दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

Submitted by लाजो on 31 October, 2010 - 23:15

दिवाळी धमाका - १

"कंदिल"

Picture.jpg

ओळखा पाहु कशाचा बनवलाय हा कंदिल????

Picture 013_0.jpg

------------------------------------------------

दिवाळी धमाका - २ - "फटाके"

http://www.maayboli.com/node/20942

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

http://www.maayboli.com/node/20986

--------------------------------------------------

उत्तरः

http://www.maayboli.com/node/21027

गुलमोहर: 

केक? लहान मुलांना खेळायला देतात तो क्ले?
तुझा काय भरवसा नाही... तु आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या वस्तु बनवतेस बाई.... Uhoh Proud
सांग की तुच पटकन ..

मला तो थर्माकोलच्या शीटचा असावा असेही वाटतय, पण तसा तो नाही, नैतर खरोखर लटकवला अस्ता! Happy
आडवा ठेवलाय नी प्लॅस्टिक शीट खाली वापरलाय म्हणजे काहीतरी गोड खाद्यपदार्थ असणार, जसे की (माहिमची) बर्फी किन्वा जेली वगैरे
पण अधिक बारकाईने बघितले अस्ता खाद्यपदार्थ नसावेत असेही वाटतय! विशेषतः खालच्या आडव्या चार पान्ढर्‍या गोलान्चे वर कडेला दोन ठिकाणी जी भोके दिस्ताहेत ती मेणारुन बुडबुडा निघाल्यावर जशी दिसतात तशि वाटताहेत. बहुधा गेल्यावर्षीच्या पणत्यातील शिल्लक मेणापासून बनवला काय की! Proud

मला वाटलं दिवाळीच्या फराळाचा करायला गेले गणपती आणि झाला मारूती असं काहीतरी लाजोचं झालंय आणि त्याचा फोटो टाकून गणपती आहे की मारूती ते ओळखायला लावतेय की काय Wink Light 1

लाजो मला तो केक वाटतोय...

काय बरं असाव???? :विचारात पडलेला बाहुला:

तु आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या वस्तु बनवतेस>>>>>>मंजुला अनुमोदन Happy

मंजुडी Proud

लाजो, हे तू केलेल्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगाच्या फलितांपासून बनवलय एव्हढ मात्र नक्की.

धन्यवाद लोक्स Happy

मंजुडी Proud

...स्वयंपाकघरातल्या प्रयोगाच्या फलितांपासून बनवलय<<< अम्या, ते मी फेलितांपासुन असे वाचले Lol

फराळ करतानातल्या उरलेल्या मैद्याचे त्रिकोण , चौकोन, पट्ट्या कापून तळून? रंगवले आहेत.
लाजोकडचं म्हणजे थर्मोकोलवगैरे असणं शक्य नाही. तिच्या घरी टाकाऊतून टिकावू असतं सगळं.

मी सांगू, टाकावूतून टिकावू आहे नं,

मग ते प्लअ‍ॅस्टिकच्या पिशव्या कापून रंगवल्या आहेत. शेपूट उरलेले पुड्ढे वापरून केलेले मटेरियल नीट निरखून पाहिले तर तसे वाटतेय.

Pages