गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.
एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.
संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."
आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......
सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.
दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.
घरातली कामं झटपट आवरून, नवर्याला ऑफिसला पाठवून, दुसर्या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........
(No subject)
मामी, ग्रेट आहात!
मामी, ग्रेट आहात!
....भन्नाट दंगा चालू आहे इथे
:हाहा:....भन्नाट दंगा चालू आहे इथे !
प्रत्येक पेशंटच्या घाबरलेल्या नवर्याशी सहानुभूतीने बोलताना माझे दिवसाला २४ विबासं अग्ग्गदी आरामात होतात ! मी फर्स्ट हं...एक ' झेप ' झाली माझी. ( तरी मी ह्यात बायका मुळीच धरल्या नाहीयेत ! मी नाही हो त्यातली.)
फास्ट ट्रेनने >> स्लोने जावा
फास्ट ट्रेनने >>
स्लोने जावा की ... दोन झेपा होतील सहज ... हाकानाका
तरी मी ह्यात बायका मुळीच
तरी मी ह्यात बायका मुळीच धरल्या नाहीयेत ! मी नाही हो त्यातली.
>>>> होय ग रुणुझुणु, आपण दोघीही 'प्लेन व्हॅनिला विबासं' वाल्या!
डोळे मिटतांना रूखरूख नको
डोळे मिटतांना रूखरूख नको आयुष्यात काहीतरी राहून गेल्याची ...:)
(No subject)
manasmi, व्हॉट अबाउट पीपल
manasmi,
व्हॉट अबाउट पीपल वर्कींग फ्रॉम होम?
आमचा २४ चा स्कोर कधीच पुरा होणार नाही..
इथल्या बाफ वर टाकलेल्या पोस्ट्स क्वालिफाय होतात का? >>>>
वर्कींग फ्रॉम होम असेल तर electronically करावेत. ऊकडिचे नसतिलच जमत तर तळणिचे मोदक चालतात.
नवराच तो. तो काय नविन काम
नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव. >> हे जबरी
पेपर टाकयला वगेरे पोर्या येतच असेल ना तुमच्याकडे. तुम्हाला पुढच्या २३ साठी ऑपशन सुचवते
(No subject)
खदखदून हसते आहे....
खदखदून हसते आहे....
(No subject)
मामी, मामी, मामी
मामी, मामी, मामी
इन्शुरंसवाल्याशी फोनवर बोलत होते.. तो म्हणाला ' हवामान कसे आहे तुझ्याकडे?', मी म्हणाले, 'फारच थंड आहे,अजिबात सहन करत येत नाही'. तो म्हणाला, 'सॉरी टु हियर दॅट, आमच्याइथे तर तुमच्याहुन जास्त थंडी आहे'. मग मी- 'सॉरी टु हियर दॅट'. अगबाई... बघताबघता विबासं!!! नवरा मला माफ करेल का?
मामी, ग्रेट
मामी, ग्रेट
सुनिधी मामी विबासं वारं सुटल
सुनिधी
मामी विबासं वारं सुटल आता सगळी कडे.
विवाहच झाल्यामुळे मला आता
विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.
---- २४ विबास झाल्यावरच कदाचित फरक पडेल, तो पर्यंत नाही.
मामी तुम्ही लोकलने फेरफटका मारल्यावर २४ चे रेकॉर्ड नक्की ब्रेक करणार.... पुढील बिबासां साठी शुभेच्छा.
स्लोने जावा की ...
---- तेव्हढेच जास्त विबासं होण्याची शक्यता :स्मित:.
(No subject)
(No subject)
(No subject)
टेली मार्केटींग करणार्यांचे
टेली मार्केटींग करणार्यांचे टार्गेट लवकर पूर्ण होत असेल नाहि ?
लेखन आणि प्रतिक्रिया.. दोन्ही
लेखन आणि प्रतिक्रिया.. दोन्ही भारी..
(No subject)
धन्य अहात सारे !
धन्य अहात सारे !
सकाळी सकाळी छान वाचायला
सकाळी सकाळी छान वाचायला मिळालं. नवर्याशी बोलते आजच. जग एवढ पुढे चाललय, मागे नको रहायला.
(No subject)
मामी शहारुखच्या माकडतोंड्या
मामी शहारुखच्या माकडतोंड्या फोटोचा एक किस घेउनच टाका तुम्ही!
किस नाही घेतलात तरी दिवे मात्र जरुर घ्या.
आता कुणीही कुणाला भेटल्यावर,
आता कुणीही कुणाला भेटल्यावर, काय, कसं ? च्या जागी विबासं ? असं विचारायचं का ?
मामी , लय भारी
मामी , लय भारी
च्या जागी विबासं ? असं
च्या जागी विबासं ? असं विचारायचं का ?
---- आपण सर्व क्रिकेट प्रेमी मग किती धावा काढल्यात असे विचारायचे?
च्या जागी विबासं ? असं
च्या जागी विबासं ? असं विचारायचं का ?
---- आपण सर्व क्रिकेट प्रेमी मग किती धावा काढल्यात असे विचारायचे?
>> बाप्रे किती विकेट्स पडल्या ठीक पण धावा?
Pages