एका माणसाला किती कपड्यांची गरज असते? माझ्या आजीच्या शब्दांत सांगायचं तर 'एक दांडीवर आणि एक **वर' पुरेसे असतात.
पण खरंच तेवढेच पुरतात?
एका माणसाला किती कपड्यांची गरज असते? माझ्या आजीच्या शब्दांत सांगायचं तर 'एक दांडीवर आणि एक **वर' पुरेसे असतात.
पण खरंच तेवढेच पुरतात?
लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी....
त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.
पार्किंग म्हटलं की माझ्या नव-याला फार टेन्शन येतं…..अर्थात मी शेजारच्या सीटवर असले तर…!! कारण नेहेमी गाडीतल्या एयरकंडीशनरच्या थंडगार झुळकीने मला अगदी गाडीत बसल्या बसल्या लगेचंच गाढ झोप लागते. पण कशी कुणास ठाऊक….. पार्किंगची वेळ आली की आपोआपच जाग येते आणि माझ्या मेंदूत काहीतरी विलक्षण हालचाली होतात. बापडी मी त्या मेंदूच्या आज्ञेचं फक्त पालन करते. तर माझं काय चुकलं…!!
चोरवणे गावात छान आदरातिथ्य अनुभवल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी आम्ही छान ताजे-तवाने झालो होतो. माझा गुढगाही दुखायचा कमी झाला होता. एकदंरीत ट्रेक छान झाला होता. पण अजुनही म्हणतात ना तसे खाज कमी झाली नव्हती.
चोरवणे गावातून पुण्याला जाण्यासाठी आधी चिपळूण गाठावे लागते. गावातल्याच एका घरी पोहे आणि चहा हाणून एसस्टीत बसलो तेव्हाही असे वाटत होते की एवढ्या लवकर पुण्याला जायचे का.
माध्यानीला आम्ही चिपळूण एसस्टी स्थानकावर उतरलो. तिथल्याच एका त्यातल्या त्यात बऱया वाटणार्या हॉटेलात क्षुधाशांती केली आणि पुण्याला जाण्यार्या एसटीची वाट पहात बसलो. त्यावेळी आम्हाला गणपतीपुळे असा बोर्ड दिसला.
सकाळचे अकरा वाजले असतील्..मी कामात गर्क..काही अर्जट फाइल्स सम्पवायच्या होत्या आणि अचानक तो समोर उभा...स्क्रीन वरुन डोळेही न हलवता मी नेहमीचे "हाय्--हेलो" केले..तो नेहमीच्या मूड्मधे वाटत नव्हता आज..
"५ मिनीट है?" - तो
"ह्म्म...everything is ok?" - मी
"lets go outside" - तो
नेहमीप्रमाणे माझ्या टेबलवर अचानक धडकून इकड्च्या-तिकड्च्या गप्पा मारणारा, उत्साहाने सळसळणारा तो आज एकदम सिरियस वाटत होता...बाहेर जाइपर्यन्त हजारो विचार माझ्या मनात क्लिक होउन गेले....तो सुरु झाला...
"अरे यार्...समझ मे नही आ रहा है..."
मी बूचकाळ्यात्.."क्या हुआ..?"
महाराष्ट्र शासनाच्या नव्या सांस्कृतिक धोरणाची कसोटी
शासनाने नव्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा जाहीर चर्चेसाठी खुला केला आहे, याचे स्वागत व्हायला हवे. मसुदा प्रसिद्ध करणे ही केवळ एक औपचारिकता ठरू नये तर या मसुद्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि सूचना विचारात घेऊन अंतिम धोरण निश्चित केले जावे, अशी अपेक्षा आहे.
नशीब हे शिकलो – ४८ 22/12/2009
मायक्रोफिल्म सेवा कंपनीत मी १९९१ - ९२ काम केले. जून १९९२ पासून मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अर्थात परवाना ओमानी मित्राचा होता त्याचा १५० रियाल सहयोग हक्क दर महिना मी देणार होतो. इथून एक नवा अनुभव सुरू झाला. खिशात एक पैसा भांडवल नसताना परदेशात व्यवसाय कसा करायचा हे एकेक प्रसंगातून मी शिकत होतो. मला दर महिना ५०० रियाल कमावणे आवश्यक होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूत येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. मायबोलीकरांसाठी हा लेख :
सूर्याची सावली
गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला.
प्रिय पप्पा,
स. न. वि. वि. पत्र लिहण्यास कारण की, खुप दिवसापासुन काही गोष्टी मी सर्वांना सांगत आलोय, पण कोणीच ऐकत नाहीत. म्हणुन विचार केला, त्या बद्दल थोड स्पष्टीकरण देऊ. पप्पा मी आशा करतोय की आपण वडीलकीच्या नात्यापेक्षा थोडावेळ ’मित्र’ म्हणुन हे पत्र (पुर्ण) वाचाल !
होळी जळाली, थंडी पळाली की उन्हाचा प्रखर ताप जाणवू लागतो. हिवाळ्यात मऊसूत वाटणारे ऊन अंगाची कल्हई करू लागते. आणि पावले मग आपोआपच कुंभारवाड्याकडे वळतात. तऱ्हेतऱ्हेच्या आकाराचे, घाटाचे, मातीचे माठ तिथे तुमच्या प्रतीक्षेतच असतात. अगदी छोट्याशा मडक्या, सुगडांपासून ते गरगरीत डेऱ्यांपर्यंत आणि नळाच्या तोट्या असलेल्या सुबक घड्यांपासून ते उभट रांजणांपर्यंत वैविध्याने नटलेली ही मृत्तिकापात्रे तुमची तहान भागविण्यासाठी सज्ज असतात.