न कळणार्या गोष्टी
आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?
आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?
आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
"अहो, तुमची पाहुण्यांची यादी झाली का तयार?"
"वेगळी तयार काय करायचीय? तू घे लिहून, मी सांगतो..."
"आता तेवढं एकच काम आहे का मलाऽऽ? सतरा व्यवधानं आहेत. लिहून घे काय? तुम्हीच लिहून द्या मला आज संध्याकाळपर्यंत."
"(आठ्या घालून) आजच्या आज??"
"ओरडताय कायऽऽ? तुम्हाला जराही गांभीर्य कसं नाही हो? वधूपक्ष आहे आपला. सगळी व्यवस्था चोख नको? घरच्या कामात लक्ष कमीच तुमचं पहिल्यापासून. मी आहे म्हणून चाललंय सगळं सुरळीत इतकी वर्षं...!"
----------
"अगं, तुझी पाहुण्यांची यादी दे माझ्याकडे. दोन्ही याद्या एकत्र करतो आणि आजच पत्रिका करायला टाकतो. तेवढंच तुझं एक मोठं काम होऊन जाईल."
पहिला भागः इंजिनीयरींगचा सोहळा-१-बारावी उवाच पण प्रवेश हवाच!
"अगं,इतकी काय घाबरतेस रॅगींगला? तो जस्ट एक भाग आहे कॉलेज लाईफचा..उलट रॅगींग नंतर नवीन मित्र-मैत्रीणी भेटतील तुला. सगळे हेल्पफुल असतात गं.. "
(आवाज बारीक करत)"आपण त्यांनी सांगितलेलं केलं तर.." इती दोन वर्ष इंजिनीयरींगला कॉलेजाळलेली माझी बहीण. आता ती स्वत: लोकांच्या रॅगींगची मजा घेत होती..पलीकडची तवान्यांची (कोण रे ते टवाळे म्हणतंय?) म्हणजे बिच्चाऱ्या फ़्रेशर्सची बाजु तिच्या लेखी नाही म्हटलं तरी निकृष्ट!
डिसक्लेमर : हे लिखाण माझे स्वतःचे नाही. जेव्हा मी काही वैयक्तिक कारणांमुळे नैराश्येच्या गर्तेत बुडालो होतो. तेव्हा माझ्या एका खास मित्राने मला एक मोटिवेशनल पुस्तक वाचायला दिले होते. ज्या लेखाने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला तो हा लेख आपल्याशी शेअर करीत आहो. आणि मी या अगोदर हा डिसक्लेमर टाकला नाही याबद्दल मी सर्वांची माफी मागतो.
:सुर्य:
* सुर्यापुढे कितीही दिवे काजवेच. त्यामुळे हा सुर्य घेऊन ठेवा. असुदे...
वयाबद्दल मला लहान वयापासुनच खुप कुतूहल वाटत आलंय. कारण सोपं आहे. अजुन ११ वर्षांचा होतो, तरी बसमधे कंडक्टर "हाफ? वय किती? फुल टिकीट लागंल." म्हणायचा. आणि त्याच क्षणी शेजारीच बसलेला मित्र "१३" व्या वर्षी पण चायला "एक हाफ द्या हो." म्हटला, की तोच कंडक्टर अगदी 'प्रसन्नवदने' वगैरे नसलं, 'मख्खवदने' जरी असलं, तरी 'गप्पवदने' तिकीट त्याच्या हाती द्यायचा...
आता 'वयाच्या मानाने मला समज जास्ती' असल्यानं मित्रांचं बिंग फोडलं नाही कधी. असो.
पावसाच्या नावाची माझी सखी होतीही पावसासारखीच. चंचल. लहरी. एक वर्षानेच मोठी होती तरी ताईगिरी आवडायची तिला. सखीचं घर कृष्णभक्तांचं. घरात सतत काहीतरी धार्मिक कर्मकांड चालत असायचं. सखीला मात्र ते आवडायचं नाही. तिच्या घरात 'तामसी' आहार चालायचा नाही म्हणून आम्ही आमच्या घरी लसणीची चटणी, कांदाभजी चापायचो ! सखीचे बाबा एक विक्षिप्त प्रकरण होतं. काकूंना खूप त्रास द्यायचे. अगदी मारहाणही चालायची. पण तरीही काकू मात्र सतत हसतमुख दिसायच्या. नवर्याचा उल्लेख 'प्रभूजी' असाच करायच्या. त्यामुळे सखीच्या मनात अजूनच चीड साठायची. बरं हे सगळे प्रकार मला सखीने कधीच नाही सांगितले.
मागच्या रविवारी अचानक गांवी जाण्याचा योग आला. अचानक म्हणजे अगदी अचानक, त्यामुळे रिझर्वेशन काही मिळाले नाही. रिझर्वेशन नसेल आणि हाताशी भरपुर वेळ असेल तर भुसावळ पॅसेंजर सारखी गाडी नाही. पावसाळी वातावरण होते. बर्याच दिवसांत पॅसेंजरने प्रवास केला नव्हता, बायकोनेही मोठ्या मनाने मला त्या गाडीची तिकिटं काढण्याची परवानगी दिली.
कल्याण स्थानकात वेळेवर तिकिटं काढायचे असेल तर एक दिवस आधी काढावे लागते. कारणं १२ महिने १३ काळ तिथे तिकिटांसाठी लांबच लांब रांगा असतात. बर्याच वेळा तर मी डोंबिवलीला जाऊन तिकिटं काढली आहेत. या अनुभवामुळे मी आदल्या दिवशीच तिकिटं काढुन घेतली होती.
ड्रीमगर्ल आणि मा.बो वर नसलेल्या माझ्या इतर मित्र-मैत्रिणींच्या अनुरोधाने इंजिनीयरींगचा सोहळा लेखणीने साजरा करायला घेत आहे. याल ना सगळे मज्जा करायला माझ्या बरोबर? 
काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ...