टाकाऊ डब्यापासून केलेली दीपमाळ आणि सजवलेल्या मेणबत्त्या .

Submitted by दीपांजली on 3 November, 2010 - 15:24

सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा !!.

पूर्वी एक ट्रेन्ड आली होती, ड्रेनेज चा कट केलेला पाइप विकत आणून त्याची दीपमाळ बनवायचा
टकाउतून टिकाउ च्या निमित्तानी हे सुचलं होतं पण यात टाकाउपेक्षा टिकाउ गोष्टी जास्त आहेत म्हणून हे दिवाळी साठी राखून ठेवलं :).

तर हा रिकामा डबा, हार्डवेअर स्टोअर मधून मिळाणारे ब्रॅकेट्स वापरून केलेला दीपमाळ बनवायचा प्रयत्न:
हा डबा:
can21.jpg

हे ब्रॅकेट्स:
can20.jpg

डब्याला ब्रॅकेट्स मेटल ग्लु नी चिकटवले.
नंतर विटकरी रंग देऊन कुंभाराच्या भट्टीतून काढल्याचा लुक दिला :).
पांढर्‍या थ्री डी पेंट्स ना कोन मधे वापरून सजवला.
पणत्या पण त्या कलर थीम मधे सजवल्या आणि ब्रॅकेट्स वर ठेवल्या.
काचेचा एक टी लाइट होल्डर पण विटकरी रंग देऊन सजवला, डब्यावर पालथा ठेवला ( आत मधे एक बॅटरी ऑपरेट टी लाइट ठेवला)., त्यावर एक पणती ठेवली.
can11.jpg

आणि हा फोटो टी लाइट्स, पणात्या पेटवल्यानंतरचा.

can13.jpg

दिवाळी निमित्त सजवलेल्या मेन्दी कॅन्डल्स.
(सगळ्या कॅन्डल्स मधे बॅटरी ऑपरेड फ्लेम आहे.)

can18.jpgcan19.JPGcan14.jpgdurga.jpgcan24.jpgcan17.jpg

गुलमोहर: 

Great!!! शब्दच नाहियेत.... अप्रतिम, सुंदर, सुरेख, हे शब्द आता गुळगुळीत झाले आहेत :)...
Deepanjali, Happy Diwali to you and your family...

ग्रेट!

अप्रतिम केलं आहेस गं!! खरोखर सुरेख..
डब्यावर स्प्रे पेंट नी पेंट केलंस का? मी कूकी टिन्स रंगवायचा प्रयत्न करत होते,acrylics नी,पण तो रंग direct मेटल वर बसत नाहीए.तू जरा सांगू शकशील त्या डब्यावर रंग कसा द्यायचा ते?विपू मधे लिहिलंस तरी चालेल.
धन्यवाद..

वृषाली,
स्प्रे पेंट नाही गं, विटकरी रंग फ्लॅट ब्रश नी दिलाय आणि पांढरं डिझाइन कोन मधे भरलेल्या थ्री डी कलर नी.
मी अ‍ॅक्रिलिक कलर च वापरलाय बेस ला आणि डब्यावरचा कागद काढून रंगवलय ते मेटॅलिक बेस वरच !
२-३ कोट दिले, पहिल्या कोट मधे रंग कधीच इव्हन येत नाही.
सगळ्यांना थँक्स.

मिनोती,
थँक्स :).
फोटो नक्की टाक केल्यावर, वॉलमार्ट हार्डवेअर मधे बघ ते ब्रॅकेट्स मिळतील.

ओह, टाकाउ गोष्ट शोधयचीये तर Proud
एखादा डबा रिकामा कर किचन मधला किंवा वाइन बॉटल कर रिकामी Wink
मी बॉटल वर पण करत होते पण फुटली ती, नशीब पॅटिओ मधे.

मेणबत्त्या सुंदर डिजे!! दिपमाळ पण आवडली. ब्रॅकेट्स मेटल इतके छान चिकटू शकतात हे कळले. आता प्रयोग करण्यात येईल.

रच्याकने, तू कधीतरी मला लिहिलं होतंस की कुर्तीवर मेंदी आर्ट काढण्याबाबत तू लिहिणार आहेस... ते कधी? Happy

Pages