'वैतागवाडी' आणि 'राडा' - भाऊ पाध्ये
Submitted by साजिरा on 2 July, 2012 - 06:57
'भाऊ पाध्ये' या नावापाठोपाठ 'वासूनाका' हे नाव जोडूनच माझ्या मनात कायमच येत गेलं आहे. महानगरांतली पात्रं, त्यांचे व्यवहार, त्यांची नाती, त्यांची लैंगिकता मोठ्या ताकदीने आणि धाडसाने रेखाटणार्या या कलंदर लेखकाने भाराभर नसल्या तरी मोजायला दोन्ही हातांची बोटं लागावीत इतक्या तरी कादंबर्या लिहिल्या. पण या सर्वांत 'वासूनाका'ने त्यांना बरंच काही दिलं. प्रसिद्धी, वाद, मानहानी हे तर दिलंच, पण स्वतःच्याच शैलीचं, कुवतीचं भान आणि शिवाय अस्सल महानगरीय व्यवहार तसेच्या तसे कागदावर उतरवण्याचं धाडस त्यांना या पुस्तकाने दिलं असं वाटतं.
विषय:
शब्दखुणा: