पुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..
'भारद्वाज प्रकाशन' माझ्या वडिलांचं असूनही आणि पुस्तकांबद्दल प्रचंड ओढ असूनही - प्रत्यक्ष 'प्रकाशनाच्या' कामात माझा आजवर फारसा हातभार नव्हता. पण 'काहीतरी वेगळं करावसं वाटतंय' ह्या विचारानी जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागले, तेव्हा 'आता प्रकाशनाच्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारायची' असं ठरवलं.
हे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन आहे...पण लहानपणापासून परीक्षेला, कोणत्या स्पर्धेला जायला निघालं की बाबा सांगायचे "लढ बाप्पू...जा आणि बिनधास्त batting करून ये...आगे जो होगा देखा जायेगा".
हे प्रकाशनाचं काम हातात घेतलंय ते ही 'लढ बाप्पू..." या शब्दांच्या आधारावरच