरूप धारण करणारसं दिसतय! त्यामुळे त्या द्रुष्टीने आतापासून पावले उचलेली बरी.
आपला कल्ट : विबासं
आपली पोथी : तज्ञपोथी
आपला नंबर : २४
आपले ब्रीदवाक्य : "खिरा तो एकची धिरमSSSS, जिगाला प्रीम अरीपावे!"

मामी,

लवकरात लवकर इतर २३ किस्से येऊ देत........ आपल्या प्रोजेक्टला सदिच्छा आणि शुभेच्छा...... Proud तेवढे डिटेल्स टाकायला विसरू नका....... बर्‍याच जणांना उपयोगी पडतील.. Lol

आजच सकाळी नवर्‍याला पुन्हा पटवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं असा अविचार करू नकोस. थोडे तरी विबासं करायचं मनावर घे. तर त्यानं माझ्याकडे एक तु.क. टाकला. 'काहीतरी फाजिलपणाचे उद्योग' असलसं काही पुटपुटला. म्हणजे सगळी जबाबदारी आता माझ्यावरच! एका बाईनं कुठे कुठे म्हणून पहावं? ................
(बरं, आता कुठे पहावं बरं?????)

हा असा सगळा विचार चालला असतानाच तो टाटा इंडिकॉमवाला आला. मी माझ्या फोनच्या सगळ्या तक्रारी त्याच्यापुढे मांडल्या. त्या फोननी मला कित्ती कित्ती त्रास दिलाय हे सांगताना मी रडकुंडीला आले होते. त्याने खूपच सहानुभूती दाखवून सगळं ऐकून घेतलं. वर त्याचाच फोन कसा उच्च क्वालिटीचा आहे असंही मला कनविंस केलं. तेव्हाच मला कळलं .. हा विबासं होतोय. आणि हा फारच उच्च क्वालिटीचा विबासं आहे हेही समजून चुकलं मला..... बाकिच्यांच्या त्या भानगडी, माझा तो विबासं!

आता मी एकच गाणं गुणगुणतेय ....

आय लव यू, प्रेम करू छू, झाला मला विबासं झाला!

त.टि.: चला बाई, अजून एक विबासं हातावेगळा केला. हुश्श्श्श्श्श!

Pages