साहित्य

अद्दल...!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 24 March, 2024 - 00:45

अद्दल...!

'" नेमेची येतो मग पावसाळा... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..!!"

शिशिर गुरुजींच्या मधुर सुरात सगळ्या वर्गाच्या सोबतीने मी सुद्धा सूर मिळवला खरा पण कविता म्हणताना माझ्या पोटात भला मोठा खड्डा पडला. त्याचं कारण म्हणजे, पाऊस लागला रे लागला की, आमची बायो आयेच्या पाठी भूणभूण लावते.

" ए आये, यावर्षी तरी मला रंगी-बिरंगी फुलांची नक्षी असलेली छत्री घे ना गं..! माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे नवे रेनकोट , नव्या छत्र्या आहेत.. माझ्यापाशीच नाय गं..!!

विषय: 
शब्दखुणा: 

चल

Submitted by Meghvalli on 23 March, 2024 - 08:08

पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ

नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु

हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ

येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ

अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM

meghvalli.blogspot.com

मला सांगा

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 23:26

मला सांगा आयुष जे म्हणतात नक्की काय असतं ।
भुत-स्मरणं वर्तमान रमणं आणि भविष्य रंजनं असतं।।

प्रत्येकाला जे हवं हवंस वाटतं ते सुख मिळवणं म्हणजे तरी काय असतं।
आम्रवृक्ष छायेत नदी काठी शितल वाऱ्यावर नातवंडांना खेळवणे असतं।।

पटलं तर पहा हे दुःख-दुःख जे म्हणतात ते काय असतं।
सर्व असुन ही ज्यांत समाधान नसतं ते आणि काय असतं।।

जागा मध्ये जे प्रेम प्रेम म्हणतात ते तरी काय असतं।
दुसरं काही नाही अहंकार टाकुन तिथे समर्पण असतं।।

मला सांगा निवृत्ती म्हणजे तरी नक्की काय असतं।
मिळवले जे ते टिकणार नाही हे स्वीकारणं असतं।।

जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 23:19

जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे।
प्राची ला पहा तो नवसुर्य उगवतो आहे।।

तिमीर रात्र ती दुखांची सरली आता।
क्षितिजावर सुखाची लाली पसरत आहे।।

दिशा समृद्धी च्या तिष्ठत बघती वाट।
ध्रुवीय वारा मज हे आमंत्रण देत वाहे।।

मन घेई गरुड भरारी उंच आकाशात।
पंखात माझ्या निश्चयाचे बळ आहे।।

आकाशांत उडतो मी झुंज देत मेघांशी।
दृष्टीत तरी माझे ते इवले घरटे आहे।।

सोमवार, ११/०३/२०२४ , १२:२४ AM
अजय सरदेसाई (मेघ )

प्राची = पूर्व दशा
तिमीर =अंधार
ध्रुवीय वारा = पूर्वेकडून वाहणारे वारे

अमेय - भाग २

Submitted by हौशीलेखक on 20 March, 2024 - 21:29

नेहमीप्रमाणे आपल्याच तंद्रीत चालत अमेय शाळेतून घरी येतो, तर दाराला कुलूप! त्याला एकदम आठवतं, सकाळी आई म्हणाली होती 'आज दुपारी मेघाची डान्स प्रॅक्टिस आहे. मला बहुतेक उशीर होईल घरी यायला. तोपर्यंत वरती लेले मावशींकडे बस.'. त्याला खरं तर हे असलं दुसऱ्याकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही, शेजारी असले म्हणून काय झालं! कुक्कुलं बाळ का आहे तो आता? लेले मावशी तस्सच वागवतात त्याला अजून. नाईलाज म्हणून तो जिना धाडधाड चढून वरती जातो. मावशींनी बहुतेक त्याला रस्त्यातून येतांनाच बघितलं असणार, ब्लॉकचा दरवाजा सुद्धा उघडाच आहे. तो आत जातो, नेहमीच्या सवयीनी बॅकपॅक दाराशीच टाकतो.

