" how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो .
'काय ग कुठे मारामारी करून आलीस की काय? काय ते केसांचं टोपलं झालंय' मी घरात शिरल्या शिरल्या माझा अवतार बघून भ्राताश्री उद्गारले. 'ए, गप् बस हं' मी आरश्यासमोर उभी राहून टोपलं निरखत म्हणाले. 'काय पण देवाने केस दिलेत. बसमधून येताना जरा वारा लागला की चहूदिशांना पांगतात.'. 'पण ती अरुणा काय खुश होती तुझ्या जावळावर.' इति आईसाहेब. हा संवाद आमच्या घरात वर्षातून किमान ३ वेळा होतो. त्यामुळे आम्ही दोघांनीही 'कोण अरुणा' हा प्रश्न विचारला नाही. अरुणा माझ्या जन्माच्या वेळी मॅटर्निटी होममध्ये असलेली एक नर्स. ती राजेश खन्नाची जाम चाहती होती.
कालच ही अभिमानास्पद बातमी वाचायला मिळाली. वाचतांना असे वाटत होते की प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच घडते आहे.
पनवेलच्या दुर्गमित्र संस्थेचे अजय गाडगीळ आणि त्यांच्या मावळयांचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा.
खरोखरच असा विचार मनात आणून प्रत्यक्षात आणणे ही फार अभिमानास्पद कामगिरी आहे.
सौजन्य
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15036542.cms
अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा
या अधी १/२ ठिकाणी हाच लेख लिहिलेला असल्यानी,अता बरेच जण आमच्या या करंट मिसळचे चहाते/भक्त झालेले आहेत,इथेही लिहायच होतच,आज मुहुर्त लागला...तर ठिकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी


खरं सांगायचं तर खूप कंटाळा आलाय. खूप काही सांगायचंय, बोलावंसं वाटतंय खरं.... पण एक अक्षरही लिहवत नाही. भयंकर कंटाळा आलाय.