साहित्य
पुन्हा एकदा..!
पुन्हा एकदा..!
अनवट घटनांनी भरलेल्या आपल्या आयुष्यात हे कधी ना कधी घडू शकते याची तिला पूर्ण कल्पनाच नाही तर खात्री होती. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. प्रचंड दुःख दाटलेलं तिच्या मनात .. पुन्हा एकदा रक्ताचं माणूस गमावलं होतं तिने...मात्र याक्षणी तिच्या दोन्ही डोळ्यांतले अश्रू पूर्णतः आटलेले ... तसंही लहानपणापासूनच त्यांना ओहोटी लागलेली होती. डोक्यात अनेक प्रश्न होते मात्र त्या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठपुरावा करावा असं तिला वाटत नव्हतं. तिच्या भावना बोथट झालेल्या तिच्याही नकळत.. !
अधांतरी
प्रेम आहे,
तुझ्यावर की प्रेमाच्या कल्पनेवर,
अजून कळायचे आहे.
ते उलगडेल कधी!
की मीच समजावीन स्वतःला,
माहीत नाही!
पण प्रेम नक्की आहे...? कदाचित...
हा प्रश्न आहे की उत्तर?
अजून उलगडायचे आहे!
पण छान वाटतं आहे,
कदाचित प्रेमाची कल्पनाच सुंदर असते.
संमोहन असते,
आणि असेच संमोहित राहावेसे वाटते...
अधांतरी...
सत्य उलगडले,
तर जादू हरवेल याची भीती.
म्हणून उत्तरापेक्षा प्रश्नच प्रिय वाटतो,
कदाचित....
गुरुवार, ११/६/२६ , ३:३० PM
अजय सरदेसाई -मेघ
सूर येती... , विरुन जाती..... .
सूर येती... विरून जाती...
सूर येती... विरून जाती...
उरतात कंपने,..वाऱ्यावरी...,
हृदयावरी...
सूर येती... विरून जाती...
कोण स्वामी... या स्वरांचा,
सूर कुठून येती?
संमोहीत ही धरा...
संमोहीत राने होती.
वेणूचे सूर पडताच कानी...
मन, हृदय विरघळले,
त्या सूरांवर पहुडून सारे—
वृंदावन विहरले.
सूर येती... विरून जाती...
सूरांचीs.. सुप्त स्पंदने,
सप्तचक्रांत वसली,
नाद अनाहत उठता...,
भुजंगिनी......
जागृत झाली॥
मंगलवार, ९/६/२६ , ८:५५ AM
अजय सरदेसाई -मेघ
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं तुझ्या डोळ्यांत सगळं दिसतंय गं,
त्या नजरेत स्वप्न तरंगतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं एकटीच का तू गुणगुणतेस गं,
श्वासांच्या भाषेत काही सांगतेस गं,
गालांवर उमललेलं फूल बोलतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं लपून तू कटाक्ष टाकतेस गं,
भेटीच्या क्षणी का बावरतेस गं,
डोळ्यांतलं हसू उघडं पाडतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
सखि मंद झाल्या तारका - माय व्हरशन
सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?
ही रात्र रुपेरी चांदणी,
भरली मनात देखणी.
उणीव फक्त येथे तुझी,
सांग, तू येशील का?
हृदयात आहे प्रीत तुझी,
पाहतात डोळे वाट तुझी,
मनात ओढ भेटीची,
ती तू पूर्ण करशील का?
तो चंद्र तुलाच शोधतो,
सांगण्यास गुज तिष्ठतो.
माझी स्थिती ना वेगळी,
सांग, तू कधी येशील का?
हा काळ वेळ स्वप्नवत,
मन तुझ्या प्रेमात रत.
मी वाट पाहतो तुझी,
सांग तू येशील का?
सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?
रविवार, ७/६/२६ , ८:३० PM
अजय सरदेसाई
तू माझ्या सोबत उभा रे
ध्रुवपद
कृपेचा हात तुझा मस्तकी, कृपादृष्टी माझ्यावरी,
भवसागर हा मी तरलो रे।
वादळे जरी घोंघावली, लाटा जरी उसळल्या भारी,
नाव माझी तुझ्यामुळे तरली रे।
डगमगली जरी ही नैया, भीती न मनी कणभर रे,
नावाडी माझ्या जीवाचा तू, माझ्या सोबत उभा रे॥
१
काळोख दाटून येता, वीजा नभी कडाडता,
तारे लपती मेघांच्या आड रे।
दिशाही हरवून जाता, वाटा धूसर होत जाता,
भरकटले मन दाही दिशांना रे।
अंतरी तुझी ज्योत जळे, मार्ग नवा उजळे,
दीप होऊन जीवनाचा तू, माझ्या सोबत उभा रे॥
तुला ते आठवेल का सारे ….. सुमनताई...... तुम्ही नक्कीच आठवणीत रहाल
तुला ते आठवेल का सारे ….. (कुणी तरी अनामिकाने खूप सुंदर लिहिलय हे)
हे गाणं सुरु होतं ते सतारीच्या एकामागून एक सुट्या-सुट्या वाजवल्रेल्या सुरांनी. त्यांतून निर्माण झालेल्या सुरावटीची पूर्तता होते ती आल्हाददायक जलतरंगाने, आणि पाठोपाठ सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातला काळीज कातरणारा प्रश्न कानावर पडतो: ‘तुला ते आठवेल का सारे’.
हा प्रश्न विचारणा-या युवतीच्या आठवणीतलं हे ‘ते सारे’ म्हणजे नेमकं काय हा विचार मनात येतोय, आणि ‘सारे’ म्हणजे बरंच काही घडून गेलेलं दिसतंय एवढं जाणवतंय, तोच त्याचा पोत सांगणारे शब्द येतात:
‘दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे’.
हा घाव दिलेला एका नाजूक फुलाने आहे : स्वच्छंदी
ह्या भळभळत्या जखमेचे हे हृदय दिवाणे आहे
हा घाव दिलेला एका नाजूक फुलाने आहे
मी मी म्हणणारा कोणी हे ठरवू शकला नाही
कोणाच्या खांद्यावरुनी कोणाचे जाणे आहे
मी फक्त पुढे आलेल्या शब्दांच्या ओळी केल्या
ही तुझी वेदना आहे.. हे तुझेच गाणे आहे
मानल्यास संधी आहे माणूस बनुन जगण्याची
नसता श्वासांचे केवळ हे येणे-जाणे आहे
कोणाच्या हृदयाला जर ही पाझर फोडू शकली
तर गझल....'गझल' आहे ही अथवा रडगाणे आहे
: महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
गुज बोलायचे आहे
तुझ्याशी गुज बोलायचे आहे,
मनातले सारे सांगायचे आहे।
डोळ्यांनी डिठी-डिठी,
न बोलताच सारे सा़धले आहे।।
ओठांवरी थांबले शब्द,
श्वासांत गाणे दाटले आहे।
तुझ्या अबोल सहवासात,
मन माझे हरखून गेले आहे।।
सांज उतरता वाटेवरती,
तुझी परतण्याची वेळ आहे।
तुझ्या डोळ्यांच्या कैदेतच,
दिवस सारा सरला आहे।।
हातात हात नसतानाही,
स्पर्श तुझा जाणवला आहे।
अंतर कितीही असले तरी,
धागा मनांचा जुळला आहे।।
"मेघ" अजूनही न बोलता,
किती काही उमगले आहे।
गुज बोलण्याआधीच रे,
प्रेम मनाशी जडले आहे।।