paragkan यांचे रंगीबेरंगी पान

तिरळे

उधाणते नजर मावळतीला अन
स्मरणओली वेळ विसावते पापण्यांकाठी
... क्षितिजावरच्या भेटीगाठी!
------------------------------------------

अर्थास शब्द माझा पारखा
उरलो न मी माझ्यासारखा
... तडकलेला आरसा ?

तिरळे

मृत्योर्मा अमृतं गमय |
प्रार्थनेपाशी तर्काचा विलय
ॐ शांति: शांति: शांति: |

***************************

तू उंबरठ्याशी - नसूनही असल्यासारखी
मात्र अवघ्या घरा-अंगणाला पडली तुझी भूल
तू कर्दळीचे फूल ...

चुकुन-चुकुन

आज बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा इंदिरा संतांचं 'गर्भरेशीम' चाळायला घेतलं. बहुतेक पहिल्यांदाच, अगदी माझ्याही नकळत मी ते 'वाचायला' लागलो.

बाबा .......

ऐकलं आहे
निखळणार्या तार्याकडे मागितलेलं मागणं नक्की मिळतं.
तसा माझाही विश्वास नाही अंधश्रद्धांवर
पण कधी कधी तो आधारही अश्रूमोलाचा ठरतो

आज इतकंच मागणं त्या निखळणात्या तार्याकडे -

बर्‍याच दिवसांनी एक प्रयत्न .. (तिरळे)

घर सजलं
अंगण भिजलं
... पावलांची प्रतीक्षा !

*******************

तानपुरा आणि ती -
तत्सूर ...
विधात्या, नाहीच कुठे कसूर !

******************

पंडितजी गायले .......

'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल.

तुला पाहिली

तुला पाहिली,
ऐनवेळी सांजसड्यावर
अभावितपणे उजव्या पायाचा अंगठा मुडपून माती कोरताना,
अन् तश्शीच .... त्या अज्ञात वाटेवर भिरभिरत होती
तुझी अधीरविव्हल नजर.

आजही पुन्हा ऐनवेळी
ती वाट सापडत नाहिये मला.