विषय: 
शब्दखुणा: 

अमेय - भाग १

Submitted by हौशीलेखक on 19 March, 2024 - 21:59

'नेहमीचं आहे हे हिचं. फालतू गोष्टींवरून कटकट करत बसायचं, आईचं डोकं खायचं आणि मग निघायला उशीर होतो. धावत धावत जाऊन कशीतरी बस गाठायची.' घरातून बाहेर पडतांनाच अमेयच्या डोक्यात विचार चालले होते. त्याची धाकटी बहीण मेघा आज काही नाही तर लंच बॉक्स कुठच्या रंगाचा न्यायचा ह्यावरून हट्ट करत बसली होती. 'जेमतेम शाळेत जायला लागली नाही तर एवढे नखरे तिचे, उद्या मोठी झाली की काय ताप देईल' - उगाच नाही आई-बाबा बारा वर्षाच्या अमेयला आजोबा म्हणत! असलेच काही तरी खुळ्यासारखे विचार करत तंद्री लागलेली असते त्याची. त्याच्या वर्गातली मुलं सुद्धा त्याची टिंगलच करत, शिक्षक खोचकपणे टोमणे मारत.

विषय: 
शब्दखुणा: 

गजर

Submitted by पॅडी on 19 March, 2024 - 01:11

बीप-बीप..! बीप-बीप..!! बीप-बीप...!!!

गजर झाला अन त्यांची झोप चाळवली. नेहमीच्या सवयीने तिला जवळ ओढण्यासाठी, दुलईमधून हात बाहेर काढत, त्याने पलंग चाचपडला. तोपर्यंत डोळ्यांमधली झोप बरीच कमी झाली होती.

ती हाताला आली नाही.

अचानक; त्याला रात्रीचं कडाक्याचं भांडण आठवलं. मग साग्रसंगीत आदळआपट. थयथयाट. आरोप प्रत्यारोप. शेवटी , एकाच पलंगावर छत्तीसचा आकडा करून, एकमेकांपासून शक्य तितक्या अंतरावर झोपणे वगैरे त्याला सर्व आठवलं. सुस्पष्ट.

हात दुलईत खेचून तो ढिम्म पडून राहिला.

विषय: 

⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️ भाग 7

Submitted by मधुरा कुलकर्णी on 8 March, 2024 - 09:01

मागच्या भागात आणि या भागात खूप जास्त कालावधीच अंतर आहे हे मान्य आहे मला... थोडे व्यक्तिगत इश्युज सुरू होते त्यामुळे लेखनाला अजिबात वेळही मिळत नव्हता आणि लिंक सुद्धा लागत नव्हती आणि त्यामुळे बराच वेळ झाला झाला आहे त्याबद्दल क्षमस्व...

विकास

Submitted by पॅडी on 6 March, 2024 - 23:19

गाव- पांदीत पायाचा , आता उमटेना ठसा
सांदीकोपऱ्यात उभा , गाव रडे ढसाढसा ...

ओढ आटली; जिव्हाळा, नात्यातला हरपला
अंगणातला पिंपळ, उभ्या उभ्या करपला...

रस्ते डांबरट झाले, वीज उजळते गाव
मिणमिण कंदिलास, कवडीचे मोल भाव...

लेकबाळ माहेराला, सणासुदीला पारखी
मायमाऊली सचिंत, लागे उचकी सारखी...

चिल्या-पिल्यांचा गलका, नाही पदराशी झोंबी
चिंचा आवळे सुकले, गेली करपून ओंबी...

गुरावासरांचा गोठा; नाही हंबरत गाय
डेअरीच्या दुधावर, मेली येईनाच साय...

विषय: 

माझा लेखन प्रपंच!

Submitted by चिमण on 4 March, 2024 - 06:17

माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे.

Pages

Subscribe to RSS - साहित्य