Submitted by पुरंदरे शशांक on 16 November, 2010 - 01:03
श्रावण सरी
श्रावण सरी गमतीच्या...... गमतीच्या
ऊन्हातंच नहायच्या....... नहायच्या
श्रावण ऊन्हं उनाड फार....... उनाड फार
इंद्रधनुवर होती स्वार्.... होती स्वार
श्रावण सरी अल्लडशा........ अल्लडशा
उड्या मरिती पोरी जशा........ पोरी जशा
श्रावण थेंब नाजुक गं...... नाजुक गं
पाचू चमकती भवती गं...... भवती गं
श्रावण फुले इवलाली...... इवलाली
बाळाच्या गाली खळी....... गाली खळी
श्रावण अपुला सखा जरि...... सखा जरि
निघून जाई स्वप्नापरि...... स्वप्नापरि
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे! उनाड ऊन आणि श्रावण
छान आहे!
उनाड ऊन आणि
श्रावण सरी अल्लडशा, अल्लडशा
उड्या मरिती पोरी जशा, पोरी जशा
हे आवडले!
मनापासून धन्यवाद - के अंजली
मनापासून धन्यवाद - के अंजली
छान आहे. शशांक, एक बदल
छान आहे.
शशांक, एक बदल सुचवते.कसा वाटतोय बघ.
" बाळाच्या गाली खळी, गाली खळी "
इथे म्हणताना जरा अडकतंय. त्यातला एक ' गाली ' काढलं तर लय टिकून राहतेय.:)
म्हणजे---" बाळाच्या गाली खळी, खळी "
हे.आ.मा.म.
प्रज्ञा, मला असं वाटतं - तू
प्रज्ञा,
मला असं वाटतं - तू जरा तालात म्हणून बघावं . हे बोल गाणे आहे. चू. भू. द्या. घ्या.
शशांक
फूगडी गीत्.गायनीय.
फूगडी गीत्.गायनीय.