मंगेश पाडगावकर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.

पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.

कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.

पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.

पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.

तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.

तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम"

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मौनाचा गाभारा

प्रकार: 

वा ! अगदी मनापासून लिहिलंय केदार. फार्फार आवडलं

केदार,
आवडले. मला स्वतःला मंगेश पाडगावकरांचा 'बोलगाणी' हा संग्रह खूप आवडतो.

छान लिहिलंयस केदार..... मला पाडगावकर, खळे आणि लता मंगेशकर यांचं 'श्रावणात घन निळा बरसला' हे गाणं खूप आवडतं...

धन्यवाद सर्वांना. त्यांची सगळीच गाणी मला आवडतात.

मलाही बोलगाणी प्रचंड आवडतो! कंटाळा आला की वाचत बसायचं!
छान लिहीलाय लेख केदार.. आवडला..

किती छान, मनापासून लिहिलंस केदार..

मल पण बोलगाणी आवडतात. चिऊताई चिऊताई दार उघड...खूप आवडतं.
प्राजक्ता

कोणाकडे बोलगाणी ऑडीओ फॉर्ममध्ये आहे का? असेल तर मी विकत घ्यायला तयार आहे.
माझ्याकडे कॅसेट होती त्याची ६-७ वर्षापूर्वी. खूपच मस्त होती. कोणीतरी ऐकायला नेलेली परत दिलीच नाही Sad
नंतर कितीतरी वेळा त्यासाठी अलुरकरमध्ये आणि बाकी ठीकाणी चौकशी केली पण कुठेच बोलगाणी नाही मिळाली. कॅसेटची नवीन आवृत्ती काढलीच नाही असे सांगीतले गेले मला.
केदार, माफ कर तुझ्या जागेचा असा वापर केल्याबद्दल.

केदार छान लिहिलेस रे.. मला त्यांची जन पळभर म्हणतील हाय हाय ही कविता खूप आवडते. अगदी आजच्या दहशती वातावरणातही ही कविता कशी तंतोतंत लागू पडते. संध्या कर्णिक यानी त्यांची 'अंगणात उभी गाय' ही एक अत्यंत वेगळी कविता मला वाचायला दिली होती. तिचे रसग्रहणही केले होते. एकता च्या कुठल्यातरी अंकात आहे ती कविता आणि सोबत रसग्रहणही.

बी,
माझ्या माहितीप्रमाणे जन पळभर म्हणतील हाय हाय ही भा.रा. तांबे यांची कविता आहे.

हो गं रुनी तांब्याचीच आहे ही कविता.. पण मला ती आजवर पाडगावकरांचीच वाटत होती. तर्हीही हरकत नाही.. पाडगावकर माझे आवडते कवी आहेत.

`सलाम' सारखी जबरदस्त कविता लिहिणार्‍या पाडगावकरांना मानाचा `सलाम' .. :)..

माणसावर आणि जगण्यावर मनापासुन प्रेम करणारे कवी आहेत ते..

केदार छान लिहिलयस रे..

>>तर्हीही हरकत नाही.. पाडगावकर माझे आवडते कवी आहेत.
uhoh.gif

बी,
तुझी नसली तरी पाडगावकर आणि तांब्यांची हरकत असू शकते.. Happy

मस्तच रे केदार. छान लिहिलं आहेस. आवडलं ........ Happy

~~~~~~~~~~~~~~
ज्याची त्याची प्रश्नचिन्हे ...... Happy

पाडगावकर आणि तांब्यांची हरकत असू शकते. Lol

धन्यवाद सर्वांना.

पाडगावकर आणि तांब्यांची हरकत असू शकते. >>>

छे छे दोघेही म्हणतील बी वेडा आहे. त्याला माफ करा तो काय लिहितोय त्याला कळत नाहीयेय Happy

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

दहशतवादी हल्ल्यानंतर पाडगावकरांंचा उदासबोध अजुनच प्रासं्गिक झाला आहे हे आपले दुर्दैव.
नाही तरी त्या बीबी वर आपण सर्वजण 'आतला कडू विषाद हलका' करीत आहोत.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

छान लिहीलय, मस्त वाटलं अगदी. Happy
पण "ण" च्या जागी अनेक ठिकाणी "न" आलाय, ते बघाल का जरा? Happy